ना कळले कधी season 2

(658)
  • 430k
  • 202
  • 274.6k

आर्या, i am talking with you! आर्या ! सिद्धांत मीटिंग मध्ये आर्याच्या नावाने ओरडत होता. तरीही तिचे लक्षच नव्हते. आर्या!तो जोरात ओरडला आणि आर्याची तंद्री भंगली,काय सर काही म्हणालात. लक्ष कुठे असत ग तुझं मी किती वेळचा बोलतोय! मूर्ख आहे का मी ?की इथे बसलेले बाकीचे मूर्ख आहेत? तो पुन्हा तिच्यावर ओरडायला लागला. 'मला ना हल्ली तुझं काय करावं कळत नाही आहे. तुझं अजिबात कामात लक्ष नाही', 'कुठून घेतात असे लोक कंपनी वाले पण!' तो अजूनही रागात च बोलत होता. आर्या ला ह्या बोलण्याचा काहीही फरक पडत नव्हता.तिने तर आता सवयच करून घेतली होती.सिद्धांत पण कळाल चिडून काहीही फायदा नाही

Full Novel

1

ना कळले कधी Season 2 - Part 1

आर्या, i am talking with you! आर्या ! सिद्धांत मीटिंग मध्ये आर्याच्या नावाने ओरडत होता. तरीही तिचे लक्षच नव्हते. जोरात ओरडला आणि आर्याची तंद्री भंगली,काय सर काही म्हणालात. लक्ष कुठे असत ग तुझं मी किती वेळचा बोलतोय! मूर्ख आहे का मी ?की इथे बसलेले बाकीचे मूर्ख आहेत? तो पुन्हा तिच्यावर ओरडायला लागला. 'मला ना हल्ली तुझं काय करावं कळत नाही आहे. तुझं अजिबात कामात लक्ष नाही', 'कुठून घेतात असे लोक कंपनी वाले पण!' तो अजूनही रागात च बोलत होता. आर्या ला ह्या बोलण्याचा काहीही फरक पडत नव्हता.तिने तर आता सवयच करून घेतली होती.सिद्धांत पण कळाल चिडून काहीही फायदा नाही ...अजून वाचा

2

ना कळले कधी Season 2 - Part 2

आजही अस वाटतंय की सगळं कालच घडलंय आर्याचा विचार चालूच होता. नेहमी सारखाच आम्ही weekend ला फिरायला निघालो. आणि सगळं आठवू लागलं. आर्या काहीही असत हा तुझं आता हे काय नविन की bike वरच जायचं! सिद्धांत म्हणाला. अरे माझी ईच्छा होती की मी माझ्या boyfriend च्या मागे अस मस्त bike वर long drive वर जावं पण, आता boyfriend तर नाही पण नावऱ्यासोबत तर जाऊच शकते ना! आर्या म्हणाली. काहीही स्वप्न पहायची का ग तू? सिद्धांत ला तिचं बोलणं ऐकून हसायलाच आलं. तू नेणार आहेस का ते सांग फक्त काय सिद्धांत माझा एवढाही हट्ट पुरवणार नाही तू ती लटक्या ...अजून वाचा

3

ना कळले कधी Season 2 - Part 3

हॅलो, हा आई बोल काय झालं ह्या वेळेला फोन केला सगळं नीट आहे ना? आर्याने विचारलं. अग हो आर्या नीट आहे थोडा श्वास तर घे सगळं एकाच दमात बोलून गेलीस.आणि माझ्या मुलीला मी कधीही फोन करू शकते ना? बरोबर ना? सिद्धांत ची म्हणाली. हो पण हा वेळ सिद्धांत चा घरी येण्याचा आहे सहसा आपण ह्या वेळेला बोलण्याचं टाळतो म्हणून म्हणाले. नाहीतर आपल्याला बोलायला कुठलं आलंय वेळेच बंधन. आर्या म्हणाली. हो ते ही आहे पण आज मी तुला एका वेगळ्या कामासाठी फोन केला आहे. तू आता माझ्याबरोबर येवू शकते डॉक्टरांकडे. त्यांनी विचारलं. काय झालं तुला बर वाटत नाही आहे का ...अजून वाचा

4

ना कळले कधी Season 2 - Part 4

'हे बघ मंदार तू जर ही मस्करी करत असशील तर लगेच थांबव मला अशी चेष्टा आवडत नाही'. एव्हाना ने सिद्धांत ला सगळी परिस्थिती त्याच्या पद्धतीने सांगितली होती. ' ह्यातला एकूण एक शब्द खरा आहे सिद्धांत' त्याची आई त्याला म्हणाली. त्याने एकदम चमूकन च त्याच्या आई कडे पाहिले.'आणि हे सगळं जर खर आहे तर तुम्ही मला आता सांगताय!' 'आणि तुम्हाला काय वाटतय की मी हे स्विकारेन, अजिबात नाही!'. गंमत वाटतीये का तुम्हाला हे सगळं कुणीही येईल आणि काहीही सांगेन आणि मी लगेच स्वीकारावं. मी त्या मुलीला ऑफिस मध्ये च कसा सहन करतो मला माहिती आहे, आणि तिला पत्नी म्हणून स्वीकारायचं, ...अजून वाचा

5

ना कळले कधी Season 2 - Part 5

अजून कसा आला नाही हा! किती वेळ तिने परत एकदा घड्याळाकडे पाहिलं. अरे आता फक्त 9:30 च झाले 10 येतो म्हणाला. आज वेळ पण इतका हळूहळू का जात आहे. ती म्हणाली. हे बघ दीदी लवकर उठलं ना की असाच वेळ हळूहळू जातो आणि त्यात वाट पाहिली की जास्तच हळू जातो. आयुष तिला म्हणाला. ऐ सकाळी सकाळी काहीतरी वायफळ बडबड करू नको रे! सकाळी उठून त्याचा विचार तर नसेल बदलला रे? येईल ना नक्की तो? आर्या ने पुन्हा त्याला विचारलं. 'येईन ग, थोडा धीर तर धर'. आयुष तिला समजावत म्हणाला. 'इतके दिवस धरलाच ना रे आता नाही धरल्या ...अजून वाचा

6

ना कळले कधी Season 2 - Part 6

चल आर्या तू जा फ्रेश हो पटकन मी सत्यनारायनाची पुजा ठेवली आहे पटकन तयार हो.सिद्धांत ची आई म्हणाली. सिद्धांत तयार झाला? तिने आश्चर्यानेच विचारलं. तो मला नाही म्हणू शकतो का आर्या? त्या म्हणाल्या. हा ते ही आहेच. चल तू वेळ नको घालवू पटकन आवरून ये.जा तुझ्या रूम मध्ये. आर्या जायला निघाली, अरे काय मला आता रूम share करायची, मी हा आधी विचारच केला नाही काय किरकिर आहे,तो मनातच विचार करत होता. ती तिच्या bags घेऊन गेली. सिद्धांत काही वर गेला नाही तो आपला खालीच हॉल मध्ये timepass करत बसला होता. सिद्धांत अरे आवर ना तू काय इथे टाईमपास ...अजून वाचा

7

ना कळले कधी Season 2 - Part 7

"सिद्धांत"त्याच्या आई च्या आवाजाने तो विचारातून बाहेर आला. आणि तो कॅमेरा सोडून गेला. छान एकदम मनासारखं झालं माझ्या त्याची म्हणाली. सध्या सगळ्या गोष्टी तुझ्याच मनासारखं चाललंय. तो पुटपुटला. 'आर्या, थकली असशील आता आराम कर असेही सगळे गेले'. हो चालेल म्हणून ती रूम मध्ये गेली तिला तिच सामान पण सेट करायचं होतं पण सिद्धांत कडून एक wardrobe मिळवायचा होता. ती त्याचीच वाट बघत होती. किती चांगला वागला ना आज सिद्धांत वाटलं पण नव्हतं इतक्या लवकर सगळं नीट होईन त्यातल्या त्यात तो पूजे साठी पण बसला,सिद्धांत खरच बदलला? आज दिवसभरात एकदाही नाही चिडला तो.ह्या पेक्षा अजून काय पाहिजे. मंदार ची ...अजून वाचा

8

ना कळले कधी Season 2 - Part 8

तिला कितीतरी वेळ झोप लागत नव्हती. सतत डोक्यात विचार चालू होते. सिद्धांत चा तिला प्रचंड राग येत होता. असा वागू शकतो हा? वाटलं आता सगळं चांगल होईल पण नाही मी उगाचच इतकी अपेक्षा ठेवली. सिद्धांत कधीच नाही सुधारू शकत. पण मला क इतका त्रास द्यायचा जाऊ दे मी पण त्याचा विचार नाही करणार मुळात आता मला ही काही घेणदेण च नाही त्याच्याशी मी लक्ष च नाही देणार त्याच्या कडे त्याला जेव्हा आठवेन तेव्हा आठवेन. ह्याच विचारात तिला खूप उशीरा झोप लागली. इकडे सिद्धांत ची ही अवस्था काही वेगळी नव्हती. त्याच सारख सारख लक्ष आर्या कडेच जात ...अजून वाचा

9

ना कळले कधी Season 2 - Part 9

सिद्धांत ने आर्या ला दिलेली सगळी कामे तिने व्यवस्थित पूर्ण केली. त्यामुळे तो बराच खुश होता. पण आर्या मात्र थकली होती. चल आर्या निघायचं तो तिला म्हणाला. हो अरे एक 10 मिनिटे थांबतो का? ती अजूनही कामातच होती. अग करशील उद्या, चल ना! तो म्हणाला. आता नाही गेलं तर पुन्हा ह्याला राग येईन आणि मग पुन्हा चिडेल नको ऑफिस मध्ये भांडण नको घरी जाऊन तेच करायचं आहे ! तिने लगेचच सिस्टीम बंद केली आणि निघाली. गाडी मध्ये बसल्यावर तिला चांगलाच क्षीण जाणवायला लागला तिने डोळे मिटुन घेतले. आर्या काय झालं बर नाही वाटत आहे का? सिद्धांत ने विचारलं. ...अजून वाचा

10

ना कळले कधी Season 2 - Part 10

'आर्या तू उठलीच आहेस तर थोडस खाऊन घे' तो म्हणाला. नाही अजिबात नाही मला ईच्छा च नाही आहे आर्या हे बघ तुला कुणी विचारलं नाही मी सांगतोय खाऊन घ्यायचं. तो थोडासा रागवूनच म्हणाला. सिद्धांत please नको ना आता काहीच मी हवं तर थोड्या वेळाने खाईन. त्याने तिचं काहीही ऐकलं नाही तो सुप घेऊनच आला. चल इतकं संपव नंतर पुन्हा खा, आणि आर्या मला नाही ऐकायची सवय नाही,माहिती असेल ना तुला? तो हक्काने म्हणाला. तिला ही माहिती होत आता आपलं काहीही चालणार नाही एकदा हा जिद्दीला पेटला की कुणाचही ऐकत नाही. त्याने आर्याला उठवायला मदत केली तो स्वःत तिला भरवत ...अजून वाचा

11

ना कळले कधी Season 2 - Part 11

तिला जाग आली तेव्हाही तो तिच्या जवळच बसून होता तो कामात होता पण तरीही तिच्याच जवळ तिला लग्ना आधीचा आठवला तो ही असाच बसायचा तिच्या काही झालं की. माणूस मुळात बदलत नसतो त्याचा स्वभाव च आहे हा तो नाही बदलणार ह्याही परिस्थितीत तिला त्याला अस जवळ बघून छान वाटल. त्यात आज त्याने घेतलेली काळजी आणि नकळत पणे 'बायको' असा केलेला उल्लेख तिच्या ओठांवर हसू आणून गेला. सिद्धांत आज अगदी पूर्वीसारखाच वागत होता. तोच तर तिला आवडायचा. आज च त्याच वागणं पाहून तिला तो नव्याने आवडू लागला. मला कितीही हा सिद्धांत हवाहवासा वाटला तरी फार काळ ...अजून वाचा

12

ना कळले कधी Season 2 - Part 12

तो सकाळी उठला पण आज नेहमीसारखी आर्या त्याचा आजूबाजूला नव्हती. थोडा disturb झाला पण लगेच त्याने नॉर्मल केलं स्वतःला. आणि आवरून ऑफिस ला आला. त्याला खूप वाटत होतं की आर्याला कॉल करावं भेटावं पण त्याने टाळल आर्या ने पण बरीच वाट बघितली आणि शेवटी तिला कळून चुकलं की हा नाही येणार आणि आपण कुणावर जबरदस्तीही करू नये. त्याला जर माझ्याविषयी काही वाटलं तर आला असता तो मी उगाचच इतका सिद्धांत चा विचार करते त्याला माझ्या विषयी काहीही नाही वाटत. आता मी ही त्याच्या कडून काही expectations नाही ठेवणार उगाचच त्रास होतो मग आता त्याला आठवेल तेव्हा आठवेल अशी प्रेम ...अजून वाचा

13

ना कळले कधी Season 2 - Part 13

आर्या च तरीही लक्ष TV तच होत. दीदी बघ सिद्धांत जिजू आलाय आयुष म्हणला. उगाच त्याच नाव काढू नको तुला अस वाटत असेल की तू त्याच नाव काढलं की मी लगेच घाबरून tv वगैरे बंद करणार तर अस काहीही होणार नाही.मी घाबरत नाही कुणालाच आणि सिद्धांत ला तर अजिबातच नाही so don't disturb me. ती त्याच्याकडे न बघताच म्हणाली. हे बघ जिजू मला काय वाटत ना आजारपणामुळे तिच्या डोक्यावर परिणाम झालाय so तू तिला इतकं seriously नको घेऊ करत असते ती अशीच बडबड. पण मनात काही नसत रे तिच्या. तुमचं चालु द्या मी येतो. आणि तो निसटला. सिद्धांत ...अजून वाचा

14

ना कळले कधी Season 2 - Part 14

बर झाल थांबला किती मोठी काळजी मिटली माझी. ती त्याला म्हणाली. आर्या तुझ आपलं काहीतरीच असत रात्री जाऊ नको काय झालं गेलो असतो तर उगाच आपल काहीतरी.मी आईला काय सांगितलं असत का गेला सिद्धांत?आणि सकाळी उठून परत जायचंच आहे ना! अरे उद्या असही ऑफिस नाही आहे मग आता जायच काय किंवा उद्या सकाळी काय फरक पडतो. आणि इथे झोपायचं काय तिथे झोपायचं काय सारखच आहे. काही सारख नाही ती माझी रूम आहे ही तुझी आहे किती मोठा फरक आहे हा. अरे एक रात्र काढायची आहे तुला इथे फक्त मी काही settle होअस नाही म्हणत आहे. ...अजून वाचा

15

ना कळले कधी Season 2 - Part 15

बापरे किती पसारा झालाय रूम मध्ये सिद्धांत ने पाहिलं तर ओरडेलच! आर्या रूम मधला पसारा पाहून स्वःत ला बोलत काय ग आर्या एकटीच काय बडबड करतीये? इतक्यात सिद्धांत तिथे आला. झालं आता हा ओरडणार तिने मनाची संपूर्ण तयारी केली. पण त्याने काहीही react केल नाही तो आपला लॅपटॉप घेऊन काहीतरी चेक करत बसला. अरेच्चा! 'नवलच झाल चक्क सिद्धांत ने भांडण टाळल ग्रेट'! तिने थोडा हळू हळू च आवरायला सुरवात केली. अरे हा काही बोलत का नाही आहे इतका शांत कसाकाय झाला! जाऊदे ते बरच आहे म्हणा मी पण ना शांत आहे तरीही मला प्रॉब्लेम ...अजून वाचा

16

ना कळले कधी Season 2 - Part 16

किती हौशीने बनवलं होत मी जेवण, काय झाल असत थोड चांगल म्हणाला असता तर पण हा स्पष्टवक्ता खोट कस पण त्याची तरी काय चुकी आहे, त्याला नाही आवडल त्याने बोलून दाखवले.आणि ज्याचा त्याचा आवडीचा प्रश्न आहे. मला खर बोलतो सिध्दांत मला साध जेवण पण बनवता येवू नये!. त्याने काय म्हणून खायचं आणि मला का वाईट वाटतय तो बोलला तर चुकी माझीच आहे मला च नाही येत काही बिचारा माझ्या मुळे त्याच पोटही नसेल भरल. त्याने काहीही खाल्लेल नव्हतं. ती त्याच्या जवळ गेली 'सिद्धांत, i know तुझ जेवण नीट झालेल नाही तुला हव असेल तर तू ...अजून वाचा

17

ना कळले कधी Season 2 - Part 17

'किती spicy खातेय त्रास नाही होत तुला?','नाही रे सगळे तुझ्या सारखे नसतात',तिने लगेचच जीभ चावली. हल्ली फार जिभेवरचा कंट्रोल हळूच म्हणाली. सिद्धांत ला राग आला खर तर तिच्या ह्या बोलण्याचा पण त्याने दाखवला नाही. 'sorry मला अस नव्हतं म्हणायचं' ती म्हणाली. नेहमीच तुला अस नसत बोलायच आर्या तुला सांगितलं ना एकदा बोलून गेल्यावर सावरण्याचा प्रयत्न करत जाऊ नको जमत नाही तुला!तो म्हणाला. आर्याने चुपचाप ऐकून घेतल, चुकी आपलीच आहे म्हणा उगाच बोलले त्याला. ती मनातच म्हणाली. दोघांनीही आपल आटपले आणि निघाले. त्याने ice cream parlour गाडी थांबवली चल आर्या खायच ना ice cream? तो म्हणाला. विषय आहे का? ...अजून वाचा

18

ना कळले कधी Season 2 - Part 18

आर्या उठ हा लवकर, माझ आवरल्यावर मी निघून जाणार आहे ऑफिस ला मग तू बघ तुझ तो तिला म्हणाला. यार सकाळी सकाळी काय किरकिर लावली ह्याने सकाळी उठल्या पासून धमक्या च देतो मला. ती झोपेतच म्हणाली. मी अजून इथेच आहे ऐकू येतय बर मला विचार करून बोल.तो म्हणाला. ती ताडकन उठून बसली, आता डोळ्यावरची झोपच उडाली तिच्या, काय होतंय माझं अस जे नसत बोलायचं तेच नेमक ह्याच्या समोर निघून जात. अश्यानी हा मला नक्की एक दिवस घराच्या बाहेर हाकलून देणार! बर झालं हा काही react नाही करत आहे नाहीतर माझ काही खर नव्हतं पण सिद्धांत च ...अजून वाचा

19

ना कळले कधी Season 2 - Part 19

'बर आर्या 'आज जाण्याच्या आधी मला तुझ्याशी काही गोष्टी discuss करायच्या आहेत मीटिंग मधल्या आणि पुढे काय करायचं हेही '! तू तुझ काम पूर्ण करून घे मी बोलावतो तुला! ओके, हरकत नाही! आर्या म्हणाली. आज आर्यावर मी खरच खुप खुश आहे, अगदी माझ्या मनासारखं प्रेझेन्टेशन दिल तिने!काय कॉन्फिडन्स होता तिचा, कुठलाही experience नसताना तिने हे केलं हे खरच कौतुकास्पद आहे. तो मनातच तिचा विचार करत होता, त्याच तिच्या केबिन मधूनही सारख तिच्याच कडे लक्ष जात होतं. आर्या तिच्या कामात मग्न होती, तितक्यात तिला कॉल आला. सो सॉरी, अरे कामाच्या नादात मी विसरूनच गेले मी एक अर्ध्या तासात पोहचते ...अजून वाचा

20

ना कळले कधी Season 2 - Part 20

अरे कुठे गेला हा असा न सांगता! डोक्यात राग घालून गेलाय, कुठे गेला असेल? कॉल करू का? हा कसा माझा फोन फोडला ना त्याने . बिचारा माझा फोन, आताच तर घेतला होता . तिने एकवार आपल्या फुटलेल्या फोन कडे पाहिलं तो आजूनही त्याच जागेवर पडून होता. 'मी नाही उचलणार काहीही झाल तरी त्यालाच उचलू दे', कळेल तरी निदान आपण रागात किती नुकसान केलय! 'सिद्धांत ला ना चिडचिड करण्या शिवाय दुसरं काही जमत च नाही!' घरीच येणार होते ना मी दुसरा काही ऑपशन आहे का माझ्या कडे? पण नाही सांगितलं का नाही म्हणून भांडला. बर text पण करून ठेवला ...अजून वाचा

21

ना कळले कधी Season 2 - Part 21

ऐ काय रे आयुष मघाच पासून बघतोय मी, का खेचतोय रे तिची? ती बिचारी काही बोलत नाही म्हणून अस का तिच्याशी? सिद्धांत आयुष ला नाटकी रागावून म्हणाला. ऐ जिजू this is not fare हा तू माझ्या पार्टीतला आहेस ना मग तिच्या कडून काय बोलतोय ? आज ह्याला माझा इतका पुळका का येतोय strange! नाही चांगलच आहे at least सिद्धांत माझ्या बाजूने बोलला तरी. अरे मग काय! मोठी बहीण आहे ना तुझी ती ? मग अस वागतात तिच्याशी...... अरे तुला काय झालं अचानक..... आमचं चालूच राहत. हो मग काय झाल म्हणून तू तिला अस बोलणार आणि ...अजून वाचा

22

ना कळले कधी Season 2 - Part 22

'सिद्धांत काय करतोय तू हे आपण ऑफस च्या कॅन्टीन मध्ये आहोत घर आहे का हे आपलं?' ' shhhhh...... नको जेवून घे पटकन'. 'झालं माझं'. 'बाकी आहे', तो दटावूनच म्हणाला. तू इतक्या प्रेमाने भरवलं ना भरलं माझं त्यात च पोट भरल बास आता. मी काही तुझं ऐकणार अस वाटत का तुला ? ती मानेनेच नाही म्हणाली. आणि तुझ्या बोटांना लागलं आहे तुला त्रास होत होता म्हणून मी हे करतोय नाही तर मला हौस नाही आली. अरे हो पण मला जेवताच येत नव्हतं अस तर नव्हतं ना! कस वाटत इथे ! काय कस वाटतय कस वाटतय ...अजून वाचा

23

ना कळले कधी Season 2 - Part 23

आर्या आज मंदार ची पार्टी आहे आपल्याला जायचं आहे बर का, सिद्धांत ने सांगितल. अरे पण तू आधी का सांगितलं अस वेळेवर कस जाणार. सॉरी अग माझ्या डोक्यातून निघूनच गेल आता त्याचा मेसेज बघून लक्षात आलं.आणि वेळेवर काय तुला तर तयार व्हायची पण गरज नाही अशीही छान च दिसते तू ! काहीही काय! अशी येणार मी नो वे! आणि काय रे असा पटकन कस ठरवणार कुठला ड्रेस घालणार? ज्वेलरी अन ऑल कस होईल? तू एक काम कर तू जा आणि सांग की आर्या ला बर नाही म्हणून ती नाही आली. किती फालतू कारण देते ग तू आर्या मी जर ...अजून वाचा

24

ना कळले कधी Season 2 - Part 24

तिने सिद्धांत कडे पाहिलं, तिला वाटलं त्याची परवानगी घ्यावी. सिद्धांत ला कळलं ते तो म्हणाला, 'माझ्या कडे बघूच नको 'आपले decisions आपण घ्यायचे'.'आणि मला पण पटत की कुठलीच गोष्ट try केल्याशिवाय चांगली वाईट ठरवू नये'. 'मग हे तुला पण लागू होत ना तू का नाही करत try??आर्या म्हणाली'. 'of course, मलाही applicable आहे, पण तुझ्या माहिती साठी मी आधीच केलीये try and then I have decided'. आर्याचा तरीही विचार चालूच होता. 'अग किती विचार करणार आहेस आर्या?' मंदार म्हणाला. 'अग आर्या इतका विचार नको करू आणि ईच्छा नसेल तर सरळ नाही म्हण त्यात काय एवढं!'. विक्रांत म्हणाला. ...अजून वाचा

25

ना कळले कधी Season 2 - Part 25

काय झालंय आर्या? अस का डोकं धरून बसलीये? खूप दुखतंय रे माझं डोक. कशाला घ्यायची इतकी मग, आपल्याला झेपत तर. सिद्धांतआता झाल्यावर बोलून काय फायदा ? तेच मी आधी थांब पुरे कर म्हणत होतो ना तर म्हणे काही होत नाही. आता कळलं न त्रास आर्या अक्खी रात्र किती त्रास झाला माहिती आहे ना? sorry ! माझ्या मुळे तुला पण त्रास झाला. अग आर्या तू सॉरी म्हणावं म्हणून मी बोलतच नाही आहे! हो रे तुझी काळजी कळतीये मला मी पण थांबणारच होते दोन पेग नंतर पण त्यांनी आग्रह केला मग नाही कस म्हणायचं ना? काय वाटलं ...अजून वाचा

26

ना कळले कधी Season 2 - Part 26

आर्या कुठे निघाली आहेस तू....? थोड्यावेळापूर्वी कुणी तरी म्हणत होत मी नाही अडवणार an all आता काय झाल मग? मी अडवलं नाही तुला फक्त कुठे चाललीये हे विचारल. सांगायचं तर सांग नाही तर मला काही फरक नाही पडत. मी चालली माझ्या घरी तुला असही माझ्या शी बोलायचच नाही आहे ना रहा मग एकटा!बाय आणि ती निघालीही. जा आणि अजिबात वापस नको येवू मला गरज पण नाही. सिद्धांत तिला म्हणाला. काय ग, आर्या आज इकडे कशी? आणि एकटीच.तिच्या आई ने तिला विचारल. काय ग आई हे माझं घर नाही का? मला वाटलं तेव्हा नाही येवू शकत का मी. तस ...अजून वाचा

27

ना कळले कधी Season 2 - Part 27

आर्या काय आहे हे तू टिफिन नाही खाल्ला आणि मी सिद्धांत साठी ही दिला होता पण तू त्याला ही दिला. तिची आई तिला बोलत होती. 'आर्या अग मी तुला काही तरी विचारतीये'.काही तरी बोल. 'आई प्लीज ह, अस मला शाळेतल्या मुलांसारखं ट्रीट नको करु ह! टिफिन का नाही खाल्ला अन ऑल! मला नव्हती भुक thats it ! आणि उगाच विषय वाढवू नको'. ती खूप rudely बोलली. हे बघ आर्या, तुझी काळजी वाटते म्हणून बोलते तुला नाही कळणार,आणि सिद्धांत च काय ? त्याला का नाही दिला. विसरले मी! नाही राहील लक्ष्यात. नक्की तू खर बोलतीये ...अजून वाचा

28

ना कळले कधी Season 2 - Part 28

सकाळी ऑफिस मध्ये मिटींग चालू होती आणि सिद्धांत जसे जसे एकेका टीम मेंबर चे नाव घेत होता तस तस टेन्शन वाढत होत. शेवटी त्याने एक पॉज घेतला आणि म्हणाला. 'so team, ज्यांची मी आता नावे announce केली ती उद्या आपल्याला निघायचं आहे अँड हा प्रोजेक्ट आपल्या साठी खुप महत्वाचा आहे. आणि जे इथे आहेत त्यांना मी कॉल वरून instruct करत राहील.' आणि त्याने मीटिंग संपवली.त्याने एकदाही आर्या कडे पाहिलं नाही. आर्या ला तर सिद्धांत चा खूप राग येत होता आणि एकीकडून आनंद ही होत होता. कारण ह्याच प्रोजेक्ट नंतर सिद्धांत च पुन्हा प्रमोशन होत. पण आता ...अजून वाचा

29

ना कळले कधी Season 2 - Part 29

एकदाचा सिद्धांतचा प्रवास सुरु झाला, तसे ऑफिस मधले बरेच जण त्याच्या सोबत होते पण त्याला ह्या वेळी आर्या फार आठवण येत होती. आर्या एकटी राहू शकेल न?? आधीच तर ती इतकी घाबरट आहे मी सोडायला नको होतं तिला ऐकटीला किती चेहरा पडला होता तिचा. आर्या काल बरोबर म्हणत होती. आपलं प्रेम म्हणजे बांधून ठेवावं वाटत नाही सोडून जावं वाटत नाही. खरच आहे ते पण मला आर्यला सोडून जाण्याचा इतका का त्रास होत आहे? , ह्या आधीही मी कितीतरी वेळा बाहेर गेलेलो आहे मग ह्या वेळेस माझाही पाय का निघत नव्हता. मला आर्याला सोडून जावं ...अजून वाचा

30

ना कळले कधी Season 2 - Part 30

सुरवात तर अगदी सिद्धांतरुपी राक्षस, Devil अशीच होती तिथपासून प्रवास वाचण्यात त्याला जी मजा वाटत होती, आणि पुढे काय असेल या बद्दल अजूनच उत्सुकता वाढत होती. आणि विशेष म्हणजे आर्यने त्याचा राक्षस असा उल्लेख केलेला वाचूनही त्याला राग नव्हता आला उलट हासायलायच येत होतं. 'बिचारीला तेव्हा मला तोंडावत म्हणावं वाटलं असेल पण तेव्हा मी ठरलो तिचा बॉस काय बोलणार म्हणून तिने लिहिलं असेल'.त्याच्या बद्दल च्या निगेटीव्ह कंमेंट्स वाचून त्याला असच वाटलं.चला एकंदर खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे आमची. किती भाग्य म्हणावं की दुर्दैव की आमची स्टोरी मला आठवत नाही म्हणून मला वाचावी लागतीये.पण काहीही म्हणा आर्याने ...अजून वाचा

31

ना कळले कधी Season 2 - Part 31

आर्या तुला सांगितलेले changes केले?, पलिकडून काहीही उत्तर नाही आले. 'आर्या i am talking with you dammit लक्ष आहे तुझं'. sir this is Anvi not Aarya! आणि हे तिसऱ्यांदा होतंय. अन्वी ही त्याची बंगलोर च्या ऑफिस मधली assistant होती. Shut !!! काय होतंय अस, extremely sorry Anvi! its ok sir! काय चालू आहे माझ्या सोबत सतत आर्याचंच नाव येत तोंडात. मला तर कुठेही तिच दिसतीये. कंट्रोल सिद्धांत इथे आर्या नाही आहे ह्या नंतर तीच नाव अस मीटिंग मध्ये नाही आलं पाहिजे. तो स्वतःलाच समजवून सांगत होता. आज सिद्धांत ने एकही कॉल ...अजून वाचा

32

ना कळले कधी Season 2 - Part 32

काय ग, एवढी का अपसेट आहेस? आयुष च्या आवाजाने आर्या भानावर आली. काही नाही रे असच! सिद्धांत ला करतीये? ती मानेनेच हो म्हणाली. येईल ना, इतकं काय आणि असला तरी तुझं कोणतं पटत त्याच्यासोबत! shut up आयुष , ह्या वेळेस माझी कुठलीही भंकस ऐकण्याची इच्छा नाही आहे. अरे यार काय खोट बोलतोय का मी, तुझं म्हणजे कस आहे न तुझं माझं जमेना न तुझ्या वाचून करमेना! त्याला येत असेल का रे माझी आठवण? हे अजिबात नाही, तो तर मस्त मजा मारत असणार तो तर म्हणत असेल बर झालं मला दहा दिवस आर्या पासून सुटकारा मिळाला! आयुष निदान मला ...अजून वाचा

33

ना कळले कधी Season 2 Part 33

इतक्या रात्री कोण आलय...? मी पण काय बावळट आहे इतक्या रात्री चोरांशिवाय दुसरं कोण येणार..... बापरे आता काय सिद्धांत पण घरी नाही. कुणाला बोलावू ? गेट च्या आवाजाने आर्या चांगलीच घाबरली होती. काय करू यार???? तिला दरवाजा उघडण्याचा आवाज आला, चावी तर माझ्या आणि सिद्धांत शिवाय इतर कुणाकडे नाही आहे सिद्धांत तर आज रात्री येणं मुळीच शक्य नाही. मग.... चोर ....पण त्याच्या कडे चावी कुठून आली??? पण दाद द्यायला हवी किती कॉन्फिडन्स आहे डायरेक्ट चावीने दार उघडून चोरी..! पण हा विचार करण्याचा ही वेळ नाही आहे. आता काय करु?? मी लपून राहिलेलं च बर ! ...अजून वाचा

34

ना कळले कधी Season 2 - Part 34

सिद्धांत काय शोधतो आहे ? किती वेळ च बघतीये मी! काही हरवलं का तुझं? आर्या ने त्याला विचारल. सिद्धांत सकाळी उठल्या पासून ती डायरी आणि बुक्स शोधत होता. पण ते काही त्याला मिळत नव्हते. नाही ग आर्या काही नाही! काही नाही कस किती अस्वस्थ वाटतोय तू! सांग काय झालं ते. आर्या प्लीज यार! सांगितलं न एकदा काही नाही म्ह्णून का मागे लागलीये तो चिडून म्हणाला. आर्याचा चेहरा पाहून त्याला कळलं की आपण विनाकारणच चिडलो.सॉरी, म्हणजे मला अस नव्हतं म्हणायच पण तू ह्या मध्ये नको पडू. ठीक आहे, आणि ती तिथून निघाली. मला काही कळत नाही का तू ...अजून वाचा

35

ना कळले कधी Season 2 - Part 35

आर्या अजूनही जागीच कशी काय? मला वाटलं झोपली असेल. आणि इतक्या रात्री ही कुणाशी बोलतीये ! जाऊ दे कुणाशी बोलो ना माझं काय जात असाही तिच्या मित्र मैत्रिणींचा रात्रीच दिवस चालू होतो रात्री जगायचं आणि मग सकाळी उशिरा उठायचं.खर तर त्याला आर्या ला बोलावं वाटलं पण थोड्यावेळापूर्वी झालेलं भांडण त्याला आठवलं आणि त्यानं बोलायच टाळलं. आणि तो झोपला. कसा आहे सिद्धांत मला सगळ्यांनी 12 ला च विष केलं पण ह्याला साधं लक्षात नाही की आज माझा वाढदिवस आहे मी पण नाही सांगणार! अस जबरदस्तीने कस म्हणायच की विष कर म्हणून.नकोच जाऊ दे पण आज मी सिद्धांत शी ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय