भाग १पहाटेचे चार वाजले होते . रस्ता पुर्ण सामसुम होता. भटकी कुत्री सुद्धा नव्हती रोडवर. टाचणी जरी पडली तरि आवाज येईल इतकी भयानक शांतता होती. काय माहिती का पण अशी शांतता नेहमीच प्रिय असते. तसं तर ती रात्रीच घराबाहेर पडताच नव्हती पण आज कारण अचानक आलं होतं. " माझ्या आजच्या सकाळच्या appointments जरा पुढे ढकल. मी उशीरा येईन . " आपल्या हाताखालच्या नर्सला सुचना देऊन ती निघाली. अंगातला कोट काढून तिथेच ठेवला. केस क्लचने वर बांधून टाकले. तीने गाडी हॉस्पिटलच्या पार्किंगमधून काढली आणि रिकाम्या रस्त्यावर speed मध्ये पळवायला लागली. मज्जा वाटते अशा शांत रोडवर आपण एकटेच, ना कोणाच्या हॉर्नचा आवाज, ना

Full Novel

1

दोन टोकं... भाग १

भाग १पहाटेचे चार वाजले होते . रस्ता पुर्ण सामसुम होता. भटकी कुत्री सुद्धा नव्हती रोडवर. टाचणी जरी पडली तरि येईल इतकी भयानक शांतता होती. काय माहिती का पण अशी शांतता नेहमीच प्रिय असते. तसं तर ती रात्रीच घराबाहेर पडताच नव्हती पण आज कारण अचानक आलं होतं. " माझ्या आजच्या सकाळच्या appointments जरा पुढे ढकल. मी उशीरा येईन . " आपल्या हाताखालच्या नर्सला सुचना देऊन ती निघाली. अंगातला कोट काढून तिथेच ठेवला. केस क्लचने वर बांधून टाकले. तीने गाडी हॉस्पिटलच्या पार्किंगमधून काढली आणि रिकाम्या रस्त्यावर speed मध्ये पळवायला लागली. मज्जा वाटते अशा शांत रोडवर आपण एकटेच, ना कोणाच्या हॉर्नचा आवाज, ना ...अजून वाचा

2

दोन टोकं. भाग २

भाग २ let me love you ची instrumental रिंगटोन वाजत होती." काय यार, झोपू पण देत नाहीत .एकतर झोप रात्रभर आणि त्यात फोनचा सकाळी सकाळी भोंगा. " " कोण आहे ?? ? " अस्सल पुणेकराने बोलावं तसं ती म्हणाली. " अं......... मॅम तुम्ही कधी येणार आहेत ?? " हॉस्पिटलमधून फोन आला होता. " आता यायचय का ?? " तीने रागातच विचारलं. " अंं........ म्हणजे ते........ " " ए बाराखडी म्हणून झाली असेल तर पुढे बोल. डोक्यात जाऊ नको. " " येऊ शकत असाल तर बघा ना प्लीज. " " बर येते. " आणि तसाच फोन जोरात तीने बेडवर आपटला. उठून आवरून निघाली ती. गाडी बंद पडलेल लक्षात ...अजून वाचा

3

दोन टोकं. भाग ३

भाग ३ विशाखा तर घरी जाऊन तिचाच विचार करत बसली होती पण हॉस्पिटलमध्ये तर हाहाकार माजला होता. पंडितने कसंबसं माणसाला handle केलं आणि त्याच्या बायकोचं बाहेर काढलेल सामान पण आत नेऊन ठेवलं. तेवढ्यात प्रीती आली पळत पळत , " सर..... सर..... सर..... " " मागे तर कोणच दिसत नाहीये ? " - डॉ. पंडित" काय ? " " अगं मला वाटलं मागे कुत्र लागलं की काय पण कोणच नाहीये मागे..... ?? " " ?? " " खराब होता का ?? जाऊदे, बोल एवढ पळत का आलीस ?? " " सर, मॅम असं अचानक शांत कशा झाल्या, I mean तुम्ही काय बोललात असं की मॅमनी त्यांचा डिसीजन चेंज केला...... ...अजून वाचा

4

दोन टोकं. भाग ४

भाग ४ विशाखा घरी येऊन आवरून पटकन झोपून गेली. एकटीच राहत होती, घरी काम करायला आणि जेवण बनवायला काकु त्याच सगळं काम करायच्या. त्यांनी बनवलं की खायचं नाहीतर उपाशी झोपायच. कारण तीला काही बनवताच येत नव्हतं, ना कोणी शिकवलं आणि ना कधी हीने शिकण्याचा प्रयत्न केला. स्वभावही तसाच चिडचिडा आणि रागीट पण एकदम बिनधास्त. रागाला आली की मग समोरच्याच काही खरं नसायचं. तीला तीच्याच आश्रमातल्या मुली घाबरायच्या. तेच त्याच्या विरुद्ध सायली..... स्वभावाने नेहमी हसरी, शांत, कधीच रागाला न येणारी, घरातील प्रत्येक काम करणारी. प्रत्येकाशी मिळून मिसळून राहणारी. पण नेहमी वडिलांच्या धाकात वावरणारी, सतत मनावर त्यांचं दडपण घेऊन जगणारी.‌ उद्या दिदीला डिस्चार्ज देणार म्हणल्यावर ...अजून वाचा

5

दोन टोकं. भाग ५

भाग ५ विशाखाने आता परत भेट होईल ही आशाच सोडली होती. ती आधी जिथे जिथे भेटली होती त्या जागा घातल्या होत्या. मनात वाटायचं की आज तरी चुकून भेट होईल पण झालीच नाही. शेवटी तीने ही तो नाद सोडला. आता परत विशाखा तिच्या लाईफ मध्ये बिझी झाली. हॉस्पिटल, घर आणि आश्रम या तीन जागांभोवतीच तिचं जग फिरत होतं. सायली च ही तेच झालं होतं. तिला भेटाव पण वाटत होतं आणि भेटू नये असं पण वाटत होतं. सायली तर इतकं घाबरलेली होती की दुकानात जाताना सुद्धा ती चुकुन समोर येऊ नये म्हणून बघत बघत जायची. आज आधीच उठायला उशीर झाला होता त्यात सकाळी सकाळी ...अजून वाचा

6

दोन टोकं. भाग ६

भाग ६ माझ्या सोबत ह्या बॅग घेऊन येणार का ?? असं विशाखा ने विचारलेल्या बरोबर सायली उडाली. " कोण ?? " " नाही नाही. तु नाही. त्या दुकानदाराला विचारलं ? "" सॉरी पण म्हणजे असं अचानक असं ना. आणि अजून माझी खरेदी व्हायची आहे. " " मग जा करून ये. तोपर्यंत मी इथेच थांबते. हां पण पळून नाही जायचं . जा जाऊन ये पण प्लीज जरा लवकर ये. हवं तर मी परत तुला तुझ्या घरी ड्रॉप करेन. "" ओके. मग थांबा तुम्ही इथे मी आलेच. " असं म्हणून सायली गेली. विशाखा सगळ्या बॅग सांभाळत तिची वाट बघत बसली होती. तब्बल दोन तासांनी सायली ...अजून वाचा

7

दोन टोकं. भाग ७

भाग ७विशाखा‌ आता चांगलीच बिझी दिली होती. में महिना, सगळ्यांना सुट्ट्या पण तरीही नेहमीपेक्षा पेशंटस् जरा जास्तीच होते. स्वत:च्या कामातुन वेळच मिळत नव्हता. आता सकाळी ८ ला हॉस्पिटलमध्ये गेले की रात्री १० - ११ वाजायचे तिला घरी यायला. जवळपास पुर्ण आठवडा ती आश्रमात सुद्धा गेली नव्हती. आज शनिवार होता, तसं पटपट काम उरकुन ती आश्रमात जाणार होती कारण काका चांगलेच भडकले होते तीच्यावर. तेवढ्यात काकांचाच फोन आला, तो उचलायचा की नाही याचा विचार करेपर्यंत तर फोन वाजून कट झाला. आपण करायचा तर शिव्या मिळतील त्यापेक्षा थोडा वेळ थांबलं तर काकांचं परत करेल म्हणून ती वाट बघत होती पण नंतर काही फोन ...अजून वाचा

8

दोन टोकं. भाग ८

भाग ८ आता हे नेहमीचच झालं होतं. सकाळी आणि रात्री झोपायच्या आधी बोलल्याशिवाय विशाखा आणि सायली दोघींना चैन पडायचा सायलीचही अकरावीला अॅडमिशन झालं होतं. त्यामुळे कधी कधी तिला वेळच मिळायचा नाही विशाखाला बोलायला आणि बोलणं नाही झाल तर दोघींना पण काहितरी चुकल्यासारखं वाटायचं सतत. विशाखा आता सायलीच ऐकून दिवसातून एकदातरी काकाला फोन करायचीच. त्यामुळे काका पण खुश होता ?. प्रत्त्येक शनिवारी थोडा वेळ का होईना पण सायली आश्रमात यायचीच आणि तिला भेटायला दर शनिवारी विशाखा हाफ डे टाकत होती तर कधी एक दोन तासच जायची हॉस्पिटलमध्ये. ह्या सगळ्या एक गोष्ट प्रकर्षाने बदलत होती ती म्हणजे विशाखा च वागणं. तीचा चिडचिडेपणा आता बराच कमी ...अजून वाचा

9

दोन टोकं. भाग ९

भाग ९ विशाखा तशीच तणतणत हॉस्पीटलला आली. पंडितने तिला टेन्शनमध्ये जाताना बघितलं होतं आणि आता आली तर रागात ते प्रीतीने सुद्धा बघितलं पण मॅमला विचारलं तर परत ओरडतील म्हणून ती पंडित कडे गेली. " डॉक्टर, मॅमला काय झालंय ?? म्हणजे जाताना एकदम टेन्शनमध्ये होत्या आणि आत्ता आल्यात तर रागात आहेत. " प्रीतीने पंडितला विचारलं. " ते मला कसं माहिती असणार प्रीती बाई. " " ईईईईईईईई बाई नका म्हणु डॉक्टर प्लीज ???. पण तुम्हाला माहिती असतं ना नेहमी म्हणून तुम्हाला विचारलं. " " नाही मला आज काय झालंय काहिच माहिती नाही प्रीती ........... बाई ? " मध्येच एक पॉझ घेत बाई म्हणाला आणि तिथुन पळून ...अजून वाचा

10

दोन टोकं. भाग १०

भाग १० दुसऱ्या दिवशी परीला मस्त नवीन ड्रेस घातला, बांगड्या घातल्या. गजरा लावला. परी सोबत सगळेच नटले होते. मग नटल्यावर फोटोशुटचा कार्यक्रम तर झालाच पाहिजे ना ?. सगळ्या जणी भरपुर पोझ देऊन फोटो काढत होत्या. विशाखा एकटी होती जी नटलीही नाही आणि फोटो काढिला पण गेली नाही. सायलीच जवळ येऊन म्हणली, " सगळ्यांनी छान छान ड्रेस घातलेत मग तुला काय प्रॉब्लेम आहे ?. " " मला आवडत नाही ? " मोबाईलमधलं डोक वर न काढता विशाखा ने उत्तर दिलं. " आवडत तरी काय तुला ?. शॉपिंग नाही आवडत, मेकअप नाही आवडत, नटायला नाही आवडत........ मग आवडत तरी काय ?? " " झोपायला ??. प्रचंड आवडतं ...अजून वाचा

11

दोन टोकं. भाग ११

भाग ११विशाखा आश्रमात फक्त शनिवार आणि रविवारीच जायची. आणि सायली शनिवारचा पुर्ण दिवस तिकडेच असायची. तसं तर सुट्टी की सगळ्याच पोरी सकाळी ८-९ पर्यंत झोपायच्या. आज सकाळी सकाळीच काकाने सायलीला कॉल केला. सायली कॉलेजला अॅडमिशन घ्यायला गेली होती. काकाचा कॉल कट करून त्याला मेसेज केला की नंतर कॉल करते. मग पटपट अॅडमिशनच काम करून तिकडे गेली. ती पोहोचली तेव्हा दहा वाजत आले होते. घरात जाऊन बघितलं तर सगळं सामसुम. काका सोडलं तर कोणच दिसत नव्हतं. " इतना सन्नाटा क्यों है भाई...... " सायली ने घरभर नजर फिरवत विचारलं. " एक जण उठलं नाही. सगळे झोपलेत. " " काय ?. दहा वाजायला आलेत ...अजून वाचा

12

दोन टोकं. भाग १२

भाग १२ विशाखाला काहीच कळायला मार्ग नव्हता. तिचं स्वप्न खरं होतं की काय याची भिती वाटायला लागली होती. दोघांनी खरंच जर मुलं बघायला सुरू केलं तर ?....... नाही नाही. मी हे होऊच देणार नाही. हे सगळं स्वप्नच असणार. इतकं चांगलं दोघं माझ्याबद्दल कधीच बोलणार नाहीत ?, बोललं तरी स्वप्नात बोलतील फक्त. विचार करता करता बाहेर बघत होती तर लक्षात आलं आज आभाळ पुर्ण भरून आलं होतं. ते आभाळ बघुन आपोआप तिचा चेहरा खुलला. लहानपणापासूनच पाऊस प्रचंड आवडायचा. आता जर पाऊस पडला तर मस्त गरमागरम कांदाभजी आणि वाफाळलेला चहा घ्यायचा. सायलीला पण घेऊन जाते, असं म्हणून फोन करायला फोन हातात ...अजून वाचा

13

दोन टोकं. भाग १३

भाग १३विशाखा सायलीसोबत राहुन राहुन बरीच शांत झाली होती. पण मागच्या आठवड्यापासून जरा तीची चिडचिड वाढली होती. आणि टेन्शन काकाने घेतलं होतं. कारण मनातलं असं पटकन बोलुन दाखवण‌ विशाखाचा स्वभावच नव्हता. ती फक्त समोरच्यावर रागवून मोकळी होते पण मनातला त्रास बाहेर नाही काढत. आणि काका सारखं रागवु नको म्हणतो म्हणून तीने आश्रमात यायचं बंद केलं. आता घरीच रहायला लागली. मागचा एक आठवडा विशाखा फिरकलीच नाही. काही कळायला मार्ग नव्हता शेवटी काकाने सायलीला फोन केला, " हां बोला ना काका. काय झालं ?? " " काही नाही. जरा बोलायचं होतं तुझ्याशी. " " आपण नंतर बोलुयात का ?? आत्ता मी थोडं बिझी आहे. " " ...अजून वाचा

14

दोन टोकं भाग १४

भाग १४ आश्रमात आली तर चांगलाच बाहेर अंधार पडला होता. पोरी जेवण करून वर टेरेसवर अंथरूण घालून तिथेच गप्पा बसल्या होत्या. विशाखा घरात आली त्यावेळी तिला कोणच दिसलं नाही फक्त काका तेवढं किचन आवरत होता. ती सावकाश पावलं टाकत त्याच्या मागे जाऊन थांबली. " आज खुप दिवसांनी दर्शन दिलं. कसं काय या पामरावर आपली कृपा झाली ?? " त्याच काम करता करताच त्याने विशाखाला विचारलं. " तुला असं कळलं मी आले ते ??? मी तर एकदम हळु हळु आले, ते पण आवाज न करता. " " गाडीचा भोंगा मग काय मी वाजवला होता. " " ओह ??. तरीच म्हणलं तुला कसं कळालं. " " जेवायचं ...अजून वाचा

15

दोन टोकं. भाग १५

भाग १५ विशाखा गाडी घेऊन सायली कडे लगेच निघाली. गाडीवर जाताना पण एकटीच बडबडत होती ती. " आता जाते चांगलीच झापते. मला ignore करते काय. हलवा आहे का ?? मी काय गुत्त घेतलंय तिला समजून घ्यायचं. हा काका काहिही बडबडेल पण म्हणून काय त्याच ऐकत बसु काय मी. हम हम है. आता जाते आणि डायरेक्ट कॉलर पकडते आणि सांगते. अरे पण ती तर कॉलर वाले ड्रेस नाही घालत. हां, कानाखालीच मारते तीच्या आणि मग सांगते तीला. की एएए हे बघ. जे कोणी नवीन येईल त्यांना आपल्यापासून दूर ठेवायचं. आणि दुस-यांमुळे मला दुर्लक्ष करायचं नाही. " विशाखा स्वत:शीच बडबडत सायलीच्या ...अजून वाचा

16

दोन टोकं. भाग १६

भाग १६ विशाखा घरी आली तसं काका तीच्या मागे - पुढे करत होता. ती घरात येऊन चावी जागेवर ठेवुन त्याने तीच्यासमोर प्रश्नावली उघडली होती. काय झालं ?? काय म्हणले तुला ते ?? तु त्यांच्या बोलण्याच टेन्शन नाही घेतलं ना ?? आणि निघाली तर मगाशीच होती मग किती वेळ लावला ?? कुठे होती एवढा वेळ ?? सांगितलं होतं ना नको जाऊ तरी का नाही ऐकलं माझं ?? मी कधीचा फोन करत होतो, उचलला का नाही ?? सायलीचे पण फोन नाही उचलले तु. ठीक आहेस ना तु ?? " का.....का..... " एकदम मोठा सुर लावत विशाखा म्हणाली. " मी ठीक आहे पण आता तु अजुन ...अजून वाचा

17

दोन टोक. भाग १७

भाग १७विशाखा कॅब बुक करतच होती की मागुन आवाज आला, " अरे रडकु तु इकडे " मागे वळुन बघितल समोर आकाश. " तु काय माझा पाठलाग करत असतोस का रे ?? नेहमी कसा समोर येऊन टपकतोस ?? " " एक बाई मी का तुझा पाठलाग करेन ?. जाताना दिसलीस म्हणून हाक मारली. पण तु काय करतीयेस इथे एवढ्या रात्री ?? " " मी घरी जात होते पण गाडी बंद पडली म्हणून थांबले. " " ओह पण गाडी कुठे आहे ?. मला तर वाटतंय की तुच माझा पाठलाग करतीयेस. " " गाडी मेकॅनिक घेऊन गेला. आणि मी का तुझा पाठलाग करू ? ?? " " ते तुलाच माहिती ...अजून वाचा

18

दोन टोकं. भाग १८

भाग १८ सायली सकाळी सकाळी घरी आली. " विशाखा..... विशाखा...... विशाखा..... " आत येतानाच ती ओरडत ओरडत आली, तीच्या काका बाहेर आला. " काय गं ?? एवढ्या लवकर कसं काय ?? " " विशाखा कुठे आहे ? " " कुंभकर्ण अजुन झोपलाय. इतक्या लवकर उठते का ती ?? " " अजुन झोपलीये ? ?? काय पोरगी आहे ही ??"" का गं ?? काय झालं ?? " " अरे मी काल कॉल केला तेव्हा निघाली हॉस्पिटलमधून. मला म्हणाली घरी गेल्यावर करते आणि केलाच नाही. मी वाट बघत बसले होते की ती कॉल करेल म्हणून ? " " अच्छा. तरी रात्री जरा उशीरच झाला तीला यायला. साडे अकराच्या दरम्यान ...अजून वाचा

19

दोन टोकं. भाग १९

भाग १९ पंडितने तो मुलगा काय बघतोय हे बघायला आत वाकुन पाहिल तर विशाखा टेबलवर हात ठेवून, त्यावर डोकं गाढ साखरझोपेत घोरत होती. तीला तसं बघुन पंडितने तर डोक्यावरचं हात मारून घेतला ?. जवळ जाऊन तीला उठवलं, " मॅम........ मॅम...... " हाक मारली पण विशाखा ढिम्म. पण तो हँडसम मुलगा तीला तसं बघुन हसायला लागला. पंडितने रागाने मागे त्याच्याकडे बघितल तर तो गप्प बसला. पण जसं ह्याने पुढे बघितलं तसं तो परत हसायला लागला. आणि ते पण मोठमोठ्याने हसायला लागला. " ही...... ही.... आत्ताच.... आली....ये .... ना.. तरी.... झो...पलीये.... ?? " हसता हसता त्याने विचारल आणि परत हसायला लागला. इतका हसत होता की ...अजून वाचा

20

दोन टोकं. भाग २०

भाग २० आकाश विशाखाला सोडुन घरी आला. आईने बघितलं तर गाणं गुणगुणत हातात चावी फिरवत हसत हसत येत आईला बघुन ब्रेक मारल्यासारखा थांबला. तीला बघुन हसला तरीही आई त्याच्याकडेच बघत होती. " काय झालं ?? असं का‌ बघतीये ? " चेहऱ्यावर कशीबशी स्माईल ठेवत त्याने विचारल पण मनात धाकधूक ही होती की ही अशी काय बघतीये ?. " काही नाही. बघतीये की आजकाल जरा जास्तच खुश आहेस नाही का ? " " कोण मी ?? " " नाही तो शेजारचा पिंट्या. " " सॉरी मला विचारलं म्हणजे मीच असणार ना ?"" इतकं कळतंय तर कशाला विचारावं ? " " अरे मी तर नेहमी हॅप्पी असतो, माहिती ...अजून वाचा

21

दोन टोकं. भाग २१

भाग २१ हळुच दार उघडलं आणि सायली आत आली. विशाखा झोपली होती. तीने लाईट लावली आणि विशाखाच्या जवळ येऊन झोपेत ते कापसाचे बोळे तीच्या डोक्याखाली गेले होते. सायली ने हळुच ते उचलुन कच-याच्या डब्यात टाकले. आणि तीच्या डोक्यावरून हात फिरवला. हात लागला तशी विशाखाची झोप चाळवली आणि तीने डोळे उघडुन बघितलं तर समोर सायली. विशाखा जोरात दचकली आणि ओरडली, " आ..... " " ए..... गप ना. ओरडायला काय झालंय. ? " तीच्या तोंडावर हात ठेवत सायली म्हणाली. " तु इथे काय करतीयेस ?? " उठुन बसत तीने विचारलं." मी नेहमीच येते. त्यात नवीन काय ? " " हो पण पहाटेचे चार वाजलेत. कळतंय का ?? ...अजून वाचा

22

दोन टोकं. भाग २२

भाग २२ विशाखा पटपट आवरून बाहेर आली आणि सोफ्यावर उडी मारली," काका....... काका....... "काका हातात प्लेट घेऊन बाहेर " घसा फाडण्यात येऊ नये. नाष्टा आणलेला आहे. " " ओह थँक्यु काका ☺️ . आय लव्ह यु काका ? " " ??? " " काय झालं असं बघायला ☹️ " " तेच मी तुला विचारायला पाहिजे की काय झालंय तुला " " मला ? . मला कुठे काय .. काहीच तर नाही. " " मग एवढं गोड गोड का बोलतीये ? " " गोड गोड म्हणजे ? " " सवय नाहीये गं बाई असं गोड गोड ऐकण्याची. ४ शिव्या दे पण असं नको बोलत जाऊ. धडकी भरते मला. " " ?? ...अजून वाचा

23

दोन टोकं. भाग २३.

भाग २३ सायली ओरडली तशी सगळे आजुबाजुचे तीच्याकडे बघायला लागले. " Are you okay ? " शेजारच्या माणसाने तीला विचारलं. " तु तुझं खा ना. तुला काय करायचय ? " सायली त्या माणसाला म्हणाली आणि रागाने विशाखा कडे बघायला‌ लागली." Wow. insaneness ?? " आकाश हसत हसत म्हणाला. " ओय हॅलो, असं काही नाहीये हां. " विशाखा आकाशकडे बघत तोंड वाकडं करत त्याला म्हणाली. " अच्छा मग कसं आहे ?? आणि विषय बदलला बरं का तु ?. खरं खरं सांग, माझा पाठलाग करत होतीस ना ?. " " नाही, मी का तुझा पाठलाग करू ?? ? " " अच्छा मग इथे काय करतीयेस ? " " मी ...अजून वाचा

24

दोन टोकं. भाग २४

भाग २४ आकाश विशाखाला घेऊन निघाला आणि गाडी बरोबर एका मोठ्या हॉस्पिटलसमोर येऊन थांबली. त्याने एक नजर विशाखा कडे तर ती अजुनही गुंगीत होती. तीच्या जवळ जाऊन तीच्या गालाला हात लावत आकाश म्हणाला, " सॉरी. तुला इथं आणायला गुंगीचे औषध चहात टाकावं लागलं मला. तुला असं बघवत नाही ना म्हणून हे करतोय bcz I care for u. " तो बोलणार होता तेवढ्यात त्याचा फोन वाजला. त्याच माणसाचा मेसेज होता, " लग्न झालं की आयुष्य भर बोलत बस आता तीला आत घेऊन ये. " त्या माणसाचा मेसेज वाचुन आकाश लाजला. विशाखाला बघुन हसला आणि तीला परत दोन्ही हातांवर घेऊन आता गेला. अपॉईंटमेंट आधीच घेतलेली होती त्यामुळे तीला घेऊन ...अजून वाचा

25

दोन टोकं. भाग २५ ( शेवट )

भाग २५ " म्हणजे " काका आणि आकाश पुर्ण थक्क झाले होते. आपण काय ऐकतोय आणि ऐकतोय ते खरं का हेच त्या दोघांना कळत नव्हतं. " म्हणजे सोप्या भाषेत सांगतो. विशाखा एक डॉक्टर आहे. बरोबर ?? " " हो " आकाश आणि काका एकदमच म्हणाले आणि एकदम अवघडले. " हां, तर ती तीच्या दिवसातला जास्तीत जास्त वेळ पेशंटस् आणि हॉस्पीटल मध्ये घालवते. " " हो " काका म्हणाले यावेळी मात्र आकाश गप्प बसला. " ती रिकाम्या वेळेत काय करते ?? " डॉक्टरांनी प्रश्न विचारल्यावर आकाश आणि काका दोघ एकमेकांकडे बघायला लागले. कारण त्याच उत्तर दोघांकडेही नव्हतं. " ती रिकाम्या वेळेत हे असं स्वतःच जग बनवते. आपण ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय