अतुल्य भारत!! भारत अनेक रंग असलेला देश. वेगवेगळे प्रदेश, गड, किल्ले, महाल, निसर्ग, बर्फ, समुद्र, बॅकवॉटर, वाळवंट असे अनेक पर्याय भारतात आहेत. काही माहिती असलेल्या जागा तर काही अगदीच अपरिचित जागा.. कश्मीर ते कन्याकुमारी आणि राजस्थान अरुणाचल प्रदेश. प्रत्येक जागेची आपली विशेष ओळख असते. प्रत्येक जागेशी एक कथा असते. काही गोष्टी माहितीच्या आणि काही अगदीच नवीन.. भारतात काय काय पाहता येईल त्या बद्दल थोडक्यात माहिती ह्या लेख मालिकेत वाचायला मिळेल.

1

१.. गोवा- नयनरम्य समुद्र किनारा, अविस्मरणीय सूर्यास्त आणि बरंच काही..

गोव्याचे क्षेत्रफळ ३,७०२ चौ.किमी एवढे असून लोकसंख्या १४,५७,७२३ एवढी आहे. कोकणी व मराठी ह्या येथील प्रमुख भाषा आहेत. तसेच व मासेमारी हे गोव्यातील प्रमुख उद्योग आहेत. येथे प्रामुख्याने तांदूळ व कडधान्याचे पिक घेतले जाते. गोव्याची साक्षरता जास्त म्हणजे ८७.०४ टक्के एवढी आहे. गोव्यात मॅगनीज, लोह व बॅाक्साईट ही खनिजे आढळतात. पणजी हे शहर गोव्याची राजधानी असून राज्यातील सर्वात मोठे शहर असलेले वास्को व पोर्तुगीजांचा ऐतिहासिक प्रभाव असलेले मडगांव ही इतर महत्त्वाची शहरे आहेत. इसवी सनाच्या पंधराव्या शतकात पोर्तुगीजांनी व्यापाराच्या निमित्ताने गोव्यात पाऊल ठेवले व लवकरच हा प्रदेश काबीज केला. १९६१मध्ये भारताने गोवा मुक्त करेपर्यंत सुमारे ४५० वर्षांच्या दीर्घ कालावधीकरता गोव्यावर पोर्तुगीजांचा अंमल राहिला. ...अजून वाचा

2

२. महाबळेश्वर- द लॅंड ऑफ स्ट्रॉबेरीज..

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर हे एक नगरपालिका असणारे तालुक्याचे शहर आहे. सह्याद्री पर्वताच्या पश्चिम घाटातील उंच डोंगरावर हे वसलेले शहर भारतातील जी हिरवळीने सजलेली कांही मोजकीच ठिकाणे आहेत त्यातीलच हे एक. ब्रिटिश राजवटीतील मुंबई प्रांताची उन्हाळ्यातील राजधानी होती. येथील महाबळेश्वराचे देऊळ हे यादव राजा सिंघनदेव याने तेराव्या शतकात बांधले. अफझलखानच्या तंबूचे सोन्याचे कळस शिवाजी महाराजांनी या महाबळेश्वर मंदिरास अर्पण केले होते. सह्याद्रीच्या पठारावर वसलेल्या या ठिकाणी चांगली घनदाट वनश्री आहे. महाबळेश्वर येथील महाबळेश्वर मंदिर, लागून असलेले जावळीचे खोरे आणि प्रतापगड या सर्व स्थळांना शिवरायांच्या नावाचा व कर्तृत्वाचा ऐतिहासिक संदर्भ आहे. महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरी अतिशय प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर, रासबेरी, जांभळाचा मध व लाल मुळे, गाजरे हे सुद्धा खास प्रसिद्ध आहेत. महाबळेश्वरचा मध तर खूपच चविष्ट आणि प्रसिद्ध आहे. गुलकंदही येथे मोठ्या प्रमाणावर मिळतो. ...अजून वाचा

3

३. केरळ- गॉड्स ओन कंट्री.

केरळ हे भारतातले देशाच्या दक्षिण टोकाला असलेले राज्य आहे. कर्नाटक व तमिळनाडू या राज्यांच्या सीमा केरळला लागून आहेत. केरळच्या अरबी समुद्र व दक्षिणेला हिंदी महासागर आहे. भारताचे सर्वाधिक हिरवाईने नटलेले राज्य म्हणून केरळचा उल्लेख होतो. केरळ राज्याची स्थापना १ नोव्हेंबर १९५६ रोजी झाली. तिरुअनंतपुरम ही केरळ राज्याची राजधानी असून राज्यातील कोची व कोळिकोड ही महत्त्वाची शहरे आहेत. मल्याळम ही राज्याची प्रमुख भाषा आहे. पर्यटनाच्या बाबतीत केरळ हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य असून सृष्टिसौंदर्य पहायला व आयुर्वेदिक उपचारांसाठी देशातून तसेच जगभरातून हजारो प्रवासी केरळमध्ये येतात. राज्यातील साक्षरतेचे प्रमाण १०० टक्यांच्या जवळपास आहे. त्यामुळे केरळ भारतातील सर्वाधिक शिक्षित लोकांचे राज्य आहे. केरळातील अंदाजित 50 टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. ...अजून वाचा

4

४. ताडोबा- लॅंड ऑफ टायगर्स..

४. ताडोबा- लॅंड ऑफ टायगर्स.. वाघ बघण्याची इच्छा आपल्यापैकी बऱ्याच जणांना असते. देशात २६ व्याघ्र प्रकल्प आहेत. महाराष्ट्रात तीन व्याघ्र प्रकल्प आहेत आणि ते विदर्भातच आहेत. यामध्ये मेळघाट, चंद्रपूरचा ताडोबा आणि नागपूरचा पेंच प्रकल्पाचा समावेश आहे. ह्यातले ताडोबा हे महाराष्ट्रातील वाघांसाठी प्रसिद्ध असे अभयारण्य आहे. ताडोबाला वाघांचे रण म्हणले जाते. तस पाहता, वाघाला बघायची उत्सुकता सगळ्यांनाच असते आणि ते पार्क मध्ये पाहण्यापेक्षा खऱ्या खुऱ्या जंगलात पहायची मजा काही वेगळीच असते. ताडोबा व्याघ्र अभयारण्य हे महाराष्ट्रातील सर्वात जुने व सर्वात मोठे अभयारण्य. भारतातील अभयारण्यांमध्ये त्याचा ४१वा क्रमांक लागतो. ताडोबा नॅशनल पार्क ( ११६.५५ चौ. कि.मी. ) आणि अंधारी वन्यजीव अभयारण्य ...अजून वाचा

5

५. तारकर्ली - मस्त समुद्र किनारा, लख्ख सूर्यप्रकाश आणि वॉटर स्पोर्ट्स..

५. तारकर्ली - मस्त समुद्र किनारा, लख्ख सूर्यप्रकाश आणि वॉटर स्पोर्ट्स.. विस्तीर्ण पसरलेला समुद्रकिनारा, पायांना कोमल स्पर्श करणारी मऊ कोवळे उन. स्वर्ग यापेक्षा काही वेगळा असेल? तारकर्ली किनारा असाच अनुभव देतो. तारकर्ली किनार्‍यावर गेल्यानंतर या स्वर्गाचा अनुभव येते. अतिशय सुंदर असा समुद्रकिनारा, बांबूची, सुपारीची झाडे पाहून मन प्रसन्न होते. इथले समुद्र किनारे इतके स्वच्छ आणि नितळ आहेत की पाण्यातील सौंदर्य डोळ्यांनी पाहता येते. समुद्र किनारे नेहमीच माणसाला खुणावत असतात. भारतात तसे बरेच प्रसिद्ध समुद्र किनारे आहेत आणि महाराष्ट्रा मधील अत्यंत प्रसिद्ध किनारा हा तारकर्लीचा आहे. तारकर्ली महाराष्ट्राचे मॉरीशास म्हणून ओळखले जाते. मालवणपासून अवघ्या ७ कि.मी. अंतरावर अतिशय स्वच्छ व सुंदर ...अजून वाचा

6

६. भारतातल्या रोड ट्रीप्स- भाग १

अश्या रोड ट्रीपचा थ्रील अनुभवण्याचा कल वाढलेला दिसतो आहे. गाडीत सामान भरून नाहीतर बाईकवर एक रस्ता धरायचा आणि सरळ जिथे वाट नेईल तिथे...भारत निसर्ग संपन्न देश आहे. विविधतेनी नटलेला देश आहे जे बाहेर पडल्याशिवाय अनुभवता येत नाही.. भारतातही असे काही कमी रस्ते नाहीत जे खास आहेत आणि तुमची ट्रीप सुंदर करतात! त्यातल्याच काही सुंदर, देखण्या आणि नवीन अनुभव देणाऱ्या रोड ट्रिप्स! आयुष्यात एकदातरी अनुभवाव्या अश्या रोड ट्रिप्स, ज्या आयुष्यात खूप काही नवीन दाखवून जातील. अश्या रोड ट्रिप्स मन प्रसन्न तर करतीलच पण खूप नवीन अनुभव देऊन जातील. निसर्गाच्या अधिक जवळ जाता तर येईलच पण त्या ठिकाणच्या लोकांशी सुद्धा तुमचा संवाद होऊ शकेल. फक्त रस्ते नवीन असतील त्यामुळे काळजी घेतली, थोडी माहिती आधी पाहून घेतली तर तुमचा प्रवास आनंददायी आणि सुखकर नक्कीच होईल. आणि अडचणी येणार नाहीत. ...अजून वाचा

7

७. भारतातल्या रोड ट्रीप्स- भाग २

७. भारतातल्या रोड ट्रीप्स- भाग २ ११. मुंबई ते तारकर्ली महाराष्ट्रातला स्वच्छ नितळ किनारा म्हणजे तारकर्लीचा. हा फारसा गजबजलेला नाही. त्यामुळे इथे रोड ट्रीप ठरवत असाल तर समुद्राचे सुंदर दर्शन घेण्यासाठी सज्ज व्हा. आणि तारकर्लीच्या निळ्याशार समुद्रात स्कुबा डाइविंग अनुभव नक्की घ्या. आणि समुद्राखालाच्या जगात हरवून जा. अंतर : मुंबई ते तारकर्ली हे अंतर 535 किलो मीटर आहे. आणि न थांबता प्रवास केला तर अंदाजे 9 तास लागू शकतात. टीप : मुंबईपासून एनएच 17 ने कासल गाठायच. तेथून तारकर्ली. या मार्गावरील नैसर्गिक सौंदर्य पाहूनच लाँग ड्राइवमुळे येणारा थकवा दूर पळेल. १२. . चेन्नई ते येलागिरी- हा प्रवास ...अजून वाचा

8

८. १२ ज्योतिर्लिंग- भाग १

८. १२ ज्योतिर्लिंग- भाग १ भारतातील १२ ज्योतिर्लिंगे अतिशय प्रसिद्ध आहेत. ह्या वेगवेगळ्या स्थळांना भेट देऊन मनोकामना पूर्ण केली सुंदर ठिकाणी वसलेली आणि ऐतिहासिक ओळख असलेली ही १२ ज्योतिर्लिंगे आहेत. धर्म शास्त्रानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाची विधीव्रत पूजा केल्यास मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. आपल्या पैकी बरेच शिव भक्त असतात आणि ज्योतिर्लिंगाला भेट देण्याची इच्छा असते. भारतात शंकराची एकूण १२ महत्त्वाची मंदिरे आहेत. त्यांना १२ (द्वादश) ज्योतिर्लिंगे म्हणतात. धर्मशास्त्राने या ज्योतिर्लिंगांच्या यात्रेचा क्रम सांगितला आहे, तो असा- सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम्। उज्जयिन्यां महाकालमोङ्कारममलेश्वरम् ॥१॥ परल्यां वैद्यनाथं च डाकिन्यां भीमशंकरम्। सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने ॥२॥ वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमीतटे। हिमालये तु केदारं ...अजून वाचा

9

९. १२ ज्योतिर्लिंग- भाग २

९. १२ ज्योतिर्लिंग- भाग २ ७. श्री रामेश्वर- रामेश्वर दक्षिण भारतात प्रसिद्ध आहे. रामचंद्राने याची स्थापना केल्यामुळे याला रामेश्वर नाव पडले. स्कन्द्पुरण व शिवपुराणात या पवित्र क्षेत्राचा उल्लेख सुद्धा आलेला आहे. रामेश्वर द्वीपाचा आकार काहीसा श्रीविष्णूच्या शंखासारखा असून श्रीलंकेच्या राजाने याठिकाणी मंदिर बांधले होते. रामेश्वर मंदिराची निर्मिती १२ ते १६व्या शतकात झाली. हे मंदिर अतिशय सुंदर आहे. इथली कलाकुसर पाहून मन प्रसन्न होते. बंगालचा उपसागर व हिंदी महासागर यांचे संगम स्थान असून द्रविड स्थापत्य शैलीचे हे मंदिर मानले जात असून येथील मंडपाची निर्मिती इ स १७४० ते १७७० या कालावधीत झाली. या मंदिर परिसरात २२ विहिरी असून गर्भगृहात चांदीच्या चौथऱ्यावर ...अजून वाचा

10

१०. लेह-लडाख - अविस्मरणीय अनुभव भाग १

सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ, मोनास्ट्रीज, गिर्यारोहकांचे नंदनवन, निसर्गाचे विविधांगी दर्शन अशी रेलचेल असणाऱ्या लेह-लडाखची भटकंती एकदा तरी अनुभवावी अशी पर्यटनाची आवड असणाऱ्यांची इच्छा असतेच. खरंच आहे ते.. निसर्गाचे चमत्कार लेह-लडाख मध्ये पाहायला मिळतात. इथला निसर्गाला उपमा द्यायच्या म्हणजे कदाचित शब्द अपुरे पडतील. नेहमीच्या प्रवासापेक्षा खूप वेगळा असा हा प्रवास आहे. या प्रवासामध्ये हिमालयाच्या डोंगरांमध्ये अरुंद रस्त्यांवर केलेला हा प्रवास म्हणजे वेगळाच थरार आहे. आणि तुफान थंडी आणि विरळ होणारा ऑक्सिजन यामुळे काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. येते प्रत्येक मिनिटाला काहीतरी वेगळ येथे अनुभवायला मिळते. या रस्त्यांच्या सभोवताली असलेलं निसर्गसौंदर्य म्हणजे देवाची अफलातून कारागिरी आहे असच वाटत राहत. मनमोहक, पण तेवढेच खतरनाक रस्ते इथे आहेत. ...अजून वाचा

11

११. लेह- लडाख- अविस्मरणीय अनुभव भाग २

११. लेह- लडाख- अविस्मरणीय अनुभव भाग २ ३. शांती स्तूप- शांती स्तूप हा उत्तर भारतातील जम्मू आणि काश्मीरमधील लेह टेकडीवर एका बौद्ध पांढऱ्या गुंफाचे स्तूप आहे. हे इ.स. १९९१ मध्ये जपानी बौद्ध भिक्खु, ग्योमोयो नाकामुरा आणि पीस पॅगोडा मिशनचा एक भाग म्हणून बांधण्यात आले. शांती स्तूप चौदावे दलाई लामा यांनी नमूद केलेल्या बुद्धांच्या अवशेषांवर आधारित आहे. प्राचीन, शाही सौंदर्याचा हा एक आविष्कार आहे. या स्तूपामध्ये बुद्धाचे पुतळे आणि जुनी, दुर्मीळ हस्तलिखिते आहेत. हे स्तूप केवळ त्याच्या धार्मिक महत्त्वामुळेच नव्हे तर सभोवतालच्या परिसराचे पॅनोरमिक दृश्ये प्रदान करण्याच्या ठिकाणामुळे देखील पर्यटकांचे आकर्षण बनले आहे. त्यामुळे इथे पर्यटन वाढीस लागले आहे. शांती स्तूपामध्ये सध्याच्या दलाई लामाचे छायाचित्र आहे. स्तूप दोन-स्तरीय रचना म्हणून तयार केले आहे. पहिल्या स्तरामध्ये प्रत्येक ...अजून वाचा

12

12. लेह-लडाख मध्ये कधी जाल?

12. लेह-लडाख मध्ये कधी जाल? तुम्ही लेह- लडाख ची ट्रीप ठरवत असाल पण नक्की कधी जायचं हे कळत नाही होऊ शकत. त्यासाठी महत्वाच म्हणजे तुम्ही तुमची आवड आणि क्षमता तपासून पहा. कधी इच्छा असून हवामान सूट न झाल्यामुळे ट्रीप मध्ये अडचणी येऊ शकतात. लेह-लडाख हा अतिशय थंड प्रदेश आहे त्यामुळे ट्रीप ठरवतांना आपल्याला कोणता ऋतू मानवेल हे पाहण अत्यंत गरजेच असत. आपल्याला किती थंडी सोसेल, आणि बाकीच्या गोष्टी जश्या, काही ठिकाणी ऑक्सिजन कमी असेल तिथे त्रास होणार नाही ना हे पहायची नितांत गरज असते नाहीतर ट्रिपचा विचका होऊ शकतो. तुम्हाला शक्य असेल तर प्रत्येक ऋतू मध्ये तुम्ही लेह-लडाख ला ...अजून वाचा

13

१३. अष्टविनायक - भाग १

१३. अष्टविनायक - भाग १ अष्टविनायक ही महाराष्ट्रातील आठ मानाची व प्रतिष्ठेची गणपतीची देवळे आहेत. पश्चिम महाराष्ट्र व कोकणात ह्या देवळांना स्वतंत्र इतिहास आहे. या सर्व देवळांना पेशव्यांचा आश्रय असल्यामुळे त्यांना पेशवाईच्या काळात महत्व प्राप्त झाले. मुद्गल पुराणातही अष्टविनायकांचे वर्णन आढळते. अष्टविनायकांच दर्शन घेण्याची इच्छा बऱ्याच भक्तांची असते. श्री गणपतीची महाराष्ट्रातील प्रत्येक गावात एक-दोन मंदिरे हमखास पाहण्यास मिळतात. त्या मंदिरांतून गणेशाची हजारो रूपे भाविक अनुभवतात. असे असले तरी, महाराष्ट्रातील या विशिष्ट ‘आठ’ ठिकाणच्या गणेश मंदिरांना, मूर्तींना खास महत्त्व आहे. या आठ मंदिरांस मिळून ‘अष्टविनायक’ म्हटले जाते. गणपतीच्या अनेक नावांपैकी एक नाव म्हणजे विनायक म्हणूनच या मंदिरांचा संच म्हणजे अष्टविनायक. महाराष्ट्रात असलेली अष्टविनायकांची मंदिरे (स्थळे) महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत. ...अजून वाचा

14

१४. अष्टविनायक - भाग २

१४. अष्टविनायक - भाग २ ५. श्री विघ्नेश्वर- श्री विघ्नेश्वरला ओझरचा गणपती देखील म्हणतात. येथील श्रींची मूर्ती लांब असून अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून श्री विघ्नेश्र्वराला ओळखले जाते. श्रींच्या डोळ्यात माणिक असून, कपाळावर हिरा आहे. अशी प्रसन्न व मंगल मूर्ती असलेला श्रीगणेश विघ्नांचे हरण करतो, म्हणून या गणपतीला विघ्नेश्र्वर म्हणतात. ही गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे. मंदिराच्या चारही बाजूंना तटबंदी-बांधकाम असून, मध्यभागी गणेशाचे मंदिर आहे. कुकडी नदीच्या तीरावर असलेले हे मंदिर एक जागृत स्थान आहे. थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो. चिमाजी आप्पा यांनी हे देऊळ बांधून त्यावर सोनेरी कळस चढविला. राजा अभिनंदनने त्रिलोकाधीश होण्यासाठी यज्ञ ...अजून वाचा

15

हिमाचल प्रदेश- न विसरता येण्यासारखी जागा - भाग १

हिमाचल प्रदेश- न विसरता येण्यासारखी जागा - भाग १ हिमाचल प्रदेश हे उत्तर भारतातील एक पहाडी राज्य आहे. हिमाचल चा शाब्दिक अर्थ बर्फाचे पहाड असलेला प्रांत असा आहे. बर्फ नेहमीच पर्यटकांना आकर्षित करत असतो त्यामुळे पर्यटकांच आवडत ठिकाण म्हणून हिमाचल प्रदेश प्रसिद्ध आहे. हिमाचलच्या उत्तरेला जम्मू आणि काश्मीर, पश्चिमेला पंजाब, आग्नेयेला उत्तराखंड व दक्षिणेला हरियाणा ही राज्ये आहेत. हिमाचल प्रदेशाचे क्षेत्रफळ ५५,६७३ चौ.किमी आहे. लोकसंख्या ६८,५६,५०९ एवढी आहे. हिंदी व पहाडी ह्या येथील प्रमुख भाषा बोली आहेत. शिमला ही हिमाचलची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हिमाचल प्रदेशाची साक्षरता ८३.७८ टक्के आहे. गहू, बटाटे, तांदूळ, आले ही येथील प्रमुख पिके आहेत. हे राज्य हिमालयाच्या कुशीत वसले असल्यामुळे येथे अनेक निसर्गरम्य ठिकाणे आहेत. पर्यटन हा येथील प्रमुख व्यवसाय आहे. कुलू, मनाली, सिमला, धरमशाला यांसारखी प्रसिद्ध पर्यटन स्थळे या राज्यात असल्यामुळे पर्यटनाच्या बाबतीत हे राज्य आघाडीवर आहे. इथे लाखोंच्या संखेने ...अजून वाचा

16

हिमाचल प्रदेश- न विसरता येण्यासारखी जागा- भाग २

हिमाचल प्रदेश- न विसरता येण्यासारखी जागा- भाग २ प्रेक्षणीय स्थळे : राज्याच्या अर्थव्यवस्थेत पर्यटन व्यवसायाला अत्यंत महत्त्वाचे स्थान असून व्यवसायाचा येथे बऱ्यापैकी विकास झालेला आहे. त्या दृष्टीने शासनाने विविध पायाभूत सुविधा, सार्वजनिक उपयोगांच्या सेवा, वेगवेगळ्या वाहतूक सुविधा, रस्ते, विमानतळ, संदेशवहन, पाणीपुरवठा, पुरेसा वीजपुरवठा, नागरी सुखसोयी, मनोरंजनाची साधने इ. सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. अजूनही या व्यवसायाच्या विकासास फार मोठा वाव आहे. बारमाही पर्यटन चालू राहण्याच्या दृष्टीने राज्यशासन प्रयत्नशील आहे. पर्यटन व्यवसायाच्या शाश्वत विकासाच्या दृष्टीने पर्यावरणाला हानी न पोहोचता पर्यटनाशी निगडित पायाभूत सुविधा उभारण्यास खाजगी क्षेत्राला परवानगी देण्याविषयी राज्यशासन सकारात्मक विचार करीत आहे. हिमाच्छादित हिमालयीन शिखरे, उष्ण पाण्याचे झरे, नैसर्गिक व मानवनिर्मित सरोवरे, ऐतिहासिक किल्ले, धार्मिक व मानवशास्त्रीय दृष्ट्या महत्त्वाची स्थळे इ. पर्यटकांची प्रमुख ...अजून वाचा

17

१७. हिमाचल प्रदेश- न विसरता येण्यासारखी जागा- भाग ३

१७. हिमाचल प्रदेश- न विसरता येण्यासारखी जागा- भाग ३ २. मनाली- मनाली हिमाचल प्रदेशाच्या कुलू जिल्ह्यातील निसर्गसुंदर मनाली पर्यटकांच आवडत हील स्टेशन आहे. लोकसंख्या 2,254 (1981). हे सिमल्याच्या उत्तरेस सुमारे 250 कि.मी. समुद्रसपाटीपासून 1,798 मी. उंचीवर वसलेले आहे. हिमाचल हे राज्यच मुळी निसर्गाने अतिशय समृद्ध राज्य आहे. कोंदणात हिरा बसवावा तसे मनाली हे नितांतसुंदर पर्यटनस्थळ. हिमाचलमधील ही सर्वात सुपीक व्हॅली समजली जाते. अतिशय सुंदर असा हा प्रदेश आहे. पर्यटकांना नेहमीच भुरळ घालणारा.. त्याचबरोबर, ‘ट्रेकर्स पॅराडाईझ’ म्हणून ओळखल्या जाणा-या मनालीहून १२ कि.मी. वरील कोठी हे निसर्गरम्य गाव म्हणजे रोहतांग पासमधील ब-याचशा ट्रेक्सचं सुरुवातीचं ठिकाण. ट्रेकिंग ची आवड असणाऱ्यांच अतिशय आवडत ...अजून वाचा

18

१८. हिमाचल प्रदेश- न विसरता येण्यासारखी जागा- शेवटचा भाग ४

१८. हिमाचल प्रदेश- न विसरता येण्यासारखी जागा- शेवटचा भाग ४ ४. डलहौसी- डलहौसी हे हिमाचल प्रदेश मधील सगळ्यात प्राचीन स्टेशन आहे. हे शहर १९५४ मध्ये इंग्रजांनी स्थापन केले होते. ब्रिटिश गव्हर्नर डलहौसी याने हे ठिकाण शोधून काढले. म्हणून ते आजही त्याच्या नावाने प्रसिद्ध आहे. डलहौसी ब्रिटिश स्थापत्यकलेचे नमुने आजही आपणास येथे बघायला मिळतात. तुरळक काही सुरेख चर्चेस, बंगले आपल्याला जुन्या स्वातंत्रपूर्व काळात घेऊन जातात. देवभूमी हिमाचल प्रदेशाचा प्रवास हा नेहमीच भव्यत्व व दिव्यत्वाचा साक्षात्कार घडविणारा ठरतो. त्यात डलहौसी प्रमुख आकर्षण मानले जाते. अतिशय मनोरम्य अशी ही जागा आहे. आणि इथे आल्यावर तुम्ही नक्कीच इथल्या निसर्गाच्या प्रेमात पडाल. आकाशाशी स्पर्धा ...अजून वाचा

19

१९. राजस्थान- लॅंड ऑफ किंग्स.. १

१९. राजस्थान- लॅंड ऑफ किंग्स.. १ राजस्थान ही भारतातील अतिशय प्रसिद्ध जागा आहे. लॅंड ऑफ किंग्स म्हणून राजस्थान ओळ्खल इथला इतिहास, किल्ले, इथले राजे, राजवाडे, उंट सगळच जगभर प्रसिद्ध आहे. राजस्थान इथल्या विविश रंगांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. त्यामुळेच लाखो पर्यटक इथे भेट देतात. राजस्थान (जुने नाव राजपुताना) हे उत्तरी भारतातील एक राज्य आहे. हे राज्य आपल्या प्राचीन इतिहासाची व ऐतिहासिक किल्यांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. जयपूर ही या राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. राजस्थानचे क्षेत्रफळ ३,४२,२३९ चौ.किमी एवढे आहे. क्षेत्रफळानुसार राजस्थानचा भारतात प्रथम क्रमांक लागतो. येथील लोकसंख्या ६,८६,२१,०१२ एवढी आहे व लोकसंख्येनुसार राजस्थानचा भारतात तिसरा क्रमांक लागतो. हिंदी व राजस्थानी या येथील प्रमुख बोलल्या जाणार्‍या भाषा आहेत.राजस्थानची साक्षरता ६७.०६ टक्के एवढी आहे. इथे उष्ण वाळवंट व कमी पाऊस यामुळे येथे शेतीचे प्रमाण कमी आहे. ज्वारी, मका, हरबरा व गहू ही येथील प्रमुख धान्य पिके, ...अजून वाचा

20

२०. राजस्थान- लॅंड ऑफ किंग्ज .. २

२०. राजस्थान- लॅंड ऑफ किंग्ज .. २ राजस्थानातील प्रेक्षणीय स्थळांची माहिती- १. जयपूर-पिंक सिटी राजस्थानची राजधानी असलेले शहर म्हणजे गुलाबी रंगांच्या विविध छटा घेऊन नटलेले शहर आहे. म्हणूनच जयपूर ला पिंक सिटी म्हणून ओळखले जाते. जयपूर मध्ये पाय ठेवताच कोणत्यातरी भव्य पुस्तकातून सगळ्या गोष्टी बाहेर पडल्या आहेत अस वाटल्या शिवाय राहणार नाही. जयपूरला 'गुलाबी शहर' म्हणुनही ओळखले जाते. जयपूर पूर्वीच्या संस्थानाचेही राजधानीचे ठिकाण होते. या शहराची स्थापना इ.स. १७२८ मध्ये दुसऱ्या महाराजा जयसिंह यांनी केली. जयपूर शहर येथील महाल आणि जुन्या घरांसाठी वापरलेल्या गुलाबी दगडांसाठी प्रसिद्ध आहे. जयपूरची आधुनिक शहरी योजना केलेल्या व्यवस्थित शहरांमध्ये गणणा होते. अप्रतिम राजमहाल, पर्वतमाथ्यांवर असलेले मजबूत किल्ले, शहराच्या भोवती असलेला ...अजून वाचा

21

२१. राजस्थान- लॅंड ऑफ किंग्स.. ३

२१. राजस्थान- लॅंड ऑफ किंग्स.. ३ राजस्थान प्रेक्षणीय स्थळे- २. उदयपुर- द सिटी ऑफ लेक्स.. उदयपुर 'सिटी लेक्स' म्हणून ओळखले जाते. उदयपूरची स्थापना महाराणा दुसरे उदय सिंह ह्यांनी १५५९ साली केली व मेवाडची राजधानी चित्तोडगढहून उदयपूरला हलवली. १८१८ पर्यंत मेवाडची राजधानी राहिलेले उदयपूर ब्रिटीश राजवटीमध्ये राजपुताना एजन्सीचा भाग होते. उदयपूर जयपूरच्या ४०३ किमी नैऋत्येस तर अहमदाबादच्या २५० किमी ईशान्येस स्थित आहे. सरोवरांचे शहर ह्या टोपणनावाने प्रसिद्ध असलेले उदयपूर राजस्थानच्या मेवाड प्रांताच्या राजधानीचे शहर होते. ह्या शहराच्या चहुबाजूने अरावली पर्वतरांग आहे. त्यामुळे हे शहर अधिकच देखणे झाले आहे. ह्या 'व्हेनिस ऑफ द इस्ट' मध्ये विपुल निसर्गसंपत्ती आहे. त्याचबरोबर इथली देवळे प्रसिद्ध आहेत. इथल आर्किटेक्चर अर्थात वास्तुकला अप्रतिम आहे जी एकदा तरी ...अजून वाचा

22

२२. राजस्थान- लॅंड ऑफ किंग्स.. ४

२२. राजस्थान- लॅंड ऑफ किंग्स.. ४ राजस्थान प्रेक्षणीय स्थळे- ३. जैसलमेर- द गोल्डन सिटी पाकिस्तान च्या जवळ स्थित जैसलमेर ही जागा पर्यटकांची आवडती जागा आहे. जैसलमेर अगदी थर वाळवंटाच्या मध्यभागी नसले तरी बऱ्यापैकी वाळवंटी प्रेदेशांत आहे. पर्यटकांना ...अजून वाचा

23

२३. राजस्थान- लॅंड ऑफ किंग्स.. ५

२३. राजस्थान- लॅंड ऑफ किंग्स.. ५ राजस्थानातील प्रेक्षणीय स्थळे- ४. माउंट अबू- अप्रतिम हिल स्टेशन माउंट अबू राजस्थान मधले एकमेव हिल स्टेशन आहे. हिरवाईने नटलेले हे हिल स्टेशन राजस्थान मधील आवडते पर्यटन स्थळ आहे. माउंट अबू हे भारताच्या राजस्थान राज्यातील सिरोही जिल्ह्यातील आरवली पर्वतरांगे मधले उंच शिखर आहे. ते गुजरात राज्याच्या पालनपूरपासून ५८ कि.मी. दूर आहे. माउंट अबू पर्वताचे २२ कि.मी. लांब आणि ९ कि.मी. रुंद असे खडकाळ पठार आहे. गुरु शिखर हे अरवली पर्वत रांगेचे सर्वात उंच शिखर आहे. ते समुद्रसपाटीपासुन १७२२ मीटर उंच आहे. माउंट अबू हे 'वाळवंटातले नंदनवन' म्हणून ओळखले जाते कारण त्यात अनेक नद्या,तलाव,धबधबे आणि सदाहरीत जंगले आहेत. माउंट अबू चे प्राचिन नाव अर्बुदांचल असे आहे. राजस्थान ...अजून वाचा

24

२४. राजस्थान- लॅंड ऑफ किंग्स.. ६

२४. राजस्थान- लॅंड ऑफ किंग्स.. ६ राजस्थान प्रेक्षणीय स्थळे- ५. जोधपुर- द ब्लू सिटी जोधपुर जागेला गेटवे टू थर सुद्धा म्हणले जाते. जोधपुर निळ्या इमारतींसाठी, तिथल्या मिठाई, किल्ले, शानदार महाल आणि मंदिरे ह्यांसाठी पर्यटकांमध्ये विशेष प्रसिद्ध आहे. इथे बरीच घरे निळ्या रंगात आहेत त्यामुळे जोधपूरला ब्लू सिटी सुद्धा म्हणले जाते. इथे सूर्य नेहमीच तळपत असतो त्यामुळे जोधपुर ला सूर्य नगरी सुद्धा म्हणले जाते. जोधपुर राजस्थान मधले दुसरे मोठे शहर आहे. आणि इथली लोकसंख्या १० लाखांच्या वर आहे त्यामुळे जोधपुरला महानगर म्हणून घोषित केले गेले. २०१४ मध्ये जोधपुर ला मोस्ट एक्स्ट्रा ऑर्डिनरी प्लेसेस ऑफ़ द वर्ल्ड मध्ये प्रथम स्थान ...अजून वाचा

25

२५. राजस्थान- लॅंड ऑफ किंग्स.. ७- शेवटचा भाग

२५. राजस्थान- लॅंड ऑफ किंग्स.. ७- शेवटचा भाग * राजस्थानातील प्रेक्षणीय स्थळे- ६. बिकानेर- "कॅमल फेस्टिवल साठी प्रसिद्ध वाळवंटातील थर वाळवंटामध्ये वसलेले बिकानेर हे पर्यटकांसाठी पर्वणीच आहे. ह्या शहरात उंट हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. 'उंटांचा देश' अशी सुद्धा बिकानेर ची ओळख आहे. हजार हवेलींचे शहर म्हणून देखील बिकानेर प्रसिद्ध आहे. इथले कॅमल फेस्टिवल विशेष प्रसिद्ध आहे. त्याची मजा अनुभवण्यासाठी ह्या जागी लाखोंच्या संखेने पर्यटक भेट देतात. आणि फक्त आपल्या देशातलेच नाही तर विदेशांतून येणारे पर्यटक इथे भेट देण्यासाठी उत्सुक असतात. ही जागा राजस्थान मधल्या ३ मुख्य वाळवंटी प्रदेशांपैकी एक आहे. उंट आणि वाळवंटा बरोबर इथले मुख्य आकर्षण म्हणजे ...अजून वाचा

26

२६. महाराष्ट्रातील किल्ले- भाग १

२६. महाराष्ट्रातील किल्ले- भाग १ किल्ले हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय आहे. प्रत्येकाला किल्ल्यांविषयी उत्सुकता असतेच. महाराष्ट्रात अनेक आहेत. किल्ले शत्रूंपासून संरक्षण करण्यास सुलभ जावे आणि सभोवतालच्या प्रदेशावर नियंत्रण ठेवता यावे, म्हणून बांधलेल्या वास्तू. इंग्रजीत कॅसल, फोर्ट, सिटॅडल, बर्ग वगैरे संज्ञांनी उल्लेख होतो. तर मराठीत दुर्ग, गिरिदूर्ग, द्वीपदुर्ग, जंजिरा, गढी, कोट, गड, बालेकिल्ला वगैरे संज्ञांनी या वास्तूचे वेगवेगळे प्रकार सांगितले जातात. किल्ल्यांचे बांधकाम आणि उपयोग फार प्राचीन काळापासून पूर्ण जगभर होत आला आहे. ज्या काळी अनपेक्षित परकीय आक्रमणांची भीती होती त्या काळी घरे, मंदिरे, नगरे इत्यादि तटबंदी किंवा कोट बांधून सुरक्षित ठेवण्याची सोय केली जायची. शत्रूचा हल्ला झाल्यास ...अजून वाचा

27

२७. महाराष्ट्रातील किल्ले - भाग २

२७. महाराष्ट्रातील किल्ले- भाग २ महाराष्ट्रात बरेच किल्ले आहेत. त्यातल्या प्रसिद्ध किल्ल्यांची माहिती- १. रायगड -‘रायगड’ हा महत्त्वपूर्ण किल्ला आहे. मराठी साम्राज्याच्या इतिहासामध्ये त्याची एक खास ओळख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी इ. स. १६६४ मध्ये हा गड बांधून घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची डागडुजी करून त्याला इ. सन १६७४ मध्ये मराठा साम्राज्याची राजधानी घोषित केली. शिवछत्रपतींनी स्थापन केलेल्या स्वराज्याची राजधानी म्हणजे रायगड! छत्रपती शिवाजी महाराज यांचा शके १५९७, आनंदनाम संवत्सर, जेष्ठ शुद्ध त्रयोदशी, शनिवार ६ जून, १६७४ रोजी जो राज्याभिषेक झाला आणि तो या रायगडावर झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचे देहावसन रायगडावरच झाले. म्हणून या गडाला विशेष महत्त्व प्राप्त ...अजून वाचा

28

२८. महाराष्ट्रातील किल्ले- ३

२८. महाराष्ट्रातील किल्ले- ३ * महाराष्ट्रात असलेले किल्ले- २. राजगड- 'राजगड' हा सुद्धा शिवाजी महाराजांचा एक महत्वपूर्ण किल्ला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याची पहिली राजधानी होती. स्वत: महाराजांनी या गडाची उभारणी केली होती. इ.स. १६४५ ते १६७२ जवळजवळ २७ वर्षांचा कालखंड महाराजांनी गडावर घालविला होता. महाराजांची काही काळासाठी ‘राजगड’ ही राजधानी होती. छत्रपती शिवाजी महाराजांचा आवडता किल्ला ‘राजगड’होता. पुणे शहराच्या नैर्ऋत्येला ४८ किलोमीटर अंतरावर आणि पुणे जिल्ह्यातील भोर गावाच्या वायव्येला २४ किलोमीटर अंतरावर नीरा-वेळवंडी-कानंदी आणि गुंजवणी या नद्यांच्या खोऱ्यांच्या बेचक्यात मुरुंबदेवाचा डोंगर उभा आहे. तोरणा किल्ल्याचा बालेकिल्ला आकाराने लहान असल्यामुळे राजकीय केंद्र म्हणून हा किल्ला सोयीचा नव्हता. त्यामानाने राजगड दुर्गम असून ...अजून वाचा

29

२९. महाराष्ट्रातील किल्ले- ४

२९. महाराष्ट्रातील किल्ले- ४ * महाराष्ट्रातले किल्ले ३. शिवनेरी किल्ला- शिवनेरी हा किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर येथे ह्या किल्ल्याचा प्रकार गिरिदुर्ग आहे. हा किल्ला तसा फार मोठा नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मामुळे ‘शिवनेरी’ किल्ल्यास महाराष्ट्राच्या इतिहासात एक वेगळेच अन् अढळ स्थान आहे. आणि हा किल्ला खूप प्रसिद्ध आहे. शिवनेरीचा हा किल्ला अतिशय प्राचीन किल्ला आहे. हा प्राचीन किल्ला महाराष्ट्र राज्यात जुन्नर गावाजवळ आणि पुण्यापासून अंदाजे १०५ किलोमीटरवर आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २६ मे इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. शिवनेरी किल्ला हा सुमारे १०७० मीटर उंच असून दक्षिण - उत्तर दीड किलोमीटर पसरलेला आहे. किल्ल्याचा दक्षिणेकडील भाग अर्धगोलाकृती ...अजून वाचा

30

३०. महाराष्ट्रातील किल्ले- ५

३०. महाराष्ट्रातील किल्ले- ५ महाराष्ट्रातले किल्ले ४. प्रतापगड- पौराणिक व एतिहासिक वारसा लाभलेले महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील पर्यटकांच पर्यटन स्थळ आहे. आणि इथे जवळच प्रतापगड हा लोकप्रिय किल्ला आहे. हा किल्ला महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध डोंगरी किल्ला आहे. महाराष्ट्रातील अनेक महत्वाच्या किल्ल्यांपैकी हा एक किल्ला आहे. शिवाजी महाराजांच्या शौर्याची आणि मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष देत हा किल्ला उभा आहे. सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात महाबळेश्वरच्या नैर्ऋत्येस सुमारे १३ किमी. वर आहे. शाहीर तुळशीदास यांनी म्हणल्याप्रमाणे ‘राजगड राजाचा, प्रतापगड जिजाईचा!’.. म्हणजेच राजमाता जिजाबाईंचा सर्वांत आवडता किल्ला हा प्रतापगड होय. नीरा आणि कोयना नदीच्या परिसरात मराठ्यांनी सत्ता मिळवली होती त्याच रक्षण करणे गरजेचे होते. त्यासाठी मजबूत किल्ला ...अजून वाचा

31

३१. महाराष्ट्रातील किल्ले- ६

३१. महाराष्ट्रातील किल्ले- ६ * महाराष्ट्रातले किल्ले ५. सिंधुदुर्ग- सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी जलदुर्ग आहे. हा किल्ला सागरी सुरक्षा मिळावी म्हणून शिवाजी महाराजांनी बांधला. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २१ जून इ.स. २०१० रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले. शिवाजी महाराजांच्या आरमारात या किल्ल्याला फार महत्त्व होते. नोव्हेंबर २५ इ.स. १६६४ रोजी याचे बांधकामाला सुरवात झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे प्रमुख केंद्र मालवण येथील जंजिरा म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला. छत्रपती शिवाजी महाराजांकडे ३६२ किल्ले होते. या सर्व किल्ल्यांचा बराच विस्तार होता. भुईकोट आणि डोंगरी किल्यांच्या बरोबरीने सागरी मार्गावरील शत्रुंची स्वारी परतून लावण्यासाठी जलदुर्गाची निर्मिती महत्त्वाची आहे, ही गोष्ट ओळखून शिवाजी ...अजून वाचा

32

३२. महाराष्ट्रातील किल्ले- ७

३२. महाराष्ट्रातील किल्ले- ७ ७. पुरंदर किल्ला- पुरंदर किल्याला ऐतिहासिक महत्व आहे ते संभाजी महाराजांमुळे. सह्याद्रीच्या पुरंदर किल्ल्यावर छत्रपती महाराजांचा जन्म झाला आहे आणि त्यामुळेच पुरंदर किल्ल्याला ऐतिहासिक महत्व लाभलेले आहे. पुरंदर हा किल्ला पंधराशे मीटर उंच आहे आणि हा पुरंदर किल्ला गिरिदुर्ग प्रकारात मोडतो. हा किल्ला पुणे जिल्ह्यातील विस्तीर्ण डोंगररांगेत आहे. इथे ट्रेकिंग ला जाणाऱ्या ट्रेकरसची संख्या बरीच असते. त्याचे कारण म्हणजे पुरंदर किल्ला ट्रेकिंगसाठी सोपा आहे. इतिहासाच्या खुणा जपलेल्या पुरंदर किल्ल्याचा विस्तार मोठा आहे. इतिहासात 'अल्याड जेजुरी, पल्याड सोनोरी, मध्ये वाहते कर्‍हा पुरंदर शोभती शिवशाहीचा तुरा', असे वर्णन असलेला किल्ला म्हणजे पुरंदर किल्ला आहे. या किल्ल्यावर काही दिवस ...अजून वाचा

33

३३. महाराष्ट्रातील किल्ले - ८

३३. महाराष्ट्रातील किल्ले- ८ ८. तोरणा किल्ला- तोरणा हा सह्याद्री पर्वतरांगांमधील प्रसिद्ध डोंगरी किल्ला आहे. आणि पुणे जिल्ह्यातला सर्वात डोंगर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला सर्वप्रथम जिंकून आपल्या स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली होती. तोरणा किल्ला प्रचंडगड म्हणून सुद्धा ओळखला जातो. तोरणा किल्ला पुणे जिल्ह्यातला दुर्गकोटातील अतिदुर्गम आणि अतिविशाल म्हणून हा गड प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातून गेलेल्या सह्याद्रीच्या पर्वत रांगेतून दोन बाजू निघून पूर्वेला पसरलेल्या आहेत. त्या पैकी एका बाजूला तोरणा किल्ला आणि राजगड हे किल्ले आहेत. दुसऱ्या बाजूला भुलेश्वर रांग असे म्हणले जाते. तोरणा किल्ला पुण्यापासून अगदीच जवळ आहे. म्हणजे पुण्यापासून रस्त्याच्या वाटेने तोरण्यापर्यंतचे अंतर ६० किमी आहे. ह्या किल्ल्याला ऐतिहासिक महत्व लाभलेले ...अजून वाचा

34

३४. महाराष्ट्रातील किल्ले- ९

३४. महाराष्ट्रातील किल्ले- ९ ९. पन्हाळा- पन्हाळा महाराष्ट्राच्या इतिहासातील प्रसिद्ध किल्ला आहे. हे ठिकाण थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले त्याचबरोबर, कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्याचे मुख्य स्थान आहे. कोल्हापूरच्या वायव्येस सुमारे १८ किमी. वर कोल्हापूर-रत्नागिरी च्या रस्त्याच्या दक्षिण दिसेह्ला सह्याद्रीच्या कुशीत एका छोट्याशा पठारावर वसले आहे. ४००० फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो. त्यामुळे इथे ट्रेकर्स ची गर्दी असते. महाराष्ट्राच्या इतिहासात ह्या किल्ल्याला अनन्य साधारण महत्व आहे. वेगवेगळ्या काळात दोन वेळा राजधानीचा मान मिळालेला हा किल्ला आजही मानाने नांदता आहे. कोकण आणि घाटमाथा यांच्या सरहद्दीवर असणाऱ्या या किल्ल्यावर ...अजून वाचा

35

३५. महाराष्ट्रातील किल्ले - १०

३५. महाराष्ट्रातील किल्ले- १० ९. सज्जनगड- छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात रायगड ही शिवशाहीची तर सज्जनगड ही अध्यात्मिक राजधानी मानली होती. समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्यामुळे पावन झालेल्या या सज्जनगडाला महाराष्ट्राच्या इतिहासात विशेष महत्त्व असलेले दिसते. समर्थ रामदास स्वामींनी या गडावर बराच काळ घालविला आणि याच गडावर त्यांनी समाधी घेतली. समर्थ रामदास स्वामी यांनी जिथे समाधी घेतली तो सज्जनगड किल्ला सातारा शहरापासून अवघ्या ९ कि.मी. अंतरावर आहे. या किल्ल्याला ७५० पायऱ्या आहेत. तसेच याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ३००० फुट आहे. या किल्ल्यावरती २ तलाव आहेत. समर्थ रामदास स्वामी यांच्याकडूनच प्रेरणा घेऊन शिवाजी महाराजांनी स्वराज्याची लढाई लढली. समर्थ रामदास स्वामी हे शिवाजी ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय