माणूस देवाला प्रत्यक्ष भेटू शकत नाही . देवाची महती जाणुन घेणे अथवा त्याचा कृपा प्रसाद घेणे यासाठी कोणी मध्यस्थ आवश्यक असतो . हे काम संत करीत असतात . समाजाला भक्ती मार्गाला लावणे जेणे करून समाजमन बळकट होईल . आयुष्यातील संकटांचा सामना करू शकेल यासाठी संत पुढाकार घेत असतात . संत हे समाजातच असतात पण आपल्या कामगिरीमुळे ते सामान्यातून संतपदी विराजमान झालेले असतात .

Full Novel

1

संतश्रेष्ठ महिला भाग १

संतश्रेष्ठ महिला भाग १ माणूस देवाला प्रत्यक्ष भेटू शकत नाही . देवाची महती जाणुन घेणे अथवा त्याचा कृपा प्रसाद यासाठी कोणी मध्यस्थ आवश्यक असतो . हे काम संत करीत असतात . समाजाला भक्ती मार्गाला लावणे जेणे करून समाजमन बळकट होईल . आयुष्यातील संकटांचा सामना करू शकेल यासाठी संत पुढाकार घेत असतात . संत हे समाजातच असतात पण आपल्या कामगिरीमुळे ते सामान्यातून संतपदी विराजमान झालेले असतात . भारत भूमी संतांची भुमी म्हणुन ओळखली जाते. येथे देशोदेशी संत परंपरा आहे . ज्ञानेश्वर ते तुकाराम यासह अनेक संत या मातीत जन्मले . परंतु या पुरुष संतांच्या तुलनेत महिलांची संख्या खूपच कमी होती. ...अजून वाचा

2

संतश्रेष्ठ महिला भाग २

संतश्रेष्ठ महिला भाग २ संत परंपरेतील महिलांमध्ये प्रथम नाव मुक्ताबाईंचे घेतले जाते . संत मुक्ताबाईंचा उल्लेख फार आदराने केला . अत्यंत लहान वयात उत्तम समज असणारी जुनी व जाणकार संत त्यांना आद्य संत म्हणून संबोधले जाते . ज्यांच्यामुळे मराठी साहित्याचे दालन परिपूर्ण झाले. ज्यांनी मायमराठीच्या सारस्वतात भक्तीचा मळा फुलविलेला आहे. अशा संत ज्ञानदेवाच्या भगिनी संत मुक्ताबाईंचा जन्म इंद्रायणीतीरी वसलेल्या आळंदी गावाजवळील सिद्धबेटावर अश्विन शुद्ध प्रतिपदा शुक्रवार शके १२०१ म्हणजेच इ. सन. १२७९ मध्ये झाला. त्यांच्या आई-वडिलांचे मूळ गाव औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील आपेगाव होते . स्त्री शक्तीच्या जोरावर त्यांनी तेराव्या शतकातही आपल्या साहित्य कृतीतून परंपरेच्या जोखडातून ...अजून वाचा

3

संतश्रेष्ठ महिला भाग ३

संतश्रेष्ठ महिला भाग ३ यानंतर मात्र विसोबा खेचर संत ज्ञानेश्वर यांना आपला गुरु मानायला लागले . ते म्हणत चांगदेव मुक्ताबाईंनी मला कबूल केले आहे , आणि सोपानदेवाने माझ्यावर दया केलीआहे . विसोबा ज्ञानेश्वर आणि सोपानदेव दोघांनाही आपला गुरु मानत. नंतर खुद्द नामदेवांनी त्यांना आपले गुरु करून घेतले . त्यांनी गावोगावी 'नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी' अशा ईर्षेने यात्रा केल्या. त्यांच्या अभंगगाथा म्हणजे भावभक्तीचा नम्रमधुर ठेवा आहे. त्यावर मुक्ताबाईंच्या वत्सल स्नेहाचा अवीट ठसा उमटलेला आहे. मुक्ताबाईंनी ज्ञानदेवांच्या संत मंडळीतील श्रेष्ठांनादेखील आपल्या आध्यात्मिक अधिकार बळावर स्पष्टोक्तीच्या सुरात जागविले आहे. याबाबतीत संत नामदेवांचा प्रसंग बोलका आहे. संत नामदेव हे विठ्ठलाचे ...अजून वाचा

4

संतश्रेष्ठ महिला भाग ४

संतश्रेष्ठ महिला भाग ४ गोरक्षनाथांच्या कृपेचा देखील मुक्ताबाईंवर वर्षाव झाला होता. या कृपेनंतरच मुक्ताबाईंना “अमृत संजीवनीची” प्राप्ती सांगीतले जाते. समाजाभिमुख आणि अत्यंत अर्थपुर्ण अशी मुक्ताबाईंची अभंग निर्मीती आहे . त्यांच्या सर्वच अभंगांमधुन प्रत्येकाच्या जीवनाशी निगडीत अश्या त्या रचना असल्याची जाणीव होते. मुक्ताबाईंचे विचार फार साधे मात्र परखड होते. मराठीतील पहिल्या कवयित्री म्हणुन आज देखील त्यांचा नामोल्लेख होतो. संत मुक्ताबाई आयुष्यातील प्रत्येक प्रसंगांना निर्भयपणे खंबीरपणे सामोरी गेल्या . विवेकबुद्धी तर मुक्ताबाईंकडे अत्यंत दृढ होती . म्हणूनच जेव्हा जनसमाजाकडून प्रत्येकवेळी होणारी उपेक्षा व अपमान सहन न होऊन ज्ञानेश्वर जेव्हा उद्विग्न स्थितीवर मात करावी म्हणून पर्णकुटीची ताटी (दार) बंद करून ध्यानस्थ ...अजून वाचा

5

संतश्रेष्ठ महिला भाग ५

संतश्रेष्ठ महिला भाग ५ या परंपरेतील दुसरे नाव आहे संत जनाबाई यांचे जनाबाईंचा जन्माचा ठोस काळ जरी नसला तरी देखील अंदाज त्यांचा जन्म हा 1258 काळातील असल्याचे काही पुरावे आढळुन येतात जनाबाईंचा जन्म परभणी येथील गंगाखेड येथील दमा नावाच्या विठ्ठलभक्ताच्या घरी झाला. जनाबाईंच्या एका अभंगातील "माझ्या वडिलांचे दैवत| तो हा पंढरीनाथ ||" या ओळींवरून त्यांचे वडील दमा हेदेखील विठ्ठल भक्त होते हे समजते . त्यांच्या आईचे नाव करुंड. त्याही भगवद्भक्त होत्या. ते उभयता दरवर्षी पंढरीची वारी करत होते. आपल्या मुलीचे पालन पोषण करण्यास आर्थिक दृष्ट्या अक्षम असल्याचे समजल्यामुळे, पिता दामा यांनीत्यांना संत नामदेव यांचे वडील ...अजून वाचा

6

संतश्रेष्ठ महिला भाग ६

संतश्रेष्ठ महिला भाग ६ संत नामदेव हे संत जनाबाईंचे गुरु असल्याने आणि त्यांच्याकडे सर्व संतांचे येणे जाणे असल्याने संत प्रभावळीतील सर्व संतांना त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेले होते . त्यांना संत नामदेवांमुळे सतत संतसंग घडला होता. त्यामुळे जनाबाईंनी आपल्या अभंगांची नावे ‘दासी जनी’, ‘नामयाची दासी’ आणि ‘जनी नामयाची’, अशी ठेवली आहेत. या दासीपणाची, स्वत:च्या शूद्र जातीची आणि स्वत:च्या ‘स्त्री’पणाचीही जाणीव व्यक्त करणारे अनेक अभंग संत जनाबाई यांच्या मनातून त्यांच्या शब्दांत उमटले आहेत. विठ्ठलाला मायबाप आणि प्रसंगी ‘सखा’, ‘जिवाचा मैतर’ समजणार्‍या जनीने विठ्ठलाशी त्याबद्दल संवाद साधलेला तिच्या अनेक हृद्य अभंगांतून दिसतो. अतिशय सामान्यातली सामान्य, अशी जनाबाईची ओळख. पण आयुष्यभर मोलकरणीचे काम करणार्‍या ...अजून वाचा

7

संतश्रेष्ठ महिला भाग ७

संतश्रेष्ठ महिला भाग ७ या परंपरेतील तिसरे नाव आहे संत कान्होपात्रा नको देवराया अंत आता पाहु। प्राण हा सर्वथा पाहे।। हरिणीचे पाडस व्याघे्र धरियेले। मजलागी जाहले तैसे देवा।। तुजविण ठाव न दिसे त्रिभुवनी। धावे वो जननी विठाबाई।। मोकलूनी आस झाले मी उदास। घेई कान्होपात्रेस हृदयास।।” ही संत कान्होपात्रा यांची ही रचना फार प्रसिध्द आणि “सर्वश्रृत” आहे. कान्होपात्रा या वारकरी संप्रदायातील इ.स. 15 व्या शतकातील एक प्रमुख संत कवयित्री होउन गेल्या. संत कान्होपात्रा यांचा जन्म पंढरपुर पासून २२ किमी वर असलेल्या मंगळवेढा या गावी एका गणिकेच्या पोटी झाला. शामा या नाचगाणं करणाऱ्या गणिकेकडे अनेक प्रतिष्ठीतांचे येणे जाणे होते. अनेक धनदांडग्यांना ...अजून वाचा

8

संतश्रेष्ठ महिला भाग ८

संतश्रेष्ठ महिला भाग ८ चंद्रभागा नदी पाहिल्यावर वारकरी म्हणाले किती जन्माचे पुण्य म्हणून तुझे पंढरपुरास पाय लागले आहेत . समोर दिसते ती “पापनाशक” चंद्रभागा नदी आणि हे समोरचे मंदिर विठ्ठलाचे आहे . असे म्हणताच तिने त्यांना साष्टांग नमस्कार केला आणि चंद्रभागेत स्नान करून पुंडलिकाचे दर्शन घेतले , नामदेव पायरीचे दर्शन घेऊन धावतच विठ्ठ्ल मंदिरात शिरली. मंदिरातील सोळा खांबाजवळ उभे राहून तिने देवाचे डोळे भरून रूप पाहिले . आणि त्याला लोटांगण घातले . आपल्या जीवनाचे सार्थक झाले म्हणून भजन गाऊन नाचू लागली . यानंतर ती पंढरपुरात राहिली आणि विठ्ठल भक्तीमध्ये रमून गेली . इकडे काही दिवसांनी ठाणेदाराचे पत्र बादशाहाला मिळाले ...अजून वाचा

9

संतश्रेष्ठ महिला भाग ९

संतश्रेष्ठ महिला भाग ९ यामध्ये नंतर नाव येते बहिणाबाई यांचे .. संत बहिणाबाई या वारकरी संप्रदायातील असुन मराठी संत आणि संत तुकाराम महाराजांच्या शिष्या म्हणुन ओळखल्या जातात. महाराष्ट्रात ज्या प्रमुख स्त्री संत होउन गेल्या जनाबाई, मुक्ताबाई, वेणाबाई, कान्होपात्रा, मीराबाई, आक्काबाई यांमध्ये संत बहिणाबाईंचे देखील मानाचे स्थान आहे. प्रपंच परमार्थ चालवी समान|| तिनेच गगन झेलियेले। संत बहिणाबाईंचे हे उपकारच म्हणावयास हवेत की त्यांनी आत्मनिवेदन लिहिले. संत तुकारामांच्या शिष्या म्हणून त्या प्रसिद्ध आहेत. इ.स. १६२८ ते १७०० हा त्यांचा कार्यकाल. संत बहिणाबाईंच्या अभंगात आरंभी आदिनाथ शंकरापासून गुरूपरंपरा दिलेली आहे. त्यानंतर आत्मनिवेदनपर अभंगातून त्यांचे जीवन उलगडते. हे अभंग त्यांचे खास वैशिष्ट्य आहे ...अजून वाचा

10

संतश्रेष्ठ महिला भाग १०

संतश्रेष्ठ महिला भाग १० यावेळी बहिणाबाईंचे वय १८ वर्षांचे होते. तुकोबाराय स्वप्नात आलेला अनुभव त्या अनेकदा सांगत. प्रज्ञाचक्षू गुलाबराव यांनी बहिणाबाईंच्या अभंगांचे सखोल अध्ययन करून त्यांना उपनिषदांचे सार उत्कटपणे मांडणारे अभंग म्हटले आहे. शांकरभाष्याप्रमाणे शास्त्रीय आणि वामन पंडिताइतकी त्यांची भाषा शुद्ध आहे, असेही गुलाबराव महाराज म्हणतात. काव्यदृष्ट्यादेखील बहिणाबाईंचे अभंग सरस आहेत. अनुप्रास, यमक, उपमा, रूपक, दृष्टांत, अनन्वय, विरोधाभास अशा अनेक अलंकारांनी ते नटले आहेत. करूणरस, वत्सलरस, हास्यरस, भयानकरस, अद्भुतरस, वीररस, भक्तीरसाने ओतप्रेत भरले आहेत. शांतरसाचा आविष्कार काव्यात सर्वत्र दिसतो तुकाराम महाराजांनी स्वप्नात बहिणाबाईंना “अनुग्रह” देऊन कवित्वाची आज्ञा दिली होती . योगायोग म्हणजे तुकाराम महाराज यांनाही नामदेव महाराजांनी स्वप्नामध्येच ...अजून वाचा

11

संतश्रेष्ठ महिला भाग ११

संतश्रेष्ठ महिला भाग ११ यानंतर नाव या परंपरेत येते संत वेणाबाई यांचे .. जवळपास श्रीकृष्णाला उद्देशुन लिहीलेल्या 1200 ते रचना आजही त्यांच्या भगवद्भक्तिची साक्ष देतात. संत वेणाबाई यांचा जन्म इ.स. १६२७ मध्ये झाला. त्या मुळच्या मिरज येथील देशपांडे यांच्या कन्या. विवाहानंतर कोल्हापूरला गेल्या व काही काळातच, वयाच्या दहाव्या वर्षी विधवा झाल्या. कोल्हापूर हे त्यांचे माहेर तर मिरज हे सासर होते. ‘धन्य वेणाई वेणुमोहित ! वेणुविण गाय सप्रेमयुक्त !! सतराव्या शतकाचा प्रारंभ (सन १६२७) म्हणजे सामाजिक परिस्थिती कशी असेल हे काही वेगळं सांगायला नको. कोल्हापूरचे देशपांडे-साधेसुधे सश्रद्ध धर्मप्रवण पण सुशिक्षित कुटुंब. प्रथेप्रमाणे लाडक्या लेकीचा विवाह बालपणीच करून दिला. पण मुलीला ...अजून वाचा

12

संतश्रेष्ठ महिला भाग १२

संतश्रेष्ठ महिला भाग १२ यानंतर नाव येते ते राजस्थान मधील श्रेष्ठ संत मीराबाई यांचे संत ज्ञानेश्वरांपासून ते गाडगेबाबांपर्यंत आपल्याकडे संत महात्मे होऊन गेले. या सगळ्यांनी मराठीतील भक्तीसाहित्य समृद्ध केलेले आहे. पण मराठी भाषेशिवाय इतर भाषातही त्या त्या प्रांतातील संत महात्म्यांनी प्रचंड साहित्य निर्मीती केलेली आहे. मग ते संत तुलसीदासांचे 'तुलसी रामायण' असो, सुरदासाचे काव्य असो, कबीर्-रहिमचे दोहे असोत वा मीरेची पदे असोत. या सगळ्यांनीच भारतीय संत साहीत्याला एका विलक्षण उंचीवर नेलेले आहे. मात्र यापैकी संत कबीर आणि संत मीराबाई या दोघांचे आयुष्य अतिशय वेगवेगळ्या पद्धतीचे आहे . कबीर अतिशय सामान्य घरात वाढले, त्यांच्यासमोरच्या समस्या वेगळ्या होत्या तर मीरा राजघराण्यात ...अजून वाचा

13

संतश्रेष्ठ महिला भाग १३

संतश्रेष्ठ महिला भाग १३ संत तुलसीदासांना लिहलेल्या पत्रातून मीराबाई ने तुलसीदास यांना सल्ला मागितला की मला माझ्या श्री कृष्णभक्ति सोडण्यासाठी जबरदस्ती केली जाते आहे . परंतु मी श्री कृष्णाला आपले सर्वस्व मानलेले आहे . ते माझ्या आत्म्यात आणि नसा नसात सामावलेले आहेत . नंदलालाला सोडणे म्हणजे माझ्यासाठी देह त्याग करण्यासारखे आहे . कृपया मला आपण मदत करा आणि काय करू यासाठी योग्य सल्ला द्या . त्यावर महान कवि तुलसीदास यांनी या पत्राचे उत्तर असे दिले .. “जाके प्रिय न राम बैदेही। सो नर तजिए कोटि बैरी सम जद्यपि परम सनेहा।। नाते सबै राम के मनियत सुह्मद सुसंख्य जहाँ ...अजून वाचा

14

संतश्रेष्ठ महिला भाग १४

संतश्रेष्ठ महिला भाग १४ ऐसी लगन लगाई कहां तूं जासी तुम देखे बिन कल न परति है तलफि तलफी जासी तेरे खातर जोगण हुंगी करवत लूंगी फासी मीरा के प्रभु गिरिधर नागर चरणकंवल की दासी "तुझ्या प्राप्तीसाठी जोगीण बनेन, वेळ पडल्यास मरण पत्करेन. गिरिधरा, ही मीरा तुझ्या चरणांची दासी आहे रे!" तिचा ठाम विश्वास होता की प्रभुचे नामस्मरण, त्याचे भजन कीर्तन हीच त्याच्या प्राप्तीची गुरुकिल्ली आहे. त्यासाठी मथुरा-काशीला जाण्याची गरज नाही. तीर्थयात्रांची आवश्यकता नाही. बस्स प्रभुंचे नामस्मरण यातच मोक्ष आहे. आणि हे सुत्र तीने आयुष्यभर अंगी भिनवले होते. भजन भरोसे अविनाशी मै तो भजन भरोसे अविनाशी जप तप तीर्थ ...अजून वाचा

15

संतश्रेष्ठ महिला भाग १५

संतश्रेष्ठ महिला भाग १५ यात पुढील नाव येते ते संत सोयराबाई यांचे यमाजी आणि हौसा या जोडप्याची मुलगी. मंगळवेढ्याजवळच्या लहानशा गावातली. काळी-सावळी, टपोऱ्या डोळ्यांची, समंजस, शालीन, चाणाक्ष सोयरा हीला चोखोबांच्या आईनं हेरली आणि सून म्हणून घरात आणली. चोखोबा प्रथम पासून नामदेव भक्त असल्याने चोखोबा आणि सोयराच्या लग्नाला संत नामदेव आले होते. आपल्या नवऱ्याचं वेगळेपण, विठ्ठलावरचं त्याचं अपार प्रेम, नामदेवांच महात्म्य, नामदेवांची चोखोबांवर असणारी माया हे सगळं कळण्याचं सोयराचं तेंव्हा वय नव्हतं. पण हे सगळं काहीतरी वेगळं आहे हे कळण्याचा चाणाक्षपणा मात्र तिच्यात होता. सोयरा सुगृहिणी होती. गृहकृत्यदक्ष सुद्धा होती. आपला चार गाडग्या-मडक्यांचा खोपटातला संसार तिने चांगला आणि नेटका ...अजून वाचा

16

संतश्रेष्ठ महिला भाग १६

संतश्रेष्ठ महिला भाग १६ समाजातल्या सगळ्या स्तरातले लोक या वारकरी झेंड्याखाली गोळा झाले. ही समतेची गुढी पेलताना त्यांनी छळ अवहेलना झेलली पण खांद्यावरची पताका खाली पडू दिली नाही. यांत नामदेव शिंपी होता, येसोबा खेचर होता, गोरा कुंभार होता, नरहरी सोनार होता, कुणबी तुकोबा होता, सेना न्हावी होता, सावता माळी होता, दासी जनी होती, गणिका कान्होपात्रा होती... पण या सगळ्या मांदियाळीत वेगळं होतं ते चोखामेळा आणि त्याचं कुटुंब ! महारवाड्यात जन्मलेल्या चोखामेळ्यानं विठ्ठलाच्या पायाशी उभं राहून जोहार मांडला. आधीच महार आणि त्यात बाई, म्हणजे सोयराबाईचं जगणं आणखी एक पायरी खाली! नवऱ्याबरोबर मेलेली ढोरं गावाबाहेर ओढून नेता नेता या ...अजून वाचा

17

संतश्रेष्ठ महिला भाग १७

संतश्रेष्ठ महिला भाग १७ या परंपरेतील पुढील नाव आहे संत सखुबाई ज्यांनी स्वत:ला सर्वात प्रिय परमेश्वराच्या चरणी शरण गेले त्यांचा महिमा अपार आहे. असे लोक खरे भक्त असतात आणि अशा भक्तांना सांभाळण्यासाठी देवाला अनेक लीला कराव्या लागतात. त्यासाठी देव अत्यंत नीच काम करायलाही तयार होतात . ते आपल्या प्रिय भक्तांसाठी काहीही करण्यास तयार असतात. महाराष्ट्रात कृष्णा नदीच्या काठी कऱ्हाड नावाचे एक गाव आहे, तेथे एक ब्राह्मण राहत होता. त्याच्या घरात ब्राह्मण, त्याची बायको, मुलगा आणि सुन असे राहत होते . ब्राह्मणाच्या सुनेचे नाव 'सखुबाई' होते . जितकी अधिक निष्ठावंत, आज्ञाधारक, सौम्य, नम्र, आणि साधी मनाची अशी सखुबाई होती तितकीच ...अजून वाचा

18

संतश्रेष्ठ महिला भाग १८

संतश्रेष्ठ महिला भाग १८ यातील माहिती घेऊ संत अक्कमहादेवी यांची अक्का महादेवी ह्या वीरशैव धर्माशी संबंधित एक प्रसिद्ध महिला होत्या . कन्नड साहित्यात त्यांचे काव्य भक्ती करण्यासाठी मानले जाते . अक्का महादेवी यांनी एकूण सुमारे ४३० श्लोक सांगितले होते जे इतर समकालीन संतांच्या शब्दांपेक्षा कमी आहेत. त्यांना बसवा , चेन्नई बासावा, किन्नरी बम्मैय्या, सिद्धार्थ, आलमप्रभू आणि दासीमैया अशा वीरशैव धर्माच्या इतर संतांनी उच्च स्थान दिले होते . ‘माझ्या शरीरावर माझा हक्क’ असे म्हणणारी ही संत कवयित्री. ह्या बाबतीत तिचे मीरेशी साधर्म्य आहे. मलंगपण स्वीकारले की मग कसली फिकीर? ह्या संत स्त्रीचे लिंगायत पंथात अद्वितीय स्थान ...अजून वाचा

19

संतश्रेष्ठ महिला भाग १९

संतश्रेष्ठ महिला भाग १९ यानंतरना नाव येते महदंबा यांचे. ह्या सु. १२२८−सु. १३०३ या काळातील आद्य कवयित्री. अकराव्या ते अठराव्या शतकातील यादव व महानुभाव-संत काळ या दरम्यान स्त्री साहित्य बोटावर मोजण्याइतकेच होते. बाराव्या शतकापासून संतांचे लिखाण सुरू झाले. चातुर्वर्ण व्यवस्थेचा समाज जीवनावर प्रभाव असतानाही संत कान्होपात्रा, महदंबा, पुढे जनाई, मुक्ताई यांनी साहित्यकृती रचल्या. महदंबा मराठीतील आद्यकवी ठरल्या. चक्रधर स्वामींच्या लग्नात महदंबेचे धवळे गायिले. त्यानंतर त्यांच्या काव्य प्रवासास सुरूवात झाली. महादाईसा ऊर्फ महादाईसा ऊर्फ महदंबा (जन्म : इ.स.१२३८; मृत्यू : इ.स.१३०८) ऊर्फ रूपाईसा ह्या मराठी भाषेतील पहिल्या स्त्री कवयित्री आहेत . महदंबा जालना जिल्ह्यातील रामसगाव या गावच्या आहेत. तसं ...अजून वाचा

20

संतश्रेष्ठ महिला भाग २० - अंतिम भाग

संतश्रेष्ठ महिला भाग २० यानंतरची श्रेष्ठ संत आहे रंगनायकी आंदाळ आंदाळ ही बारा प्रसिद्ध आळवार संतांमधली एकमेव स्त्री-संत. आंदाळ शब्दाचा अर्थ आहे, देवावर सत्ता गाजवणारी, देवाची प्रियतमा !!! आंदाळची भक्तीची वाट आत्यंतिक प्रेमाची आहे. ते आहे एखाद्या कुमारिकेचे पहिले निष्कलंक प्रेम. तिला तामिळ भूमीने “श्रीरंगाची प्रिया-रंगनायकी” म्हणून गौरवलं आहे. श्री वेलीपुत्तूर हे तामिळनाडूमधलं एक लहानसं गाव आहे. तिथे रंगनाथाचे एक प्राचीन मंदिर आहे. या रंगनाथाची रोज सकाळची पहिली पूजा इतर देवस्थानांतल्या पूजेपेक्षा अगदी वेगळी केली जाते. जवळच्या आंदाळच्या (जी तामिळनाडूची प्रसिद्ध संत-कवयित्री) मंदिरात तिची पूजा आधी केली जाते. आणि तिच्या गळय़ातून उतरवलेला हार वाजतगाजत विधीपूर्वक रंगनाथाच्या मंदिरात आणून तो ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय