कोरेगाव पार्कातल्या क्रॉसवर्डच्या बाहेर ‘मिडनाईट-ब्लॅक’ रंगातली फोर्ड-ईको-स्पोर्ट गाडी येऊन थांबली. दार उघडुन एक साधारण तिशीच्या आसपासचा एक युवक उतरला. गाडीच्या रंगाशीच सार्धम्य सांगणारा काळा कुळकुळीत सॅटीनचा शर्ट, ग्रे रंगाचं स्पोर्ट्स जॅकेट, पायात क्रोकोडाईल शुज, बारीक फ्रेमचा चंदेरी चष्मा आणि जेल लावुन मागे वळवलेले केसं. दाराशीच उभ्या असलेल्या बॉयला व्हॅलेसाठी गाडीची किल्ली देऊन तो क्रॉसवर्डमधील एका कोपर्‍याकडे वळला. कोपर्‍यात जमलेली ८-१०च लोकं बघुन त्या तरूणाच्या चेहर्‍यावरील हास्य किंचीत मावळले.त्याला आलेले बघताच गळ्यात मोठ्ठालं ओळखपत्र, कानाला ब्ल्यु-टूथ हेड्सेट लावून वावरणारा संयोजक टाईप्स एक युवक धावतच दाराकडे आला. “वेलकम कबीर सर.. प्लिज वेलकम..”, तो संयोजक त्या तरुणाशी हातमिळवणी करत म्हणाला.“जित.. अरे काय? इतकीच

Full Novel

1

इश्क – (भाग १)

कोरेगाव पार्कातल्या क्रॉसवर्डच्या बाहेर ‘मिडनाईट-ब्लॅक’ रंगातली फोर्ड-ईको-स्पोर्ट गाडी येऊन थांबली. दार उघडुन एक साधारण तिशीच्या आसपासचा एक युवक उतरला. रंगाशीच सार्धम्य सांगणारा काळा कुळकुळीत सॅटीनचा शर्ट, ग्रे रंगाचं स्पोर्ट्स जॅकेट, पायात क्रोकोडाईल शुज, बारीक फ्रेमचा चंदेरी चष्मा आणि जेल लावुन मागे वळवलेले केसं. दाराशीच उभ्या असलेल्या बॉयला व्हॅलेसाठी गाडीची किल्ली देऊन तो क्रॉसवर्डमधील एका कोपर्‍याकडे वळला. कोपर्‍यात जमलेली ८-१०च लोकं बघुन त्या तरूणाच्या चेहर्‍यावरील हास्य किंचीत मावळले.त्याला आलेले बघताच गळ्यात मोठ्ठालं ओळखपत्र, कानाला ब्ल्यु-टूथ हेड्सेट लावून वावरणारा संयोजक टाईप्स एक युवक धावतच दाराकडे आला. “वेलकम कबीर सर.. प्लिज वेलकम..”, तो संयोजक त्या तरुणाशी हातमिळवणी करत म्हणाला.“जित.. अरे काय? इतकीच ...अजून वाचा

2

इश्क – (भाग २)

कबीर गोवा एअरपोर्टच्या बाहेर आला आणि समुद्राचा खारा, दमट वारा त्याच्या नाकात शिरला. कबीरने डोळे बंद करुन तो वारा नसा-नसांत भरुन घेतला. शहरांतला तो पेट्रोलचा, पोल्युशन्सचा, कचर्‍याचा, कोंदलेल्या श्वासांचा, गल्लोगल्ली उभारलेल्या हातगड्यांवरील खाद्यपदार्थांचा.. सर्वा-सर्वांपेक्षा वेगळा… काही क्षणच कबीर त्या स्वर्गीय अनुभुतीत होता. त्याची तंद्री भंगली ती टुरीस्ट-टॅक्सीवाल्यांच्या आवाजांनी.“पणजीम..पणजीम.. म्हाप्सा.. म्हाप्सा..” च्या आवाजांनी परीसर गजबजुन गेला. कबीरने एक दीर्घ श्वास घेतला, आपली ट्रॉली बॅग ओढली आणि तो टॅक्सीत जाऊन बसला. “सर, फर्स्ट टाईम गोवा?”, ड्रायव्हरने टॅक्सीच्या आरश्यात कबीरकडे बघत विचारलं.कबीर स्वतःशीच हसला आणि मानेनेच त्याने नाहीची खुण केली. कबीरला त्याची शेवटची, सहा महीन्यांपुर्वीची गोवा-ट्रीप चांगलीच लक्षात होती. त्याच्या चार मित्र-मैत्रीणींबरोबर ...अजून वाचा

3

इश्क – (भाग ३)

त्या तरुणीला सोफ्यावर ढकलुन तो दुकानवाला निघुन गेला. कबिरचं डोकं सॉल्लीड ठणकत होतं, त्यातच त्या तरुणीला जिना चढवुन आणल्याने सॉल्लीड धाप लागली होती. डोक्याला हात लावुन तो खुर्चीत बसतच होता तोच त्याचा फोन खणखणु लागला. चार शिव्या हासडत त्याने फोन उचलला.. “कबिर सर.. रोहन बोलतोय…, काय म्हणतंय गोवा…”धाप लागल्याने कबिरला निट बोलताच येत नव्हते.. “ठिक.. ठिके.. ठिके गोवा…” “अरे काय रे? काय झालं?”, रोहनने काळजीच्या सुरात विचारलं..”अश्या धापा का टाकतोयेस…? एव्हरीथिंग ऑलराईटना?”“एक मिनीटं थांब, मी जरा पाणी पितो आणि मग बोलतो ओके?”, कबिर..“ओके.. ओके, मी होल्ड करतो..”, रोहन म्हणाला टेबलावरचा पाण्याचा जग कबिरने तोंडाला लावला, गटागटा पाणी प्यायल्यावर त्याला ...अजून वाचा

4

इश्क – (भाग ४)

“एक्सक्युज मी..”, कबिर बसला होता त्या टेबलाच्या समोर उभी असलेली तरुणी म्हणाली. कबिरने जणू लक्षच नव्हते अश्या अविर्भावात वर “येस?”, कबिर“अम्म.. इथे कोणी बसलेलं नसेल, तर मी इथं बसु का?”, तरुणी“हो.. व्हाय नॉट.. प्लिज..” ती तरुणी समोरची खुर्ची सरकवुन बसली. हातातल्या फाईल आणि कागदपत्र कडेला ठेवली आणि कबिरला म्हणाली.. “मी राधा…”“आय नो..”, कबिर पट्कन म्हणुन गेला.. “अं..” आपले घारे डोळे मोठ्ठे करत ती म्हणाली..”हाऊ डू यु नो?”कबिरला पट्कन आपली चुक लक्षात आली.. तो टॅटू आपण मगाशी पाहीला होता हे कबिर बोलु शकत नव्हता.. “आय मीन.. तुच म्हणालीस नं आत्ता,…”, कबिर आपली चुक सावरत म्हणाला..“ओह हं… हिहिहिहिहि..”, विचीत्र हसत राधा ...अजून वाचा

5

इश्क – (भाग ५)

“आई-शप्पथssss.. सौल्लीड शॉक बसला असेल ना तुला?”, रोहन फोनवर खो-खो हसत म्हणाला“अरे मग काय तर.. दुसरं कोणी असतं तर लाल केलं असतं.. पण यार खरंच, इतकी मस्त आहे ना राधा….”, कबिर “बsssर.. चांगली प्रगती आहे, दोन दिवस नाही झाले गोव्याला जाऊन तर..करा एन्जॉय करा.. आणि हो स्टोरी घे लिहायला …”, रोहन“हो रे.. सुचायला तर हवं काही तरी…”, कबिर “अरे अख्खी कादंबरी आहे तुझ्याजवळ.. मला नक्की खात्री आहे, तुझी गोष्ट तुला राधामध्येच मिळेल…”, रोहन“लेट्स सी.. बरं चल, ठेवतो.. करेन फोन नंतर…”, कबिर“येस्स सर.. बरं यार, एक फोटो पाठव नं त्या राधाचा.. तु इतकं छान वर्णन केलं आहेस.. फ़ार बघायची इच्छा ...अजून वाचा

6

इश्क – (भाग ६)

राधा गेट उघडतच होती तोच समोर एक रिक्षा येऊन थांबली. रिक्षावाला पटकन उतरला आणि त्याने रिक्षातुन सोफी ऑन्टींना हात खाली उतरवले. सोफी ऑन्टींच्या हाताला आणि कपाळाला थोडं खरचटलं होतं. ते बघताच हातातली बॅग टाकुन राधा धावत रिक्षेपाशी गेली. कबिरही काय झालं बघायला मागोमाग धावला. “सोफी ऑन्टी ! काय झालं?” राधाने त्यांचा हात धरत विचारलं..“काही नाही ताई.. त्या रिक्षेतुन चालल्या होत्या, म्हापसा चौकात मध्येच एक मोटारसायकलवाला आला, त्याला वाचवण्याच्या नादात रिक्षा उलटली..”“अहो काय.. निट चालवता येत नाही का रिक्षा तुम्हाला..? माजलेत तुम्ही लोकं…!!”, राधा तावातावाने बोलली“ताई, अहो माझ्या रिक्षेत नव्हत्या त्या.. दुसरी रिक्षा होती. तो गेला पोलिस स्टेशनात.. मी विचारलं ...अजून वाचा

7

इश्क – (भाग ७)

राधा उठुन आपल्या रुमकडे निघाली आणि कबीरच्या मनात प्रचंड चलबिचल सुरु झाली. काय करावं? काय करावं म्हणजे राधाला थांबवता कसंही करुन कबीरला राधाला नजरेआड होऊ द्यायचं नव्हतं. राधा जेथे कुठे जाणार आहे, तेथे तेथे आपण सुध्दा तिच्या बरोबर जावं?पण राधा का म्हणुन आपल्याला बरोबर घेऊन जाईल? राधाला सांगावं की फोन निट चालू झालाचं नव्हता?पण तिने बघीतला होता फोन चालु झालेला, आणि आपल्या सांगण्यावर ती का विश्वास ठेवेल, तिला तिचं स्वातंत्र्य महत्वाचं आहे.. काय करावं..? कबीरची मतीच गुंग झाली होती. “राधा…”“हम्म?” “राधा.. आय एम सॉरी..”“कश्याबद्दल? आय मीन कश्या-कश्याबद्दल?”, काहीसं हसुन राधा म्हणाली..“ते मी सकाळी तुला.. ते गेटपाशी म्हणालो… आय-लव्ह-यु.. ते ...अजून वाचा

8

इश्क – (भाग ८)

कबिर तिथे किती वेळ बसला होता? त्यालाच माहीत नाही. कदाचीत दोन मिनीटं असेल, कदाचीत दोन तासही असेल. प्रश्न तो प्रश्न होता राधा निघुन गेली पुढे काय? काही क्षण ओसरल्यावर कबिर भानावर आला. त्याच्यात लपलेला गुन्हेगारी-कथा-लेखक जागा झाला. राधाने काही तरी ‘क्ल्यु’ सोडला असेलच की. काही तरी, ज्यावरुन राधा कुठे गेली ह्याचा पत्ता लागेल. कित्तेक सराईत गुन्हेगार सुध्दा गुन्हा करताना नकळत काहीतरी खूण सोडून जातातच… कबिर नव्या उमेदीने उठला आणि त्याने राधाची खोली शोधायला सुरुवात केली. कपाटं, टेबलाचे ड्राव्हर्स, बेडखाली, डस्टबीन जेथे शोधता येईल तेथे.. पण कागदाचा एक साधा कपटा सुध्दा सापडला नाही. कबिर स्वतःशीच चरफडत होता… ‘थिंक कबिर.. थिंक…’त्याने ...अजून वाचा

9

इश्क – (भाग ९)

नविन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा मंडळी. क्रिसमसच्या सुट्या आणि नविन वर्षाचं स्वागत जोरदार झालं ना? तुमच्या सर्वांच्या ढीगभर प्रतिक्रिया आणि वाचुन मज्जा वाटते. काही ई-मेल्समध्ये विचारणा झाली होती की राधा नक्की कशी दिसते, किंवा माझ्या लेखी, सिने-तारकांपैकी राधासारखं दिसणारं असं कोण? खुप मजेदार ई-मेल्स होत्या. बर्‍याचजणांनी विचारलं म्हणुन मी माझा ह्या बाबतीतला शोध आरंभला आणि राधाला साजेशी एक तारका सापडली खरी. ‘सपना पब्बी’, इथे क्लिक करुन बघा तिचा फोटो.. अर्थात हे माझं व्हर्जन आहे, तुम्हाला काय वाटतं? राधा कोणासारखी दिसते? असो.. तर चला कथेकडे वळु… भाग ८ पासुन पुढे “कसा आहेस?”, मोनिकाने वेटरला ऑर्डर देऊन कबिरला विचारलं.“मी मस्त.. तु?”, कबिर“मी ...अजून वाचा

10

इश्क – (भाग १०)

ज्या दिवशी राधा कबिरला सोडुन निघुन गेली होती त्या रात्रीपुर्वीच्या गप्पांच्या सेक्शनचे पान कबिरने लॅपटॉपवर उघडले. ह्यातील प्रसंगात अजुन भर घालण्याच्या हेतुने कबिरने लिहायला सुरुवात केली.. “हे बघ राधा.. ठिक आहे.. यु आर नॉट हॅपी विथ युअर हजबंड.. पण नॉट हॅपी विथ लाईफ़..?? मला नाही पटत… तुझं आयुष्य मे बी अनेकींसाठी एक ड्रिम लाईफ़ असेल.. गडगंज नवरा.. हाताशी भरपुर पैसा.. फिरायला २४ तास गाडी, पार्टी लाईफ़, सेलेब्रेटी स्टेट्स.. आय मीन व्हॉट्स रॉग?” “असेल.. इतरांसाठी असेल.. माझ्यासाठी नाही..”, राधा“पण का? ““कारण मला माझं स्वातंत्र्य महत्वाचं आहे कबिर… मला लग्नानंतर माझं पुर्ण आयुष्य असं डोळ्यासमोर दिसत होतं. मुलं-बाळं त्यांच खाणं-पिणं.. मग ...अजून वाचा

11

इश्क – (भाग ११)

राधाचा निश्चय पक्का होता. कबिर काही मार्ग काढो नाही तर न काढो, तिला इथुन निघणं क्रमप्राप्त होतं. तिला आपल्या काय अपेक्षा आहेत हे स्पष्ट होते, आणि कुण्या कबिर नामक व्यक्तीसाठी, ज्याची ओळख फक्त काही दिवसांची होती, त्याच्यासाठी ती आपले स्वातंत्र्य पणाला लावण्यास कदापी तयार नव्हती. कबिरला सोडुन ती आपल्या खोलीत आली. सोफी-ऑन्टीचा जाताना निरोप घेता येणार नाही ह्याचं मात्र तिला राहुन राहुन वाईट वाटत होत. महीन्याभरातच त्यांचे आणि राधाचे खुप छान संबंध जुळले होते. “एका अर्थाने, झालं ते बरंच झालं, कदाचीत त्यांचा निरोप घेण जास्त अवघड झालं असतं. शेवटी इथे थोडं नं आपण कायमचं रहाणार होतो? ४ दिवसांनी जायचं, ...अजून वाचा

12

इश्क – (भाग १२)

राधा त्या प्रकाराने क्षणभर गांगरुन गेली.. पण क्षणभरच, तिने लगेच स्वतःला सावरले, चार्लीला बाजुला ढकलण्यासाठी तिने आपले हात त्याच्या सोडवण्याचा प्रयत्न केला, पण चार्लीची तिच्याभोवती मजबुत पकड होती. राधाने तो प्रयत्न सोडुन दिला. तिने विचार केला “काय हरकत आहे? काय हरकत आहे जर एखाद्याने तिला किस्स केले?” अनुरागच्या त्या खोट्या, क्षणभराच्या खोट्या किस्सपेक्षा, चार्लीचा राकट किस तिला अधीक भावला. त्याच्या मर्दानी, नॉन-कल्चर्ड, वाईल्ड मिठीमध्ये तिने स्वतःला झोकुन दिले. तिच्या त्या कृतीला योग्य-अयोग्याच्या तराजुत तोलणारे इथे कोणी नव्हते, उंचावणार्‍या भुवया नव्हत्या की पाठीमागे होणारी कुजबुज नव्हती. होते फक्त आणि फक्त स्वातंत्र्य. एका स्पिडब्रेकरवरुन ट्रक खाड्कन गेला आणि राधा व चार्ली ...अजून वाचा

13

इश्क – (भाग १३)

राधाचा फोन येऊन गेल्यावर अनुरागने चक्र वेगाने फिरवली. राधाच्या जामीनीची पुर्तता त्याने काही फोन-कॉल्सवरच करुन टाकली आणि तो स्वतःचे घेउनच गोकर्णला गेला. गोकर्णचे एक बिझीनेसमन त्याच्या ओळखीचे होते,त्यांच्या फार्म-हाउसवरच्या हेलीपॅडवर उतरुन त्यांच्याच कारने तो पोलिस-स्टेशनला पोहोचला. पोलिस-स्टेशनवर जणु जगातले सगळे पत्रकार, सगळे टीव्ही चॅनल्स आपापल्या ओबी-व्हॅन्ससहीत जमले होते. अनुरागने आधीच फोनवरुन तंबी देऊन ठेवली होती, त्यामुळे त्याची कार पोलिस-स्टेशनवर पोहोचताच पोलिसांनी त्याला गराडा घातला आणि त्याला सुरक्षीत आत घेऊन गेले. अनुरागकडुन बाईट्स मिळवण्यासाठी सगळ्यांची चढाओढ चालली होती, पण पोलिसांपुढे कुणाचाच निभाव लागत नव्हता.. “आता कळेल साल्याला मिडीया मागे लागली की काय होते ते…” पोलिस-स्टेशनच्या पायर्‍या चढताना कुणाचेतरी वाक्य अनुरागला ...अजून वाचा

14

इश्क – (भाग १४)

कबिरला पुढे काय बोलावं तेच सुचेना. तो नुसताच फोन कानाला लावुन बसुन राहीला..“हॅल्लो.. आहेस का?”“हो.. आहे आहे..”, राधाच्या आवाजाने भानावर आला बहुदा राधाला सुध्दा पुढे काय बोलायचे हे सुचेना, त्यामुळे काही क्षण शांततेत गेले. “कशी आहेस?”, कबिरने विचारले“टी.व्ही. बघतोस ना? मग माहीती असेलच की मी काय काय दिवे लावलेत ते..!”, काहीसं हसुन राधा म्हणाली..“तुझीच चुक आहे.. काय गरज होती त्या दिवशी असं अचानक निघुन जायची. मला थोडा वेळ दिला असतास तर….”“हे बघ कबिर.. जुन्या गोष्टींबद्दल बोलुन काय उपयोग.. जे झालं ते झालं.. लेट्स मुव्ह ऑन…”“राधा, मला भेटायचंय तुला.. प्लिज नाही म्हणु नकोस.. तु म्हणशील तेथे, म्हणशील त्या हॉटेलमध्ये…”“मला पब्लिक-अटेंन्शन ...अजून वाचा

15

इश्क – (भाग १५)

“गुड मॉर्निंग रोहन..”, ऑफीस मध्ये आल्यावर कबिर म्हणाला.. रोहनने मात्र काही उत्तरच दिले नाही, संगणकावर तो काम करण्यात मग्न “रोहनss… गुड मॉर्नींग…”, कबिर पुन्हा एकदा म्हणाला..“गुड मॉर्निंग…”, रोहन “का रे? असा उदास का? काय झालं?”, कबिर“काही नाही असंच..”“तब्येत बरी आहे ना?”“हम्म…”“बरं.. आपल्या पुस्तकाच्या सेल्सचा रिजनल रिपोर्ट घेउन जरा केबिनमध्ये येतोस का?.. बघु अजुन कुठे कमी सेल्स असेल तर तेथे प्रमोट कसं करता येईल…”, कबिर“मी मेल करतो फाईल..”, रोहन कबिरने जरावेळ रोहनकडे रोखुन कडे बघीतले आणि मग तो ठिक आहे म्हणुन केबिन मध्ये निघुन गेला. रोहनचे काय बिनसले होते कुणास ठाऊक, पण त्याला मुळपदावर यायला दोन दिवस लागले. काहीतरी फॅमीली ...अजून वाचा

16

इश्क – (भाग १६)

ईटरनीटी…ए प्युअर ब्लिस्स… तो क्षण किती वेळाचा होता दोघांनाही ठाऊक नाही.कदाचीत काही सेकंद..कदाचीत एखादा मिनिटं..कदाचीत कित्तेक मिनिटंही… जणू सर्व त्या क्षणापुरता थांबुन गेला होता. समुद्राच्या लाटा, वार्‍याच्या झुळुकीने हलणार्‍या नाराळाच्या झाड्यांच्या झावळ्या, एकसंध आकारात उडणारे पक्षांचे थवे.. सर्व काही.. राधा आणि कबीर भानावर आल्यावर एकमेकांपासुन दुर झाले.“वॉव्व.. आय… आय नीड अ बिअर…”, खाली मान घालुन कपाळ चोळत कबीर म्हणाला..“का रे? टेस्ट आवडली नाही का?”, पहील्यासारखेच खळखळुन हसत राधा म्हणाली..“तु ना.. खरंच.. अशक्य आहेस…” कबीर..“तु मला ओळखलं कुठे आहेस अजुन? चल जाऊ या? उशीर होतोय.. अजुन ६ तासाचा ड्राईव्ह आहे…”, असं म्हणुन राधा कारकडे जाऊ लागली. कबिर अजुनही तिच्या पाठमोर्‍या ...अजून वाचा

17

इश्क – (भाग १७)

कबिर आणि राधा साधारण ३-३.३० तास ड्राईव्ह मध्ये एकमेकांशी एक शब्दही बोलले नाहीत.शेवटी बर्‍याचवेळानंतर राधा म्हणाली, “आय एम सॉरी!”“सॉरी? कशाबद्दल? बिचबद्दल…. की त्या घाटाबद्दल?”, कुत्सीतपणे कबिर म्हणाला“दोन्हीबद्दल…”, राधा “म्हणजे? तुला म्हणायचंय की दोन्ही बाबतीत चुकलीस?”“नाही.. मी चुकीची नक्कीच नाही वागले.. पण तु हर्ट झालास.. म्हणुन सॉरी..”“ओह.. सो तुला वाटत नाहीए तु चुकलीएस.. मग तुला काय करायचंय कोण हर्ट झालं आणि कोण नाही. तु बरोबर आहेस ना.. मग झालं तर…” “नाही, तसं नाही. सगळ्यांत पहीलं म्हणजे मी माझ्या भावनांना आवरायला पाहीजे होतं.. निदान तुझ्या बाबतीत. मी प्रेझेंट मधे जगणारी मुलगी आहे कबिर.. त्या क्षणी जे वाटलं ते करते. आधी काय ...अजून वाचा

18

इश्क – (भाग १८)

“मग.. पुढे काय करायचं ठरवलं आहेस?”, कडक कॉफीचा घोट घेता घेता मेहतांनी कबिरला विचारलं.“कश्याबद्दल?”, कबिरने न कळुन विचारलं“कश्याबद्दल काय.. पुस्तकाचा दुसरा भाग लिहीणार आहेस ना.. त्याबद्दल.. काही विचार केला आहेस का?”“ओह.. हा.. ते… नाही.. अजुन काही विचार नाही केलाय…”“मग कर की सुरु आता.. आत्ता विचार चालु केलास तर ४-६ महीन्यात थोडीफार सुरुवात होईल…” “हम्म.. बरं, आपल्या सगळ्या एडीशन्स संपल्या का?”“अरे हा.. बरं झालं आठवण केलीस.. आपण तिसरी एडिशन जरा जास्तीच मोठ्ठी काढली होती.. पण थोडा आता सेल कमी झालाय.. पुस्तकही दुकानात पडुन आहेत.. तर आमच्या मार्केटींग टीमने एक नविन कल्पना काढली आहे.. विक्री वाढवण्यासाठी…” “काय?”“तु ते पुस्तकाच्या शेवटी तुझा ...अजून वाचा

19

इश्क – (भाग १९)

मेहतांनी ‘ड्रॉ’ ची तारीख एक महीन्यांनी ठेवली होती. तो महीना कबिरसाठी अंत पहाणारा ठरत होता. कबिर अक्षरशः एक एक मोजुन काढत होता. रतीबद्दल.. तिला भेटण्याबद्दल त्याला उत्सुकता का वाटत होती हे त्यालाच कळत नव्हते, परंतु बर्‍याचदा असं होतं ना की काही व्यक्ती एका भेटीतच ओळखीच्या वाटतात तर काही अनेक भेटींनंतरही अनोळखी. राधाच्याबाबतीत कबीरची ही भावना खुप जास्ती स्ट्रॉंग होती, पण कदाचीत तेंव्हा तो तिला प्रत्यक्षात भेटला होता. रतीशी तर तो फक्त फोनवरच बोलला होता. त्या दिवसानंतर रतीला पुन्हा फोन करण्याचा त्याला अनेकवार मोह झाला. परंतु त्याचे दुसरे मन त्याला साथ देईना. शेवटी काहीही झालं तरी ह्या घडीला तो एक ...अजून वाचा

20

इश्क – (भाग २०)

कबिर मेन्यु-कार्ड बघण्यात मग्न होता तेंव्हा त्याच्या समोर एक नेपाळी किंवा तत्सम दिसणारी एक मुलगी येऊन उभी राहीली. तिच्या पिवळ्याधम्मक लिली फुलांचा एक मोठ्ठा गुच्छ होता. कबिरने प्रश्नार्थक नजरेने रतीकडे बघीतलं. रती हसत उभी राहीली आणि तिने तो गुच्छ त्या मुलीकडुन घेऊन कबिरच्या पुढे धरला.. “हे घे.. तुझ्यासाठी…”“अगं गेस्ट तु आहेस, मी नाही..”, उठुन उभं रहात कबीर म्हणाला..“घे रे.. एका मोठ्या लेखकाला भेटतेय.. एव्हढं तर करायलाच हवं ना?”“ओहो… मोठ्ठा लेखक म्हणे… थॅंक्स.. मस्त आहेत फुलं..”, आधी रतीकडे आणि मग त्या मुलीकडे बघत कबीर म्हणाला.. “थॅंक्यु सर..मॅडमने सांगीतलं होतं, फुलं चांगलीच हवीत.. आजचा स्पेशल डे आहे…”, ती मुलगी हसत हसत ...अजून वाचा

21

इश्क – (भाग २१)

“काय रोहन शेठ.. कशी होती कालची संध्याकाळ?”, रोहन ऑफ़ीसला येताच कबीर म्हणाला..“मस्त.. कबीर.. तु खरंच चिडला नाहीस ना?”, रोहन“नाही मी का चिडु? खरंच मला आनंद झाला.. तुम्ही दोघंही अनुरुप आहात एकमेकांना..”“आम्ही ठरवलं होतं तुला सांगायचं.. पण समहाऊ योग्य अशी वेळच मिळत नव्हती..”“असु दे अरे.. तुम्ही दोघं खुश आहात ना.. मग झालं…”“बरं आमचं जाऊ देत.. तुझं बोल.. तुझी संध्याकाळही चांगली गेलेली दिसतेय.. ती बरोबरची छानच होती.. रती ना?”, रोहन“हम्मं.. खरंच छान आहे अरे ती.. इतकी मस्त बोलते ना.. खरं तर तिनेच माझी संध्याकाळ छान बनवली..”, असं म्हणुन कबीरने त्या संध्याकाळबद्दल रोहनला सांगीतलं.. “तुला आवडलीय ती .. हो ना?”, कबिरकडे बघत ...अजून वाचा

22

इश्क – (भाग २२)

“काय म्हणतेय तुझी कोका-कोला गर्ल?”, रोहनने ऑफिस मध्ये येताच कबीराला विचारले“कोका-कोला गर्ल?”“अरे तिच रे ती, त्या दिवशी तुझ्याबरोबर होती रती का?”“हां , रती”“मग कोका-कोला गर्ल काय?”,“अरे तू ती कोका-कोलाची जाहिरात नाही पाहिलीस का? सिद्धार्थ मल्होत्रा वाली.. त्यातली ती काउंटरवरची मुलगी, रती अगदी तशीच दिसते की”, रोहन“हो रे… तरीच मी विचार करत होतो, कुठे तेरी बघितल्यासारखे वाटतेय हिला” “बरं बोल, विचारलस का तिला? भेटायला तयार आहे का ती?”“हो, हो विचारलं ना, पुढच्या विकेंडला चालेल म्हणाली.. आपण संध्याकाळी भेटू शकतो”“लै भारी, मी लग्गेच मोनिकाला सांगतो, खूप मज्जा येईल आपण सगळे भेटलो की…”, “अरे पण मग तु एव्हढा उदास का?”“रतीचा बॉयफ़्रेंड आहे….”, ...अजून वाचा

23

इश्क – (भाग २३)

नेपल्सच्या आकाशातली निळाई कमी होऊन गडद लाल, गुलाबी, केशरी रंगांची मुक्तहस्ते उधळण झाली होती. दिवसभर मवाळपणे तळपणारा सुर्य़ मावळतीकडे होता. समुद्रकिनारी जाणार्‍या रस्त्याच्या काही किलोमीटर आधी असलेल्या अरुंद रस्त्यांच्या कडेने उभारलेल्या कॅफेंमध्ये बाहेर रस्त्याच्या कडेला लावलेल्या खुर्च्यांवर बसुन राधा पुनमबरोबर ग्रिल्ड सॅंन्डविच आणि कॉफी घेत होती. बरोबरची ट्रिप आदल्या रात्रीच परतली होती आणि ती आणि पुनम, अवंतीकाने सांगीतल्याप्रमाणे महीना दोन महीने तेथे थांबुन रेकी करणार होत्या. “राधा.. तो शेफ़ बघ नं.. कसला हॉट आहे ना?”, पुनम आतल्या काऊंटरकडे बोट दाखवत म्हणाली..“हो ना अगं.. नाही तर आपल्या इथले.. दोन-चार सन्माननीय अपवाद सोडले तर…”“तो बघतोय मगाच पासुन तुझ्याकडे…”, राधाला चिडवत पुनम ...अजून वाचा

24

इश्क – (भाग २४)

“अशक्य आहे अरे हे सगळं.. असं कसं कोण करु शकतं..”, कबीरने आदल्या रात्रीचा किस्सा ऐकवल्यावर रोहन म्हणाला..“हो ना अरे.. असं निर्जन रस्त्यावर सोडुन गेला निघुन सरळ, काही वेडं वाकडं झालं असतं तर?”, कबीर“नंतर काय केलंत मग? कुठे फ़िरलात?”, रोहन“खोपोलीपर्यंत जाऊन आलो न मग.. सॉल्लीड भुक लागली होती, खरं तर मस्त धाब्यावर जाऊन जेवायचा विचार होता, पण एक तर रात्रीची वेळ, त्यात हिचे असे तोकडे कपडे.. एकट्याने ढाब्यावर जायची हिम्मत होईना.. मग फ़ुड-मॉलला हादडलं…”“बरं केलं तिने ब्रेक-अप केला पिटरशी..तु तर खुशचं असशील..”, रोहन “हो.. पण अरे.. मला थोडं असं इम्मॅच्युअर बिहेव्हिअर वाटलं तिचं.. आय मीन.. पिटरने जे केलं ते चुकीचंच ...अजून वाचा

25

इश्क – (भाग २५)

कबीरची झोप मोडली ते केंव्हापासुन वाजणार्‍या फोनच्या आवाजाने. आदल्या दिवशी रात्री नातेवाईकांचा सगळा गोतावळा लग्नासाठी येऊन थडकला होता. सगळ्यांना गप्पा-टप्प्पांमध्ये कबीरला झोपायला मध्यरात्र उलटुन गेली होती. त्याने घड्याळात बघीतले, ८च वाजत होते. काही सेकंदांनी पुन्हा फोन वाजु लागला. वैतागुन त्याने फोन उचलला… “कबीर.. ए कबीर.. अरे झोपलाएस का?”, पलीकडुन राधा फोनवर ओरडत होती..“राधा? हा कुठला नंबर आहे तुझा…?”, कबीर राधाचा आवाज ऐकताच खडबडुन जागा झाला..“काय करतो आहेस?”, त्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करुन राधा म्हणाली..“झोपलोए.. सकाळी झोपेतच असतात बहुतेक लोकं..”“पेपर बघीतलास आजचा?”, राधा“मी झोपलोय म्हणलं तर! झोपेत वाचेन का पेपर…”“बरं बरं.. व्हेरी गुड.. एक काम कर, पट्कन एम.जी.रोड वर ये.. तुला ...अजून वाचा

26

इश्क – (भाग २६)

“रोहन.. मी जरा रतीच्या घरी चाललो आहे..”, टेबलावरुन कारची किल्ली उचलत कबीर म्हणाला“घरी? का रे? काय झालं?”, रोहन“अरे दोन झाले.. तिचा फोन बंद येतोय, व्हॉट्स-अ‍ॅपपण लास्ट-सीन दिन दिवसांपूर्वीचेच आहे..”, कबीर“कबीर..”, कबीरला थांबवत रोहन म्हणाला.. “मला वाटतं ती अपसेट असेल.. त्या दिवशी तु तिला एकटीला सोडुन राधाच्या मागे निघुन गेलास…”“अरे पण मी आलो ना परत.. आलो तेंव्हा निघुन गेली होती ती.. मी काय करणार मग?”, रोहनचं वाक्य तोडत कबीर म्हणाला..“हम्म.. पण मला वाटतं..” पण कबीर त्याच्या बोलण्याची वाट न बघता निघुन गेला होता. रतीच्या घराचं दार रतीच्या आईनेच उघडलं.. “काकु.. रती आहे घरी?”, कबीर“नाहीए..”“अं.. कुठे गेलीए.. तिचा फोन पण बंद ...अजून वाचा

27

इश्क – (भाग २७)

“वुई-आर गेटींग मॅरीड…”, फुल्ल एनर्जीने राधा पुन्हा एकदा म्हणाली, पण रोहन आणि मोनिका शॉक लागल्यासारखे आधी एकमेकांकडे तर एकदा बघत होते.“आर यु नॉट हॅप्पी?”, राधा काहीसे चिडून रोहनला म्हणाली.. “येस.. येस.. वुई आर.. पण हे कधी ठरलं?”, रोहन..“आत्ता. ...अजून वाचा

28

इश्क – (भाग २८)

कबीरच्या मनाची स्थिती सांगता येण्यापलीकडची झाली होती. एका बाजुला राधाला गमावल्याचं दुःखं होतं तर दुसरीकडे उर्वरीत पूर्ण आयुष्यभर लाभणार्‍या साथीचं सूख. कबीरला हा क्षण अजरामर करायचा होता. त्याच्या ह्या विचीत्र वागण्याचा जितका त्रास त्याला झाला होता तितकाच नक्कीच रतीला ही झालेला होता ते तो जाणून होता. पण कसं?काय करावं? त्याला काहीच सुचत नव्हतं. तो डोळे मिटून स्टेअरींगवर डोकं ठेवुन बसला होता इतक्यात खिडकीच्या काचेवर टकटक झाली म्हणुन त्याने दचकून डोळे उघडुन बघीतले आणि त्याला आश्चर्याचा धक्का बसला. समोर राधा उभी होती. “राधा.. तु??”, दार उघडून बाहेर येत कबीर म्हणाला..“हो.. मी आले परत…”“परत???? म्हणजे???”, कबीर संभ्रमात पडत म्हणाला..“घाबरु नकोस.. परत ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय