मी एक अर्धवटराव

(46)
  • 157.1k
  • 7
  • 62.3k

मी एक अर्धवटराव! 'नमस्कार! मी अर्धवटराव! दचकलात ना असे अजब गजब नाव ऐकून? खरे सांगू का या नावाने मला कुणी हाक मारली तर मी दचकत नाही, रागावत नाही, चिडत नाही, ओरडत नाही आणि रडतही नाही. उलट अशी हाक कुणी आणि त्यातल्या त्यात बायकोने मारली ना तर मला एखादा बहुमान, सर्वोच्च पुरस्कार मिळाल्यासारखे वाटते. एक अगदी खरे-खरे कुणाचीही शपथ न घेता सांगतो (कारण शपथ घेतली म्हणजे खरेच बोलावे असा काही नियम नाही ना, फारतर तो एक संकेत आहे) की,

Full Novel

1

मी एक अर्धवटराव - 1

१) मी एक अर्धवटराव! 'नमस्कार! मी अर्धवटराव! दचकलात ना असे गजब नाव ऐकून? खरे सांगू का या नावाने मला कुणी हाक मारली तर मी दचकत नाही, रागावत नाही, चिडत नाही, ओरडत नाही आणि रडतही नाही. उलट अशी हाक कुणी आणि त्यातल्या त्यात बायकोने मारली ना तर मला एखादा बहुमान, सर्वोच्च पुरस्कार मिळाल्यासारखे वाटते. एक अगदी खरे-खरे कुणाचीही शपथ न घेता सांगतो (कारण शपथ घेतली म्हणजे खरेच बोलावे असा काही नियम नाही ना, फारतर तो एक संकेत आहे) की, ...अजून वाचा

2

मी एक अर्धवटराव - 2

२) मी एक अर्धवटराव! दिवसागणिक मी मोठा होत होतो. आईच्या म्हणण्यानुसार जसे वय वाढत जात होते तसतसे जन्मतःच मला चिकटलेले गुण अधिकच घट्ट होत होते. इतके की, मी काही तरी कारण काढून जेवायचेही टाळत असे. नानाविध कारणे सांगून शाळेत जायचेही टाळत होतो. परंतु घरच्यांचा दट्ट्या आणि गुरुजींचा रट्टा यामुळे उशिराने का होईना शाळेत जात असे. पूर्ण वेळ शाळा कधी केलीय हे मला आठवत नाही. मात्र गुरुजी म्हणत तसा मी एकपाठी होतो. अभ्यासात विशेष परिश्रम न करताही मी सदैव पन्नास-साठ टक्के गुण मिळवत असे. आठव्या वर्गात शिकत असतानाची एक घटना माझ्या कायम स्मरणात आहे. ती गोष्ट आठवली ...अजून वाचा

3

मी एक अर्धवटराव - 3

३) मी एक अर्धवटराव! आपल्याकडे कसे आहे, मुलाला नोकरी लागली, तो कामाधंद्याला त्याच्या हाताला एकदाचे काम मिळाले की, तो विवाहासाठी योग्य झाला, वयात आला असा शिक्का बसतो. माझेही तसेच झाले. पदवीधर झालो आणि एका सरकारी कार्यालयात नोकरीला लागलो. झाले. लगेच माझ्या लग्नाची चर्चा सुरू झाली. यात माझी आई आघाडीवर होती. कुणाच्याही आईला तिच्या मुलाच्या लग्नाची घाई सर्वात जास्त असते. लग्नाला नकार देणाऱ्या मुलाचे मन वळवून त्याला 'दोनाचे चार' करायला लावण्यात आईचा सिंहाचा वाटा असतो. माझेही तसेच झाले. इच्छा नसताना आईच्या पुढाकाराने माझ्यासाठी वधुसंशोधन सुरु झाले. नोकरीच्या निमित्ताने मी दुसऱ्या गावी राहात होतो. ते गाव माझ्या राहत्या ...अजून वाचा

4

मी एक अर्धवटराव - 4

४) मी एक अर्धवटराव! लग्नाची तयारी जोरात सुरू झाली. पंधरा दिवसांची रजा घेतली होती. त्यावेळी 'हनिमून' वगैरे अशी प्रथा नव्हती... किमान मध्यमवर्गीयांसाठी तर निश्चितच नव्हती. फार तर लग्न झाले की, नवीन जोडपे एखाद्या देवतेच्या त्यातही कुलदेवतेच्या दर्शनासाठी जात असत. मी रजेचा अर्ज माझ्या साहेबांसमोर ठेवला. त्यावर सरसरी नजर टाकत साहेबांनी विचारले,"पंधरा दिवसांची सुट्टी शक्य नाही. आठ दिवस पुरेसे आहेत. खरेच लग्न आहे ना?""म्हणजे काय? साहेब, सोबत लग्नपत्रिका जोडली आहे...""अहो, अशा पत्रिका शंभर रुपये फेकले की तासाभरात मिळतात. कसे आहे, मी काही असाच या खुर्चीवर बसलो नाही. डोक्यावरचे केस काळे-पांढरे असा प्रवास करून आता तांबडे झाले आहेत. ...अजून वाचा

5

मी एक अर्धवटराव - 5

५) मी एक अर्धवटराव! मला पहिल्यापासूनच प्रवासाची भारी आवड! त्यातही बसने करणे ही माझ्यासाठी आनंदाची पर्वणी! आमच्या पिढीने एक काळ असाही पाहिला आहे की, त्याकाळी सर्वसामान्यांना केवळ आणि केवळ लालपरीचा अर्थात महामंडळाच्या बसचा सहारा होता, आधार होता. महामंडळाने जारी केलेल्या योजनांमध्ये ३-५-७- आणि १० दिवसांचे पास अशा योजना असायच्या. ठराविक रक्कम भरून तो पास विकत घेतला की, मग योजनेप्रमाणे तितके दिवस महाराष्ट्र राज्यात फिरत राहायचे. तर असे मुदती पास काढून मी एकट्याने अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला आहे. ते म्हणतात ना, 'हौसे, गवसे, नवसे' ही त्रयी अनुसरून फिरत असलो तरीही महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांना भेटी देणे हाही प्रमुख ...अजून वाचा

6

मी एक अर्धवटराव - 6

६) मी एक अर्धवटराव! विवाहानंतर एक-एक दिवस, आठवडे, महिने आणि वर्षेही एकामागून एक जात होती. परंतु माझ्या स्वभावात तीळमात्र फरक पडत नव्हता उलट अंगीभूत असलेले गुण दिवसेंदिवस वाढत होते. नशीब चांगले की,बायको अत्यंत समजूतदार, गृहकृत्यदक्ष होती. कधी माझ्या स्वभावामुळे चिडत होती, रागवत होती, संतापत होती,त्रागा करीत होती, रुसत-फुगत होती, आदळआपट करीत असे पण शेवटी सारे सांभाळून, समजून घेत होती,'पदरी पडले नि पवित्र झाले' याप्रमाणे वागत होती. आमचा संसार कडुगोड आठवणींसह सुरळीतपणे चालू आहे... रविवारचा दिवस उजाडत असताना बायकोच्या कोंबड्याने बांग दिली. नाही! तसे नाही! आम्ही कोंबडाच काय पण कोणताही प्राणी आयुष्यभरात ...अजून वाचा

7

मी एक अर्धवटराव - 7

७) मी एक अर्धवटराव ! काही दिवसांपासून भर मे महिन्यात पावसाळा आहे की काय असे वातावरण निर्माण झाले होते. आभाळ गच्च भरून होते. थंडगार वारे वाहत होते. मुसळधार पावसाला सुरुवात होईल अशी लक्षणे दिसत होती परंतु पाऊस हुलकावणी देत होता. त्यादिवशी सायंकाळी चहा संपवून आम्ही दोघे नवराबायको दिवाणखान्यात बसलो होतो. बायको नेहमीप्रमाणे तिच्या कामात दंग होती तर मी रिकामटेकडा बिचारा भ्रमणध्वनीच्या खेळात अडकलो होतो. तितक्यात अचानक अनेक दिवसांपासून अपेक्षित असलेला, वातावरण निर्मिती केलेला पाऊस सुरू झाला. तशी सौभाग्यवती मला म्हणाली,"अहो..." कसे असते बायकोने आवाज दिला की, तिचा ध्वनी कानावर आदळतो न आदळतो तोच नवऱ्याचा प्रतिनिधी ...अजून वाचा

8

मी एक अर्धवटराव - 8

८) मी एक अर्धवटराव! त्यादिवशी कोणत्या तरी सणाची सुट्टी होती. सण म्हटले काय खायची चंगळ! त्यात स्वयंपाकात बायकोचा हात कुणी धरणार नाही अशी माझी खात्री! बायकोने केलेल्या स्वयंपाकावर आडवातिडवा हात मारून मी पलंगावर आडवा झालो आणि काही क्षणातच घोरायला लागलो. अर्थात ही बायकोची मल्लीनाथी! कारण मीच काय कुणीही आपण घोरतो हे कबुलच करत नाही. कारण स्वतःचे घोरणे फार कमी लोकांना ऐकू येते. ज्या लोकांना स्वतःचे घोरणे ऐकू येते यापैकी अनेक लोक ते कबुलच करत नाहीत. आता हेच बघा ना मला माझे घोरणे ऐकू न येताही मी ते मान्य करतो पण नेहमी रात्री अपरात्री जिच्या घोरण्यामुळे माझी झोपमोड ...अजून वाचा

9

मी एक अर्धवटराव - 9

९) मी एक अर्धवटराव ! मी माझ्या बायकोच्या माहेरचा जावाई ना ! माझे सासरही तसे मध्यमवर्गीय पण त्यांनी माझे जावाई या नात्याने सारे कोडकौतुक, मानसन्मान केला. मुळात मी स्वभावाने अतिशय शांत असाच. त्यामुळे मीही माझ्या सासरी किंवा सासरच्या माणसांबद्दल कधी राग, संताप, द्वेष, चिडचिड असे प्रकार केले नाहीत. एकंदरीत मी एक आवडता असा जावाई होतो. त्यादिवशी रविवार असल्यामुळे सारे कसे सुस्तावल्यासारखे झाले होते. तितक्यात माझ्या चुलत सासऱ्यांचा फोन आला. मी उचलताच तिकडून सासरे म्हणाले,"जावाईबापू, नमस्कार. एक छोटे काम होते हो...""मामा, सांगा ना. संकोच करू नका..." माझी परोपकारी वृत्ती जागी झाली."काय आहे, तुम्हाला तर माहिती आहेच ...अजून वाचा

10

मी एक अर्धवटराव - 10

१०) मी एक अर्धवटराव ! नेहमीप्रमाणे मारोतीरायाचे दर्शन घेतले. आणि तिथून जवळच असलेल्या आमच्या गॅस कंपनीत गेलो. तिथली कामे करून मी घरी परतलो दाराबाहेर चप्पल काढत घराचे दार ढकलले. ते नुसते लोटलेले होते. मी दारातून आत प्रवेश केला न केला की, आतून हिचा आवाज आला, "अहो, आलात काय?" "होय. आलो की. अग, मला नेहमी पडणारा एक प्रश्न असा की, आजच नाही तर मी जेव्हा जेव्हा बाहेरून येतो आणि तू समोर नसतेस त्या प्रत्येक वेळी तू मला 'आलात काय?' हा ठरलेला प्रश्न विचारतेस? हे तुला कसे जमते ग? तुला कसे समजते ग?" ...अजून वाचा

11

मी एक अर्धवटराव - 11

११) मी एक अर्धवटराव! मध्यमवर्गीय विवाहित पुरुष आणि ऊतू जाणारे दूध यांचा काय ऋणानुबंध हे कदाचित देवालाही ठावूक नसावे. मध्यमवर्गीय स्त्रीयांकडून नवऱ्याला हमखास सांगितले जाणारे एक काम म्हणजे, 'अहो, मी जरा अमुक तमुक काम करतेय किंवा मी स्नानाला जातेय गॅसवर दूध ठेवलेय तिकडे जरा लक्ष द्या...' कोणताही नवरा हे काम मी यशस्वीपणे केलेय हे छातीठोकपणे सांगू शकत नाही आणि कुणी असा यशस्वीतेचा झेंडा अटकेपार रोवला असेल तर अशा पतीराजांना 'दूधसम्राट' या पदवीने गौरविण्यात यावे. प्रत्येक वेळी मी स्वतःलाच तेही स्वगत (कारण हा प्रश्न बायकोला विचारायची हिंमत माझ्याजवळ तरी नक्कीच नाही.) विचारतो की, नेमके दूध तापायला ठेवल्याबरोबर स्त्रीयांना इतर ...अजून वाचा

12

मी एक अर्धवटराव - 12

१२) मी एक अर्धवटराव ! सकाळची वेळ होती. मी तिनेच केलेल्या चहाचा आस्वाद घेत बसलो होतो. लग्न झाल्यापासून आम्ही एक शिस्त म्हणा, नियम म्हणा केला होता अर्थातच मी घरी असेल त्यादिवशी चहा, नाष्टा, जेवण दोघांनी मिळून एकत्र करायचे. त्यादिवशी चहा घेताना सौ. म्हणाली,"अहो, तुम्ही एकानंतर एक अशी अर्धवट कामे करता त्यामुळे मला ना राग येतो आणि मग मी तुम्हाला रागारागाने बोलते. ह्याचा तुम्हाला राग येत नाही का हो?""व्वा! क्या बात है! बाईसाहेबांचा मूड चांगला दिसतोय. वातावरणही पोषक आहे. कधीही पाऊसधारा कोसळू शकतात. काय भजे बिजे करायचा विचार आहे की काय?" मी लाडात येत विचारले."झाले. थोडे ...अजून वाचा

13

मी एक अर्धवटराव - 13

१३) मी एक अर्धवटराव! ऊतू जाणारे दूध! या परीक्षेत उत्तीर्ण सर्व नवरे मंडळीचे मनापासून अभिनंदन! या परीक्षेला यशस्वीपणे वा अयशस्वीपणे सामोरे गेलेल्या पतीराजांना अजून एका परीक्षेला नेहमीच सामोरे जावे लागते ती म्हणजे भाजी आणणे! काही वेळा तर एक वेळ दूध परवडले पण भाजी खरेदी नको अशी माझ्यासारख्या अनेक नवऱ्यांची स्थिती होते. कितीही पायपीट करून, घासाघीस करून, पाहून- निरखून, हाताची बोटे लालभडक होईपर्यंत सांभाळून आणलेल्या पिशव्या, हाताला, खांद्याला लागलेली कळ हे सारे सोसून भाज्या आणल्या तरीही शाबासकी म्हणून काय मिळते तर बायकोने भाज्यांकडे बघत कडकड मोडलेली बोटे आणि साता जन्माचा उद्धार! 'एक मानव दाखवा मजसी, बायकोने गौरवले ...अजून वाचा

14

मी एक अर्धवटराव - 14

१४) मी एक अर्धवटराव! 'असून अडचण, नसून खोळंबा' अशीच अवस्था प्रिय पत्नीच्या भ्रमणध्वनीमुळे नवऱ्याची होते. बायकोला मोठ्या कौतुकानं स्वतंत्र भ्रमणध्वनी घेऊन द्यावा तर भ्रमणध्वनीवरील साऱ्या गोष्टींची जाणीव करून देणे, तिचा फोन चार्ज नसेल तर चार्जिंगला लावणे, तिने कुठेतरी कानाकोपऱ्यात ठेवलेला भ्रमणध्वनी शोधून देणे. ती एखाद्या कामात विशेषतः स्वयंपाकात किंवा दुपारच्या दीर्घ वामकुक्षीत व्यग्र असताना तिचा भ्रमणध्वनी वाजला तर तो इमानेइतबारे तिच्या हातात देणे, हातात देताना तो उचलून (ऑन) देणे ही कामे करावी लागतात म्हणून बायकोचा भ्रमणध्वनी असून अडचणीचा. बरे, बायकोला तिच्या हक्काचा भ्रमणध्वनी नसेल तर मग नवऱ्याचा किती खोळंबा होतो हे मी सांगणे गैरवाजवी होईल. ...अजून वाचा

15

मी एक अर्धवटराव - 15

१५) मी एक अर्धवटराव ! 'काय करताय? चला. जाऊ साडी बाप रे! केवढ्यांदा दचकलात तुम्ही? अहो, मी तुम्हाला साडी घ्यायला येताय का असा साधा प्रश्न विचारला तर तुम्हाला जसे काय मी सीमेवर शत्रूशी लढायला नेतोय असा तुमचा चेहरा झाला. पण खरे सांगू का, तुमची अवस्था एकदम बरोबर आहे. बायकोबरोबर साडी घ्यायला जायचे म्हणजे किंवा बायकोसाठी तिला दुकानात न नेता स्वतःच्या पसंतीने साडी आणायची म्हटलं की, प्रत्येक नवऱ्याचा असाच थरकाप उडतो. नवऱ्याने मोठ्या प्रेमाने आणलेली साडी बायकोला पसंत पडेल याची शून्य टक्के खात्री असते. एखादा नवरा अमेरिकेत गेला म्हणजे आजकाल हे सहज शक्य आहे. तिथली कामे, वास्तव्य ...अजून वाचा

16

मी एक अर्धवटराव - 16

१६) मी एक अर्धवटराव! सकाळचे सव्वासात वाजत होते. मी लवकरच होतो. मी फेसबुक, व्हाटस्अप यावरील संदेश आणि चित्रांचे मनापासून अवलोकन करीत होतो. उलट टपाली संदेशही पाठवत होतो. डोळे, मन, शरीर जरी भ्रमणध्वनीवर खिळून होते तरी कान मात्र एका विशिष्ट आवाजावर लक्ष देऊन होते. तितक्यात मला अपेक्षित असलेला आवाज आला,"अहो, ऐकलत का?" त्या आवाजाने माझी तंद्री भंग पावली. मी भानावर येत पुटपुटलो,'चला. बस करा. महाराज, बुलावा आया है। उठा...'असे म्हणत मी भ्रमणध्वनी टप्प्या-टप्प्याने बंद करीत असताना पुन्हा आवाज आला. मला एक कळत नाही. माझ्या बायकोला एक गोष्ट केव्हाच का कळत नसावी की, शयनगृहातून किंवा स्वयंपाक घरातून दिलेला ...अजून वाचा

17

मी एक अर्धवटराव - 17

१७) मी एक अर्धवटराव! सकाळचे आमचे कार्यक्रम तसे ठरलेले असायचे. स्नान, पूजा होईपर्यंत नाश्त्याच्या गरमागरम फराळ तयार होत असे. त्यादिवशीही आमचा फराळ सुरू असताना बायको म्हणाली,"देवपूजेच्या बाबतीत मात्र तुमचा हात कुणी धरू शकत नाही. अगदी नंबर वन पुजेच्या बाबतीत! देवांची मांडणी असेल, त्यांची षोडशोपचार पूजा असेल आणि फुलांनी केलेली आरास असेल सारे कसे बघतच बसावेसे वाटते. जशी देवपूजा व्यवस्थित, मन लावून करता तशी इतर कामांमध्ये मन का नाही लागत हो तुमचे? तिथे का कंटाळा करता हो?""मला वाटतच होते की, स्तुतीसुमनाची त्यातही गुलाबपुष्पांची उधळण होत असताना बोचणाऱ्या काट्यांची पाखरण कधी होणार आहे?""जे खरे ते खरे! मग स्तुती ...अजून वाचा

18

मी एक अर्धवटराव - 18

१८) मी एक अर्धवटराव! सायंकाळची वेळ होती. मस्त थंडगार हवा होती. खिडकीतून बाहेर पाहिले की, छान पैकी पसरलेला संधीप्रकाश लक्ष वेधून घेत होता. तशा वातावरणात गॅलरीमध्ये आम्ही दोघेही गप्पा मारत बसलो होतो. बायकोचा मुड चांगला असला म्हणजे आम्ही दोघेही गॅलरीत नेहमीच बसतो. कधी चहा घेत. कधी वातावरण जास्तच आल्हाददायक असले तर गरमागरम भज्यांचा आस्वाद घेत. कधी मक्यांची कणसं खात तर कधी काही आणि उन्हाळ्यात तर दररोज तिथे बसून जेवणाचा आमचा नित्यक्रम ठरलेलाच. अचानक काही तरी आठवल्याप्रमाणे बायको म्हणाली,"अहो, काल सायंकाळी तुम्हाला ब्लाऊजपीस आणि अस्तरचा कपडा आणायला सांगितले होते. आणला का हो?""कालच सायंकाळी आणला. मी आलो तेव्हा ...अजून वाचा

19

मी एक अर्धवटराव - 19

१९) मी एक अर्धवटराव! सायंकाळ होत होती म्हणजे चार वाजत होते. चहाची वेळही होती. परंतु सौभाग्यवतीचा आराम चालू होता. 'कंटाळलेल्या पुरुषाला फेसबुकचा आधार' याप्रमाणे मी माझा भ्रमणध्वनी उचलून सुरू केला. फेसबुकवर जावे म्हणता भ्रमणध्वनीवर कुणाचा तरी संदेश प्राप्त झाला. शेजारच्या अण्णांनी पाठविलेल्या संदेशात लिहिले होते, 'येता का बाहेर? सहज.' मी लगेच 'आलोच' असे उत्तर पाठवून उठलो. शयनगृहात डोकावले. सौभाग्यवतीचा सप्तसूर लागला होता. मी कपडे चढवून बाहेर पडलो. मला पाहताच अण्णा म्हणाले,"या. या. "मी त्यांच्या दिवाणखान्यातील सोफ्यावर बसत म्हणालो,"अण्णा, वहिनींचा आराम चालू असेल. झोपमोड होईल त्यांची.""अहो, ती घरात आहेच कुठे? ती गेलीय तिच्या बहिणीकडे पाच वाजेपर्यंत येईल. म्हणून ...अजून वाचा

20

मी एक अर्धवटराव - 20

२०) मी एक अर्धवटराव! त्यादिवशी दोघे टीव्हीवरील एक मालिका बघत होतो. खरे तर आजकालच्या मालिका मी बघत नाही पण सौभाग्यवती एकूणएक मालिका पाहात असल्यामुळे मलाही पकडून आणल्याप्रमाणे सायंकाळी सात ते रात्री साडेदहापर्यंत टीव्हीसमोर बसावेच लागते. टीव्हीचा आणि माझा संबध फक्त क्रिकेटचे सामने, बातम्या आणि काही आवडीचे सिनेमा लागले तर पाहणे इतकाच! क्रिकेटचे मला एवढे प्रचंड वेड आहे की, जेव्हा कुठलाही सामना सुरू नसतो, कोणत्याही सामन्याचे थेट प्रक्षेपण नसते तेव्हा कुठल्या ना कुठल्या खेळाच्या वाहिनीवर मागच्या कुठल्या तरी सामन्यांची क्षणचित्रे दाखवत असतात तीच मी तासनतास पाहात बसतो. मला कंटाळा येत नाही. तितक्यात मालिकेत 'क्षणभराची' ...अजून वाचा

21

मी एक अर्धवटराव - 21

२१) मी एक अर्धवटराव! सकाळी सकाळी गरमागरम पोहे म्हणजे व्वा! क्या बात है। अशी पूर्वीपासूनच गरम पोहे हा पदार्थ माझ्यासाठी जीव की प्राण! त्यादिवशीही आम्ही दोघे पोह्यावर ताव मारीत असताना सौ. म्हणाली," का हो, मंदिरात जाणार असालच तर चार-पाच भाज्या घेऊन या ना. अरे, हो. बघा. मी सारखी आठवण करते, पिच्छा करते ते तुम्हाला पटत नाही. पण मी सांगितले नाही तर एक तरी आठवण तुम्ही आठवण ठेवून करता का हो?""काय झाले आता?" मी विचारले. तिने इकडेतिकडे पाहात शक्य तितक्या हळू आवाजात विचारले,"अहो, लॉकरचे काम केलेत का?""तू दागिने दिल्याशिवाय मी बँकेत जाणार कसा?" मी उलट विचारले"तेच ते. करावे, द्यावे ...अजून वाचा

22

मी एक अर्धवटराव - 22

२२) मी एक अर्धवटराव! एक प्रसंग, एक घटना माझ्या कायम स्मरणात आहे. आमच्या आम्ही माझ्या नोकरीच्या गावी आल्यानंतर साधारणतः दोन महिन्यांनी घडलेली ही घटना... शनिवारची रात्र! झोपताना विचार केला की, उद्या रविवार आहे. जरा उशिराने उठू परंतु मध्यमवर्गीय मानवाच्या नशिबात कुठले आलेय हे भाग्य? 'जन्मोजन्मीचे नाते जडलेय बायकोशी, झोप कशी मिळेल सुट्टीच्या दिवशी?' असे काहीसे नाते नवराबायको, सुट्टी आणि झोपेचे असते. रविवारी सकाळी गाढ झोपेत असताना कशाच्या तरी आवाजाने झोप चाळवली. उठावेसे वाटत नव्हते. डोळा उचलत नव्हता. पुन्हा तोच आवाज आला. यावेळी थोडा जागा असल्यामुळे आवाजाचा धनी कोण असेल याची पुसटशी कल्पना आली आणि मी दचकून, डोळ्यातील ...अजून वाचा

23

मी एक अर्धवटराव - 23

२३) मी एक अर्धवटराव! त्यादिवशी सायंकाळी आम्ही दोघे जेवायला बसलो होतो. नेहमीप्रमाणे टीव्हीवरील मालिका चालू होत्या. वाहिनीवरील एक मालिका एका विशिष्ट आणि रंगतदार वळणावर असल्यामुळे आम्ही दोघेही मन लावून पाहात होतो. प्रसंगी सौ'ची स्थिती अशी होई की, हातातला घास तोंडात टाकताना तो ओठांजवळ तसाच ठेवून किंवा घास चावताना तसाच थांबवून ती तो प्रसंग बघत होती. तितक्यात मला जोरदार ठसका लागला. एका क्षणात ठसक्याने उग्र स्वरूप धारण केले. मला काहीही सुचत नव्हते, डोळ्यात आसवांनी गर्दी केल्यामुळे मला समोरचे काहीही दिसत नव्हते. हातातील आणि तोंडातील घास खाली पडला. घशात खवखव, आग होत होती. नाकातूनही पाणी येत असताना कपाळावर घर्मबिंदू जमा झाले. "झालं? ...अजून वाचा

24

मी एक अर्धवटराव - 24

२४) मी एक अर्धवटराव! सकाळी सकाळी माझ्या भ्रमणध्वनीवर वेगळ्याच प्रकारची घंटी वाजली. अर्धवट अवस्थेत मी घड्याळात पाहिले. सकाळचे सहा वाजले होते. तसा मी मनाशीच म्हणालो,'ही विशेष धून वाजतेय म्हणजे आज कुणाचा तरी वाढदिवस असणार. कुणाचा बरे! हे आठवणीत राहिले असते तर भ्रमणध्वनीवर गजर ठेवायची गरज का भासली असती? चला पाहू तरी..' म्हणत मी पडल्या पडल्याच भ्रमणध्वनी उचलला. भ्रमणध्वनीचा एक एक खटका दाबत मी त्या विशेष ठिकाणी पोहोचलो. मीच आठवणीसाठी लिहिलेला संदेश असा होता,'उठा. असे पाहताय काय नवरोबा? आज तुमच्या लाडक्या बायकोचा वाढदिवस आहे. 'चाखायची असेल गोड डिश, तर बायकोला लवकर करा विश!...' चला. बायकोला विश करूया.' म्हणून ...अजून वाचा

25

मी एक अर्धवटराव - 25

२५) मी एक अर्धवटराव! ती एक सायंकाळ! आमच्या जीवनातील एक मोठ्ठा विनोद जन्माला घालणारी, बहाल केलेल्या 'अर्धवटराव!' या पदवीतला सत्यांश पटवाणारी, सिद्ध करणारी. त्या सायंकाळी आम्हाला एका नातेवाईककडे एका समारंभासाठी जायचे होते. ते ठिकाण माझ्या घरापासून बरेच दूर होते. मला दुचाकीवरून जायचा कंटाळा आला आणि हिचीही इच्छा आरामात टॅक्सीने जाऊ अशीच होती. चार वाजता निघायचे होते. बायकोला सजायला, नटायला खूप वेळ लागतो म्हणून हिने तीन वाजल्यापासून तयार व्हायला सुरुवात केली. पावणेचार वाजता ही म्हणाली,"अहो, मी तयार आहे बरे का?""होय. आजकाल तू तब्येतीने चांगलीच तयार झाली आहेस...""मस्करी करू नका. गाडी बुक केली का?""होय. तेच करतोय..." असे म्हणत मी भ्रमणध्वनी ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय