शहरातील एक प्रशस्त नामांकित कॉलेज. आज तो कॉलेजचा हाल फुलून गेला होता.. रंगबिरंगी फुलांनी बाग जशी फुलून जाते त्याप्रमाणे हजार बाराशे स्टुडंट्स रंगीबिरंगी कपड्यांमध्ये वावरत होती. हसत खेळत एकमेकांसोबत सेल्फी काढत होती. तर कुणी एकमेकांसोबत डान्स करत व्हिडिओ बनवून घेत होती. हसत्या खेळत्या फुलांनी भरलेला बगीचा वाटत होता तो संपूर्ण हॉल. कार्यक्रम सुरू झाला. अतिथी गणांनी स्टेजवर प्रवेश केला. संचालन करण्यासाठी ज्या दोन विद्यार्थिनी होत्या. त्यांनी उत्कृष्ट संचालन करणे सुरू केले. प्रतिष्ठित व्यक्ती स्टेजवर बसलेली त्या सर्वांची स्वागतं पुष्पगुच्छाने केली गेली. त्याबरोबरच त्यांचे स्वागत छानसे स्वागत गीताने पण नृत्य समवेत केले गेले. स्वागत समारंभ संपल्यानंतर मग विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ सुरू करण्यात आला.

1

नियती - भाग 1

भाग १शहरातील एक प्रशस्त नामांकित कॉलेज. आज तो कॉलेजचा हाल फुलून गेला होता.. रंगबिरंगी फुलांनी बाग जशी फुलून जाते हजार बाराशे स्टुडंट्स रंगीबिरंगी कपड्यांमध्ये वावरत होती. हसत खेळत एकमेकांसोबत सेल्फी काढत होती. तर कुणी एकमेकांसोबत डान्स करत व्हिडिओ बनवून घेत होती.हसत्या खेळत्या फुलांनी भरलेला बगीचा वाटत होता तो संपूर्ण हॉल.कार्यक्रम सुरू झाला. अतिथी गणांनी स्टेजवर प्रवेश केला. संचालन करण्यासाठी ज्या दोन विद्यार्थिनी होत्या. त्यांनी उत्कृष्ट संचालन करणे सुरू केले.प्रतिष्ठित व्यक्ती स्टेजवर बसलेली त्या सर्वांची स्वागतं पुष्पगुच्छाने केली गेली. त्याबरोबरच त्यांचे स्वागत छानसे स्वागत गीताने पण नृत्य समवेत केले गेले. स्वागत समारंभ संपल्यानंतर मग विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ सुरू करण्यात आला.हे ...अजून वाचा

2

नियती - भाग 2

भाग 2मोहित जेव्हा स्टेजवर आला तेव्हा तो गोंधळून गेला होता.अगदी तसंच जेव्हा दाखवायला आणलेल्या मुलीला हातात चहाचा ट्रे देतात हॉलमध्ये पाठवून सर्वांसोबत बसवून मग प्रश्न विचारतात तेव्हा जशी तिची अवस्था होते त्या बिचार्‍याची अवस्था झाली होती.सर्वांग घामाने डबडबले त्याचे...फासावर चढवण्यासाठीच जणू त्याला आणलेले होते.कसाबसा थरथरत्या पायांनी मोहित स्टेजवर चढला.शाल श्रीफळ तसेच डिग्री देऊन मान्यवरांनी त्याचा सत्कार केला...उसने अवसान आणून चेहरा हसतमुख ठेवला होता त्याने.तेवढ्यात संचालन करणाऱ्या विद्यार्थिनींनी म्हटले..."तर डियर फ्रेंड्स....मिस्टर मोहित आता आपल्या सोबत आपले विचार , आपले एक्सपिरीयन्स...शेअर करतील..सो... मिस्टर मोहित....!!!"आणि हे ऐकूनच त्याचे पाय......त्याच्या पायात आतापर्यंत जो त्याने धीर एकवटून ठेवलेला होता ..तोही आता गळून पडला...आणि...............आणि आता ...अजून वाचा

3

नियती - भाग 3

भाग 3मुकाट्याने मोहित झोपडीत शिरला. बाहेरच्या पेक्षा आत दुर्गंधी अधिक होती. त्याला त्या दुर्गंधीचे काहीच वाटत नव्हते. कारण दुर्गंधी नेहमीची सवय झाली होती.तेवढ्यात त्याची लक्ष त्याच्या मामाकडे गेले. मामा अधाश्यासारखा मोहितच्या ठेवलेल्या सिल्वर ट्रॉफी कडे पहात होता एकटक.मोहितचेही लक्ष गेले की मामा आपल्या सिल्वर ट्रॉफी कडे एकटक बघतोय.त्याचे मामा विचार करत होते...."हा चांदीचा कप आहे म्हणतोय मोहित. तर हा कप किती रुपयांना विकता येईल...??"त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून मोहित ही समजून गेला की त्यांच्या मनात काय आहे...??...मनीषा काय आहे...???"मोहित्या हे काय आहे...???""मामा ...माझं बक्षीस आहे ते मला मिळाले आहे.""बक्षीस किती रुपयांचा असेल...???"मोहित आता खरच मनातून चरकला. गडबडून त्याने मामाच्या तोंडाकडे ...अजून वाचा

4

नियती - भाग 4

भाग 4बैठकीकडे जायचे होते तर बैठकीचा जिना दोन भिंतीच्या मध्ये होता भुयारा सारखा वरती चढणारा.स्टेप्स चढताना दोघेच होते. ती पुढे चढत होती. तिच्या मागे मागे खाली पाहत तो चढत होता. आणि एका क्षणाला ती मध्येच थांबली. आणि पलटली.हा आपला खाली पाहतच.. आणि मग..लक्ष नसल्यामुळे तो तिला धडकला गेला. आणि ती धडपडत होती तर त्याने पटकन तिला सावरले.दोन क्षणांसाठी दोघांचीही ह्रदय धडधडू लागले होते.पण काहीही झाले तरी मोहित हा विलक्षण संयमी स्वभावाचा होता. त्याने तिला व्यवस्थित सरळ उभे केले.आणि पुढे पाहून चालण्याचा इशारा केला. नजर चुकवून तो वर खाली पाहू लागला कोणी पाहत तर नाहीये......जवळपास 20 मिनिटांनी बैठकीतून मोहित परत ...अजून वाचा

5

नियती - भाग 5

भाग-5मुखातून एकदा शब्दाचे बाण बाहेर पडल्यानंतर आपण ते परत घेऊ शकत नाही हे तेवढेच खरे आहे. आणि जिव्हारी लागलेले सारखे बोचत असतात हृदयात.त्याने चालणे थोडे मंद केले तेवढेच तिच्यासोबत बरोबरीने चालता येईल असे वाटून. पण ती आता थोडी भरभर चालू लागली होती...नाईलाजाने मग तोही फास्ट चालत तिच्याबरोबर समांतर पावले टाकू लागला...गेट जवळ पोहोचताच मात्र... तो भीतीने समोर पाहू लागला....समोर त्यांच्या घरचा भला मोठा पुतळा काळाकुट्ट कूत्रा आपले घारे डोळे टकमक करून लांब जीभ काढून उभा होता.त्याच्याकडे बघून त्याच्या अंगी सरसरून घाम फुटला.तेवढ्यात मायराने त्या कुत्र्याला आवाज दिला.मायरा..."शेरू !!! बाजूला हो... शेरू... शेरू काय सांगितलं...?? समजलं का ??? बाजूला हो ...अजून वाचा

6

नियती - भाग 6

भाग 6चालता चालता डोक्यात विचारांनी थैमान माजवले होते त्याच्या... केव्हा झोपडी वजा घर आले समजले ही नाही.आणि त्याचे समोर गेले....तर...समोर त्याचे वडील वाट पाहत होते त्याची.आपल्या मुलाला पाहून त्याचे आई वडील दोघेही भारावून गेले होते.तरी पार्वती अधेमधे शहरात जाऊन मोहितला भेटून येत होती. पण कवडूला मात्र कधीही वेळ मिळत नव्हता.अंगाने भरलेला जरी कवडू होता तरी त्याचे मन फारंच भावनिक होते.मोहितही आपले आई-बाबांना फार फार दिवसांनी भेटत असल्यामुळे तात्पुरते तो सर्व काही विसरून गेला.त्याच्या आईला भारावल्यागंत ...त्याला काय करून देऊ खायला...?? आणि काय नाही ....??..असे वाटू लागले.मोहित ने मग एक एक किस्से सांगितले.मोहितचे बाबा कवडू आणि आई पार्वती आज निवांत ...अजून वाचा

7

नियती - भाग 7

भाग 7...नकळत आपोआप तिचे पाय आवाजाच्या रोखाने जाऊ लागले.आणि जवळ जाताच ती खुळ्यागत पाहतच राहिली.झुडपांच्या जाळीत एक गोरेपान पोर होते. क्षीण आवाजात अधून मधून रडत होते. तोंडातून फेस ही येत होता त्याच्या.न रहावून पार्वती त्याला घेण्यास खाली वाकली.. पण तीपाहून आणखीन थबकली कारण....त्याच्या एका अंगाला लाल मुंग्या चावत होत्या. तेथून रक्तही येत होते. ते पाहून पार्वतीचा जीव गलबलला.आणि खाली वाकून त्याला घेण्यास हात पुढे केले. पुन्हा ती थबकली आणि घाबरली ही. या बाळाला आपण हात लावावे की लावू नये.. हा विचार तिच्या मनात आला.अगोदरच गावामध्ये त्यांना बऱ्याचशा गोष्टीला हात लावायला आणि प्रवेश घ्यायला मनाई होती.असा सगळा विचार मनात चालू ...अजून वाचा

8

नियती - भाग 8

भाग -8आणि आता दुसरी चिंता होती की दिवसेंदिवस आता मोहितला समजत जाणार होते ,अक्कल येणार होती,तर लोकांकडून खरे समजण्याची होती दोघांना.एक दिवस कवडू असाच बसलेला होता. त्याच्या मनात तीच तगमग सारखी होती आणि दिवस जात होते तशी तशी नवीन चिंता ग्रासंत होत्या..आपल्या मनात असलेली चिंता ती...कवडू पार्वतीला बोलू लागला...की....."पार्वती ...आता मोहितला आपल्याला शाळेत घालावे लागेल.""हो.". कवडू बोलायला मोहितला शाळेत घालावे लागेल पण त्यालाही माहीत होते की त्याच्याने हे होणार नाही शाळेत मोहितला प्रवेश घेऊन देणे.कारण गावामध्ये त्या लोकांना शाळेमध्ये प्रवेश नव्हता. आणि त्याची परिस्थिती मोहितला बाहेर पाठवण्याची नव्हती.इकडे पार्वती म्हणाली...."केव्हा घालणार..??""तेच विचार करताय मी. त्याला इथे तर आपण घालू ...अजून वाचा

9

नियती - भाग 9

भाग 9आपल्या आई-बाबांच्या मनस्थितीत पासून अनभिज्ञ मोहित भराभर पावले उचलत एका दिशेने निघाला गावाच्या..संध्याकाळ होण्याच्या मार्गावर होती. त्याचा जीव करू लागला कारण ती तिथे एकटी होती. पोहोचायला त्याला पंधरा मिनिटे तरी लागणार होती.जसा शॉर्टकट घेता येईल तसा तो शॉर्टकट घेत गेला तरी त्याला पोहोचायला बारा मिनिटे लागले.पोचल्यानंतर तू इकडे तिकडे पाहू लागला...पण तिथे...........मायरा ओढ्याच्या काठावर वीस मिनिटांपूर्वीच पोचली होती. एखाद्या दगडावर बसून वाट पाहत होती. ओढ्याच्या दुसऱ्या बाजूला दोन गुरे गुरकावून एकमेकांशी भांडत होते... त्यांच्या शिंगांची आघात एकमेकांवर होत होते.मायरा तिथे बसली होती तेव्हा दुरून तिला दोन डोळे न्याहाळत होते...मायराचे वडील बाबाराव... गावातल्या एक प्रतिष्ठित व्यक्ती... घरंदाज करारीपणा त्यांच्या ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय