पॉवर ऑफ अटर्नी

(52)
  • 118.9k
  • 1
  • 66.7k

त्या दिवशी शनिवार होता. पहाटेच विभावरीचं, न्यूयॉर्क हून येणारं विमान मुंबई एयर पोर्ट वर लँड झालं होतं. भल्या मोठ्या तीन बॅगा घेऊन विभावरी टॅक्सी करून पुण्याला यायला निघाली होती. पुण्याला अकरा वाजता पोचली आणि आत्ता तिसर्‍या मजल्या वरच्या आपल्या फ्लॅट समोर उभी होती, आणि कॉल बेल वाजवून दरवाजा उघडायची वाट पहात होती. दार एका तिशीतल्या तरुणांनी उघडलं आणि तो दरवाज्यात प्रश्नार्थक मुद्रा करून उभा होता. एकदा विभावरी कडे आणि एकदा तिच्या सामानांकडे बघत होता. त्याला पाहिल्यावर विभावरी गोंधळली. तिच्या अपेक्षेप्रमाणे तिच्या मैत्रिणीने, सानिकाने दार उघडायला हवं होतं पण हा तर कोणी भलताच माणूस दिसत होता. विभावरी ला वाटलं की आपला बहुधा मजला चुकला म्हणून ती दोन पावलं मागे सरकली आणि दारावर काय नंबर आहे ते बघितलं. नंबर बरोबर होता. मग हा माणूस कोण असावा आणि सानिका कुठे गेली आहे यांचा विचार ती करतच होती, तेवढ्यात त्या माणसानी विचारलं.

Full Novel

1

पॉवर ऑफ अटर्नी - भाग 1

पॉवर ऑफ अटर्नी भाग १ त्या दिवशी शनिवार होता. पहाटेच विभावरीचं, न्यूयॉर्क हून येणारं विमान मुंबई एयर पोर्ट लँड झालं होतं. भल्या मोठ्या तीन बॅगा घेऊन विभावरी टॅक्सी करून पुण्याला यायला निघाली होती. पुण्याला अकरा वाजता पोचली आणि आत्ता तिसर्‍या मजल्या वरच्या आपल्या फ्लॅट समोर उभी होती, आणि कॉल बेल वाजवून दरवाजा उघडायची वाट पहात होती. दार एका तिशीतल्या तरुणांनी उघडलं आणि तो दरवाज्यात प्रश्नार्थक मुद्रा करून उभा होता. एकदा विभावरी कडे आणि एकदा तिच्या सामानांकडे बघत होता. त्याला पाहिल्यावर विभावरी गोंधळली. तिच्या अपेक्षेप्रमाणे तिच्या मैत्रिणीने, सानिकाने दार उघडायला हवं होतं पण हा तर कोणी भलताच माणूस दिसत ...अजून वाचा

2

पॉवर ऑफ अटर्नी - भाग 2

पॉवर ऑफ अटर्नी भाग 2 भाग १ वरुन पुढे वाचा “विभावरी तू थांब जरा, मला बोलू दे.” काकांनी विभावरीला “किशोर साहेब, असं बघा, तुमच्या जवळ ते अधिकार पत्र आणि घराची सेल डिड असेलच ना ? तर दाखवता का जरा ?” काकांनी विचारलं. “मूळ पेपर बँकेत जमा केले आहेत. झेरॉक्स आहेत. एक मिनीट थांबा दाखवतो.” किशोर म्हणाला काकांनी कागद पत्रे पाहिली आणि मान हलवली. मग किशोरला म्हणाले “तुम्ही पैसे कोणाला दिले ?” “बँकेने सानिका मॅडम च्या नावाने पे ऑर्डर काढला होता. अधिकार पत्रात तसं स्पष्ट लिहिलं आहे की पैसे सानिका ला द्यावेत आणि ते मला मिळाले असे समजावे. Deemed ...अजून वाचा

3

पॉवर ऑफ अटर्नी - भाग 3

पॉवर ऑफ अटर्नी भाग ३ भाग २ वरुन पुढे वाचा आठ दहा दिवस तसेच गेले. पोलीसांकडून काहीच बातमी आली एक दिवस लंच टाइम मध्ये किशोर ला काय वाटलं कुणास ठाऊक त्यांनी विभावरीला फोन लावला. “हॅलो मी किशोर बोलतोय.” “नंबर सेव केला आहे तुमचा. बोला. काही कळलं का ?” – विभावरी. “नाही. कालच गेलो होतो. मला म्हणाले काही प्रगती झाली तर कळवू. सारखे सारखे येऊ नका. आदल्याच दिवशी तुम्ही पण आला होता असं म्हणाले.” – किशोर. “हो मला पण तुमच्या सारखंच उत्तर मिळालं. काय करायचं ?” – विभावरी. “आपण भेटूया का ? अर्थात तुम्हाला जर वेळ असेल तरच.” – किशोर. ...अजून वाचा

4

पॉवर ऑफ अटर्नी - भाग 4

पॉवर ऑफ अटर्नी भाग ४ भाग ३ वरुन पुढे वाचा “विभावरी मॅडम लोकं आपल्याकडे बघताहेत, स्वत:ला सावरा.” विभावरीनी त्याच्याकडे डोळे पाणावलेले आणि नाकाचा शेंडा लाल लाल झाला होता. तिने पर्स मधून रूमाल काढला आणि चेहरा पुसला. किशोर कडे बघून हसली. म्हणाली “किशोर सर, तुम्ही नका काळजी करू तुम्ही काहीच गुन्हा केला नाहीये, उलट तुम्हीच फसवल्या गेले आहात. देव इतका निष्ठुर नाहीये. सगळं काही ठीक होईल. मला विश्वास आहे.” किशोर हसला. म्हणाला “जेंव्हा कोणी तुमच्याबद्दल आपलेपणाने बोलतो तेंव्हा इतकं बरं वाटतं. विभावरी मॅडम थॅंक यू.” “किशोर सर, मला जे जाणवलं तेच मी बोलले. माझं तर फक्त आर्थिक नुकसान झालेलं आहे ...अजून वाचा

5

पॉवर ऑफ अटर्नी - भाग 5

पॉवर ऑफ अटर्नी भाग ५ भाग ४ वरुन पुढे वाचा किशोर घरी गेल्यावर चहा पिता पिता आईशी बोलत होता. दिवसभराचं अपडेट देण्याची त्याची सवय होती. विभावरीनी सांगीतलेली सानिकांची कथा सांगून झाली. हे सगळं पुराण ऐकल्यावर आई खूपच हळहळली. म्हणाली “एवढं सगळं तिने सानिकासाठी केलं म्हणजे एक प्रकारे धाकट्या बहि‍णीसारखी सांभाळतच होती तिला. पण तिने अशी परतफेड का केली असावी हे काही समजत नाही. कृतघ्न पणाचा कळसच गाठला. काय म्हणावं या पोरीला ? विभावरीला केवढा धक्का बसला असेल यांची कल्पनाच करवत नाही. बिचारी विभावरी!” आईने संवेदना प्रकट केली. “धक्का बसला आहेच. पण आता सावरली आहे. म्हणत होती की, आपण सगळे ...अजून वाचा

6

पॉवर ऑफ अटर्नी - भाग 6

पॉवर ऑफ अटर्नी भाग ६ भाग ५ वरुन पुढे वाचा “चला. छान, शिफ्ट करतांना जर काही मदत लागली सांगा. मी येईन. आधी सांगितलं तर सुट्टी मागता येईल.” किशोर नी मदत देऊ केली. “खरंच याल तुम्ही ? पण माझी एक अडचण आहे, माझं सामान खूप आहे. तुम्ही पाहीलंच त्या दिवशी, ३-४ मोठमोठ्या बॅगा आहेत. हॉस्टेल वर एवढी जागा मिळणार नाही, तुमच्या कडे ठेवलं तर चालेल का ? काकांच्या कडे जवळ जवळ रोज जागा किती अडते, अशी कुरकुर चाललेली असते.” विभावरीनी तिची अडचण सांगितली. किशोर काही बोलायच्या आतच आईंनी सांगून टाकलं. “अग खुशाल ठेव. सध्या जरी आम्ही, राहत असलो, तरी ...अजून वाचा

7

पॉवर ऑफ अटर्नी - भाग 7

पॉवर ऑफ अटर्नी भाग ७ भाग ६ वरुन पुढे वाचा रीजनल ऑफिस च्या समोर विभावरीला पाहून किशोर चकीतच झाला. “तुम्ही इथे काय करता आहात ?” “मी इथे काय करते आहेss, केवढा गहन प्रश्न विचारला तुम्ही. काय उत्तर देऊ मी तुम्हाला ?” -विभावरी. “सॉरी, पण.....” – किशोर. “ते मॅच मध्ये असतं ना, लोकं cheer up करतात. तसंच. तुमचं मनोधैर्य वाढवायला आले आहे. निर्धास्त पणे चौकशीला सामोरे जा. तुमची काहीच चूक नाहीये. त्यामुळे तुमच्या वर कसलाच ब्लॉट येणार नाही. काय ते खरं खरं सांगून टाका. मुळीच घाबरू नका. मी थांबते आहे इथे. चौकशी संपल्यावर आपण बरोबरच घरी जाऊ. ऑल द बेस्ट ...अजून वाचा

8

पॉवर ऑफ अटर्नी - भाग 8

पॉवर ऑफ अटर्नी भाग ८ भाग ७ वरुन पुढे वाचा “तू अकोल्याची आहेस ?” माईंना आश्चर्य वाटलं. “होss. का असं का विचारलं ?” – विभावरी. “अग आम्ही पण अकोल्याचेच. तुम्ही कुठे राहत होता ?” – माई. “जठारपेठेत मुकुंद मंदिर आहे न, त्याच्या मागच्या गल्लीत.” – विभावरी. “आमचं घर पण जवळच आहे. बघ. पृथ्वी गोल आहे. अकोल्यातली माणसं पुण्याला भेटली.” माईनी बोलून दाखवलं. “अहो म्हणूनच आपल्या तारा जुळल्या.” आपोआप विभावरीचं अनुमोदन. “विभावरी,” माई म्हणाल्या, “एक विचारू ? राग येणार नाही ना ? खरं उत्तर देशील का ?” “नाही राग येणार. माई विचारा ना. आणि शेजारी टेबलावर एक पुस्तक होत, ते ...अजून वाचा

9

पॉवर ऑफ अटर्नी - भाग 9

पॉवर ऑफ अटर्नी भाग ९ भाग ८ वरुन पुढे वाचा रीजनल ऑफिस ला किशोर साडे तीन वाजताच पोचला. थोड्या विभावरी पण आली. किशोरला पाहून तिला आनंद झालाच. विभावरीच्या चेहऱ्यावर मुळीच टेंशन दिसत नव्हतं. नेहमी सारखीच प्रसन्न मुद्रा होती तिची. आणि ती पाहून किशोरला जरा हायसं वाटलं. “अरे वा फ्रेश दिसते आहेस एकदम, ऑल द बेस्ट.” किशोरनी थम्ब्स अप करून म्हंटलं. “थॅंक यू.” असं म्हणून ती ऑफिस मध्ये शिरली समिती समोर गेल्यावर थोडं इकडचं, तिकडचं बोलणं झाल्यावर प्रश्नांना सुरवात झाली. “मॅडम जे अधिकार पत्र सानिका नी दिलं आहे, ते तुम्ही केलं नाही, असं तुमचं म्हणण आहे बरोबर ?” समितीच्या ...अजून वाचा

10

पॉवर ऑफ अटर्नी - भाग 10

पॉवर ऑफ अटर्नी भाग १० भाग ९ वरुन पुढे वाचा “नाही. तुझ्या या अश्या अवस्थेत तुला मी एकटं सोडायला नाही. तुला हवं तर तू काकांकडे जा , किंवा किशोर येईल तुझ्या बरोबर, हॉस्टेल वर जाऊन तू कपडे घेऊन ये. काय करतेस ?” माई म्हणाल्या. विभावरीनी दोन मिनिटं विचार केला मग म्हणाली की “काकांकडे नको, ते अजून मलाच बोलतील. पण माई, मी इथे राहणं बरोबर दिसेल का ? शेजारी, पाजारी काय विचार करतील ? लोकं काय म्हणतील ?” “तू स्वत:चा विचार कर, लोकांचा नको. लोकं काय दोन्ही बाजूंनी बोलतात. तू जा किशोर बरोबर आणि सामान घेऊन ये. आता जास्त विचार ...अजून वाचा

11

पॉवर ऑफ अटर्नी - भाग 11

पॉवर ऑफ अटर्नी भाग ११ भाग १० वरुन पुढे वाचा “पण तुमचं यात नुकसान आहे. पुढे मागे जर फ्लॅट विकायचा असेल तर बँकेच्या फ्लॅट वर असलेल्या चार्ज मुळे तो तुम्हाला विकता येणार नाही.” – सदस्य “चालेल मला. तसंही मला तो विकायचा नाहीये.” विभावरीने मोहोर उठवली. “तुमची तयारी असेल तर बँक lenient view घेऊ शकते. पण खात्रीपूर्वक असं काही आत्ताच सांगू शकत नाही. तो फ्लॅट तुमचाच आहे हे पण सिद्ध व्हायला पाहिजे.” सदस्य अजून ऐकायला तयार नव्हता. “अहो तो फ्लॅट जर किशोरचा नाही यावर विश्वास ठेऊन तुम्ही कारवाई करता आहात, तर तो माझा आहे हे पण अॅक्सेप्ट करायला पाहिजे ...अजून वाचा

12

पॉवर ऑफ अटर्नी - भाग 12

पॉवर ऑफ अटर्नी भाग १२ भाग ११ वरुन पुढे वाचा “हुश्श, जीव गुदमरला की माझा. किती जोरात आवळलं ?” किंचाळली. “अग पहिलीच वेळ आहे माझी. मला सवय नाहीये, खूप जोरात झालं का ? ओके. आता हळुवार पणे करतो.” किशोरनी सफाई दिली. “नको नको, धाप लागली मला शहाण्या. तू दूरच ठीक आहेस. आणि आत्ता माई देवळातून येतील, तू बस इथेच,” मी चहा करते. विभावरी चहाच्या बहाण्याने किचन मधे धावली, किशोर तिच्या मागे, मागे. पण तेवढ्यात कॉल बेल वाजली, मग किशोरचा नाईलाज झाला. विभावरीने तेवढ्यात त्याला चिडवलं त्याला अंगठा दाखवला, आणि खळखळून हसली. माई आल्या होत्या. आता चॅप्टर संपला होता. किशोर ...अजून वाचा

13

पॉवर ऑफ अटर्नी - भाग 13

पॉवर ऑफ अटर्नी भाग १३ भाग १२ वरुन पुढे वाचा जेवण झाल्यावर माई किशोरला म्हणाल्या की विभावरीला तिच्या हॉस्टेल पोचवून ये. “पोचवून येऊ ? ते कशाला ? मला तर वाटलं की आज राहते आहे म्हणून. पण जायचंच असेल तर, ती जाईल की एकटी. नेहमीच तर जाते.” – किशोर “हो माई, जाईन मी एकटी, उगाच कोणाला त्रास नको.” विभावरीचा स्वर जरा चिडकाचं होता. “ओके, ओके येतो मी, कायमच राग कसा असतो ग तुझ्या नाकावर ? चल.” किशोर नी असं म्हंटल्यांवर विभावरीचा चेहरा फुलला. आणि मग दोघेही बाहेर पडले. हॉस्टेल वर पोचल्यावर, खाली थोडा वेळ गप्पा मारतांना विभावरी म्हणाली “किशोर,” “हूं” ...अजून वाचा

14

पॉवर ऑफ अटर्नी - भाग 14 - अंतिम भाग

पॉवर ऑफ अटर्नी भाग १४ भाग १३ वरुन पुढे वाचा “आई,” किशोर खट्याळ पणे म्हणाला, “ह्या तर दोनच झाल्या. तिसरी कृपा पण झाली आहे त्याचा उल्लेख नाही केलास ?” “आता हे काय नवीनच ? तूच सांग.” माई म्हणाल्या. विभावरी सुद्धा त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पहात होती. “अग तुझ्या लक्षात कसं येत नाहीये ? विभावरी सारखी इतकी सुंदर, गूणी आणि लोभस सून कशी मिळाली तुला ? हा गोंधळ झाला म्हणूनच न. आता ही कृपाच नाही का ?” किशोर मिष्कील स्वरात म्हणाला. हे ऐकून विभावरीच्या गालावर गुलाब फुलले नसते तरच नवल. किशोर तिच्याकडे अनिमिश नजरेने बघत होता आणि ते बघितल्यावर ती ...अजून वाचा

15

पॉवर ऑफ अटर्नी (पर्व २ रे ) भाग १

पॉवर ऑफ अटर्नी (पर्व २ रे ) पहिल्या पर्वाचा सारांश. विभावरीच्या फ्लॅट मधे, विभावरी आणि तिची मैत्रीण सानिका राहात विभावरीला एक वर्षा साठी अमेरिकेला जावं लागतं. सानिकाला तिच्या ऑफिस मधे एक राम नावाचा तरुण भेटतो, आणि त्यांची मैत्री होते. मैत्रीचं रूपांतर प्रेमात होतं. राम तिला खोट्या भूल थापा देऊन आपल्या जाळ्यात ओढतो. मग त्याचा थापांना फसून खोटी पॉवर ऑफ अटर्नी तयार करून विभावरी अमेरिकेत असतांना, तिचा फ्लॅट किशोर ला विकून टाकतात. पैसे हातात आल्यावर दोघेही जणं हुबळीला पळून जातात. सानिकाचा फोन स्विच ऑफ करून राम लपवून ठेवतो, त्यामुळे विभावरीचा सानिकाशी कॉनटॅक्ट तुटतो. वर्ष झाल्यावर विभावरी भारतात वापस येते आणि ...अजून वाचा

16

पॉवर ऑफ अटर्नी (पर्व २ रे ) भाग २

पॉवर ऑफ अटर्नी (पर्व २ रे ) भाग २ भाग १ वरून पुढे वाचा .... विभावरी झोपल्यावर बराच किशोर जागा होता आणि विभावरीच्या बोलण्याचा विचार करत होता. शेवटी तो एका निष्कर्षावर आला, की विभावरीने त्याला समजून घेतलं आहे तेंव्हा, त्याला सुद्धा तिचं मन राखायला पाहिजे. उद्या पासून अभ्यास करायचा असा मनोमन निश्चय केल्यावर, मगच त्याला शांत झोप लागली. सकाळी, चहा पितांना माईंनी विचारलं, “काय ग काहीं बोलणं झालं का?” “तसं म्हंटलं तर बोलणं झालं. पण आता बघायचं की किशोर काय करतो ते, काल काही अंदाज आला नाही.” विभावरी म्हणाली. “असं गुळमुळीत काही नको. असं काहीतरी कर की तो ...अजून वाचा

17

पॉवर ऑफ अटर्नी (पर्व २ रे ) भाग ३

पॉवर ऑफ अटर्नी (पर्व २ रे ) भाग ३ भाग २ वरून पुढे वाचा .... तुला बँकेच्या बॅलेन्स अभ्यास करावा लागेल, आणि हे एक प्रचंड काम असतं. त्या साठी तू कोणीतरी चांगला CA पकड. इतरही अनेक रेशो आहेत, त्याचा अभ्यास करावा लागेल, उदाहरणार्थ डेट -इक्विटी रेशो, असेट लायबीलीटी रेशो, वगैरे. पण हे सगळं हळू हळू कर. मन लावून केल्यास, कठीण काहीच नाहीये. थोडक्यात, ऑफिसर झाल्यावर तुला बँक यशस्वी रित्या चालवायची आहे, त्याचं हे शिक्षण आहे. तू हुशार आहेस, केंव्हाच मला मागे टाकून पुढे जाशील.” – साहेब. “काय साहेब, काहीतरीच काय? तुमच्याच मार्गदर्शनाखाली मी शिकतोय. उगाच माझी थट्टा करताय.” ...अजून वाचा

18

पॉवर ऑफ अटर्नी (पर्व २ रे ) भाग ४

पॉवर ऑफ अटर्नी (पर्व २ रे ) भाग ४ भाग ३ वरून पुढे वाचा .... काही दिवस असेच पाहण्यात गेले. उत्सुकता वाढत होती, पण साहेब, निश्चिंत होते, ते म्हणाले, की मुळीच काळजी करू नकोस, निवड होणार याची मला पक्की खात्री आहे. एक दिवस संध्याकाळी विभावरी हिरमुसलं तोंड करून आली. माई एकदम धसकल्या. किशोर पण अजून आला नव्हता, विभावरी आली आणि न बोलता सोफ्यावर बसली. चेहरा खूप उतरला होता. माईंनी काळजीने विचारलं “ अग काय झालं? जरा सांगशील का?” “मला एक वर्षा साठी अमेरिकेला जावं लागणार आहे ,माई,” – विभावरी. “अग काय, सांगतेस काय? असं अचानक? अरे, देवा! मग ...अजून वाचा

19

पॉवर ऑफ अटर्नी (पर्व २ रे ) भाग ५

पॉवर ऑफ अटर्नी (पर्व २ रे ) भाग ५ भाग ४ वरून पुढे वाचा .... रात्री विभावरी “किशोर काय करायचं समजत नाहीये, तू बिहार सोडून दुसरं शहर मागून बघ ना, बिहार म्हंटलं की भीती वाटते.” “विभावरी, आपण फार सुरक्षित जीवन जगतो आहोत, यात वाद नाही. पण पळपुटेपणा करून कसं चालेल? अग कसंही असलं तरी तिथेही माणसंच राहतात, हे बघ, मी तिथला नाही म्हंटल्यांवर, त्यांच्या कुठल्याही भांडणा मधे मी असणारच नाहीये, तेंव्हा घाबरण्याचं काही कारण नाही. काळजी नको कारूस. तू अमेरिकेत जा, मी बिहारला जातो आईला पुण्यातच ठेवू. जरूर पडली तर पटण्याहून पुण्याला फ्लाइट आहे, मी दोन तासात ...अजून वाचा

20

पॉवर ऑफ अटर्नी (पर्व २ रे ) भाग ६

पॉवर ऑफ अटर्नी (पर्व २ रे ) भाग ६ भाग ५ वरून पुढे वाचा .... किशोर साधा होता, शाळा कॉलेज मधे सुद्धा त्याने कधी मारामारी केली नव्हती, पण आताचा प्रसंग वेगळा होता, आत्ता पर्यंत ते बदमाश बँक लुटायची गोष्ट करत होते, आणि किशोरच्या मानेवर सुरा ठेऊन एक जण उभा होता. पण आता त्यांचा विचार बदलला होता आणि ते आता माधवीला उचलून नेण्याची भाषा करत होते. किशोर विचार करत होता, काहीही झाले तरी माधवीच्या मदतीला जायलाच पाहिजे, असा त्याच्या मनाने कौल दिला. हा विचार एकदा पक्का ठरल्यावर त्याने क्षणाचाही विलंब न लावता ज्याने माधवीला पकडले होते त्याच्यावर झेप ...अजून वाचा

21

पॉवर ऑफ अटर्नी (पर्व २ रे ) भाग ७

पॉवर ऑफ अटर्नी (पर्व २ रे ) भाग ७ भाग ६ वरून पुढे वाचा .... “त्यांची बायको असते आणि त्यांच्या आई ट्रॅवल कंपनी बरोबर कोस्टल कर्नाटक फिरायला गेल्या आहेत. म्हणून कदाचित फोन लागत नसेल. तुमचं काय काम होतं हे सांगितलं तर मी त्यांना कॉनटॅक्ट करायचा प्रयत्न करेन.” – बाई. “नाही, तशी काही आवश्यकता आणि अर्जनसी नाहीये, फक्त सगळं ठीक ठाक आहे का अशी चौकशी करायची होती. पण सगळं ठीकच दिसतंय, त्यामुळे काळजी नाही. बरय धन्यवाद. मी चालतो.” असं म्हणून तो निघाला. परिस्थितीचा उगाच गवगवा करण्यात काही अर्थ नाही असं त्याला वाटलं. हा रीपोर्ट दुसऱ्या दिवशी दरभंगा ब्रँच ...अजून वाचा

22

पॉवर ऑफ अटर्नी (पर्व २ रे ) भाग ८

पॉवर ऑफ अटर्नी (पर्व २ रे ) भाग ८ भाग ७ वरून पुढे वाचा .... माधवी आता निवांत खुर्चीवर बसली. आता दुपारचे पांच वाजत आले होते, आणि सकाळपासून अन्नाचा एक कण सुद्धा तिच्या पोटात गेला नव्हता. तिला एकदम भुकेची जाणीव झाली. तिच्या बरोबर तिचा बँकेतला सहकारी होता, त्याने जाऊन काही तरी खायला आणलं. खाल्यावर जरा तरतरी आली. “सकाळ पासून खूप विचित्र घटना घडताहेत, खूपच दगदग झाली. तुम्ही खूप थकल्या असाल, तुम्ही घरी जाऊन आराम करता का? मी थांबतो इथे.” – सहकारी. “छे,छे. अरे, ज्या माणसाने माझ्या साठी जिवाची बाजी लावली, त्याला सोडून मी घरी जाऊ? माझ्या नवऱ्याच्या नावाला ...अजून वाचा

23

पॉवर ऑफ अटर्नी (पर्व २ रे ) भाग ९

पॉवर ऑफ अटर्नी (पर्व २ रे ) भाग ९ भाग ८ वरून पुढे वाचा .... “एक मिनिट, थोडं थांबतेस का? माझ्या काही ओळखी आहेत एयरलाइन्स मधे, मी बघतो तुला उद्याची फ्लाइट मिळते का?” – बॉस. “थॅंक यू सर, खरंच फार मोठी मदत होईल मला. थांबते मी.” – विभावरी. जवळ जवळ अर्धा तास बॉस फोन वर बोलत होता, मग विभावरीला म्हणाला. “तुझं काम झालं आहे. उद्याच्या फ्लाइट मधे तुला जागा मिळून जाईल. मी एक फोन नंबर देतो, त्यांना कॉनटॅक्ट कर ते तिकीटाची व्यवस्था करतील.” – बॉस. विभावरी दुसऱ्याच दिवशी विमानात बसली. विमान सुरू झाल्यावर विभावरीने एक समाधानाचा ...अजून वाचा

24

पॉवर ऑफ अटर्नी (पर्व २ रे ) भाग १०

पॉवर ऑफ अटर्नी (पर्व २ रे ) भाग १० भाग ९ वरून पुढे वाचा .... “ताई, आता ते सर्व. चला आपण रूम मधे जाऊ, किशोर सर तुमच्या वाटे कडे डोळे लाऊन बसले आहेत.” माधवी म्हणाली आणि मग दोघी जणी रूम मधे जायला निघाल्या. विभावरीच्या डोक्यांवरचं ओझं आता पूर्ण उतरलं होतं आणि केंव्हा एकदा किशोरला भेटते असं तिला झालं होतं. “त्यांना काय माहिती की मी आली आहे ते? त्यांचा तर फोनच लागत नाहीये. कोणा जवळ आहे त्यांचा फोन?” – विभावरी. “तो बँकेत कदाचित जे नवीन साहेब आले आहेत, त्यांच्या जवळ असेल. मी उद्या जाऊन घेऊन येईन. शुद्धीवर आल्या ...अजून वाचा

25

पॉवर ऑफ अटर्नी (पर्व २ रे ) भाग ११ (अंतिम)

पॉवर ऑफ अटर्नी (पर्व २ रे ) भाग ११ (अंतिम) भाग १० वरून पुढे वाचा .... “बरोबर आहे इंस्पेक्टर प्रसाद म्हणाले. त्यांनी किशोर ला दुर्गा कुमारच्या पत्रा बद्दल सांगितलं. हे ऐकून किशोरच्या पायाखालची जमीनच सरकली. माधवी तर भयंकर संतापली. म्हणाली “अहो असं कसं, जे लोकं बँकेत होते, त्यांनी सगळं पाहीलं आहे, हा कोण माणूस आहे असं विपरीत बोलतो आहे? तद्दन खोटं आहे हे” “माधवी मॅडम शांत व्हा. खरं काय आहे ते सगळ्यांनाच माहीत आहे. या माणसाला शोधायला आमच्या टीम गेल्या आहेत. तो आल्यावरच कळेल की त्याचा असं पत्र लिहिण्या मागे काय उद्देश आहे तो. पण तुम्ही आणि किशोर ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय