पत्रसुमने...सुहाना सफर

(1)
  • 61
  • 0
  • 10.1k

प्रिय सोना. .आपल्या आयुष्याचा हा सुहाना सफर तुझ्यापुढे वाचते आहे Made for each other....पासून सुरू झालेला हा आपला प्रवासअगदीMad for each other पर्यंत पोचला होता आपल्या लग्नापूर्वी आपण एकमेकांना भेटत होतो तेव्हाच आपले भावबंध ❤️ जुळले होते शांत, संयमी, मितभाषी तूअणि धीट, थोडीशी उतावीळ ,आणि बडबडी मी?आपली जोडी खरच देवाने छान जमवली होती आपले लग्न ठरले हाही एक गमतीचा योगायोग होता बरीच स्थळे बघून आणि नाकारून झाल्याने घरचे माझ्या लग्नाबाबत निराश झाले होते तशात एक डॉक्टर स्थळ मला बघायला येते आहे ते मला कशाला पसंत करतील अशा विचाराने व काही महत्वाच्या कारणाने वडील घराबाहेर होते

1

पत्रसुमने...सुहाना सफर - भाग १

प्रिय सोना..आपल्या आयुष्याचा हा सुहाना सफर तुझ्यापुढे वाचते आहेMade for each other....पासून सुरू झालेला हा आपला प्रवासअगदीMad for each पर्यंत पोचला होताआपल्या लग्नापूर्वी आपण एकमेकांना भेटत होतो तेव्हाच आपले भावबंध ️ जुळले होतेशांत, संयमी, मितभाषी तूअणि धीट, थोडीशी उतावीळ ,आणि बडबडी मीआपली जोडी खरच देवाने छान जमवली होतीआपले लग्न ठरले हाही एक गमतीचा योगायोग होताबरीच स्थळे बघून आणि नाकारून झाल्याने घरचे माझ्या लग्नाबाबत निराश झाले होतेतशात एक डॉक्टर स्थळ मला बघायला येते आहे ते मला कशाला पसंत करतील अशा विचाराने व काही महत्वाच्या कारणाने वडील घराबाहेर होतेआई आणि मी दोघीच घरातसंभाषण सूत्रे माझ्याकडेच होतीतू तर मला बघितल्या क्षणी आवडला ...अजून वाचा

2

पत्रसुमने...सुहाना सफर - भाग २

प्रिय सोना ...यानंतर काही दिवसांनी माझी बँकेची वेळ बदललीमाझी दोन वेळची बँक एक वेळ सुरू झालीमी रोज संध्याकाळी बँकेतून की तू दवाखान्यात जायचामी दुपारी बँकेत.. तू घरी असायचाअसा आपला लपंडाव चालायचाआपले लग्न ठरले तेव्हाच वडिलांनी मला सांगितले होते नवरा डॉक्टर आहे तो संध्याकाळी दवाखान्यात जाणार..तुला त्याच्याबरोबर फिरायला मिळणार नाहीपण आपल्या संसारात मला ही उणीव कधी भासलीच नाहीआपल्या संसारात तू बाहेरची कामे सांभाळत होतासच शिवाय घरकामात सुद्धा मला मदत करायचाकेर काढणे, भाजी आणणे, भाजी निवडणे ,घरची साफसफाई हे सर्व आवडीने आणि नियमित करीत होतासखरेतर माहेरी माझी पण आई नोकरी करीत होती पण माझे वडील बाजारहाट सोडता घरातली कोणती कामे कधीच ...अजून वाचा

3

पत्रसुमने...सुहाना सफर - भाग ३

प्रिय सोना..तुझ्या दवाखान्याचे गाव लांब होतेतु त्या गावात थोड्याच अवधीत चांगले नाव कमवले होतेसतुझा प्रामाणिक स्वभाव..पैशाची हाव नसणेशिवाय अचूक यामुळे लोकांचा तुझ्यावर विश्वास होतात्या काळात तू त्या गावात एकमेव डॉक्टर होतासतुझ्या शब्दाला गावात खूप मान होता ऊस आणि दुधाच्या व्यवसायात अग्रगण्य असलेले हे गाव सधन होतेतू मात्र कोणाकडून कधी एखादी भाजीची पेंडी सुद्धा फुकट आणत नव्हतासतुझ्या दवाखान्याच्या मालकांच्या म्हशी होत्याते रात्री ताजे काढलेले सकस दूध मात्र तू घेऊन यायचा ते सुद्धा पैसे देऊन ..तुझी निरलस वृत्ती, सेवाभाव, गोड नम्र बोलणे यामुळे गावातील असंख्य माणसे तुझ्यावर खुश होतीआजही त्या गावात तुझे नाव काढले तरी अनेक लोक प्रेमाने आणि अदबीने बोलतातत्या ...अजून वाचा

4

पत्रसुमने...सुहाना सफर - भाग ४

प्रिय सोना..तुझ्या दवाखान्याच्या गावातले तुझे जवळचे पेशंट मात्र आपले काही एक न ऐकता आपल्या घरी दर वेळेस गुळाची भेलकी असतत्या गावात सर्वांकडे म्हशी होत्यामला खरवस खूप आवडत असेतुझे अनेक पेशंट म्हैस व्यायली कीखरवसाची पातेली आपल्या घरी नेहेमी आणून पोचवतशिवाय डॉक्टर ची बायको गुळ खात नसेल या समजुती पायी खरवस साखर घालून बनवत असतअगदी मागील वर्षी पर्यंत आपल्याकडे खरवस पोच होत होतात्यांच्या गुऱ्हाळ घरातील कडील सोलापूर कडून आलेल्या कामगारांना तू काही वेळ फुकट औषध देत होतासतर काही वेळा त्यांनी उधारी पण ठेवलेली तुला चालत असेजी ते पुढील सीझन मध्ये चुकती करत असतत्यामुळे आपल्या संसारात आपल्याला गुळ कधीच विकत आणावा ...अजून वाचा

5

पत्रसुमने...सुहाना सफर - भाग ५

प्रिय सोना आपला दोघांचा स्वभाव सकारात्मक आणि उत्साही असल्यानेव आपली आवड एकसारखी असल्यानेआपल्या व्यस्त चक्रात सुद्धा आपण जास्तीत जास्त साठी द्यायचोसंपूर्ण सांसारिक आयुष्यात आपण नोकरी व्यतिरीक्त कधीच एकमेकांना सोडून गेलो नाहीकाही वेळा असे काही कुणाला सांगितले की त्यांना थोडी असूया वाटेमग तुच म्हणायचा.. कशाला लोकांना आपले काही सांगत असतेस?आपले आपल्या पाशी ठेवायचेकुणाची कधी असूया नाहीकोणाचा राग द्वेष नाहीसरळ साधा "अजातशत्रू"होतास तूआपले कायम एकत्र असणे पाहून आपल्या घरच्या कार्यक्रमात सुद्धा जरी पुरुष बायकांच्या पंगती वेगळ्या असल्या तरीघरचे लोक आपल्याला शेजारी शेजारी जेवायला वाढायचेअगदी दोन वेगवेगळ्या खोल्यात सुद्धा आपण कधी बसलो नाहीतुला फिरायची खूप आवड होतीआपण वेगवेगळ्या ठिकाणी रविवारी जात असू ...अजून वाचा

6

पत्रसुमने...सुहाना सफर - भाग ६

प्रिय सोना..त्या काळात आपल्या आयुष्यात दोन तीन लक्षात राहण्या सारख्या गोष्टी घडल्या होत्यातुझ्या मावस भावाची पत्नी आजारी होतीत्यांच कुलदैवत होतजोतिबाचे दर्शन घेण्याकरीता त्यांच्या दोन मुली आणि तुझा भाऊ अशी त्यांची फॅमिली घेऊन कोल्हापूरला आल्यात्यांच्यासोबत दत्तू अण्णा म्हणून त्यांचे गुरु आले होतेत्यांचे वय ८५ होतेअत्यंत तेजस्वी, पण सरळ साधे व्यक्तिमत्व असणारे दत्तू अण्णा केवळ भाऊजींच्या आग्रहामुळे आपल्या घरी आले होतेअन्यथा ते आपली कुटी सोडून कोठे जात नसतअगदी भाऊजीकडे सुद्धा ते कधी राहिले नव्हतेते आपल्याकडे राहायला तयार झाले होतेआपण त्यांची चांगली व्यवस्था ठेवली होतीचवदार साधे बिन मसाल्याचे जेवण मी त्यांच्या साठी रांधले होतेमी संध्याकाळी केलेली मूग डाळ खिचडी, पापड, कढी, घरचे ...अजून वाचा

7

पत्रसुमने...सुहाना सफर - भाग ७

प्रिय सोनाअसेच आपले संसाराचे दिवस चालू होतेकधी अडचणी तर कधी त्यातून मार्ग काढायची खुशी..घरासाठी सगळीकडून कर्ज काढल्याने आर्थिक अडचणी असायच्यामी माझे दहा बारा तोळ्यांचे सर्व सोन्याचे दागिने आपले घर तयार होत होते तेव्हाआर्थिक अडचणी मुळे विकून टाकले होतेते पैसे घरासाठी वापरले होतेहे माझं आपल्या संसारासाठी छोटेसे योगदान होतेत्यात माझी काही वेगळी प्रौढी नव्हतीतुला मात्र त्याचे खूप कौतुक आणि अप्रूप वाटले होतेतू म्हणालास बायका नवऱ्याच्या मागे लागून नवीन नवीन सोन्याचे दागिने बनवताततू मात्र आहे ते दागिने विकायला तयार झालीसपुढील काळात जरा बरी परिस्थिती झाली की मी तुझे सगळे दागिने तुला परत नव्याने करून देईनमी फक्त हसले होतेकारण असेही मला सोन्याच्या ...अजून वाचा

8

पत्रसुमने...सुहाना सफर - भाग ८

प्रिय सोनाबारावीचा निकाल लागल्यावर..आपल्या मुलाच्या बोर्ड मेरिट मुळे त्याला पुण्यात त्याच्या आवडीच्या कॉलेज मध्ये स्कॉलरशिप सहित ऍडमिशन मिळालीती प्रोसेस किचकट असल्यांने आपण दोघेही गाडी आणि त्याचे सामान घेऊन आठ दहा दिवस पुण्यात राहिलो होतोत्याला व्यवस्थित रूम पाहून देऊन मगच आपण परत आलो होतोआता आपण दोघे आणि आपले काम असे रूटीन सुरू झालेघरात जिमी होताच आपल्या सोबत ..मुलगा पुण्यातून सुट्टीला अधून मधुन घरी आला की जिमी फार आनंदी होत असेत्याचा आपल्या मुलावर खूप जीव होतात्यानंतर पुण्यात शिकत असताना चार वर्षे मुलाचा दर रविवारी संध्याकाळी आठवणीने तुला फोन येत असेआठवडा भर जे जे घडले ते तुला तो सांगत असेत्या काळात काहीही ...अजून वाचा

9

पत्रसुमने...सुहाना सफर - भाग ९

प्रिय सोना..तुझा कोल्हापुरात असलेला दवाखाना बंद करण्याच्या formality पूर्ण करीत इकडे बदलीच्या गावी सोबत घेऊन जाण्याच्या सामानाची आवरा आवर सुरू केलीसलगेच हजर व्हायचे असल्याने थोडे तरी सामान घेऊन जायला लागणार होतेराहायला घर मिळाल्यावर उरलेले संसाराचे सामान न्यायला लागणार होतेमाझ्यापेक्षा तुझीच गडबड जास्त चालली होतीतुला एक उत्साह ही होता शिवाय मी माझ्या ट्रेनिंग कामात पुण्यात व्यस्त असल्याने वेळ देऊ शकत नव्हतेतुझे प्रत्येक गोष्टीचे प्लॅनिंग उत्तम असायचेशिवाय पॅकिंग करण्यात तुझा हात कोणीच धरू शकत नव्हतेतिकडे मुलगा सुन यांना पण तू कळवले होतेसपण ना त्यांना माझ्या प्रमोशनचे कौतुक ना माझ्या बदलीशी देणे घेणेआपली नाती हळूहळू वीसविशीत होत होतीकिती सावरायचं म्हणले तरी जमत ...अजून वाचा

10

पत्रसुमने...सुहाना सफर - भाग १०

प्रिय सोना …त्यानंतर त्या दुकान मालकांच्या घरी आपले जाणे होऊ लागलेत्यांना तुझा खूप लोभ होतातुझ्या गप्पा गोष्टीत काहीतरी शिकायला असे ते म्हणतआता तिथे त्यांच्या दुकानातच तुझ्याकडून तपासून घ्यायला पेशंट येऊ लागलेचक्क तिथंच तुझा दवाखाना सुरु झालातू पण त्यांना मामा असे प्रेमाने बोलावू लागलाआता आपला मित्र परिवार वाढू लागलामाझ्या लिखाणा मुळे मी परिचित झालेच होतेअनेक ठिकाणी मला उद्घाटन, कार्यक्रम यासाठी बोलावणे येऊ लागलेमाझे काव्य वाचन सुद्धा होऊ लागलेअशात तुझ्या आयुष्याला कलाटणी मिळालीतिथला एक चालता दवाखाना चालवायची तुला ऑफर मिळालीदवाखाना मुख्य रस्त्यावर होतामला बरे वाटलेतुला काहीतरी काम मिळावे असे मला ही वाटत होतेजरी तू माझ्या साठी इकडे आलास तरी पूर्ण दिवस ...अजून वाचा

11

पत्रसुमने...सुहाना सफर - भाग ११

प्रिय सोना..येथे माझ्या लेखनाच्या निस्सीम चाहत्या असणाऱ्या दोन मैत्रिणी इथे मला भेटल्यात्यांनी मला खूप जीव लावलाएकदा माझा वाढदिवस त्यांनी कोल्ड्रिंक हौस मध्ये केक आणून आपल्याला बोलावून साजरा केलाएक मैत्रीण दूरच्या गावात रहायला होतीतिने आपल्याला एकदा जेवायला बोलावलेघरची माणसे साधी सज्जन होतीमी येणार म्हणून तिने चक्क घरापासून रस्त्यापर्यंत रांगोळ्या काढल्या होत्याखुप प्रेमाने आतिथ्य केलेतिचा माझा संपर्क खूप टिकलातिच्या लग्नाचे केळवण आपण तिथे नुकत्याच निघालेल्या मोठ्या हॉटेलात केले होतेती पुण्यात राहायला गेलीतिला मुलगी झाल्यावर तिने मला मुलीवर कविता लिहायला सांगितली होतीती तिला पाठवली तेव्हा खूप खुश झालीट्रेनिंगला गेले असता तिच्या पुण्याच्या घरी सुद्धा मी दोन दिवस राहून आलेकालांतराने हे संबंध संपुष्टात ...अजून वाचा

12

पत्रसुमने...सुहाना सफर - भाग १२

प्रिय सोना ..आता बँकेतील माझे कोल्हापूरचे करिअर सुरू होणार याचा मला खूप आनंद झाला होताएखादी छोटीशी चांगली शाखा मिळून काम करायचे.. आता नोकरी थोडीच राहिली होतीआणि खरेच कोल्हापुरात गेल्या गेल्या मला एक छान छोटी शाखा ऑफिसर म्हणून मिळालीतुला सुद्धा बरे वाटलेतू सुद्धा कोल्हापुरात परत काही नवीन सुरू करावे असे मी सुचवलेचार दिवस असे गेले तोवर मला दुसऱ्या लांबच्या शाखेत शाखा अधिकारी म्हणून दोन महिन्यासाठी तात्पुरते पोस्टिंग दिलेमला या कामाचा अनुभव नव्हतापण मी नवीन शिकायला मिळेल म्हणून आणि थोडे दिवस तर हे पोस्टिंग आहे अशा विचाराने जॉइन झालेही शाखा बरीच लांब होतीआपल्या घरापासून बसची सोय पण ठीक नव्हतीलगेच तू पुढे ...अजून वाचा

13

पत्रसुमने...सुहाना सफर - भाग १३

प्रिय सोना ..मी माझा राजीनामा तर पाठवून दिलाएक महिना नोटीस पिरियड होता महिन्याभरात त्याची स्वीकृती होणार होतीमी हळूहळू माझे आवरायला सुरुवात केलीआपण ही खुर्ची सोडणेपूर्वी काम स्वच्छ असावे अशी माझी खटपट चालू होतीपण नंतर पत्र आले वरिष्ठ ऑफिसकडूनपण राजीनामा स्वीकृत नाही झालाकारण काय तर म्हणेया शाखेत काम करायला कोणी तयारच नव्हते …परत मन नाराज झालेतू होतास मला सावरायला..जाऊदे आता इतके दिवस केलेसअजून थोडे दिवस कसेही जातीलआता तर तुला कामाचा आवाका पण आलायनंतर करू आपण मजापरत सुरू झाले कामात बुडून जाणेआता सुट्टी किंवा एक दोन दिवस रजा काढून आपल्या पुणे वाऱ्या सुरू झाल्यापिलू मोठे होत होतेतीन महिन्याचे झाल्यावर तिचे बारसे ...अजून वाचा

14

पत्रसुमने...सुहाना सफर - भाग १४

प्रिय सोना..रिटायरमेंट नंतर चार पाच दिवस इकडे तिकडे आवरा आवरी करण्यात गेलेमाझे पेन्शन पेपर्स, बँकेचे इतर सर्व डॉक्युमेंट तू एक फाईल करून त्यात लावून ठेवलेसआपल्या घरात कोणताही महत्वाचा कागद आला, कोणतेही बिल भरले की ते व्यवस्थित त्या त्या फाईल ला लगेच गेले पाहिजे ही तुझी शिस्त होतीआणि ती तुझी तू पाळत होतासपहिला आठवडाभर आपण भरपूरहॉटेलिंग केलेबँकेत चक्कर मारून मिळालेल्या पैशाची व्यवस्थित योजना करून गुंतवणूक केलीशेवटच्या आठवड्यात दिवाळी होतीत्याची तयारी सुरू केलीघरची साफसफाई सजावट वगैरेघरचे फर्निचर बदलून नवीन घेतलेमला एक आराम खुर्ची घ्यायची होतीतिची खरेदी झालीदिवाळीत मुलगा व त्याचे कुटुंब कोल्हापुरात येत असतआता बरोबर आपले लाडके छोटे पिल्लू पण यायचे ...अजून वाचा

15

पत्रसुमने...सुहाना सफर - भाग १५

प्रिय सोना..आता आपली पिलू मोठी होत होतीआपली जबाबदारी थोडी कमी होत होतीतुला जास्त वेळ बसले की मूळव्याधीचा त्रास सुरू होताखूप अभ्यास करून तू याची सर्जरी कुठ व कशी करायची हे ठरवले होतेसआपल्या फिरण्यात अडचणआपण युरोप टूर करण्यापूर्वी पुण्यात तुझे मूळव्याध ऑपरेशन करून घेतले होतेतुला ही सर्जरी लेसर ट्रीटमेंट पद्धतीने हवी होतीज्यामध्ये ब्लड लॉस व त्रास कमी होतोयाचा खर्च जास्त असला तरी आपल्याला काहीच प्रॉब्लेम नव्हतापुण्यातील नामांकित सर्जन कडून आपण ही सर्जरी करून घेतलीसर्जरी थोडी क्लिष्ट होती पण तुझे रिपोर्ट व तब्येत चांगली असल्यानेएका दिवसात आपण घरी गेलोअशा प्रकारच्या सर्जरी साठी त्या दिवशी चार पाच लोक ऍडमिट होतेत्यांच्या सगळ्यांच्या घरची ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय