गीत रामायणा वरील विवेचन

(63)
  • 180.2k
  • 2
  • 74.8k

।।श्रीराम श्रीराम श्रीराम।। वाचकांनो आज मी ग.दि.माडगूळकर यांनी वाल्मिकी रामायणावर आधारित लिहिलेल्या गीत रामायणावर यथाशक्ती विवेचन करण्याचा प्रयत्न करणार आहे. ग.दि माडगूळकरकरांनी एकूण छप्पन गीतांत क्रमाने संपूर्ण रामायणाचे प्रसंग वर्णन केलेले आहेत. त्यातील आजपासून रोज एकेक गीत घेऊन मी त्यावर विवेचन करणार आहे. वाचकांचा उत्तम प्रतिसाद लाभेल ह्याची मला खात्री आहे. त्यातील पाहिलं गीत आहे स्वये श्री रामप्रभू ऐकीती एका परिटाच्या संदेहामुळे श्रीरामप्रभु सीतामाईंचा त्याग करतात त्यावेळी त्या गरोदर असतात हे श्रीरामप्रभूंना माहीत नसते. श्रीरामाच्या आदेशावरून लक्ष्मण सीता माईला ऋषी वाल्मिकीनच्या आश्रमात नेऊन सोडतात. तिथेच सीतामाई एखाद्या तपस्विनी योगिनी प्रमाणे आयुष्य व्यतीत करतात. तेथे लव आणि कुश ह्या जुळ्या मुलांचा जन्म होतो. ऋषी वाल्मिकीनच्या मार्गदर्शनाखाली ते दोघे सगळ्या विद्या शिकून सर्वगुणसंपन्न होतात. देवाच्या आदेशानुसार वाल्मिकी ऋशिंनी रामायण लिहिलेलं असते. आता सर्व प्रजेच्या मनात असलेला सीता माईंविषयी असलेला वृथा संदेह दूर व्हावा असे वाल्मिकी ऋषींना मनोमन वाटते. त्यासाठी ते लव आणि कुश यांना गीतरुपात रामायण शिकवितात आणि ते अयोध्येत सर्वत्र गाण्यास सांगतात.

1

गीत रामायणा वरील विवेचन - 1 - गीत रामायणावरील विवेचन

।।श्रीराम श्रीराम श्रीराम।। वाचकांनो आज मी ग.दि.माडगूळकर यांनी वाल्मिकी रामायणावर आधारित लिहिलेल्या गीत रामायणावर यथाशक्ती विवेचन करण्याचा प्रयत्न करणार ग.दि माडगूळकरकरांनी एकूण छप्पन गीतांत क्रमाने संपूर्ण रामायणाचे प्रसंग वर्णन केलेले आहेत. त्यातील आजपासून रोज एकेक गीत घेऊन मी त्यावर विवेचन करणार आहे. वाचकांचा उत्तम प्रतिसाद लाभेल ह्याची मला खात्री आहे. त्यातील पाहिलं गीत आहे स्वये श्री रामप्रभू ऐकीती एका परिटाच्या संदेहामुळे श्रीरामप्रभु सीतामाईंचा त्याग करतात त्यावेळी त्या गरोदर असतात हे श्रीरामप्रभूंना माहीत नसते. श्रीरामाच्या आदेशावरून लक्ष्मण सीता माईला ऋषी वाल्मिकीनच्या आश्रमात नेऊन सोडतात. तिथेच सीतामाई एखाद्या तपस्विनी योगिनी प्रमाणे आयुष्य व्यतीत करतात. तेथे लव आणि कुश ह्या जुळ्या मुलांचा ...अजून वाचा

2

गीत रामायणा वरील विवेचन - 2 - अयोध्या मनुनिर्मित नगरी

लवकुशांनी राम दरबारात रामायण सांगण्यास सुरुवात केली आहे. ते सांगतात: शरयू नदीच्या काठावर अयोध्या नावाची मनू ने निर्माण केलेली नगरी स्थित आहे. (मनू हा भारतीयांचा आद्य पुरुष आहे व शतरुपा ही मनूची पत्नी असून आद्य स्त्री आहे. त्यांच्यापासूनच भारत वंशाचे लोकं निर्माण झाले.) तर ह्या अयोध्या नावाच्या अजस्त्र नगरी मध्ये एकाहून एक सुंदर अश्या इमारती, वास्तू उभ्या आहेत. दोन्ही बाजूला सुंदर वास्तू आणि त्यांच्या मध्ये समांतर असे रस्ते आहेत ज्या रस्त्यांवरून अनेक रथ हत्ती घोडे, तिथून येणारे जाणारे प्रवासी नटून थटून त्यावरून मार्गक्रमण करत असतात. ह्या अयोध्या नगरीच्या घराघरावर रत्नांची तोरणे आहेत. घर मंगलचिन्हांनी सुशोभित केलेले आहेत. ठिकठिकाणी नयनरम्य ...अजून वाचा

3

गीत रामायणा वरील विवेचन - 3 - उगा का काळीज माझे उले?

सर्वथा संपन्न समृद्ध अश्या संसारात राजा दशरथ व त्यांच्या भार्यांना एकच शल्य खुपत होतं ते म्हणजे पुत्र नसणे. त्याच विचार करीत कौसल्या देवी आपल्या राजवाड्यातील उपवनात बसलेल्या असतात. सहज त्यांचं लक्ष फुलांनी लगडलेल्या लतिकेवर जाते आणि त्यांना विषाद वाटतो. त्यांचं मन व्याकुळ होते. त्या विचार करतात: 'पहा ह्या वेलीला सुद्धा भरभरून फुले आहेत पण माझ्या संसारवेलीवर एकही पुत्ररूपी फुल नसावं हे किती दुर्दैव आहे. आजपर्यंत कधी मनात वाईट विचार आला नव्हता,कधी कोणाचा हेवा वाटला नव्हता. एवढंच कशाला कधी दोन सवती असून त्यांच्या प्रति कधी मत्सर मला वाटला नाही पण आज ह्या फुलांनी समृद्ध अश्या वेली बघून मला खूप हेवा ...अजून वाचा

4

गीत रामायणा वरील विवेचन- 4 - लाडके कौसल्ये राणी

राजा दशरथांच्या मनातही देवी कौसल्ये प्रमाणे पुत्र नसल्याचे शल्य खुपत असते. त्या निराशेतून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी राजा दशरथ मृगयेला(शिकारीला) इकडे एक श्रावण नावाचा कुमार मजल दरमजल करत आपल्या वृद्ध अंध माता पित्यांना कावड मध्ये बसवून त्यांच्या इच्छेनुसार तीर्थाटन करीत असतो. एका पारड्यात पिता एका पारड्यात माता अशी कावड खांद्यावर घेऊन तो एकेका तिर्थस्थळी माता पित्यांना नेत असतो. असाच तो यात्रा करत करत शरयू नदीच्या तीरावर येऊन थांबतो,कावड खाली ठेवतो. त्याच्या पित्याला तहान लागली असल्यामुळे तो जवळील जलाशयातून पाणी आणावयास जातो. तिथेच एका वृक्षावर राजा दशरथ शिकारीची वाट बघत असतो. राजा दशरथ आवाजावरून न बघता त्या दिशेने अचूक बाण सोडून ...अजून वाचा

5

गीत रामायणा वरील विवेचन - 5 - दशरथा घे हे पायस दान

राजा दशरथाने वसिष्ठ ऋषींनी सांगितल्याप्रमाणे अश्वमेध यज्ञ केला. पुत्रकामेष्टी यज्ञ केला. भरपूर अन्न वस्त्र धन दान केले. ऋषी मुनी योग्य तो सन्मान केला. यज्ञात शेवटची समिधा टाकताच त्या यज्ञ कुंडातून अग्निदेव प्रकट होतात. त्यांच्या हातात एक सुवर्ण पात्र असते ज्यात पायस(खीर) असते. ते पायस अग्निदेव दशरथ राजास देतात आणि म्हणतात:- हे दशरथा तू केलेला यज्ञ संपन्न झाला आहे. तुझ्यावर सगळे देव प्रसन्न झाले आहेत. श्री विष्णू देवांनी स्वतः मला आदेश देऊन हा प्रसाद घेऊन इथे पाठवलं आहे हा माझा सन्मान च आहे असे मी मानतो. ह्या पात्रातील पायस तिन्ही राण्यांना भक्षण करण्यास दे. हे पायस अत्यंत मधुर आणि ओजस्वी ...अजून वाचा

6

गीत रामायणा वरील विवेचन - 6 - राम जन्मला ग सखी राम जन्मला

हाती घेतलेले पायसाचे पात्र राजा दशरथ देवी कौसल्ये च्या हातात देऊन म्हणतात, कौसल्या देवी ह्या पायसाचे तीन समान करून आपण तीनही राण्यांनी प्राशन करावे. त्यानुसार कौसल्या देवी तीन समान वाटे करतात स्वतः घेतात व राणी सुमित्रा व राणी कैकयी ला देतात. सुमित्रा राणींना वाटते की आपल्याला कमी पायस दिलं आहे त्यामुळे त्या रुसतात आणि पायसाचे फुलपात्र बाजूला ठेवतात. राजा दशरथ, कौसल्या देवी,कैकयीदेवी त्यांना समजवतात पण त्या मान्य करण्यास तयार नसतात. तेवढ्यात एक वानरी येऊन सुमित्रा राणीच्या जवळचं फुलपात्र उचलून घेऊन जाते व स्वतः प्राशन करते ते बघून राणी सुमित्रा आणखी विलाप करू लागतात. त्यांचा विलाप बघून देवी कौसल्या आणि ...अजून वाचा

7

गीत रामायणा वरील विवेचन - 7 - सावळा ग रामचंद्र

चैत्र शुद्ध नवमीला श्रीरामांचा जन्म होतो. राजा दशरथ आणि देवी कौसल्या ह्यांचं इप्सित पूर्ण होते. त्यांचे हृदयं आनंदाने उचंबळून राजवाड्यात प्रत्येकजण आनंदात उत्साहात असतो. संपूर्ण अयोध्या आनंदोत्सवात मग्न असते. हळूहळू दिसामासाने श्रीराम वाढू लागतो. कौसल्या देवींचा वेळ श्रीरामाचे लाड करण्यात,त्याला खाऊ पिऊ घालण्यात,त्याला न्हाऊ माखू घालण्यात,त्याचे कोडकौतुक करण्यात, त्याच्या बाळ लीला बघण्यात कसा निघून जातो हे त्यांचं त्यांनाही कळत नाही. चारही बालकांच्या वावरण्याने राज प्रासादात एक चैतन्याची लहर पसरलेली असते. देवी कौसल्या,देवी सुमित्रा व देवी कैकयी चारही मुलांच्या संगोपनात रमून गेलेल्या असतात. कौसल्या देवी बाळ श्रीरामाला आपल्या मांडीवर पालथे निजवून सुगंधी तेल-उटण्याने अंघोळ घालत असतात. सावळ्या बाळ श्रीरामाचे छोटे ...अजून वाचा

8

गीत रामायणा वरील विवेचन - 8 - ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा

हळूहळू श्रीराम व त्यांचे तीनही अनुज दिसामासाने वाढू लागले. पाहता पाहता श्रीराम आठ वर्षांचे झाले. त्यांचा मौन्ज विधी झाला त्यांना व त्यांच्या भावांना वसिष्ठ ऋषींच्या आश्रमी विद्याअध्ययन करण्यास पाठविण्यात आले. तिथे गुरुकुलात गुरु वसिष्ठ व गुरुमाता अरुंधती ह्यांच्या छत्र छायेखाली सगळ्या विद्या श्रीरामांनी व त्यांच्या तीनही भावांनी आत्मसात केल्या. सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये श्रीरामांचे बुद्धीचे तेज वेळोवेळी सगळ्यांना दिसून आले. वसिष्ठ ऋषींनी घेतलेल्या अनेक कसोट्यांमधून श्रीराम सदैव उत्तीर्ण झाले. आणि वेदाभ्यास, युद्धनीती,राजनीती आदी सगळे शिक्षण घेऊन गुरूंना यथायोग्य गुरुदक्षिणा देऊन गुरू व गुरुमातेचा आशीर्वाद घेऊन श्रीराम व त्यांचे बंधू स्वगृही परततात. आता श्रीराम किशोरवस्थेत असतात. स्वगृही परतल्यावर काही काळाने ऋषी विश्वामित्र ...अजून वाचा

9

गीत रामायणा वरील विवेचन - 9 - मार ही त्राटीका, रामचंद्रा

श्रीराम व लक्ष्मण विश्वामित्र ऋषींसोबत त्यांच्या यज्ञस्थळी पोचतात. विश्वामित्र ऋषी इतर ऋषीगणांसह आता निश्चिन्त पणे यज्ञास स्थानापन्न होतात. श्रीराम लक्ष्मण दैत्य येतात का हे बघण्यास आणि त्यांच्याशी लढण्यास सावध पवित्रा घेऊन उभे असतात. यज्ञ सुरू असतो. यज्ञ मध्यावर येताच कुठूनतरी राक्षसांची झुंड तिथे प्रकट होते. श्रीराम व लक्ष्मण सावध च असतात ते त्या सगळ्यांचा नायनाट करतात. विश्वामित्रांना व इतर ऋषींना हायसं वाटते. यज्ञात आहुती टाकणं सुरू असते. पुन्हा दैत्यांची फौज येते. इकडून दैत्यांचे हत्यारं यज्ञाच्या दिशेने सुटतात तिकडून श्रीरामाचे बाण दैत्यांच्या दिशेने सुटतात. पुन्हा श्रीराम व लक्ष्मणाचे बाण लागून सगळ्या दैत्यांचा नाश होतो. थोडावेळ गेला नाही की पुन्हा पुन्हा ...अजून वाचा

10

गीत रामायणा वरील विवेचन - 10 - चला राघवा चला

श्रीरामांनी विश्वामित्र ऋषींनी सांगितल्यावर त्राटीकेचा वध केला आणि अखेर यज्ञ संपन्न झाला. यज्ञ संपन्न झाल्यावर श्रीराम व लक्ष्मण यांनी विश्वामित्र यांना स्वगृही परतण्याची आज्ञा मागितली पण विश्वामित्र ह्यांनी त्यांना त्यांच्या समवेत मिथिला नगरीत चलण्यास आग्रह केला. हे श्रीरामा आम्हास राजा जनक यांचं त्यांच्या राज दरबारात होणाऱ्या यज्ञासाठी आमंत्रण आहे. मिथिला नगरी तर सुंदर आहेच पण त्याही पेक्षा तिथला जनक राजा खूप चांगला आहे. तेथील यज्ञ मंडपी राजा जनकाने सुनाभ नामक धनुष्य ठेवलेला आहे. जो धनुष्य साक्षात शंकरांनी जनकाला दिला. त्याच धनुष्यानी महादेवाने त्रिपुरासुराचा वध केला होता. त्या धनुष्याची जनक राजा रोज पूजा करतो. धनुष्य एवढा जड आहे की ठीक ...अजून वाचा

11

गीत रामायणा वरील विवेचन - 11 - आज मी शापमुक्त झाले

श्रीराम व लक्ष्मण ऋषि विश्वामित्रांच्या सांगण्यावरून मिथिलेला जायला निघतात. प्रवास सुरु असताना मधून मधून थोडा विश्राम करत. भूक लागल्यावर खात. तहान लागल्यावर प्रवासात लागलेल्या जलाशयातील पाणी पीत त्यांचा मिथिला नगरीकडे प्रवास सूरु होता. प्रवासात जाता जाता त्यांना एक कुटी दिसते व त्यात एक मोठी शिळा दिसते. श्रीराम विश्वामित्रांना त्याबद्दल विचारतात. विश्वामित्र श्रीरामांना त्या शिळेचा इतिहास सांगायला लागतात. हे श्रीरामा, फार वर्षांपूर्वी इथे गौतम ऋषींचा आश्रम होता ते व त्यांची साध्वी पत्नी अहल्या तिथे राहत असत. गौतम ऋषी जसे तपस्वी होते त्याचप्रमाणे त्यांची पत्नी सुद्धा योगिनी होती. एकदा आकाश मार्गाने जात असता इंद्राला गौतम ऋषींचा आश्रम दिसला. आश्रमातील अहल्या देवींना ...अजून वाचा

12

गीत रामायणा वरील विवेचन - 12 - स्वयंवर झाले सीतेचे

मिथिलेत जनक राजाच्या दरबारी आल्यावर जनक राजा विश्वामित्र ऋषींना वंदन करतात व श्रीराम व लक्ष्मणाचे स्वागत करतात. त्यांचे आदरातिथ्य त्यांना स्वयंवरात आमंत्रित करतात. दरबाराच्या मध्यभागी एका चौरंगावर एक मोठा महाकाय धनुष्य ठेवला असतो. त्या धनुष्याला उचलून जो त्याला प्रत्यंचा लावेल तो पुरुष स्वयंवरात विजेता ठरेल आणि त्याच्याच गळ्यात सीता देवी वरमाला घालतील असा स्वयंवराचा नियम जनक राजाने ठरवला असतो. राजाने असा पण का ठेवला असतो त्यामागे एक कथा आहे जी खाली नमूद केली आहे: ( महादेवाची आराधना केल्यावर स्वयं शंकरच परशुरामांना स्वतः चा धनुष्य प्रसन्न होऊन देतात. तो धनुष्य परशुराम सदैव आपल्या जवळ बाळगतात. एकदा असेच परशुराम जनक राजाकडे गेले ...अजून वाचा

13

गीत रामायणा वरील विवेचन - 13 - आनंद सांगू किती सखे ग

एव्हाना राजा दशरथ यांच्याकडे श्रीराम व देवी सीता यांचा स्वयंवर सोहळा संपन्न झाला हा निरोप जातो. राजा दशरथ व तिन्ही राण्यांना व भरत शत्रुघ्न यांना मिथिलापुरीत येण्याचे राजा जनक आमंत्रण देतात. कुलगुरू वसिष्ठ व विश्वामित्र यांच्या मार्गदर्शनानुसार असे ठरते की राजा जनकाच्या उर्वरित तिन्ही कन्यांचे (मुळात राजा जनकाच्या दोनच कन्या होत्या एक सीता जी भूमीतून उत्पन्न झाली होती व दुसरी उर्मिला आणि जनक राजाचा जो चुलत भाऊ होता कुशध्वज त्याच्या दोन कन्या होत्या मांडवी व श्रुतकीर्ती. परंतु भावाच्या मुली म्हणजे आपल्याच मुलीप्रमाणे असतात ह्या न्यायाने पुराणात मांडवी व श्रुतकीर्ती सुद्धा जनक राजाच्या पुत्री म्हणून ओळखल्या जातात. आणि राजा जनक ...अजून वाचा

14

गीत रामायणा वरील विवेचन - 14 - मोडू नका वचनास नाथा

राजा दशरथांनी जेव्हा श्रीरामांस राज्यपदी बसवण्याचा निर्णय घेतला तेव्हा भरत व शत्रुघ्न आपल्या आजोळी गेले होते. ते नसताना राज्याभिषेक हे देवी कैकयी च्या दासीला म्हणजेच मंथरेला व कैकयी ला सुद्धा खटकले. नक्की काहीतरी ह्यात गोम आहे असे त्या दोघींना वाटू लागले. मंथरेने कैकयीच्या डोक्यात गैरसमज भरून दिला. देवी कौसल्या ह्याच राजे दशरथांना प्रिय असून श्रीराम च त्यांचा प्रिय पुत्र आहे. म्हणूनच आज भरत नसताना श्रीरामाच्या राज्याभिषेकाची तयारी सुरू आहे. उद्या राम राजा झाला की कौसल्या देवी राज माता होतील मग तुला आणि तुझ्या मुलाला काहीहि महत्व राहणार नाही. असे मंथरेने कैकयीचे मन कलुषित करून टाकलं. मग आता मी काय ...अजून वाचा

15

गीत रामायणा वरील विवेचन - 15 - नको रे जाऊ रामराया

कैकयी चा दुराग्रह बघून राजा दशरथाची प्रकृती बिघडते. कैकयी चा विचित्र हट्ट आणि त्यामुळे दशरथाची ढासळलेली प्रकृती राजवाड्यात ही हळूहळू पसरते. श्रीराम आपल्या वडिलांना बघायला कैकयी च्या कक्षात येतात. तेव्हा त्यांचे वडील तर काही सांगू शकत नाहीत पण कैकयी मात्र निर्लज्ज पणे श्रीरामास तिने मागितलेल्या दोन वरांबद्दल सांगते आणि ते जर पूर्ण झाले नाहीत तर रघुकुलास कमीपणा येईल असे सांगते. ते ऐकताच श्रीराम आपल्या पिताश्रींना म्हणतात, "हे तात आपण स्वतः ला दोषी समजू नये. मी आपण दिलेलं वचन नक्की पूर्ण करेल. मला वनवासात जाण्यास काहीही आपत्ती नाही." "श्रीरामा वर मी दिलेले आहेत पण ते तू पूर्ण केलेच पाहिजे असे ...अजून वाचा

16

गीत रामायणा वरील विवेचन - 16 - रामाविण राज्यपदी कोण बैसतो?

पाहता पाहता कैकयी ने भरतास राज्यपदी बसवण्याचा व श्रीरामास वनवासात पाठवण्याचा वर मागितला ही बातमी लक्ष्मणपर्यंत ही पोचते. ती ऐकताच लक्ष्मणाची तळपायाची आग मस्तकात जाते. तो त्वेषाने देवी कौसल्येच्या कक्षात येतो जिथे श्रीराम आपल्या आईला समजवण्याचा प्रयत्न करत असतात. लक्ष्मण म्हणतात " हे रामा तुझ्याविना राज्यपदी बसण्याचा कोणालाही अधिकार नाही. जो कोणी त्यात अडथळा आणेल त्याच्याशी दोन हात करायला मी तयार आहे." "लक्ष्मणा शांत हो! क्रोधाने फक्त नुकसानच होते.",श्रीराम "श्रीरामा तू तर सर्वज्ञ आहे मग तू उगीच का त्या पापिनी कैकयी चे ऐकतोय? कैकयी ला सत्ता हवी आहे. वर,वचन हे फक्त बहाणे आहेत. आणि स्त्रीलंपट तो दशरथ राजा तो ...अजून वाचा

17

गीत रामायणा वरील विवेचन - 17 - जेथे राघव तेथे सीता

माता सुमित्रेचा आशीर्वाद घेण्यास श्रीराम व लक्ष्मण जातात. "माते आम्हाला आशीर्वाद दे की आम्ही लवकरात लवकर चौदा वर्षे वनवास करून येऊ.",श्रीराम व लक्ष्मण माता सुमित्रा सुद्धा सद् गदीत होतात. त्यांना गहिवरून येते. त्यावर श्रीराम म्हणतात, "माता कौसल्या व आपली मनःस्थिती, चिंता मला समजतेय. कुठल्या आईचे हृदय पुत्रवियोगाने द्रवणार नाही! परंतु काही कर्तव्ये पार पाडावीच लागतात. आपण अश्या धीर खचवला तर माता कौसल्ये कडे कोण लक्ष देणार? ",श्रीराम श्रीरामांचे बोलणे ऐकून थोड्यावेळाने त्या स्वतःला सावरून दोघांनाही आशीर्वाद देतात. "लक्ष्मणा मला आज तुझा अभिमान वाटतो आपल्या ज्येष्ठ भ्राता सोबत जाऊन तू कनिष्ठ बंधूचे कर्तव्यच पालन करतो आहेस. माझा तुम्हा दोघांना आशीर्वाद ...अजून वाचा

18

गीत रामायणा वरील विवेचन - 18 - थांब सुमंता, थांबवी रे रथ

देवी सीतेची विनंती अखेर श्रीराम मान्य करतात व त्यांना आपल्या सह येण्यास अनुज्ञा देतात. लक्ष्मण सुद्धा उर्मिला देवींचा निरोप त्यांच्या कक्षात जातात. "उर्मिले तुला कळले असेलच की भ्राताश्री ला वनवासात जावे लागते आहे व त्यांच्यासोबत मी सुद्धा जाणार आहे. मी इथे नसताना पिताश्री माताश्री यांची काळजी घे. स्वतःची काळजी घे.",लक्ष्मण कुमार "देवी जानकी जर भ्राताश्री सोबत येऊ शकतात तर मी आपल्या सवे का येऊ शकत नाही? विवाहापश्चात पत्नीने आपल्या पतीसोबतच राहणे उचित होणार नाही का? देवी जानकींना एक नियम व मला एक नियम असे का?",उर्मिला देवी "देवी जानकी हट्ट करून भ्राताश्रीं सोबत येणार आहेत परंतु तू तो हट्ट करू ...अजून वाचा

19

गीत रामायणा वरील विवेचन - 19 - नकोस नौके परत फिरू ग

श्रीरामांचा रथ चालत चालत गंगातीरी शृंगवेरपूर नगराच्या सीमेवर येऊन थांबला. तेथपर्यंत आलेल्या अयोध्येतील लोकांना श्रीरामांनी मोठ्या कष्टाने निरोप देऊन जाण्यास सांगितले त्यामुळे ते जड अंतकरणाने अयोध्येच्या दिशेने चालू लागले. तेथून नदी पार करून श्रीरामांना पैल तीरी जावयाचे होते. परंतु रात्र झाल्यामुळे त्यांना मुक्काम करणे आवश्यक होते. गंगातीरी असणाऱ्या नावाडी लोकांनी तो रथ बघितला व त्यातून तीन तेजस्वी व्यक्ती बाहेर आलेल्या बघितल्या ते लगेच आपल्या समुदायाच्या म्होरक्याला म्हणजेच निषादराज गृह ह्याला सांगायला गेले. श्रीरामांची कीर्ती सर्वत्र पसरल्यामुळे निषाद राजाला नावाड्यांच्या आणि कोळ्यांच्या तोंडून ऐकलेल्या वर्णनाने हे कळलं की कोणीतरी असामान्य व्यक्ती नदीतीरी आलेल्या आहेत. तो लगेच नदीतीरी त्यांना भेटण्यास गेला ...अजून वाचा

20

गीत रामायणा वरील विवेचन - 20 - या इथे लक्ष्मणा बांध कुटी

निषाद राजा ने श्रीराम,जानकीदेवी व लक्ष्मण यांना गंगा पार करून पैलतीरी पोचवले. नावेतून खाली उतरल्यावर श्रीरामांना निषाद राजाला काहीतरी द्यावी असे वाटले पण त्यांच्या गळ्यात जानव्या शिवाय काहीच नव्हते. सगळे आभूषणे त्यांनी राजवाडा सोडतानाच दान केले होते. एक अंगठी सुद्धा त्यांच्या बोटात नव्हती. लक्ष्मणाची सुद्धा हीच अवस्था होती त्यामुळे श्रीरामांना संकोचल्या सारखे झाले. श्रीरामांची ही अवस्था जानकी देवींनी अचूक ओळखली त्यांनी त्यांच्या बोटातील एकमेव अंगठी काढून श्रीरामांना निषाद राजाला देण्यास दिली. श्रीरामांनी निषाद राजाला ती अंगठी देत म्हंटल," निषादराज आपल्या आदरातिथ्याने तसेच आपल्या इथवर केलेल्या मदतीमुळे आम्ही गंगा नदी पार करू शकलो त्या बद्दल माझ्या कडून आपल्याला ही छोटी ...अजून वाचा

21

गीत रामायणा वरील विवेचन - 21 - बोलले मज इतुके राम

लक्ष्मणाने काष्ठ शाखा पाने गोळा करून एक उत्तम पर्ण कुटी बांधली. एका शुभ मुहूर्तावर तेथील जवळ राहणाऱ्या आश्रमातील ऋषींच्या श्रीरामांनी त्या पर्ण कुटीची वास्तू शांती करून घेतली व ते तिघेही त्या कुटीत प्रवेशले. इकडे मंत्री सुमंत आता अयोध्येत राजप्रसादात पोचले होते. राजा दशरथांना कसे सांगावे की मी श्रीरामांना घेऊन येऊ शकलो नाही ह्या विचारात ते असताना त्यांना राजा दशरथा चा निरोप येतो. मोठ्या जड अंतकरणाने ते दशरथ राजाला सामोरे जातात. "ये सुमंता! आसनस्थ हो! श्रीरामांना घेऊन तू आलेला दिसत नाही. तेथे काय घडलं? श्रीरामाला गंगा स्नान करून परत आयोध्येस आण असे मी तुला सांगितले होते त्याचे काय झाले? रामाने ...अजून वाचा

22

गीत रामायणा वरील विवेचन - 22 - जाहला चोहीकडे अंधार

मंत्री सुमंत दशरथ राजास श्रीरामांचा संदेश कथन करतात. दशरथ राजा तो संदेश ऐकून भावनातिरेकाने आक्रन्दू लागतात. त्यांच्या डोळ्याला अश्रूंची लागते. "पहा सुमंता! माझा श्रीराम किती गुणी आहे. स्वतः वनवासात असून त्याला त्याच्या माता पित्याची काळजी वाटते. आपले आईवडील शोकाकुल राहू नये म्हणून त्याच्या मनाची होणारी धडपड त्याच्या संदेशातून प्रतीत होतेय. माझ्या कैकयी ला वर देण्यामुळे आज तो जानकी व लक्ष्मण वनवासात फकिराप्रमाणे जगत आहेत पण त्याबद्दल त्याचा कोणावरही राग नाही. पहा कसा दैवदुर्विलास आहे. श्रीरामासारखा मोठ्यामनाचा गुणी पुत्र मला लाभला म्हणून मी भाग्यवान ही आहे आणि अश्या पुत्राला माझ्यामुळे वनात जावे लागले म्हणून मी कमनशिबी सुद्धा आहे. इथे राजप्रासादात ...अजून वाचा

23

गीत रामायणा वरील विवेचन - 23 - माता न तू वैरीणी

दशरथ राजाचा मृतदेह रसायनात ठेवण्यात आला. तातडीने वसिष्ठ ऋषींना बोलावण्यात आले. वसिष्ठ ऋषींनी भरत व शत्रुघ्न ला आणण्यासाठी त्यांच्या म्हणजे नंदीग्रामी दूत पाठवले. प्रवासात भरतास दशरथ राजाच्या मृत्यूची तसेच श्रीरामाच्या वनवासाची माहिती सांगू नये असे दूतास बजावण्यात आले होते त्यामुळे भरतास वाटले की नक्की श्रीरामांचा राज्याभिषेक सोहळा आहे आणि म्हणूनच आपल्याला घाईघाईने आयोध्येस नेण्यात येत आहे. प्रवासात भरत व शत्रुघ्न ह्याच समजात असतात त्यामुळे आनंदी असतात परंतु जसे ते अयोध्येत पोंचतात तसे त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात कारण अयोध्येला शोककळा आलेली असते. कुठेच दिवे लागले नसतात. कुठेच अग्नी प्रज्वलित झालेला नसतो. दूतास पृच्छा केली असता दूत काही न सांगता मौन ...अजून वाचा

24

गीत रामायणा वरील विवेचन - 24 - सावधान राघवा

श्रीरामाच्या शोधात भरत मोठे सैन्य घेऊन ज्या दिशेने श्रीराम गेले त्याच दिशेने मार्गक्रमण करू लागले. भरताचा सैन्य घेण्याचा एकच की जेवढे जास्त लोकं सोबत घेऊ तेवढे जण रामाला शोधण्यास उपयोगी पडतील व श्रीराम लवकरात लवकर दिसेल. रस्त्यात असणाऱ्या वाटसरू मंडळींनी, आश्रमातील ऋषीगणांनी श्रीराम कुठे गेले? कुठल्या दिशेने गेले हे भरतास अचूक सांगितले त्यामुळे भरत कुमार सैन्यासह श्रीराम जिथे पर्णकुटी बांधून राहत होते तेथे त्या दिशेने हळूहळू येऊ लागले. जसजसे ते सैन्य जवळजवळ येऊ लागले तसतसे त्यांच्या पावलांमुळे धुळीचे लोट उठू लागले. ते बाहेरच उभ्या असलेल्या लक्ष्मणास दिसले. व ते श्रीरामांना म्हणू लागले, "श्रीरामा जानकी देवींना सुरक्षेच्या दृष्टीने आत पर्णकुटीत ...अजून वाचा

25

गीत रामायणा वरील विवेचन - 25 - पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा

पर्णकुटी पासून थोड्या अंतरावर रथ आणि सैन्य थांबवून भरत श्रीरामांना भेटायला येतात. इकडे लक्ष्मणास गैरसमज झाला असल्याने तो भरताच्या धावून जायला निघतो पण श्रीराम त्याला थांबवतात आणि शांत राहण्यास सांगतात. त्यावर लक्ष्मण धुमसत तिथेच सावध पवित्र्यात उभा राहतो. भरत येताच श्रीरामांच्या पायावर नतमस्तक होतो. व आपल्या अश्रूंनी त्यांच्या चरणावर अभिषेक घालतो. श्रीराम सुद्धा सद्गदीत होतात व भरतास उठवून त्याला आपल्या छातीशी घट्ट धरून त्याच्या पाठीवरून मायेने हात फिरवत त्याला शांत करण्याचा प्रयत्न करतात. लक्ष्मणाचा क्रोध भरताच्या अश्या वागण्याने क्षणात मावळतो. आणि त्याच्याही डोळ्यात अश्रू जमा होतात. जानकी देवींना सुद्धा गहिवरून येते. भरत श्रीरामांना दशरथ राजे गेल्याची बातमी सांगतो ते ...अजून वाचा

26

गीत रामायणा वरील विवेचन - 26 - मागणे हे एक रामा, आपल्या द्या पादुका

भरत कुमारांची इच्छा असते की श्रीराम दिसताच त्यांना राजमुकुट घालून त्यांचा तिथेच राज्यभिषेक करून त्यांना परत आयोध्येस आणायचे त्यासाठी सोडतानाच भरत मुनिवस्त्र परिधान करतात. परंतु श्रीराम त्यांना राजवस्त्र परिधान करण्यास व राजमुकुट घालून राज्यपद सांभाळ असे सांगतात. आणि चौदा वर्षे होईपर्यंत मी परत अयोध्येला येणार नाही असे निक्षून सांगतात. तेव्हा भरताचा नाईलाज होतो. जसे श्रीराम निश्चयी व तत्ववादी असतात त्याप्रमाणेच श्रीरामांचे बंधू असल्याने भरत सुद्धा तेवढेच निश्चयी व तत्ववादी असतात. ते श्रीरामांना म्हणतात, "तात गेले माय असून नसल्यासारखीच आहे त्यामुळे मला अनाथ झाल्यासारखं वाटते. कोणाचाच आधार वाटत नाही. आपण आयोध्येस आले असते तर आपला आधार वाटला असता पण आपण ...अजून वाचा

27

गीत रामायणा वरील विवेचन - 27 - कोण तू कुठला राजकुमार

भरत ने श्रीरामांच्या पादुका सिंहासनावर प्रस्थापित केल्या व स्वतः अयोध्येच्या बाहेर एका आश्रमात राहून अयोध्येचा कारभार अलिप्तपणे बघू लागले. बघता दहा वर्षे निघून गेली. भरताने दहा वर्षे अगदी उत्तमरीत्या राज्यकारभार निर्लेपपणे बघितला आणि यापुढेही त्यांचे व्रत सुरूच राहिले. इकडे श्रीरामांनी चित्रकूट सोडला व नाशिक जवळच्या पंचवटी क्षेत्री गोदावरी नदीच्या तीरी पर्णकुटी बांधली व तिथे राहू लागले. ह्या दहा वर्षांच्या काळात अनेक ऋषींचे पावन सान्निध्य श्रीरामांना लाभले व ऋषींना सुद्धा श्रीरामांकडून राक्षसांचा उपद्रव दूर करण्यास वेळोवेळी मदत मिळत गेली. एके दिवशी गोदावरी नदीच्या तीरी असलेल्या पर्णकुटीत श्रीराम ध्यानस्थ बसलेले असताना त्यांच्या जवळ एक षोडश वर्षीय सुंदर मोहक तरुण स्त्री येते. ...अजून वाचा

28

गीत रामायणा वरील विवेचन - 28 - सूड घे त्याचा,लंकापती

प्रतिशोधाच्या अग्नीत जळत शूर्पणखा तिच्या खर व दूषण ह्या भावांकडे राम लक्ष्मणाची तक्रार घेऊन जाते. बहिणीची अशी अवस्था पाहून दूषण चवताळून उठतात. ते चौदा हजार सैन्यासह श्रीरामांना सामोरे जातात. "कुठेय तो राम? आमच्या भगिनीची अशी अवस्था करणारा! माझ्या पुढ्यात तर ये! चांगली अद्दल घडवतो तुला!",खर-दूषण म्हणाले. "दादा! बाहेर कोणा दैत्यांचा आवाज येतोय! मी आत्ता जाऊन त्यांचा समाचार घेऊन येतो.",लक्ष्मण तावातावाने म्हणतात. "लक्ष्मणा! त्यांनी मला संबोधले आहे ह्याचा अर्थ त्यांना माझ्याशी युद्ध करायचे आहे. त्यामुळे तू इथेच थांब मी बघून येतो.",असे म्हणून श्रीराम पर्णकुटी च्या बाहेर येतात. खर-दूषण युद्धयाच्या पवित्र्यातच असतात. "तूच का राम! तुला काय वाटलं? तू आमच्या बहिणीशी ...अजून वाचा

29

गीत रामायणा वरील विवेचन - 29 - मज आणून द्या तो हरीण अयोध्या नाथा

शूर्पणखा रावणाच्या मनात सीतेबद्दल मोह निर्माण करण्यात यशस्वी ठरली. सीतेचे हरण करण्यासाठी रावणाने मारीच राक्षस जो रावणाचा मामाच होता मदत घेण्याचे ठरवले. विश्वामित्रांच्या यज्ञाच्या वेळेस जो पराक्रम श्रीराम लक्ष्मणांनी दाखवला होता तो मारीच विसरला नव्हता त्यामुळे त्याने रावणाला रामाशी युद्ध करण्याऐवजी हा विचार सोडून द्यावा असे सुचवले. "मारीच! शूर्पणखेचा अवमान तो आपला अवमान त्यासाठी मला रामाला अद्दल घडवायची आहे. तसेच रामाची पत्नी सीता तिच्या स्वयंवरच्या वेळेस तो धनुष्य माझ्या छातीवर पडला असता सगळे माझ्यावर तेव्हा हसले होते त्याचाही मला वचपा काढायचा आहे. ",रावण"रावण! मला वाटते तू महान राजा आहे असे परस्त्री मागे वेळ घालवणे तुला शोभत नाही. तसेच सीता ...अजून वाचा

30

गीत रामायणा वरील विवेचन - 30 - याचका, थांबू नको दारात

जानकी देवींच्या हट्टामुळे श्रीराम चाप बाण घेऊन मृगाच्या शोधात कुटीबाहेर पडतात. लक्ष्मण अंगणात व सीता देवी घरात मुगाची वाट उभ्या असतात. सीता देवी फार उत्साहित झाल्या असतात. आता ते सुवर्ण मृग नाथ आणतील. त्याच्या पायात मी घुंगरू बांधेन व ते हरीण कुटीमध्ये हिंडू बागडू लागेल तेव्हा किती अद्भुत दृश्य दिसेल ह्याची कल्पना करून सीता देवी रोमांचित होत होत्या परंतु बराच वेळ होऊनहीश्रीराम येण्याचे चिन्ह दिसेना तेव्हा त्या चिंतीत झाल्या व सारख्या कुटीच्या आत बाहेर येरझारा घालू लागल्या. इकडे लक्ष्मण सुद्धा अंगणात उभे राहून श्रीरामांची वाट बघू लागले. तेवढ्यात त्यांना "सीते धाव! लक्ष्मणा धाव!" अशी आर्त हाक ऐकू आली. ती ...अजून वाचा

31

गीत रामायणा वरील विवेचन - 31 - कोठे सीता जनकनंदीनी

तिकडे श्रीराम सुवर्णमृगाच्या रूपातील मारीचाचा वध करून परतत असताना त्यांना वाटेत लक्ष्मण येताना दिसतात. त्यांना बघताच त्यांच्या छातीत चर्रर्रर्र त्यांचा डावा डोळा फडफडू लागतो ते लक्ष्मणास घाईघाईने म्हणतात,"लक्ष्मणा! तू इथे कसा? तिथे जानकी ला एकटं असुरक्षित ठेवून तू इथे का आला? त्या मायावी राक्षसाने माझा हुबेहूब काढलेला आवाज ऐकून तू इथे आला आहेस का?""हो! सीता देवींनी मला आग्रह करकरून पाठवलं. मी त्यांना समजावलं की भ्राताश्रींना काहीही होणार नाही पण त्या ऐकायलाच तयार नव्हत्या. त्यांनी मला नाही नाही ते दूषणं दिले म्हणून मला नाईलाजाने यावं लागलं. " (इथे उगीच वाटून जाते की जर लक्ष्मणांनी सीता देवीचं ऐकून कुटीबाहेर पडून थोडं ...अजून वाचा

32

गीत रामायणा वरील विवेचन - 32 - लक्ष्मणा, तिचीच ही पाऊले

श्रीराम सीता देवींच्या वियोगाने व्यथित असतात. लक्ष्मण त्यांचे सांत्वन करतात त्यांना धीर देतात. काही वेळाने त्यांच्या मनोवस्थेत बदल होतो. नैराश्य कमी होते व आपण सीतेचा शोध घेतला पाहिजे असे त्यांना वाटते. कुटी जवळच्या आवारात हिंडणारे हरणं सारखे दक्षिण दिशेकडे बघत असतात जे बघून श्रीराम व लक्ष्मणांना कळते की नक्कीच सीता देवी ह्याच मार्गाने गेल्या असाव्यात.ते दोघे दक्षिण दिशेने मार्गक्रमण करू लागतात. थोडं अंतर गेल्यावर त्यांना काही चुरगळलेली फुलं दिसतात. ते फुलं सीतेच्याच केसांमधील आहेत ही ओळख श्रीरामांना पटते. काही पावलांच्या खुणा सुद्धा त्यांना आढळतात त्यावरून श्रीराम लक्ष्मणास म्हणतात,"हे पहा लक्ष्मणा हे फुलं आणि पदचिन्ह सीतेचेच आहेत. ह्याचाच अर्थ ती ...अजून वाचा

33

गीत रामायणा वरील विवेचन - 33 - पळविली रावणें सीता

छिन्न विच्छिन्न रथा समोरून आणखी पुढे गेल्यावर श्रीराम व लक्ष्मणांना एक महाकाय गरुड पक्षी मरणासन्न अवस्थेत दिसतो. त्याला बघताच ह्यानेच सीतेला भक्षिली असावी अशी शंका श्रीरामांना येते. हा सुद्धा सुवर्ण मृगाचे रूप घेणाऱ्या मायावी राक्षसासारखा एखादा मायावी राक्षस असावा असे त्यांना वाटले. त्यामुळे ते त्याच्यावर बाण मारण्यासाठी रोखतात ते बघून तो महाकाय पक्षी म्हणतो,"हे रघुनाथा जो आधीच मरणाला टेकलेला आहे त्याला आपण का मारता आहात? मी पक्षीराज जटायू आहे. सूर्यदेव यांचा जो सारथी अरुण आहे त्याचा मी पुत्र जटायू आहे. मी दशरथ राजाचा मित्र आहे. आज माझी जी ही अवस्था झालीय ती सीता देवींना वाचवण्यासाठी जे मी शर्थीचे प्रयत्न ...अजून वाचा

34

गीत रामायणा वरील विवेचन - 34 - धन्य मी शबरी श्रीरामा

जटायूचे दहन करून श्रीराम व लक्ष्मण पुढे निघाले.वाटेत त्यांना डोके नसलेला कबंध राक्षस भेटला.त्याने श्रीरामांनी सांगितले,"हे श्रीराम आपल्या दर्शनाने धन्य झालो आहे. इंद्राने दिलेल्या शापामुळे माझी ही अवस्था आहे. माझ्या दोन्ही भुजा तुम्ही जर तोडल्या आणि मला मारून माझे दहन केले तर मी ह्या राक्षस जन्मातून मुक्त होईल.",त्यावर श्रीराम त्याला म्हणतात,"मी माझ्या भार्येच्या शोधात आहे. त्याबद्दल तू मला काही माहिती देऊ शकतो का?",त्यावर कबंध म्हणतो,"त्यासाठी आपणाला माझे दहन करावे लागेल. त्यानंतर च मी काही सांगू शकेन"श्रीराम त्याची इच्छा पूर्ण करतात. जेव्हा त्याचे दहन होते तेव्हा त्या अग्नितून दिव्य शरीर धारण करून तो कबंध राक्षस प्रकट होतो व सांगतो,"किष्किंधा नगरीत ...अजून वाचा

35

गीत रामायणा वरील विवेचन - 35 - सन्मित्र राघवांचा सुग्रीव आज झाला

शबरी श्रीरामाच्या दर्शनाने कृतकृत्य होते. एवढा काळ फक्त श्रीरामांच्या दर्शनासाठी तिच्या देहात थांबलेला प्राण अनंतात विलीन होऊन जातो. श्रीराम तिचे मन तृप्त होते. श्रीराम व लक्ष्मण आजूबाजूच्या मुनीजनांच्या मदतीने शबरीचे योग्यप्रमाणे दहन करतात व पुढच्या मार्गाला जातात.कबंध राक्षसाने सांगितल्यानुसार श्रीराम व लक्ष्मण ऋष्यमुख पर्वताकडे वाटचाल करू लागतात. तिथे सुग्रीव व त्यांचे मंत्री हनुमान व इतर सहकारी राहत असतात. सुग्रीवाचे त्याच्या मोठ्या भावासोबत वालीसोबत वैमनस्य झालं असते त्याची कथा खालील प्रमाणे आहे:-[ एकदा एक राक्षस वालीला युद्धासाठी ललकरतो. ते ऐकून वाली त्याच्याशी युद्ध करतो. युद्धात आपण हरणार हे पाहून तो राक्षस पळून जातो. वाली पुन्हा आपल्या राजदरबारात येतो. काही काळाने ...अजून वाचा

36

गीत रामायणा वरील विवेचन - 36 - वाली वध ना खल निर्दालन

वालीला ब्रम्हदेवाकडून असा वर मिळाला असतो की जो ही त्याच्यासमोर युद्धास उभा ठाकेल त्याची अर्धी शक्ती वालीला मिळेल. त्यामुळे कधीच कोणाशी हरत नाही. अशी माहिती जांबुवंत हा सुग्रीवाचा ज्येष्ठ मंत्री असतो तो श्रीरामांना देतो. त्यामुळे श्रीराम अशी योजना आखतात की सुग्रीवाने वालीला युद्धासाठी आमंत्रण द्यायचं आणि रामाने त्याच्या पुढे न येता एका वृक्षा आडून बाण मारायचा.श्रीरामांच्या सांगण्यावरून किष्किंदा नगरीत जाऊन सुग्रीवाने वालीला युद्धासाठी आव्हान केले,"वाली बाहेर ये! तुझा काळ तुला बोलावतोय असे समज! भावाच्या बायकोला पळवणार्या अधमा! बाहेर ये! मी सुग्रीव तुला युद्धासाठी आमंत्रण देतोय. ",सुग्रीव म्हणालाते ऐकून वाली चिडून बाहेर आला,"अरे भ्याडा! एवढा काळ ऋषयमुक पर्वतावर लपून बसलेला ...अजून वाचा

37

गीत रामायणा वरील विवेचन - 37 - असा हा एकच श्री हनुमान

वालीच्या वधानंतर त्याच्या क्रियाकर्मानंतर श्रीरामांनी सुग्रीवाला राज्यपदी बसवले आणि अंगदाला युवराज पदी बसवले. सत्ता प्राप्त झाल्यावर भोगविलासात रममाण होऊन सीता देवींना शोधण्याचे श्रीरामांना दिलेले वचन विसरला(आपले राजकारणी करतात अगदी तसंच) ते पाहून श्रीरामांना संताप आला त्यांनी लक्ष्मणाला सुग्रीवाची कान उघडणी करण्यास पाठविले. लक्ष्मणांनी खरमरीत शब्दात सुनावल्या वर सुग्रीव भोगविलासाच्या धुंदीतून बाहेर आला आणि त्याने कोट्यवधी वानरसेनेला आमंत्रित केले आणि आठही दिशांना पाठवले. त्यापैकी दक्षिण दिशेला गेलेल्या गटात हनुमान जांबुवंत नल-निल तसेच अंगद समाविष्ट होते. त्यांनी एक महिना शोध घेतला पण सीता माईंचा कुठेही पत्ता लागला नाही. तेव्हा ते सगळे निराश झाले. तेव्हा त्यांना समुद्र तटावर एक संपाती नामक गरुड ...अजून वाचा

38

गीत रामायणा वरील विवेचन - 38 - हीच ती रामाची स्वामिनी

जांबुवंताने हनुमानाच्या शक्तीचे वर्णन केल्यावर हनुमानाचे बाहू स्फुरण पाऊ लागले. बघता बघता हनुमानाने विराट रूप धारण केले. आणि महेंद्र त्याने लंकेकडे उड्डाण केले. तो महाकाय समुद्र ओलांडताना मध्येत एका मगरीच्या रूपातील राक्षसीने त्यांना अडविले. परंतु आपल्या बुद्धी चातुर्याने हनुमान तिथून सुटले आणि पुढचा प्रवास करू लागले. पाहता पाहता हनुमान लंकेच्या द्वारापर्यंत पोचले. तिथे सर्वत्र अक्राळ विक्राळ राक्षसांचा पहारा होता. कुठूनही जायला जागा नव्हती तेव्हा हनुमानाने सूक्ष्म रूप धारण करून राक्षसांची नजर चुकवून लंकेत प्रवेश केला. संपूर्ण ती अजस्त्र लंका हनुमानाने नजरेखालून घातली. रावणाच्या अंतःपुरात पण जाऊन पाहिले पण सीता देवी कुठेच नव्हत्या. मग हनुमान अशोक वाटीकेत एका उंच वृक्षावर ...अजून वाचा

39

गीत रामायणा वरील विवेचन - 39 - नको करुस वल्गना रावणा

हनुमानाची खात्री पटते की हीच श्रीरामांची स्वामिनी आहे. पण तरीही एकदम सीता देवींच्या समक्ष उभे राहण्याचा त्यांचा धीर होत हनुमानास वाटते की सीता देवींनी आपल्याला कधीही याआधी पाहिलं नाही तसेच सुग्रीव व श्रीराम यांच्या मैत्रीबद्दलही त्यांना ठाऊक नाही. अश्या परिस्थितीत मी जर अचानक समोर गेलो तर रावणानेच एखादे मायावी रूप घेतले असावे व तोच समोर उभा ठाकला आहे असे सीता देवींना वाटू शकते. हनुमंत असा विचार करतच होते तेवढ्यात सेवकांच्या गराड्यात रावण तिथे येऊन ठेपला आणि सीता देवींसमोर उभा राहिला व म्हणाला,"सीते! अशी किती काळ इथे खितपत पडणार आहे? अजूनही तुला आशा वाटते की तुझा राम येईल म्हणून? अगं! ...अजून वाचा

40

गीत रामायणा वरील विवेचन - 40 - मज सांग अवस्था दूता रघुनाथांची

देवी सीतांनी रावणाला असे बजावल्यावर रावण म्हणाला,"ठीक आहे सीते सध्या तू काही ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नाही. तुझा तुझ्यापतीवरचा विश्वास खोटा ठरेल तरी मी तुला एका महिन्याची मुदत देतो. मी म्हंटले त्यावर विचार कर आणि स्वमर्जीने माझी पत्नी होण्यास तयार हो.",असे म्हणून रावण आपल्या राजप्रासादात निघून गेला.सीता देवींपुढे जाण्याची आता हीच योग्य वेळ आहे हे हनुमंताने ओळखले व त्यांनी हळू आवाजात राक्षसिनींना न ऐकू जाईल पण सीता देवींना ऐकू जाईल ह्या पद्धतीने राम स्तुती म्हणणं सुरू केली. ती ऐकताच चकित होऊन देवी जानकी नि इकडे तिकडे बघितलं तेव्हा झाडावरून हनुमंताने रामांनी दिलेली अंगठी जानकी देवींच्या ओंजळीत टाकली. ती बघून जानकी ...अजून वाचा

41

गीत रामायणा वरील विवेचन - 41 - पेटवी लंका हनुमंत

सीता देवींचा निरोप घेऊन हनुमान अशोक वाटिकेच्या दुसऱ्या भागात आले. तिथे विविध प्रकारची चविष्ट फळे बघून त्यांना भुकेची जाणीव त्यांनी तिथे पोटभर गोड रसाळ फळे खाल्ले. त्यांच्या मनात विचार आला की ज्या कामासाठी आपण आलो होतो ते तर निर्विघ्नपणे झालं आहे मग आता जाता जाता रावणाला एक धोक्याचा इशारा द्यायला काय हरकत आहे म्हणून त्यांनी संपूर्ण वाटिकेची नासधूस केली. ते बघून तिथले पहारेकरी हनुमानाच्या अंगावर धावून आले पण त्यांचा हनुमानाने लीलया(सहज) बिमोड केला. ते पाहून पहारेकरी दरबारात तक्रार करायला गेले. "दैत्यराज! वाचवा दैत्यराज वाचवा! त्राहिमाम! वाटीकेत एक महाकाय वानर उत्पात माजवत आहे. त्याने सगळ्या फळफुलांची नासधुस आरंभली आहे.",पहारेकरी"एक क्षुद्र ...अजून वाचा

42

गीत रामायणा वरील विवेचन - 42 - सेतू बांधा रे सागरी

हनुमान श्रीरामांकडे देवी सीता ची ख्याली खुशाली कळवायला आले. त्यांनी श्रीरामांना सीता देवींनी ओळख म्हणून दिलेला मणी दिला. तो श्रीराम हर्षोल्हासित झाले व त्यांनी हनुमानाला आलिंगन दिले."हनुमंता! कशी आहे माझी सीता? माझ्या आठवणीत तिने नक्कीच दुरावस्था करून घेतली असेल. रावणाने तिला काही त्रास तर दिला नाही न?",श्रीरामतिकडे लंकेत सीता देवीचे शंकानिरसन केल्यावर इकडे हनुमान रामांची शंकानिरसन करत म्हणाले,"प्रभू! आपण म्हंटल त्याप्रमाणे त्यांनी आपल्या विरहात वाईट अवस्था तर करून घेतली आहे आणि त्या राजप्रसादात न राहता अशोकवाटिकेत एका वृक्षाखाली राक्षसिणीच्या गराड्यात राहत आहेत. तिथे एक त्रिजटा नामक राक्षसींन सीता देवींकडे लक्ष देण्याचे काम करते ती जरी राक्षसींन असली तरी सीता ...अजून वाचा

43

गीत रामायणा वरील विवेचन - 43 - रघुवरा, बोलत का नाही

सेतू बांधत असता रावण त्याचे हेर श्रीरामांच्या कार्यावर लक्ष ठेवण्यासाठी पाठवतो. ते हेर श्रीरामांच्या सैन्यात कोण कोण आहे? केवढी वानर सेना आहे, त्यांची किती शक्ती आहे? ह्याची संपूर्ण माहिती काढतात. आणि रावणाला लंकेत जाऊन कळवतात. रावण ते ऐकून आपल्या सैन्याला युद्धाची तयारी करण्याचे आदेश देतो. रावणाचा कनिष्ठ भ्राता विभीषण रावणाला पदोपदी समजावतो. हे लंकेश अजूनही वेळ गेली नाही. रामाला त्याची पत्नी सन्मानपूर्वक अर्पण करा आणि लंकेचा विध्वंस होण्यापासून वाचवा. श्रीराम दयाळू आहेत ते तुम्हाला क्षमा करतील. आपण अत्यंत महान राजे आहात. पुलत्स ऋषींचे पुत्र आहात. आपण शंकराचे परम भक्त आहात. आपल्याला एका परस्त्री साठी असे युद्ध करणे शोभत नाही. ज्या ...अजून वाचा

44

गीत रामायणा वरील विवेचन - 44 - सुग्रिवा हे साहस असले

रावण पुन्हा देवी सीतेकडून अपयश घेऊन आपल्या प्रासादात निघून जातो तो गेल्यावर त्रिजटा नामक एक राक्षसीण दुःखाने व्याकुळ झालेल्या देवींना श्रीराम सुखरूप असून ते शीर मायावी आहे असे सांगते ते ऐकून सीता देवींचा आनंद गगनात मावत नाही. त्या डोळे पुसतात व पुन्हा त्यांचे मन श्रीरामांची आतुरतेने वाट पाहू लागते. इकडे श्रीराम आपल्या सेनेसह समुद्रपार करून लंकेजवळ पोचले असतात. श्रीराम,लक्ष्मण,हनुमान,विभीषण व सुग्रीव लंके बाहेर असलेल्या एका पर्वतावरून लंकेचं अवलोकन करत असतात. त्याच वेळी रावण सुद्धा त्याच्या प्रासादातील उंच जागेवरून सेनेची पाहणी करीत असतो. विभीषण श्रीरामांना लंकेतील प्रत्येक जागेची बारकाईने माहिती देत असतो तेवढ्यात सुग्रीवाचे लक्ष कुठेतरी केंद्रित होते व तो ...अजून वाचा

45

गीत रामायणा वरील विवेचन - 45 - शेवटचा कर विचार फिरुनी एकदा

रामांनी समजवल्यावर सुग्रीवाला आपली चूक उमगते. रामांच्या सांगण्यानुसार सुग्रीवाने सगळ्या वानर सेनेला पाचारण केले आणि श्रीरामांनी जी युद्ध योजना होती ती समजावून सांगितली. आता युद्धाला सुरू करणार तत्पूर्वी रामांनी राज धर्माला अनुसरून वालीपुत्र अंगदाकरवी रावणाकडे एक निरोप पाठवला."अंगदा! त्वरित रावणाकडे जा आणि एकदा पुन्हा विचार कर असे रावणाला जाऊन सांग.",असे म्हणून श्रीरामांनी अंगदकडे निरोप दिला तो अंगद ने लंका दरबारी जाऊन रावणासमोर सांगितला.अंगद रावणाला म्हणाला,"रावणा!लंकानगरीच्या प्रवेश द्वारावर श्रीराम आपल्या वानर सेनेसह समुद्र ओलांडून उभे ठाकले आहेत. अजूनही एकदा विचार कर,राघवास शरण जा आणि हे युद्ध होणे टाळ. ब्रम्ह देवाच्या आशीर्वादाने तू बलशाली झाला पण त्या बळाचा तू दुरूपयोग केला. ...अजून वाचा

46

गीत रामायणा वरील विवेचन - 46 - अनुपमेय हो सुरू युद्ध राम रावणांचे

अंगदने रामांना रावणाचा मनोदय सांगितला त्यावरून युद्ध आता अटळ आणि अपरिहार्य आहे हे रामांना कळलं एका शुभ मुहूर्तावर युद्ध शंख ध्वनी दोन्ही बाजूंनी झाला आणि राम सेना व रावण सेनेचे तुंबळ युद्ध सुरू झाले. रणांगणावर सर्वत्र बाणांचा वर्षाव होऊ लागला. सगळेजण त्वेषाने मोठमोठ्याने गर्जना करीत होते जणू सगळ्यांच्या मुखातून विद्युल्लता कडाडत होती. त्या अतिप्रचंड आवाजाने दोन्हीकडच्या सैन्यातील घोडे थय थय नाचत खिंकाळत होते त्याच्या जोडीला हत्ती सुद्धा गर्जना करीत होते. त्या आवाजातच वानर सेना व राक्षसांच्या चालण्याचे लयबद्ध आवाज मिसळले.वानर सेना दात ओठ खाऊन दैत्य सेनेवर तुटून पडत होती. दैत्य सुद्धा त्यांच्याशी बरोबरीने लढत होते. वानर उंच उड्या मारत ...अजून वाचा

47

गीत रामायणा वरील विवेचन - 47 - लंकेवर काळ कठीण आज पातला

युद्ध अखंड सुरू असते. वानरसेना राक्षस सेना एकमेकांना शस्त्राने उत्तर देत होती.इकडे मेघनाद राम व लक्ष्मणांना नागपाश बाणाने बंदिस्त त्यामुळे वानर सेनेत गोंधळ आणि दैत्य सेनेत विजय सुरू असतो पण गरूडला बोलावण्यात येते व तो ते नागपाश् तोडून श्रीराम व लक्ष्मण यांना मोकळे करतो. पुन्हा श्रीराम व लक्ष्मण युद्धात सहभागी होतात.युद्धात रावणाचा सेनापती प्रहस्त नील वानरकडून मारला जातो. त्यामुळे रावण युद्धात सहभागी होतो.श्रीराम रावणाशी तर लक्ष्मण रावण पुत्र इंद्रजित शी तोडीस तोड युद्ध करण्यात गुंततात. विभीषण,सुग्रीव,हनुमान,नल निल अंगद सगळे युद्धात गुंततात. लक्ष्मणाला जेव्हा कपटाने सुद्धा जिंकता येत नाही हे बघितल्यावर रावण पुत्र मेघनाद उर्फ इंद्रजित ने लक्ष्मणावर शक्ती बाणाचा ...अजून वाचा

48

गीत रामायणा वरील विवेचन - 48 - आज का निष्फळ होती बाण

कुंभकर्ण रणभूमित येताच एकच हाहाकार होतो. वानर सेनेतील वानरांचे समूह च्या समूह कुंभकर्ण गिळून टाकतो. सगळी सेना सैरभैर होते. विभीषण कुंभकर्णाला समजवायला जातो पण कुंभकर्ण त्याला तू भाऊ असून भावाला साथ न देता शत्रू पक्षात गेला असे दूषण लावून पाठवून देतो. त्यानंतर कुंभकरणाच्या हल्ल्याने सुग्रीव मूर्च्छित होतो. अंगद लक्ष्मण यांना सुद्धा तो आटोपल्या जात नाही. हनुमान त्याच्यावर प्रहार करतात तेव्हा कुंभकर्ण त्यांना गरगर फिरवून फेकून देतो ते मूर्च्छित होतात. तोपर्यंत सुग्रीव शुद्धीवर येतो तो श्रीरामांकडे जातो व म्हणतो, "प्रभू तिकडे कुंभकर्णाने हाहा:कार माजवला आहे. तो वानरांचे जथे च्या जथे गिळून टाकतो आहे. जर असेच सुरू राहिले तर एकही वानर ...अजून वाचा

49

गीत रामायणा वरील विवेचन - 49 - भूवरी रावण वध झाला

राम निराश झालेले असतात ते विभीषणाला तसेच सारथी मातली ला रावणाला काही वरदान मिळालं आहे का हे विचारतात. तेव्हा सारथी मातली त्यांना अगस्ती ऋषींनी दिलेला बाण वापरायचा सल्ला देतो आणि विभीषण दूताकरवी रावणाच्या नाभीत अमृत कुपी असून त्याला नाभीत बाण मारल्यावरच त्याचा मृत्यू होईल असा निरोप देतो. ते ऐकून रामांच्या मनात आशा निर्माण होते. ते अगस्ती ऋषींनी दिलेला बाण रावणाच्या नाभीत मारतात आणि रावण धनुष्यासकट कोसळून धारातीर्थी पडतो. रावण मेलेला पाहून राक्षस इकडे तिकडे पळू लागतात. वानर सेना त्यांच्यावर तुटून पडते. राक्षसांचा बिमोड होतो. वानर सेना विजयोत्सव साजरा करते. वरून आकाशातून देव,गंधर्व पुष्पवृष्टी करतात. सगळे मुनी ऋषी श्रीरामांना आणि ...अजून वाचा

50

गीत रामायणा वरील विवेचन - 50 - लीनते,चारुते, सीते

श्रीराम विभीषणाला रावणाचे अंत्यसंस्कार करण्यास सांगतात ते ऐकून विभीषण आश्चर्याने म्हणतो,"प्रभू हे आपण सांगता आहात! ज्या रावणाने आपल्याला एवढा दिला त्याचा आपण अंत्यसंस्कार करण्यास सांगता आहात. धन्य आहात आपण!""विभीषणा वैर हे ती व्यक्ती जिवंत असेपर्यंतच असते. मृत्यूनंतर वैर संपते त्यामुळे धर्माप्रमाणे तू तुझ्या ज्येष्ठ बांधवाचे क्रियाकर्म करणे आवश्यक आहे ते तू कर.",श्रीरामविभीषण रावणाचे अंत्यसंस्कार करतो. लंकेत शोककळा पसरली असते. श्रीराम रौद्ररूप त्यागून आता सौम्य रूप धारण करतात व हनुमानास देवी सीतेला आपली विजयची व कुशलतेची वार्ता देण्यास सांगतात. हनुमान जेव्हा सीता देवींना श्रीराम विजयी झालेत अशी वार्ता देतात तेव्हा जनकनंदिनीं च्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागतात त्या श्रीरामांना भेटण्याची इच्छा ...अजून वाचा

51

गीत रामायणा वरील विवेचन - 51 - लोकसाक्ष शुद्धी झाली सती जानकीची

रामांनी असे म्हंटल्यावर सीता देवींना धक्का बसतो,अतीव दुःख होते त्या लक्ष्मणास अग्नी पेटवण्यास सांगतात. श्रीरामच जर मला स्वीकारणार नसतील माझं जीवन व्यर्थ आहे माझा जगून उपयोग नाही त्यामुळे मी अग्नीत देहसमर्पण करते असे म्हणून सीतादेवी अग्निप्रवेश करतात. लक्ष्मण,सुग्रीव,हनुमान सगळ्यांना अत्यंत दुःख होते. श्रीरामांना ही अतीव दुःख होते पण ते नियमबद्ध असतात त्यामुळे मनातल्या मनात अश्रू ढाळून स्तब्ध असतात. थोड्याचवेळात आश्चर्य होते. स्वतः अग्निदेव सीता देवींना सुखरुप घेऊन येतात आणि श्रीरामांना सांगतात,"प्रभू आपली जानकी शुद्ध,निष्कलंक आहे. तिचा स्वीकार करा."तेव्हा श्रीरामांच्या डोळ्यातून आणि तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागतात. श्रीराम म्हणतात,"सगळ्यांच्या साक्षीने जानकी शुद्ध आहे हे सिद्ध झालं आहे ...अजून वाचा

52

गीत रामायणा वरील विवेचन - 52 - त्रिवार जयजयकार रामा त्रिवार जयजकार

लंकेतून विभीषणाने दिलेल्या पुष्पक विमानातून श्रीराम,सीता देवी,लक्ष्मण,सुग्रीव व हनुमान अयोद्धेकडे निघाले. निघताना त्यांनी विभीषणाला नवीन राज्यपदासाठी शुभेच्छा दिल्या आणि वानर सेनेचे आभार मानून त्यांना अयोध्येत येण्याचे निमंत्रण दिले. अयोद्धेकडे जाताना प्रवासात त्यांना भारद्वाज ऋषींचा आश्रम लागला तिथे ते थांबले व त्यांचा आशीर्वाद घेऊन पुढे निघाले त्यांना सुद्धा त्यांनी अयोध्येत येण्याचे निमंत्रण दिले. पुढे आयोद्धेतून वनवासास जाताना जे जे लोकं त्यांना भेटले होते त्या सर्वांना त्यांनी परतीच्या प्रवासात अभिवादन केले. आणि अखेर ते अयोध्येत येऊन पोचले. ते येणार ह्याची वार्ता हनुमानाने जाऊन आधीच भरत यांना सांगितली होती त्यामुळे भरत आणि शत्रुघ्न ह्यांनी मिळून संपूर्ण राजप्रासाद तसेच संपूर्ण अयोध्या सुशोभित केली ...अजून वाचा

53

गीत रामायणा वरील विवेचन - 53 - प्रभो मज एकच वर द्यावा

{तुलसीदास कृत तुलसी रामायण हे श्रीरामांच्या राज्यभिषेकानंतरच संपते. उत्तर रामायण त्यात नाही तसेच सीता देवींनी जी अग्निपरीक्षा दिली त्याबद्दल असे मत आहे की रावणाच्या कैदेत जी सीता होती ती खरी नसून सीतेची प्रतिकृती होती खऱ्या सीता देवी अग्नी कडे सुरक्षित होत्या म्हणून रावणाच्या वधानंतर खोटी सीता अग्नीत प्रवेशली आणि खरी सीता अग्नी देवाने श्रीरामांना अर्पण केली. गीतरामायण हे वाल्मिकी रामयणावर आधारित असल्याने ह्यात उत्तर रामायण आहे तसेच मागील ५१ व्या गीतात नमूद केल्या प्रमाणे अग्निपरीक्षा सुद्धा आहे.}श्रीरामांचा राज्याभिषेक सोहळा आनंदात पार पडल्यावर सगळे आप्त मंडळी श्रीरामांचा निरोप घेतात. सुग्रीव,विभीषण ह्यांना भेटवस्तू देऊन श्रीराम निरोप देतात. "सुग्रीवा तू माझ्या भावप्रमाणेच ...अजून वाचा

54

गीत रामायणा वरील विवेचन - 54 - डोहाळे पुरवा रघुकुलतिलका, माझे

रामराज्यात सगळे सुखाने जगत असतात. कोणाला कुठलेच दैन्य नसते अयोध्येत नंदनवन फुलले असते. श्रीराम-सीता देवी,लक्ष्मण-उर्मिला,भरत-मांडवी, शत्रुघ्न-श्रुतकीर्ती सगळ्यांचे संसार आनंदाने असतात. यथावकाश सीता देवी गरोदर होतात आणि त्यांना अद्भुत डोहाळे लागतात. एकदा शयनगृहात बसलेले असताना सीता देवींचा चेहरा फिकट आणि थकलेला दिसत असता श्रीराम म्हणतात,"सीते तुला काही होतेय का? काही हवंय का? तुझी चर्या थकलेली वाटतेय"त्यावर सीता देवी श्रीरामांना म्हणतात,"हे रघूकुलतीलका शब्दात सांगण्यास मला संकोच वाटतोय. पण मला आजकाल उगीच वनात जावेसे वाटते. पाखरांसारखे मुक्त विहारावे,गावे बागडावे वाटतेय. कानात बासरी चा स्वर ऐकू येतो. असे वाटते वनातील एखादे पाडस कुशीत घ्यावे त्याचे विशाल निर्मल डोळे मला फार आवडतात. त्याच्यावर मला ...अजून वाचा

55

गीत रामायणा वरील विवेचन - 55 - मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे?

सीता देवीचे डोहाळे ऐकून लवकरच आपण ते पूर्ण करू असे श्रीराम वचन देतात. आपला दैनंदिन राज्यकारभार पाहत असताना श्रीरामांनी आपले हेर पेरून ठेवले होते जेणेकरून प्रजेच्या मनातील विचार आणि हाल हवाल कळावे म्हणून. एके दिवशी श्रीरामांचा हेर भद्र श्रीरामांना भेटून प्रजेचा वृत्तांत सांगतो. "बोल भद्रा! आपल्या राज्यातील प्रजा सुखात आहे न? काही अडचण तर नाहीये न त्यांना?",श्रीराम"नाही राजन! सगळी प्रजा सुखात आहे कुठेही काही दैन्य नाही, सगळीकडे समृद्धी, समाधान नांदत आहे. परंतु....",असे म्हणून भद्र खाली मान घालून गप्प बसतो. "परंतु काय भद्रा? निःशंकपणे सांग!",श्रीराम त्याला आश्वस्त करतात."प्रभू सांगायलाही संकोच वाटतो पण काही ठिकाणी माणसांच्या घोळक्यात मी काही अप्रिय विषय ...अजून वाचा

56

गीत रामायणा वरील विवेचन - 56 - गा बाळांनो, श्रीरामायण

सीता देवी वाल्मीकी ऋषींच्या आश्रमात एक कुटी बांधून राहू लागल्या. आश्रमातील इतर मुनिस्त्रियांप्रमाणे त्यांचे जीवन व्यतीत होत होते. धार्मिक सीतामाईंच्या कुशीतील गर्भ हळूहळू वाढत होता. आश्रमात आपोआपच उच्च प्रतीचे गर्भसंस्कार त्यावर होत होते. रोज पहाटे उठल्यावर आन्हिक आटोपल्यावर कुलदेवतेची आराधना करताना वेदघोष सीता देवींच्या कानी पडत असत. गोदुग्ध,कंदमुळे,फळं असा आहार करून त्या दिनचर्या पार पाडत असत. वाल्मिकी ऋषींच्या पत्नी व इतर मुनी कन्या ह्यांच्याशी त्यांचा वार्तालाप होत असे. सीता देवी राज्ञी असूनही स्वतःचे कामे स्वतःच करत असत.इकडे अयोध्येत राज प्रासादात, सिंहासनावर बसून श्रीराम सुद्धा आपले राज धर्माचे कर्तव्य पार पाडत असत. व्यवहरिकदृष्ट्या जरी त्यांनी सीता देवींचा त्याग केला होता ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय