जुळले प्रेमाचे नाते

(1.9k)
  • 993.4k
  • 300
  • 462.2k

गुड आफ्टरनून.......,आज मी माझ्या शाळेतल्या काही फ्रेंड्स ला भेटायला जातेय. गेट टु गेदर आहे आमचं. तु जेवुन घे कारण, मी तिकडूनच खाऊन येणार आहे. आणि हो काळजी घे. मिस यु. बाय चला याला मॅसेज केला आता निघते नाही तर त्या माझा जीव घेतील. 'मी प्रांजल निशांत चिटणीस. काही महिन्यांपूर्वीच माझं लग्न झालं आणि मी देखील इतर नवीन लग्न झालेल्या महिलांसारखी नटून-थटून जातेय आज छोट्याच्या गेट टु गेदर ला. जास्त नाही मेकअप करत. याला नाहीच आवडत मी जास्त केलेला मेकअप. पण मी लावलेलं आयलाईनर आणि लिपस्टिक हेच त्याला प्रचंड आवडत. खरतर माझ्याच घरी ठरलं होतं भेटायचं. पण सगळ्यांना दुर पडलं असत

नवीन एपिसोड्स : : Every Thursday & Sunday

1

जुळले प्रेमाचे नाते - भाग-१

गुड आफ्टरनून.......,आज मी माझ्या शाळेतल्या काही फ्रेंड्स ला भेटायला जातेय. गेट टु गेदर आहे आमचं. तु जेवुन घे कारण, तिकडूनच खाऊन येणार आहे. आणि हो काळजी घे. मिस यु. बाय चला याला मॅसेज केला आता निघते नाही तर त्या माझा जीव घेतील. 'मी प्रांजल निशांत चिटणीस. काही महिन्यांपूर्वीच माझं लग्न झालं आणि मी देखील इतर नवीन लग्न झालेल्या महिलांसारखी नटून-थटून जातेय आज छोट्याच्या गेट टु गेदर ला. जास्त नाही मेकअप करत. याला नाहीच आवडत मी जास्त केलेला मेकअप. पण मी लावलेलं आयलाईनर आणि लिपस्टिक हेच त्याला प्रचंड आवडत. खरतर माझ्याच घरी ठरलं होतं भेटायचं. पण सगळ्यांना दुर पडलं असत ...अजून वाचा

2

जुळले प्रेमाचे नाते - भाग-२

मी हसुन परत बोलु लागली......, मी एकदा कॉलेजला जायला निघाले. भरपूर पाऊस होता, पण कॉलेजला जाणे गरजेचे होते. लेक्चर्स करन महागात पडल असत. मी ट्रेन ने स्टेशनला पोहोचले, तिथून ऑटो करेन म्हणुन थांबले होते की, एक ऑटो माझ्या समोर येऊन थांबली. मी पाहिलं तर आत निशांत होता. मला यायला सांगत होता तो. आधी मी नाही बोलले, पण एवढ्या पावसात परत ऑटोसाठी थांबन मूर्खपणाचे ठरले असते. मग काय बसले जाऊन त्याच्या सोबत. बाहेर पाऊस, आणि त्या ऑटोमध्ये मी आणि तो. छान वातावरण होत बाहेर. अचानक माझी नजर त्याच्यावर गेली. त्याचे ते फिजलेले केस डोळ्यावर येत होते, तो सारखे कंटाळून ते ...अजून वाचा

3

जुळले प्रेमाचे नाते - भाग-३

सकाळच्या अलार्म ने माझी झोपमोड झाली. घडाळ्यात सात वाजता होते. मी आज स्वतःच उठले, आज पहिला दिवस होता ना आणि निशांत चा. म्हणजे डान्ससाठीचा... डान्स बसवायचा होता त्यामुळे लवकर तय्यारी करून मला निघायचं होत. मी फ्रेश होत बाहेर आले. किचनमध्ये आई डब्बा तय्यार करत होती. "आई.., मला लवकर चहा आणि नाश्ता दे मला उशिर होतोय." काय मॅडम.! आज लवकर उठलीस, ते ही मी न उठवता...!! .... सूर्य कोणत्या बाजुला उगवला आहे...... आईने डोळा मारतच मला विचारलं.... आई..! काय ग...चल दे लवकर नाश्ता उशीर होतोय.... माझ्या हातात चहा आणि नाश्ता देत आई उच्चारली. "बाळा निशांत चांगला मुलगा आहे हा. आवडला ...अजून वाचा

4

जुळले प्रेमाचे नाते - भाग-४

मी बोलताना माझ्या समोर बसलेल्या तिघींचे हावभाव टिपत होते. गंमत ही वाटत होती. बोलता-बोलता अभिच्या नवऱ्याचा कॉल आला म्हणून स्टोरी थांबवली. "गर्ल्स मी येईपर्यंत चालू करू नका हा." आम्ही माना डोलावल्या. ती बेडरूममध्ये गेल्याने आम्ही तिघी गप्पा मारत बसलो. "काय मग प्रिया कशी चालू आहे मॅरेज लाईफ...??" मी मुद्दाम तिला त्रास देण्याचा प्रयत्न करत होते. खर तर त्यांचं लव्ह विथ अर्रेंज मॅरेज.., पण लग्नानंतर सासुने चांगलेच रंग दाखवायला सुरुवात केले. मग मॅडम ही काही कमी नव्हत्या तिनेही नाशिकचा तडका दाखवला. असे हे दोघे सासु-सुनेचे चालूच असत म्हणून नवऱ्याने बदली करून घ्यायचा प्रयत्न ही केला. हे कळल्यावर आता कुठे ...अजून वाचा

5

जुळले प्रेमाचे नाते - भाग-५

निशांतला भेटुन आज मी घरी येऊन जरा फ्रेश होऊन थोडा अभ्यास केला. उद्या बराच वेळ बाहेर जाणार त्यामुळे आजच माझा अभ्यास पूर्ण केला. सगळा अभ्यास संपवून बाहेर आले. "आई.., मी काय घेऊन जाऊ उद्या निशांतच्या घरी.??" "त्याला काय आवडत ते बनव." "ए आई मला नाही म्हाहित त्याला काय आवडत... तूच सांग काय बनवु ते....." एक काम कर छान खोबऱ्याच्या वड्या घेऊन जा. त्याला ही आवडतील नक्कीच. मला देखील ते पटलं. मग मी किचनमध्ये जाऊन खोबऱ्याच्या वड्या केल्या. मदतीला आई होती म्हणून लवकर झाल्या. सगळं आवरून मी झोपायला गेले. पण उद्या जायचं म्हणून झोप काही येत नव्हती. सारख आज ...अजून वाचा

6

जुळले प्रेमाचे नाते - भाग-६

सकाळी रोजच्या प्रमाणे उठून सगळं आवरून ऑडीमध्ये गेले. तर आज ऑडी बंद होती. मग मी माझा मोर्च्या कॅन्टीनकडे वाजवला. कॉल केला तर त्याचा कॉल लागत नव्हता. कॅन्टीनमध्ये जाताना जिन्यात एका मुलाने मला पिंक रोज दिले आणि एक ग्रीटिंग. त्या ग्रीटिंगवर थँक्स असा मॅसेज होता. काही विचारायच्या आत तो मुलगा निघून गेला. असा काय हा...! कोणी दिल हे..? स्वतःशीच पुटपुटत मी कॅन्टीनमध्ये गेले. काही तरी खायचं म्हणून काऊंटर वर गेले तर तिकडच्या एकाने ही मला पिंक रोज आणि ग्रीटिंग दिल. "हे काय.. कोण देत आहे....?? मला कोणी काही सांगेल का...??" मी त्या मुलाला विचारले. सांगत नव्हतं. मग मी ती फुलं ...अजून वाचा

7

जुळले प्रेमाचे नाते - भाग-७

"हॅलो..., बॉस आपने बोला वैसे काम हुआ।" अब हम लोग का पैसा कब मिलेगा।...... दुसऱ्या बाजुला काही वेळाने आला..... "मैं ने उसे डराने बोला था, फिर उसको मारा क्यु...??" अब पैसा भी आधा मिलेगा समझे।...आणि कॉल कट झाला. माझ्या वेतिरिक्त तिला कोणी स्पर्श ही केला नाही पाहिजे. आणि याने तर तिला मारलं आता बघ मी काय करतो ते... त्या व्येक्तीने कुस्तीत हसत परत एक कॉल केला.... "हॅलो..., इन्स्पेक्टर सर... तुम्ही त्या एका गुंड ग्रुपला शोधत आहेत ना... मी पेपर मध्ये पाहिलं होतं..... आज मी त्यांना येताना एका चाळीच्या कट्ट्यावर पाहिलं मला वाटत तुम्ही तिकडे शोधलं पाहिजे ते नक्कीच मिळतील... ...अजून वाचा

8

जुळले प्रेमाचे नाते - भाग-८

सगळे आईस्क्रीम संपवून परत हॉलमध्ये येऊन बसलो.. "आजोबा गोळ्या घेतल्या का तुम्ही....?" मी त्यांना गोळ्यांची आठवन करून देताच रूममधे गेले. मी आणि निशांतने सर्वांसाठी हॉलमध्येच बसण्यासाठी छान अशी अरेंजमेंट केली. मग आम्ही सगळे त्यावर बसलो... बाबांनी मला सगळ्यांसाठी आणलेली गिफ्ट द्यायला सांगितली.. मी एक बॉक्स आजोबांच्या समोर धरला... "आजोबा हे घ्या.. तुमच्यासाठी... आणि दुसरा बॉक्स आजीच्या समोर.. आणि हे आजी तुम्हाला..." "बाळा काय आहे आम्ही काय लहान आहोत का गिफ्ट्स द्यायला..."... आजोबा गिफ्ट्स ही आपल्या जवळच्या व्येक्तिंना द्यायची असतात.. ज्यांना आपण आपलं मानतो..सो घ्या आता." निशांतच्या समोर ही एक बॉक्स धरला... "हे तुझ्यासाठी..." त्याने ही एक स्माईल देत घेतलं. ...अजून वाचा

9

जुळले प्रेमाचे नाते - भाग-९

कालचा दिवस एवढा गोड आणि आनंदी गेलेला की मी सारखं ते आठवुन गातल्या गालात हसत होते. फ्रेश होऊन आज कॉलेजला पाहोचले. स्वतःचा अभ्यास करत बसले होते की हर्षु आली.. "काय ग प्राजु निशांत ला पाहिलस का ग तु.??? आल्यापासून दिसला नाही मला. तुला माहीत आहे ना त्याला बघितल्या शिवाय माझा दिवस पूर्ण होत नाही..?!!!" हर्षुच्या अशा बोलण्याने मी गप्प होते. पण माझ्या फेसवरील स्माईल तिने अचुक ओळखली. "काय ग प्राजु तुला काय झालं..?? एवढी का हॅप्पी आहेस..??" तिने डोळा मारत विचारल. "काही नाही ग. सहजच." मी ही काही तरी बोलायच म्हणून बोलले खर पण निशांत सोबतच्या आठवणी आठवुन ...अजून वाचा

10

जुळले प्रेमाचे नाते - भाग-१०

रात्रभर काही जाग आलीच नाही.. आज सकाळीच मला जाग आली घडाळ्यात पाहिलं तर सकाळचे सात वाजले होते... रात्री खाल्याने आता पोटात कावळे ओरडू लागले होते.. चांगलीच भूक लागली होती. एक नजर मोबाईल वर टाकली पण निशांत चा मॅसेज किव्हा कॉल नव्हता. तशीच उठली आणि छान फ्रेश होत मी आज पहिल्यांदाच एवढ्या सकाळी उठुन किचनमध्ये गेले.. स्वतः साठी आधी कॉफी बनवली... हा आता ती निशांतच्या कॉफीसारखी नक्की नव्हती झाली. पण ठीक आहे.. मग आई-बाबांसाठी चहा आणि पोहे करून ठेवले.. वाफळलेली कॉफी घेऊन मी माझ्या रूममधे आले.. सहज म्हणुन निशांतला कॉल केला तर त्याने कॉल काही घेतला नाही.. कदाचित झोपला ...अजून वाचा

11

जुळले प्रेमाचे नाते - भाग-११

सकाळच्या अलार्मने मला जाग आली. मी देखील जास्त टाईमपास न करता उठून फ्रेश व्हायला गेले. छान तय्यार होत बाहेर आले. जास्त नाही साधा ब्लॅक टिशर्ट आणि खाली ब्लू जीन्स. थंडी म्हणून माझं आवडत मऊ मऊ पिंक स्वेटर. आई आज माझ्यासाठी लवकर उठली होती.. जाणार म्हणून तिचीच जास्त घाई चालू होती.. मी गप्प जाऊन डायनिंग टेबलावर बसले... तोच निशांतचा कॉल आला.., तस आईने त्याला ही वर बोलावून घेतलं. बळे-बळेच त्याला नाश्ता करायला लावला सोबत मला ही. खाऊच्या पदार्थांची एक बॅग माझ्या बॅगेत टाकून दिली.. प्रवासात लागेल म्हणुन.. पण कोण खाणार होत ते तेलकट वैगेरे.. पण आई पुढे कोणाचं काय चालतं... ...अजून वाचा

12

जुळले प्रेमाचे नाते - भाग-१२

छान प्रवास चालु होता. निशांत गाडी चालवत होता आणि मी बडबड करत होते.. काय आहे ना मी झोपले तर ही झोपायचा मग आम्ही कोकणात नाही ढगात पोहोचायचो... छान पहाट होत होती.. मी पहिल्यांदाच अशी पहाट अनुभवत होती... आम्ही आता कोकणच्या रस्त्याला लागलो असल्याने दुतर्फा झाडं आणि मधुन रस्ता... पण काळोखामुळे काही दिसत नव्हतं हे वेगळं. मी अंदाज लावत होते सगळ्याचा. जसे आम्ही पुढे जात होतो.., तो झोपलेला सूर्य उठण्याच्या तय्यारीत दिसत होता. त्याचा तांबडा-पिवळा रंग आकाशात पसरत होता.. माझी आणि निशांतची झोप झाल्याने आम्ही सकाळचा सूर्योदय बघण्यासाठी गाडी बाजुला लावत होतो. गाडी बाजुला लावून दोघे उतरलो. निशांतने रस्त्याच्याकडेला ...अजून वाचा

13

जुळले प्रेमाचे नाते - भाग-१३

सकाळच्या सूर्याच्या किरणांनी माझी सकाळ एकदम फ्रेश झाली. आज मला लवकरच जाग आली होती.. घडाळ्यात पहिल तर सकाळचे सात होते.. स्वतःशीच हसत मी उठले... जाऊन खितकीत बसले.., तो समोरचा समुद्र आणि त्याच्यासोबत वर येऊ पाहणारा सूर्य जणु मला गुड मॉर्निंग विश करण्यासाठीच एकत्र उठल्या सारखे वाटत होते.. त्यांना बघून मला ही त्यांना विश करावस वाटलं. थोडावेळ बसुन मग मी फ्रेश होण्यासाठी गेले.. फ्रेश होऊन खाली आले तर कोणीही उठल नव्हतं... चक्क नोकर ही घरी दिसत नव्हते. मग मीच सर्वांसाठी कडक चहा आणि गोड शिरा करायचा ठरवला. गॅसवर चहाचे पातेले ठेवले आणि सगळं सामान शोधु लागले.. कस तरी चहाचे सामना ...अजून वाचा

14

जुळले प्रेमाचे नाते - भाग-१४

सकाळच्या अलार्मने मी भटकंती ची आठवण करून देताच मी उठले... पटकन फ्रेश व्हायला गेले.. फ्रेश होऊन आले. तर काय सुचत नव्हतं... एकतर जंगलात जायचं म्हणून, मी एक रेड टॉप आणि त्यावर माझं आवडत पिंक स्वेटर घातलं. खाली ब्लॅक विथ साईड रेड स्ट्रिप्स असलेली ट्रॅक पॅन्ट घातली.. आणि खाली स्पोर्टशूज घालायचे ठरले. हाय पोनीटेल घालून मी तय्यार झाले. तय्यार होऊन मी हर्षुच्या रूममधे गेले आणि तिला उठवलं.. कशी तरी ती उठली. मग राजच्या रूममधे जातानाच तो मला त्याच्या रूममधुन बाहेर येताना दिसला... त्याला बघून मी लगेच त्याला विश केलं. "गुड मॉर्निंग राज.".... "अरे वाह..! लवकर उठलीस.. गुड मॉर्निंग प्रांजल." "हो ...अजून वाचा

15

जुळले प्रेमाचे नाते - भाग-१५

"वाह, प्राजु मस्त हा रोमान्स आणि हम्म..." प्रियांकाने डोळा मारतच बघितल. "रोमान्स तर हवाच ना.... जसा तुमचा तसा मी देखील लगेच रिप्लाय दिला. माझ्या बोलण्यावर मात्र सगळेच हसले. पण काही बोल हा प्राजु तुझ्या लाईफमध्ये तर लव्ह ट्रँगल आहे. यावर मात्र मी स्वतःचे दोन्ही हात बाजूला वर करून..,"मी तरी काय करणार" अस दाखवलं. "जाऊदे तु पूढे सांग मला ऐकायचं आहे की, अजुन काय काय झालं ते." वृंदाच्या या वाक्यावर दोघीनी माना डोकावून संमती दर्शवली. तर आदल्या दिवशी भटकंतीला गेलो नाही; म्हणून मीच सकाळी लवकर उठून फ्रेश झाले आणि सर्वांना उठवायला गेले. आधी हर्षुच्या रूममधून गेले. दार वाजवुन माझाच हात ...अजून वाचा

16

जुळले प्रेमाचे नाते- भाग-१६

सकाळच्या किरणांनी माझी झोपमोड केली... जणू काही ती सांगत होती की, उठ सकाळ झालीये. बाहेर वेगवेगळे पक्षी गात होते... की कोणी मॉर्निंग सॉंगच लावलं असाव. छान सकाळ झाली होती. मी उठुन खितकीत जाऊन बसले. समोर दूरवर पसरलेला समुद्र कालच्या आठवणी ताज्या करून गेला.. आज आमचा शेवटचा दिवस होता रत्नागिरी मधला. काल निशांतने मला सुंदर पद्धतीने सॉरी म्हटलं होतं, सोबत छान सरप्राईज ही दिल होत. आणि त्याच्या मनात हर्षु आहे हे तिच्याकडे बघुन कौल ही दिला होता. यासर्वात सर्वात जास्त मलाच वाईट वाटत होतं.. तेच मनाला कळत नव्हतं की, मला का वाईट वाटत आहे. त्यात भर म्हणून की काय.., हर्षु ...अजून वाचा

17

जुळले प्रेमाचे नाते - भाग-१७

सकाळच्या कोवळ्या किरणांनी माझी झोपमोड केली... खरतर उठायची बिलकुल इच्छा नसताना मी किलकिले डोळे करून घडाळ्यात पाहिलं आणि ताडकन कारण सकाळचे दहा वाजता होते. पळत फ्रेश व्हायला गेले. तय्यार होऊन खाली आले तर आई- बाबा डायनिंग टेबलवर गप्पा मारत नाश्ता करत होते.. "अग आई..., मला उठवलं का नाहीस..?? दहा वाजून गेलेत उशीर होईल मला जायला..." मी ओरडतच खुर्चीवर बसले. माझ्या अशा बोलण्याकडे दोघेही आश्चर्याने माझ्याकडे बघत होते... आणि अचानक हसायला लागले.. मी जरा चिडूनच विचारलं, "काय झालं..??".... "मग काय हसु नको तर काय करू.. संडे आहे आज म्हणुन तुला उठवलं नाही.." आईच्या या वाक्यावर मी मोबाईलमध्ये पाहिलं.. आज खरचं ...अजून वाचा

18

जुळले प्रेमाचे नाते - भाग-१८

आज लवकरच कॉलेजमध्ये गेले. निशांतच्या कालच्या वागण्यामुळे त्याच्याशी बोलणं गरजेच होतं. मी गेले, म्हटलं आज प्रॅक्टिस असेल तर आजच बोलेन. पण तो काही ऑडीमध्ये दिसत नव्हता. ऑडीमध्येच काय कुठेच दिसत नव्हता निशांत. म्हणुन त्याला कॉल केला. तर तो कॉल काही घेत नव्हता. "आता या मुलाला काय झालय नक्की". स्वतःशी बडबडत मी कॅन्टीनमध्ये बघायला गेले. निशांत कुठेच नव्हता. ना कॅन्टीनमध्ये.., नाही लायब्ररीत की, क्लासरूमध्ये. स्वतःच्या क्लासरूमधे आले तर, तर आज हर्षु ही आली नव्हती. आजचे लेक्चर्स अर्धे संपवुन मी आज पहिल्यांदाच कॉलेजला बंक मारत निशांतला भेटायला निघाले. ऑटोने त्याच्या बंगल्याजवळ पोहोचले. आत जाताच गार्डनमध्ये आजोबा नवीन झाडं लावत बसले ...अजून वाचा

19

जुळले प्रेमाचे नाते - भाग-१९

"अरे यार.... तुला काही झालं तर नाही ना प्राजु..??" अभिने टेंशनमध्ये विचार..... "अरे गाईज ऐका तर पुढे काय मी स्वतःच्या डोक्यावर हात मारत बोलले. तिघीही आता माझ्या बोलण्याकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐकत होत्या. मी एक मोठा श्वास घेत बोलु लागले. त्या काळोखात वरून कोसळणारा पाऊस आणि मनातील भावनांचा पाऊस दोघेही धुमाकूळ घालत होते. तशीच रस्त्यावरून जाताना स्वतःच्या विचारात असताना मागुन येणाऱ्या ट्रकने मी भानवर आले खर. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. तो ट्रक आणि माझ्यात खूप कमी अंतर राहील होत. मी तर माझे डोळेच बंद करून घेतले. तो ट्रक भरदाव वेगाने आला मी माझे डोळेच बंद करून ...अजून वाचा

20

जुळले प्रेमाचे नाते - भाग-२०

आजींच्या आवाजाने मला हलकी जाग आली... "प्राजु बाळा.. उठा आता." आजी हातात चहाचा कप घेऊन उभ्या होत्या...... "आजी तुम्ही आणला चहा. मी आले असते खाली." मी लगेच बेडवर उठुन बसत बोलु लागले. पण तापामुळे काही केल्या जमत नव्हतं..... "हो ग तु आली असतीस..., पण तुझी तब्बेत ठीक नाहीये ना म्हणून घेऊन आले. चल आता फ्रेश होऊन ये आणि घे गप्प." आजी कप घेऊन तिथेच बसल्या. मी लगेच फ्रेश होऊन गरम चहा घेतला. त्या चहामध्ये मस्त कुटून घातलेल्या आल्याचा सुगंध आणि सोबत गवती चहाचा सुगंध ही दळवळत होता.. "वाह आजी अगदी मला आवडतो तसाच बनवला आहे तुम्ही चहा." मी चहा ...अजून वाचा

21

जुळले प्रेमाचे नाते - भाग-२१

सकाळच्या कोवळ्या किरणांसोबत माझी सकाळ मस्त फ्रेश झाली. लवकर उठुन मी तय्यार होऊन खाली आले.... "कशी आहे तब्बेत प्राजु..? वाटतंय ना.?" आईने नाश्ता बनवत विचारलं. मी हाताची तीन बोटं दाखवत छान अस करून दाखवत बाहेर येऊन डायनिंगवर बसले. बाबा पेपर वाचतच बोलले..., "मग परी कस वाटतंय..?? नसेल बर वाटत तर आज नको जाऊस कॉलेजला.." बाबा पेपरमधून डोकं वर काढुन बोलते झाले.... "बाबा आता छान वाटतंय मला. आणि तसही मी आज कॉलेजला नाही जात आहे. मी निशांत ला घेऊन बाहेर जाणार आहे." अस बोलताच बाबांनी प्रश्नार्थक चेहऱ्याने पाहिलं. किचनमधुन आईचा ही आवाज आला.. "कुठे जाणार आहात..??" "अग आई..., काल निशांतने माझी ...अजून वाचा

22

जुळले प्रेमाचे नाते - भाग-२२

आज लवकरच कॉलेजसाठी निघाले होते.., कारण परत डान्स प्रॅक्टिस चालु करायची होती..अजून निशांत आला नव्हता. म्हणून मी पाहोचून प्रॅक्टिस बसले. मी प्रॅक्टिस करत असताना राज ऑडीमध्ये आला.. मला बघत येऊन समोर बसला.. पण माझं काही लक्ष त्याच्याकडे नव्हतं.. मी माझ्याच धुंदीत नाचत असताना पायात पाय येऊन खाली पडलेच... राज धावत माझ्याजवळ आला... "हेय, प्रांजल जास्त लागलं तर नाही ना..??" त्याने उचलत विचारलं. "नाही.., पण पाय दुखतोय. मुरगळला वाटत." मी राजला बोलले. त्याने मला उठवुन खाली आणल, पण मला काही चालता येत नव्हतं. त्याने माझा एक हात त्याच्या हातात घेतला, तर दुसरा माझ्या कमरेत घातला आणि घेऊन जाऊ लागला. तोच दरवाजातून ...अजून वाचा

23

जुळले प्रेमाचे नाते - भाग-२३

असेच दिवस जात होते. माझी आणि निशांतची आता घट्ट मैत्री झाली होती. वाटायचा तेवढा ही वाईट आणि खडूस तो नव्हता. राग यायचा पण माझ्यावर नाही... खुप काळजी घेणारा असा होता निशांत... आजकाल प्रॅक्टिस ही बंद होती माझ्या पायामुळे. बाकी कॉलेज, भेटणं चालूच होत. उद्या रविवार असल्याने मी निशांतच्या घरी जाणार होते.. तस मी आजोबांना प्रॉमिस जे करून आले होते. आम्हाला नर्सरीमध्ये जायचं होतं. "निशांत.., तु येणार आहेस का उद्या आमच्यासोबत नर्सरीमध्ये..??" मी कॅन्टीनमध्ये बसल्या बसल्या विचारल.... "अरे यार.., मी तर पार विसरलो होतो. मला नाही जमणार वाटत, कारण मी बाहेर जाणार आहे कॉलेजच्या फ्रेंड्स सोबत." त्याने जरा नाखुषीनेच सांगितलं. मला ...अजून वाचा

24

जुळले प्रेमाचे नाते - भाग-२४-१

आजोबा नेहमी त्याच्याकडून झाडं घेत असल्याने त्यांची आणि आजोबांची छान ओळख होती. सोबत निशांतची ही. आम्ही सुंदर फुल झाड वेगवेगळ्या रंगाची, सुंदर अशी फुलझाडं बघून तर मी वेडीच झाले होते.. त्या नर्सरीमध्ये फुलपाखरा सारखी इकडून तिकडे उडत होते. काही कॅकट्स ची झाड ही घेतली. काही फळ झाड, तर काही भाज्यांची रोपटी.. टमाटर, गवती चहा... मोगरा, शेवंती, गुलाब.. खुप छान वाटत होतं. मी तर तितेच हरवुन राहील म्हणून निशांतची माझ्यावर नजर होती. सगळ घेऊन आम्ही निघालो.. येताना सगळी झाड ट्रकमध्ये ठेवली. मी आणि निशांत अजून ही मागे बसलो होतो. लवकर येऊन आम्ही काही झाड लावणार होतो.. बाकीची आजोबा लावणार होते. जसे ...अजून वाचा

25

जुळले प्रेमाचे नाते - भाग-२४-२

जरा घाईतच मी ऑडीमध्ये घुसले.... ऑडीमध्ये आज परत तशीच गर्दी होती. मी निशांतला शोधत आत गेले.., पण तो काही नाही बघून जाणार होते की, ऑडीचा दरवाजामध्ये निशांत उभा होता. मी धावत त्याच्या जवळ गेले.. "अरे निशांत.., आपण कुठे करूया प्रॅक्टिस.?? इथे तर खुप गोंधळ आहे." मी जवळ जाऊन बोलले. "एक काम करू.. आपलं कॉलेज संपलं की माझ्या घरी जात जाऊया प्रॅक्टिसला टेरेसवर... तिकडे फक्त आपणच असु., म्हणजे कोणाचा दुसऱ्याचा त्रास नाही होणार." तो पूढे चालत बोलला. "आपण उद्यापासुन प्रॅक्टिस करूया तुझ्या घरी.. कारण आज मला शॉपिंगसाठी ही जायचं आहे." मी त्याच्या मागे चालत बोलले. त्याने माझ्याकडे बघत आपला हाताचा थम्ब ...अजून वाचा

26

जुळले प्रेमाचे नाते - भाग-२५

दहा-पंधरा मिनिटांनी मी तिला कॉल केला आणि विश केलं.... "हॅपी बर्थडे टू यु माय डिअर हर्षु..." "थँक्स मला माहित होत की, तु कॉल करशील म्हणून बाजूलाच ठेवला होता मोबाईल. जस्ट केक कापला. भाई घेऊन आला होता." तिची अखंड बडबड चालू होती. मग निमंत्रण देऊन तिने कॉल ठेवला. तशी मी झोपेच्या अधीन झाले. एवढी झोप जी आज आली होती. सकाळच्या अलार्मने माझी झोपमोड केली... "चांगल्या स्वप्नांच्या वेळी हा अलार्म बरा वाजतो.." स्वतःशीच बडबडत मी फ्रेश होण्यासाठी गेले. आज मी आणि निशांत लवकरच कॉलेजमधुन निघणार होतो. बर्थडे हा लोणावळ्यात होणार होता. त्यामुळे आम्हाला लवकर निघावं लागणार होतं. मी तय्यारी करून कॉलेजमध्ये गेले. ...अजून वाचा

27

जुळले प्रेमाचे नाते - भाग-२६

"लेट तुझ्यामुळे होईल माझ्यामुळे नाही कळलं.. तुम्हा मुलींना लागतो वेळ.." थोडा कुस्तीत निशांत बोलला. तस मी त्याच्या पाठीत धपाटा "आई ग.., लागलं ना हनी-बी." स्वतःची पाठ चोळत तो ओरडला.. "एवढं काही नाही लागत.., नाटकी नुसता.." मी उठुन स्वतःच्या रूमध्ये जाता जाता बोलले. मी आईला बोलवून घेतलं कारण तीच माझी आज तय्यारी आणि हेअरस्टाईल करून देणार होती. मी आधी ड्रेस घालून घेतला. नंतर केसांची आईने छान हेअरस्टाईल केली. समोरून थोडे हेअर बाजुला काढून कर्ल केले. मागे राहिलेल्या केसांचा बन बनवुन काही केसांना कर्ल करून तिने पिनअप करून त्यावर सिल्वर आणि डायमेंटचे हेअर एक्ससर्सरीज लावले. आज तिनेच माझा मेकअप हिंद द्यायचं ठरवल ...अजून वाचा

28

जुळले प्रेमाचे नाते - भाग-२७

हे ऐकून निशांतने मला जवळ खेचलं.. एवढया की त्याच्या हृदयाच्या ठोक्यांचा ही आवाज मला ऐकू येत होता. त्याने जवळ आणि..... त्याचे मऊदार ओठ माझ्या गुलाबी ओठांवर टेकवले... हे सगळं माझ्यासाठी अनपेक्षित होतं. स्वतःला बाजुला करत त्याने हर्षलकडे पाहिलं.. "पटलं तुला आता.. माझी पहिली किस आणि शेवटची किस फक्त आणि फक्त तिच्यासाठी असेल." एवढं बोलून त्याने माझा हात धरला आणि मला खेचत घेऊन खाली आला.. आम्ही लगेच आमच्या गाडीमध्ये जाऊन बसलो आणि काही ही न बोलता निशांतने गाडी स्टार्ट केली.. रात्रीच्या अकरा वाजता आम्ही निघालो होतो. गाडीमध्ये दोघेही शांत.. कोणीच कोणाला काही बोलत नव्हतं. मी तर शरमेने अर्धी झालेली. थोडं पुढे ...अजून वाचा

29

जुळले प्रेमाचे नाते - भाग-२८

आम्ही त्या हॉटेलमध्ये गेलो. त्या हॉटेल च नाव होतं.., "ड्रीम हाऊस". आम्ही आत जाताच निशांतने रिसेप्शनवर चौकशी केली एकाच रूम असल्याचं कळलं. त्यामुळे निशांतने रूम बुक केली. आज आम्हाला एकाच रूममध्ये ऍडजस्ट करावं लागणार होत. ती दुसऱ्या मजल्यावरची शेवटची रूम होती. ती देखील हनीमून स्पेशिअल.. काय करणार दुसऱ्या हॉटेल मध्ये ही जागा नसेल तर. म्हणून आम्ही जास्त विचार न करता आमच्या रूममधे गेलो. त्यांनी विचारला असता आम्ही बाबांना कॉल लावून दिला. कारण वय लहान असल्याने आम्हाला ते देत नव्हते. पण नक्की काय प्रॉब्लेम झाला आहे हे बाबांनी समजावलं तेव्हा त्यांनी आम्हाला रूम दिली. लिफ्टमध्ये मी, निशांत आणि एक वेटर सोबत आलेला. ...अजून वाचा

30

जुळले प्रेमाचे नाते - भाग-२९

"पण मला आता टेंशन आला आहे त्या हर्षुच. कारण तिचं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तिने मला आधीच सांगितलं की, तुझ्यापासून दूर रहा. आता हे सगळं होऊन बसले आहे. उद्या काय होईल काय म्हाहित." एवढं बोलून मी जरा काळजीत बसले असता निशांत माझ्या समोर बसला. माझा चेहरा स्वतःच्या ओंजळीत घेत त्याने मला छान समजावलं." हे बघ हनी-बी... माझं तुझ्यावर प्रेम आहे. हर्षल काय करेल म्हाहित नाही. पण तू कसलच टेंशन गजेऊ नकोस. आता तिला तुला काही करण्याआधी माझ्याशी डील करावी लागेल. तुझ्या केसालाही मी धक्का लागू देणार नाही." एवढं बोलून त्याने माझ्या डोक्यावर किस केली. छान वाटत नाही. आपली कोणी ...अजून वाचा

31

जुळले प्रेमाचे नाते - भाग-३०

आम्ही निघालो होतो... निशांत गाडी चालवत होता आणि मी बाहेरचा निसर्ग अनुभवत होते. त्या गोबऱ्या गालाच्या काळ्या ढगांनी सूर्याला आपल्या कवेत लपवुन टाकलं होतं. पण तो सूर्य ही किती शहाणा.., तो पण बरोबर ढगांच्या मागुन स्वतःचं डोकं वर काढु बघत होता... त्याची सोनेरी किरणं त्या ढगांच्या मागुन सर्वत्र पसरली होती... काही पक्षी ग्रुप करून फिरत होते. दुतर्फा झाड आणि त्यातून नागमोडा निघालेला रस्ता. मी खिडकी अजून ही ओपन ठेवली होती. छान वाटत होतं. आम्ही जात असता मला मधेच एक माळरान दिसलं आणि तस मी निशांतला गाडी थांबवायला सांगितली."निशांत.., गाडी थांबव..." माझ्या अचानक आशा बोलण्याने तो जरा गडबडला आणि गाडी बाजुला ...अजून वाचा

32

जुळले प्रेमाचे नाते - भाग-३१

"कॉजेल नंतर माझ्या घरी प्रॅक्टिस. आई.., चालेल ना तुम्हाला. मी प्रांजल ला सोडयला येत जाईल." निशांत आईची परवानगी घेत "हो चालेल, तु आहेस तर कसली काळजी नाही बघ मला निशांत." आई ने छान हसुन सांगितलं.मग थोडं बोलून निशांत निघाला. खरतर आई त्याला जेवायला थांबवत होती. पण घरी आजी-आजोबांची काळजी वाटत होती म्हणून तो निघाला. मी त्याला सोडायला म्हणुन खाली जाते सांगून त्याच्या सोबत आले. हेल्मेट आणि त्याचे कपडे घेऊन आम्ही निघालो. लिफ्टमध्ये दोघंच..., कोणीच कोणाशी बोलत नव्हतं की, अचानक निशांतने माझा हात घट्ट ठरला. त्याच्या अशा करण्याने माझे तर हार्ट बीटच वाढले. मी हात सोडायचा प्रयत्न करत होते पण कसल ...अजून वाचा

33

जुळले प्रेमाचे नाते - भाग-३२

या तिघी तर चांगल्याच दचकल्या... "काय मूर्ख आहे ती हर्षल. अरे अस प्रेम हिसकावून मिळत का..! ते मुळात दोघांच्या असावं लागतं." प्रिया तर चांगलीच चिडली होती. मागून अभि आणि वृंदाने ही सुरात सूर मिसळले.. मी तिघींना शांत केलं..."अरे, तुम्ही आता चिडू नका.. झालं ते कधीच. आणि प्रेमात माणसाला नाही कळत आपण चुकीचं वागत आहोत की, बरोबर.. त्याला फक्त हवं असत ते प्रेम... आपल्या जवळच्या व्यक्तीने आपल्यावर केलेलं प्रेम. तसच काहीस हर्षुच होत." मी एक स्माईल देत समजावलं. तेव्हा कुठे तिघी शांत झाल्या. "अग पण एवढं झालं तरीही काही बोलली नाहीस मला.." अभि जरा रागातच बोलली. "मॅडम तुम्ही नाशिकला होतात. शिफ्ट ...अजून वाचा

34

जुळले प्रेमाचे नाते - भाग-३३

तो जवळ आला आणि माझा चेहरा ओंजळीत घेतला.. "हे बघ हनी-बी..., मी अस नाही म्हणत की जिंकायचं आहेच पण तु प्रॅक्टिसवर लक्ष तरी दे.. जिंकन आपल्या हातात नाहीये. पण मेहनत तर आपण केलीच पाहिजे ना.." छान समजावत होता निशांत.. "सॉरी निशांत..., मी देईन आता नीट लक्ष.." मी लगेच त्याला सॉरी म्हटलं... तो हसला. आणि जे नको व्हायचं तेच झालं. शेवटी त्याची नजर पडलीच... माझ्या गालावर.. "काय ग.., हे काय झालं तुझ्या गालावर काय आहे.." हे ऐकताच मी स्वतःचा चेहरा बाजूला केला. "काही नाही निशांत..." मी काही तरी लपवते आहे हे निशांतला कळलं तस त्याने माझा हात त्याच्या डोक्यावर ठेवला... "शपथ घे ...अजून वाचा

35

जुळले प्रेमाचे नाते - भाग-३४

घरी आले. निशातने ने मला सोडलं आणि तो निघून गेला होता. आज बाबा ही ऑफिस मधून लवकरच आले फ्रेह होऊन बाबांशी गप्पा झाल्या. मग आम्ही जेवुन घेतलं आणि मी बेडवर अंग टाकलं. दिवसभराच्या गोष्टी मनात घोळत होत्या... राहून राहून वाईट हर्षल च वाटत होतं..., पण राग ही आलेला तिच्या वागण्याचा. आनंद होत होता तो निशांत आपल्या आयुष्यात आल्याचा.. परत एकदा देवाचे आभार मानुन मी झोपी गेले. असेच दिवस जात होते. आम्ही रोज निशांतच्या घरी प्रॅक्टिस करत होतो. कॉलेजमध्ये ही सगळी काही नॉर्मल झालेलं. फक्त मी आणि हर्षु काही आधी सारखे फ्रेंड्स नव्हतो. मी आणि स्वतःचा अभ्यास असच काहीसं चालू होतं माझं. आणि ...अजून वाचा

36

जुळले प्रेमाचे नाते - भाग-३५

माझ्या या वाक्यावर तर दोघी चांगल्याच उडाल्या. अभि शांतपणे ऐकत होती.. "अग, काय हे... नुसता मूर्खपणा आहे. हे अस त्या मूर्ख, मंद मुलीला तीच प्रेम मिळालं असत का.??" वृंदा रागावतच बोलली. "ती हर्षु अक्कल शून्य गाढव आहे का?? आणि नंतर काय झालं म्हणजे.. आणि तुला जास्त काही झालं नाही ना ग..???" प्रियांकाने काळजी पोटी विचारले असता. मी फक्त हसुन मानेनेच नकार दिला. पण या सर्वांत अभि जरा शांत बघून प्रियाच बोलली.... "अग., अभि तु काहीच नाही का ग बोलणार.???" तिने आश्चर्याने पाहिलं अभिकडे. "माहीत होतं मला.." अभि शांतपणे बोलली. तस दोघीही ओरडल्याच.. "तुला माहित होत.??? आम्हला सांगावसं नाही का वाटलं ...अजून वाचा

37

जुळले प्रेमाचे नाते - भाग-३६

"काका अहो हव तर पाय पडतो मी.., पण मला दर्शन घेऊ द्या. कोणाच्या तरी जीवनमरणाचा प्रश्न आहे ओ.." तर त्यांचे पायच धरले. कोणाच्याशी समोर न झुकणारा आज मात्र त्यांच्याकडे विनवण्या करत होता. त्याच्या अनवाणी रक्त आलेल्या पायांना बघून त्यांचं ही मन नकार देऊ शकल नाही.. आणि त्या काकांनी त्याला दरवाजा उघडून दिला. "बर बाळा लवकर कर.." ते फक्त एवढंच बोलले. त्याने मानेने होकार देत तो आत गेला.समोर गणपतीची मूर्ती.. डोळे बंद करून त्याच्या समोर हात जोडले निशांतने.. "देवा.., का रे तिच्यासोबत एवढं वाईट व्हावं. मरण्याच्या दारात उभी आहे. खुप मानते रे तुला, तुझी भक्ती भावाने पुजते.. तिच्या बापतित नको ...अजून वाचा

38

जुळले प्रेमाचे नाते - भाग-३७

आज सकाळीच मला लवकर जाग आली. उठुन बसायचा प्रयत्न केला तर काही जमत नव्हतं. आजूबाजूला पाहिलं तर कोणी नव्हतं. तशीच पडून राहिले. काही वेळाने एक नर्स आली आणि तिच्या मदतीने तिने मला बेडला टेकून बसवले.... "काही हवं आहे का तुम्हाला.??" एक गोड स्माईल देत तिने माझ्याकडे पाहिलं. "मला जरा आरसा देता का तुम्ही..?? मला स्वतःचा चेहरा बघायचा आहे." माझं बोलण ऐकून ती "आणते हा" एवढं बोलून रूमबाहेर गेली.सोबत आली तेव्हा एका हातात नाश्ता आणि एका हातात आरसा. तो आरसा त्यांनी माझ्याकडे दिला. मी रोजच्या सारख म्हणून स्वतःला आरशात आणि......... हातातला आरसा कधीच खाली पडला होता. तोंडातुन शब्द फुटत नव्हते. दरवाजा ...अजून वाचा

39

जुळले प्रेमाचे नाते - भाग-३८

"ते बाकीच्यांसाठी होत, आता खर बोल माझ्याशी. सांग कशासाठी हे उपवास.. निशांत मला माहित आहे तुला भूक सहन होत मग हे कशाला करतो आहेस." मी काळजीपोटी त्याला विचारले असता. त्याने फक्त एक मोठी स्माईल दिली.. "वेडु तुझ्यासाठी करतो आहे." स्वतःचे डोळे बंद केले. एक दीर्घ श्वास घेतला आणि तो बोलु लागला.. "तुला माहीत आहे., त्यादिवशी तुला प्रपोज केलं आणि मी सरांनी बोलावल म्हणून गेलो. आणि जेव्हा परत आलो तर तू तिथे नव्हतीस.. मी पूर्ण कॅम्पसमध्ये शोधलं तुला.. पण तू कुठेच दिसत नव्हतीस. तेव्हा एका मित्राने सांगितलं की, कॉलेजसमोर एक ऍकसिडेंट झाला आहे... पळत बाहेर आलो आणि....." स्वतःचे डोळे पुसत तो ...अजून वाचा

40

जुळले प्रेमाचे नाते - भाग-३९

आज सकाळपासुन मी निशांतची वाट बघत होती. कारण तो घरी गेलेला फ्रेश होण्यासाठी. एकतर बिचारा रात्री माझ्यासाठी थांबत होता. त्रास नको म्हणुन.. किती समजुदार आहे हा खडूस. माझ्यावर एवढं प्रेम करतो., माझी काळजी घेतो. माझ्या घरच्यांना, स्वतःच्या घरच्यांना किती सांभाळून घेतो. खडूसवर आता तर प्रेम अजूनच वाढत जात आहे. "पण राहिला कुठे हा मुलगा.." स्वतःशीच बडबड करत असताना आई आली. ती सकाळीच येऊन बसली होती. पण डॉक्टरने बोलावल असल्याने गेलेली बाहेर. तीच आली मला तर वाटलं निशांत असेल. "काय ग आई., काय बोलले डॉक्टर साहेब. अजुन किती दिवस मला ठेवुन घेणार आहेत." मी एक डोळा मारून हसुन विचारल. "अजून काही ...अजून वाचा

41

जुळले प्रेमाचे नाते - भाग-४०

डोळे उघडले तर समोर सगळे काळजीमध्ये बसले होते. शेजारी आई होती. बाबा आणि आजोबा काहीतरी बोलत होते.. मी डोळे तेव्हा मी बेडवर होते... "आई.., मी इथे कशी आली ग.??" माझ्या वाक्यावर सगळ्यांनी माझ्याकडे पाहिलं... "बाळा तु मघाशी चक्कर येऊन खाली पडलीस तेव्हा बाबांनी तुला उचलुन बेडवर झोपवलं." आईने ही घडलेलं सांगून टाकल. "पण आई अस कस झालं ग... कशी ही असली तरीही ती माझी बेस्ट फ्रेंड होती. हर्षुच ऍकसिडेंट झालं यावर तर विश्वासच बसत नाहीये माझा." माझे डोळे परत भरून आले आणि मी आईला घट्ट मिठी मारून रडु लागले. "बाळा, तिच्या नशिबात होत ते झालं ग.. आता आपण तरी काय करू ...अजून वाचा

42

जुळले प्रेमाचे नाते - भाग-४१

पण यासर्वांत मी आणि निशांत बरेच जवळ आलो होतो.. आमच्यामधलं प्रेम आता नव्याने बहरत होत. एक्साम ही जवळ आल्या सगळं विसरून मी जोमाने अभ्यासाला लागले.. आजकाल मी आणि निशांत लायब्ररीत बसून अभ्यास करायचो.. त्यात राज असायचा, पण मधेच त्याला आठवण आली की त्याच्या भावनांचा बांध तुटे... अशाच एके दिवशी मी कॅन्टीनमध्ये बसले असता माझा मोबाईल वाजला.... कॉलवर राजचा नंबर झळकत होता. "हॅलो...,बोल ना राज" मी हातातलं काम करतच विचारले. "हॅलो मी राज नाही.., राजचा मित्र राहुल बोलतोय. तो क्लासरूम मध्ये चक्कर येऊन पडला आहे.. तु येतेस का जरा...??" एवढं बोलुन त्याने कॉल कट केला. मी माझ्या हातातलं सगळं कसतर बॅगमध्ये भरल ...अजून वाचा

43

जुळले प्रेमाचे नाते - भाग-४२

अलार्मने आज जाग केलं पण सुट्टी म्हणून मीच तो बंद करून झोपले.. जाग आली ती आईच्या हाकेने.. कंटाळा उठले.. तसा मोबाईल हातात घेऊन निशांतला गुड मॉर्निंग विश केलं.. थोडा टीपी करून फ्रेश व्हायला गेले.. फ्रेश होऊन बाहेर आले आणि आईसोबत नाश्त्या करायला बसले.. आज छान अशा इडलीचा बेत होता.. पोटभर नाश्ता झाल्यावर आईने लिस्ट सांगितली की, या दिवाळीत काय काय बनवायचं ते.. यावेळी जरा जास्तीच बनवायचं ठरलं होतं कारण आम्हाला ते निशांतच्या घरीही द्यायचं होत.. "मग आई.., कोणत्या पदार्थांपासुन सुरुवात करूया...??" मी हातात मोबाईल घेऊन आईला विचारले... "अग आधी आपल्याला शॉपिंगसाठी जायचं आहे.. कारण रवा, मैदा, साखर, तुप वैगेरे सगळं घेऊन ...अजून वाचा

44

जुळले प्रेमाचे नाते - भाग-४३

"अरे निशांत तु....???! कधी आलास...??." मी सोफ्यावर जाऊन बसतच विचारले.... तेव्हा कुठे त्याने स्वतःच तोंड त्या मोबाईलमधुन काढल आणि माझ्याकडे बघुन फक्त एक स्माईल दिली... त्याच्या त्या स्माईलच मला काही कळलंच नाही... "मी काय विचारल आणि याच काय चालू आहे..??" स्वतःशीच बोलत मी किचनमध्ये निघुन गेले.. "काय ग आई कधी आला हा खडूस..." मी फ्रीजमधुन पाण्याची बॉटल काढुन पाणी पित विचारले... "तु जेव्हा झोपा काढत होतीस तेव्हा आला.. तुझ्या रूमधे गेलेला पण तू झोपली होतीस म्हणून आला बाहेर आणि एकटाच बसला आहे कधीचा.." आई कपामध्ये चहा ओतत बोलली.. तशी माझ्या हातात पाण्याची बॉटल तशीच... आणि मला आठवल.., तो स्पर्श... ती किस ...अजून वाचा

45

जुळले प्रेमाचे नाते - भाग-४४

आजचा दिवस मी लवकरच उठले. कारण आज मला निशांत सोबत त्याच्या दिवाळी खरेदीसाठी जायचं होतं. फ्रेश होऊन किचनमध्ये गेले आईच्या चेहऱ्यावर भलंमोठं प्रश्नचिन्ह होत... "आज सूर्य कोणत्या दिशेने उगवला आहे जे तु कॉलेज नसताना ही लवकर उठलीस प्राजु...???" आई हसत बोलली.. "काय ग आई...! आता काय मी लवकर ही उठु नको का...!!" मी जरा नाराजीने बोलले असता आई माझ्याजवळ आली. "अग बाळा लवकर उठलीस म्हणुन विचारले. कुठे बाहेर जायचं आहे का आज..???" एक स्माईल देत आईने विचारले. "नाही ग आता नाही संध्याकाळी जायचं आहे..!" मी लगेच बोलले आणि नंतर स्वतःची जीभ चावले.. कारण निशांतसोबत जायचं हे आईला माहीत नव्हते.. आई माझ्याकडे प्रश्नार्थक चेहऱ्याने ...अजून वाचा

46

जुळले प्रेमाचे नाते - भाग-४५

"मी सांगितल ना आता तू सांग बर..." आईने लगेच प्रश्न केला. हो नाही.. करत मी बोलु लागले.."अग आई.. ते मला निशांत आवडतो. खरतर खूप आधीपासुन तो आवडू लागला होता. त्याने माझी काळजी घेणं.. त्याला माझ्या बद्दल सगळं नाहीत आहे .., मला काय आवडत.., काय नाही ते.. अग आई त्याने माझ्यासाठी सोडलेली, पाणीपुरी खायला सुरुवात केली.." "त्यात हर्षल ला ही तो आवडायचा.." आणि मी तिच्या बर्थडे ला झालेला प्रकार सांगितला. हे ऐकून तर आई थोडी शॉकमध्ये होती.. "त्यात आमच्या डान्स नंतर त्याने मला प्रपोज केलं. त्यात माझं ऍकसिडेंट झालं.. त्यानंतर त्याने माझ्यासाठी मंगळवारचे उपवास सुरू केले.. कधीही देवासमोर पाया न पडणारा आता ...अजून वाचा

47

जुळले प्रेमाचे नाते - भाग-४६

आईच्या गोड आवाजाने माझी सकाळी झाली.... किलकिले डोळे उघडवत मी उठले.. आज दिवाळीचा पहिला दिवस होता.. "धनत्रयोदशी"... फ्रेश होऊन बाहेर आले.. बाबांना तर चक्क पाच दिवस सुट्टीचे मिळाली होती.. म्हणजे यावर्षीची दिवाळी छान होणार होती. सोबत अजून एक गोड गोष्ट म्हणजे निशांत येणार होता... वाह...!! अजून काय पाहिजे माणसाला... "गुड मॉर्निंग बाबा..." मी टेबलावर बसत बोलले. त्यांनी ही मला हसत विश केलं. "अग ऐकतेस का ग...! दिवाळी आहे तर निशांत आणि आई-बाबांना ही बोलवू असा माझा विचार आहे.." बाबा न्युजपेपर बाजुला करत आईला विचारत होते. "हो चालेल मी पण आता तेच सांगणार होते..." हात पुसत आई किचनमधून बाहेर येत बोलली. यासर्वात सर्वांत जास्त आनंद होत ...अजून वाचा

48

जुळले प्रेमाचे नाते - भाग-४७

"मॅडम आता पूर्ण दिवाळी तुमच्याकडेच आहे मी..." त्याने स्वतःच्या हातांची घडी घालून स्वतःचे डोळे बंद करत मोठी स्माईल दिली.. ऐकून तर मी उडालेच.. किती हसु आणि काय करु हे कळत नव्हतं.. निशांत एकच दिवस नाही तर चक्क तीन ते चार दिवस आपल्या डोळ्या समोर असणार आहे. अजून काय गिफ्ट पाहिजे माणसाला. डोळे लगेच पाणावले हे अचुक निशांतने ओळखलं आणि माझ्या डोक्यावर एक टपली मारली.."रडकी हनी-बी.." "अरे एक ना तु काही पाहिलं नाहीस वाटत... "काय ग.???" "नीट बघ कळेल..." मी हसत बोलले."सांग ना काय बघू नक्की कळत नाहीये."मी कानाजवळची इज बत बाजूला करत दाखवलं तेव्हा त्याला दिसले.... "हे तेच कानातले आहेत ना मी दिलेले ...अजून वाचा

49

जुळले प्रेमाचे नाते - भाग-४८

सुगंधित उठण लावुन मी बाहेर आले.. ते मानेवर विखुळलेले माझे केस... मी चेहऱ्याला क्रीम लावून घेतली... आईने साडीवर असा तिचा ब्लाऊज काढून तो माझ्या मापाचा करून ठेवला होता. "आई....!! लवकर ये मला साडी नेसवून दे." मी तर रूमधूनच ओरडले. तशी आई धावपळत आली."काय ग..., काय झालं..??" "आई मला साडी नसव ना...!" मी हातात साडी घेऊन उभी होती."काय ग.. काय झालं प्राजु अशी का ओरडली..??" मागून आजी ही आल्या."काही नाही झालं आई.. हिला साडी नेसवायची होती म्हणून बोलावून घेतलं." आई आता येत माझ्या हातातली साडी घेत बोलली. "काय ग प्राजु तुला साडी नाही नेसता येत..??" आजी हसत आत येत बोलल्या. "काय आजी आम्ही कुठे रोज ...अजून वाचा

50

जुळले प्रेमाचे नाते - भाग-४९

"अग छडी नाही.. फटाके आणले आहेस ना..." मागून निशांत हातात भल्यामोठ्या ब्यागा घेऊन येत बोलला. तिकडच्या काकांनी त्याला मदत आणि आम्ही सगळे आत आलो. "दिवाळीच्या शुभेच्छा आसावरी मॅडम.. कशा आहात तुम्ही..??" मी त्यांना मिठी मारत विचारलं. "मी छान आहे.. तु कशी आहेस आणि तुला ही दिवाळीच्या शुभेच्छा.." मिठी घट्ट करत त्यांनी ही शुभेच्छा दिल्या."कशी आहे आता तब्बेत प्रांजल..?? निशांतकडुन कळलं तुझं ऍकसिडे झालेल. आता तब्बेत ठीक आहे ना.???" त्यांनी काळजीने विचारलं.. "अहो मी एकदम ठणठणीत आहे. हा निशांत काही ही सांगतो.. माझं कुठे ऍकसिडे होतंय.. त्या बिचाऱ्या ट्रकच झालं ऍकसिडे.." माझ्या या वाक्यावर तर त्या जोरात हसल्याच..."काय ग हे... किती हसवशील..! चला म्हणजे ...अजून वाचा

51

जुळले प्रेमाचे नाते - भाग-५०

डायनिंग टेबलवर आम्ही सगळं छान ठेवलं होतं.. डाळ, भात, बटाटा भाजी.., श्रीखंड-पुरी.., अळुवड्या.., पापड-लोणचं आणि बाबांचे आवडते गुलाबजामुन.. अस पण सर्वांना आवडेल अस जेवण होत..डायनिंग टेबलवर समोर बाबा तर बाबांच्या बाजुला आजोबा.. आजोबांच्या समोर आजी.. आजीच्या बाजूला मी आणि माझ्यासमोर निशांत.. आणि बाबांच्या समोर आई.असे सगळे आम्ही बसलो होतो."घ्या सगळ्यांनी पोटभर जेवा हा..." आईने सर्वांना सांगितलं. तस मी ताटातील श्रीखंड पुरीवर ताव मारला.. समोर निशांत होताच.. ज्याची नजर फक्त माझ्यावर होती.., पण मी काही त्याच्याकडे बघत नव्हते.. "का बघु मी...?? मी असताना कोणी दुसरं त्याला ओवाळावे.. मी कस सहन करू ना.." हे सगळं मी माझ्या मनात बोलत होते आणि एक ...अजून वाचा

52

जुळले प्रेमाचे नाते - भाग-५१

"सॉरी ना... माफ कर. परत असा गैरसमज करून नाही घेणार. पक्कावाला प्रॉमिस.." मी स्वतःचे कान धरून माफी मागितली तेव्हा त्याने स्वतःचा राग सोडला.. मग थोडं बोलून आम्ही बाहेर आलो... चहा-नाश्ता करून निशांतला एअरपोर्ट वर जायचं होतं तिला घ्यायला.. खरतर सोबत मी ही जाणार होते.. पण निशांतच्या घरी जायचं होतं पण आजोबांचं नको बोलले आणि रियाला इकडे घेऊन यायच त्यांनीच ठरवल. त्यामुळे निशांत तिला घ्यायला गेलेला.. मी आणि बाबा ज्वेलरीच्या दुकानात गेलो.. कारण आजी-आजोबांनी माझ्यासाठी सोन्याच ब्रेसलेट गिफ्ट म्हणून दिल होत मग आम्ही ही निशांतला सेम ब्रेसलेट घेणार होतो.. मी आणि बाबांनी मिळून छान अस सिम्पल पण त्याला आवडेल अस ब्रेसलेट घेतलं ...अजून वाचा

53

जुळले प्रेमाचे नाते - भाग-५२

अलार्म वाजत होता आणि मी तो बंद करून करून झोपत होते.. शेवटी तो मोबाईल ही कंटाळला आणि बंद झाला... मी ही जास्त वेळ न लोळता उठुन बसले.. आणि मला आठवल की काल रात्री तर रिया बाजुला होती.. पण आता ती नव्हतीच तिथे. पण बाहेरून हसण्याचे आवाज मात्र येत होते..मग मी उठुन फ्रेश झाले आणि बाहेर आले. समोर सोफ्यावर निशांत, आजोबा, रिया आणि बाबा बसले होते आणि त्यांच्या चांगल्याच गप्पा रंगल्या होत्या. मी माझ्या रूमधुन सरळ तिथे गेले... "काय कसल्या एवढया गप्पा चालू आहेत." मी सोफ्याजवळ जात विचारल."काही नाही ग आमच्या अशाच गप्पा चालू होत्या.." रिया निशांतला टाळी देत बोलली. "अच्छा." मी ...अजून वाचा

54

जुळले प्रेमाचे नाते - भाग-५३

"हे कस काय झालं..??? म्हणजे मी मघाशी इस्त्री करून घडी वैगेरे करून बाहेर गेले होते. कोणी केल असेल..?" बोलून मी निशांतकडे पाहिलं.. त्याचा चेहरा काही वेगळच सांगत होता.."प्रांजल का केलंस अस... मला माहीत आहे तुला रिया आवडत नाही. अग आम्ही फक्त फ्रेंड्स आहोत आणि नात्याने बहीण-भाऊ.. तु हे चुकीचं केलंस हा.. अस नव्हतं करायला पाहिजे.. आता जर तिने पाहिलं तर तिला किती वाईट वाटेल.." निशांत भरभर बोलत होता.. माझ्या चेहऱ्यावे फक्त एकच भाव होते..., "हे मी केलं नाहीये.." पण आज निशांत काही वाचू नाही शकला ते भाव याचच जास्त दुःख होत होत. आणि रिया चा ही काय टायमिंग बघा.. आमच्यात ...अजून वाचा

55

जुळले प्रेमाचे नाते - भाग-५५

"व्वा यार...!! निशांत जीजू किती रोमॅंटिक आहे ग प्राजु...."वृंदा माझ्याकडे बघत बोलली.. यावर मी फक्त एक डोळा मारला..."काय ग बाबांनी बर तुम्हांला प्रपोज करू दिल.. म्हणजे तेव्हा तु फक्त सेकाँड इयर ला होतीस ना.???" प्रियाच्या या वाक्यावर मी पाच मिनिटं शांत झाली.."अरे...!! प्रिया तु पण ना..." अभि जरा रागवत बोलली. "काय ग काय झालं....??" प्रियाने जरा प्रश्नार्थक चेहऱ्याने अभिकडे पाहिलं... "अभि असुदे ग.. आता ट्रीटमेंट चालू आहे. आणि बरच झालं ना आम्हाला आधीच कळलं.." हे बोलताना मात्र माझा चेहरा उतरला होता.. कारण ही तसच होत. एक दीर्घ श्वास घेऊन मी बोलु लागले..."जेव्हा माझं ऍकसिडेंट झालेलं तेव्हा डॉक्टरांना कळलं की माझ्या गर्भाशयाला ...अजून वाचा

56

जुळले प्रेमाचे नाते - भाग-५४

"सॉरी गाईज मी तुमचं बोलण ऐकल.. पण प्रांजल हे सगळं तुझ्याचसाठी आम्ही करत होतो.. कारण तु विसरली आहेस तिने एक मोठा स्पोज घेतला..."की आज तुझा वाढदिवस आहे आणि दिवाळीच्या गडबडीत तु तो विसरली आहेस." हे सगळं माझ्यासाठी थोडं धक्कादायक होत.. मी स्वतःचा वाढदिवस विसरावे. आणि आपण उगाच त्या रियाला वाईट साईड बोलत होतो." मी माझ्या मनातच माफी मागण्याची प्रॅक्टिस करत होते.."सॉरी प्रांजल.. खरतर मीच सर्वांना सकाळी तुला सांगायचं किव्हा विश करायचं नाही हे सांगुन ठेवलं होतं. म्हणजे तो कुर्ता जाळण्याचा प्लॅन ही त्यातलाच कारण तुझं मन दुसऱ्या कशामध्ये तरी गुंतून रहावं म्हणून हे केलं आणि हो मेरे भाई को कुछ ...अजून वाचा

57

जुळले प्रेमाचे नाते - भाग-५६

"अग आई...! हे काय कोणी पाठवले एवढे बुके..??? बाबांना प्रमोशन मिळालं की काय ग ???" मी आनंदाने धावत रूमधून आले आणि आई ला विचारले.."नाही ग बाळा. बाबांना प्रमोशन वैगेरे काही नाही मिळालं..आई हे बाबांसाठी नाही तर हे सगळे बुके तुझ्यासाठी आहेत. त्यावरच्या सगळ्या ग्रीटिंगकार्ड वर तुझं नाव आहे प्राजु.." आईने जरा हसुन सगळं सांगितलं. मग मी ही धावत जाऊन सगळे ग्रीटिंगकार्ड बघायला सुरुवात केली पण जे मला हवं ते मात्र मला त्यावर दिसलं नाही..."अग आई हे निशांतने नाही पाठवलेत...?!!!" माझ्या या वाक्यावर आई मात्र उडालीच..."अग मला वाटलं तुझ्यासाठी निशांतने पाठवले असतील... पण तुला कस कळलं की हे निशांतने नाही ...अजून वाचा

58

जुळले प्रेमाचे नाते - भाग-५७

तो दिवस मात्र निशांत सोबत छान गेला.. त्या दिवसाच्या बरोबर दोन दिवसांनी मी हॉलमध्ये बुक वाचत बसले असता दरवाजावरील वाजली. मी जाऊन उघडले तर समोर एक कुरिअर वाला मुलगा हातात एक मोठं कुरिअर घेऊन उभा होता.."मिस प्रांजल प्रधान..??" त्याने माझ्याकडे बघत विचारले."येस.. मीच आहे. बोला." मी ही त्याच्याकडे बघत बोलले."मॅडम तुमचं पार्सल आलं आहे. हे घ्या आणि इथे सही करा." एवढं बोलून त्याने ते भल मोठं पार्सल माझ्यासमोर ठेवलं आणि पाठीमागच्या बॅगमधुन अजून एक पार्सल कडुन माझ्या हातात ठेवलं. "हे अजुम एक आहे घ्या. आणि इथे सही करा." एवढं बोलून त्याने सही घेतली आणि तो निघून गेला. मी त्या भल्यामोठ्या पार्सलकडे ...अजून वाचा

59

जुळले प्रेमाचे नाते - भाग-५८

निशांतच्या अचानक बोलल्याने आम्हचे हसरे चेहरे अगदी गंभीर झाले. बाबांनी ते पत्र आणायला लावले. मी तर नाखुशीने ते पत्र आले..बाबांनी ते पत्र हातात घेतलं. आणि वाचायला सुरुवात केली...प्रिय जानु...,"कशी आहेस. छानच असशील म्हणा.. मी बघतो ना तुला रोज.. कसा.., कधी..! नको हा विचारुस..!!. आणि आता तर तु एकवीस वर्षाची झालीस.. तुझा वाढदिवस झाला. बघ ना मला काही यायला जमल नाही म्हणुन तुझ्यासाठी गिफ्ट्स पाठवले. आवडले ना ग तुला..???"आणि हो तु मला विसरली असशील पण मी नाही तुला विसरलो. ते क्षण कधीच नाही विसरू शकत. येतोय मी लवकरच तुला भेटायला.. तुला माझी बनवायला. तुला कायमच स्वतःचं बनवायला... मी येतोय. भेटु ...अजून वाचा

60

जुळले प्रेमाचे नाते - भाग-५९

"अरे हा काय फालतुपणा आहे. प्राजु कोण होता तो..?? तो नक्कीच राज असणार. मूर्खपणा नुसता. आणि किती हे ट्विट्स आयुष्यात प्राजु !!" वृंदा चांगलीच भडकली होती. "अग तु शांत हो बघु. तीच बोलं तर पूर्ण ऐक." प्रिया तिला शांत करत बोलली. "हो.., माहीत आहे खुप ट्विट्स आहेत. पण हे घडलं आहे ग माझ्यासोबत मी तरी काय करणार. तूच सांग मला तुम्हाला अस माझ्या आयुष्याबद्दल खोटं सांगून काय मिळणार आहे ना...??" मी समजुतीच्या भावात बोलत होते."अग तु वेडी आहेस का...! आम्हचा विश्वास आहे तुझ्या बोलण्यावर. तु पूढे काय झालं ते सांग." सर्वाना शांत करत अभि मधेच बोलली.तो दिवस.., म्हणजे आमचं कॉलेज सुरू ...अजून वाचा

61

जुळले प्रेमाचे नाते - भाग-६०

"पण नक्कीच ओळखीतला असावा. कारण त्याला कॉलेजमध्ये येण्याची परवानगी मिळाली होती. पण नक्की कोण..?" विचार करत असतानाच मागून निशांतने हात ठेवला आणि मी दचकले. माझ्या दचकलेल्या चेहऱ्याकडे बघत त्याने प्रश्नार्थक चेहऱ्याने माझ्याकडे पाहिलं. मी फक्त एक नजर त्या पत्रावर टाकली आणि नजरेनेच निशांतला ते पत्र दखावले. "अरे परत पत्र??? कोणी दिलं.??" "माझ्या क्लासमधल्या एका मुलीने आणुन दिल. मी काही विचारण्या आधीच ती निघून गेली." "ठीक आहे. दे मी वाचतो." एवढं बोलून त्याने ते पत्र घेतलं आणि समोर बसुन वाचायला लागला. हे सगळं काही होत असताना मी निशांतच्या चेहऱ्यावरचे भाव टिपत होते. "हं..!! ठीक आहे. हा जो कोणी आहे ना तो नक्कीच आपल्या कॉलेजमधला आहे. ...अजून वाचा

62

जुळले प्रेमाचे नाते - भाग-६१

दुपारी निशांतसोबत घडलेला प्रसंग आठवुन मी अजून ही विचार करत होते... नक्की कोण करत असेल. "जर तो राज असेल पण राज का करत असेल.. त्याला हे करून काय मिळणार आहे.. निशांतला झालेली दुखापत मोठी नव्हती.. पण ती आज.. काय माहीत उद्या काय वाढून ठेवलंय.. "स्वतःशी विचार करत मी बेडवर पडले होते.. संध्याकाळी निशांतला भेटायला जाईल अस ठरवत होते, खर पण उगाच ओरडेल म्हणुन तो विचार डोक्यातून काढुन टाकला. स्वतःच्या विचारात असताना बाजूचा फोन वाजला आणि माझ्या हृदयाचे ठोके ही... घाबरतच स्क्रीनवर पाहिलं.. निशांतच नाव स्क्रीनवर बघून कुठे बर वाटल.. "हॅलो..., काय मॅडम.. किती वेळ लागतो एक कॉल घ्यायला. मला वाटलं झोपली ...अजून वाचा

63

जुळले प्रेमाचे नाते - भाग-६२

सकाळी घडलेला प्रकार आम्ही कोणालाही सांगायचं नाही असं ठरवलं होतं. कारण आधीच घरात तणावाच वातावरण असल्याने निशांतला अजुन कोणाला द्यायचं नव्हतं. पण तो कॉल कोणी केला याची माहिती निशांत काढणार होता. यासर्वात मध्ये अनभिज्ञ होते ते आजी-आजोबा. त्यांना मात्र काहीच माहीत नव्हतं. आणि आम्ही ही ते त्यांना सांगणार नव्हतोच. मी स्वतःच्या रूममधे कॉलेजचा अभ्यास करत बसले असता बाबा आले. इकडच्या, तिकडच्या गप्पा झाल्या, पण मी कोणालाही आज घडलेला प्रसंग काही सांगितला नाही की मला आलेला कॉल. त्या गप्पा जेवनाच्या टेबलावर ही सुरूच होत्या. जेवुन मी स्वतःच्या रूममधे बसले असता मला निशांतचा कॉल आला.."हॅलो हनी-बी... निशांत बोलतोय." "हा बोल ना.. काही माहिती मिळाली का ...अजून वाचा

64

जुळले प्रेमाचे नाते - भाग-६४

"तो क्षण येण्याच्या पाच मिनिटं आधीच अचानक कॅफेची लाईट गेली.. त्यामुळे जरा अंधार पसरलला. परत लाईट आली तेव्हा व्यक्ती मेन डोअर जवळ रेड कलरच जॅकेट घातलं होत ती व्यक्ती लपून बघत असायचं जाणवलं निशांतने दरवाजाच्या जवळ धाव घेतली.. ते बघून ती व्यक्ती ही पळु लागली...यासर्वात मी ही लगेच बाहेर आले.. जेव्हा बाहेर आले तेव्हा समोर रेड जॅकेट मध्ये दुसर तिसरी कोणी नसुन तो राज होता. निशांत आणि राज एकमेकांवर हमला करत होते.. त्यांची मारामारी बघुन मग मीच त्यांना अडवायला गेले आणि त्यांना दूर केलं.."निशांत मी तुला सोडणार नाही... का.?? का माझ्या बहिणीचा जीव घेतलास तु...? अस करून काय मिळाल ...अजून वाचा

65

जुळले प्रेमाचे नाते - भाग-६३

माझी ईच्छा नसताना ही ते मला कराव लागणार होतं. कारण कालच निशांतला दुखापत झाली होती. आता त्याला गमावण नव्हतं.. नाही.., हो करत मी ते गिफ्ट काऊंटर वरून घेतलं.. "घेतलंस ते गिफ्ट..!! गुड गर्ल. आता ते ओपन कर आणि त्यात जे काही आहे ते उद्या घालुन यायच आहे. पत्ता आज रात्री पाठवतो. आणि हो रागात फाडून टाकण्याचा प्रयत्न करू नकोस.. नाही तर मला तुझ्या लाडक्या निशांतला त्रास द्यावा लागेल. तसा ही तो मध्ये मध्ये येत आहेच म्हणा.. पण ठीक आहे काही दिवसच. नंतर आपण जाणारच आहोत सर्वांपासून दूर... जिथे असु फक्त तु आणि मी...." आणि त्याचा तो हसण्याचा आवाज माझ डोकं ...अजून वाचा

66

जुळले प्रेमाचे नाते - भाग-६५

आम्ही तिघे ही त्या कॅफेमध्ये परत न जाता घरी गेलो. कारण राज आणि माझ्यासाठी हे धक्कादायक होत. हर्षलने माझा करण्याचा प्रयत्न हा विचारच मला नकोसा वाटत होता. शेवटी परत मॉल आणि आम्ही दोघांनी आप- आपलं घर गाठलं. मी काही ही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. गप्प जाऊन स्वतःच्या रूममधे गेले आणि मनसोक्त रडले.. "का रडु नये..!!.. जिला मी माझी बेस्ट फ्रेंड मनात होते. जी माझ्यासाठी माझ्या बहिणी सारखी होती.. खरतर मानलेली बहिणीच आणि तिनेच मला जीवे मारण्याचा विचार करावा.. काळीज पिळवणूक टाकणार सत्य आज मला निशांतकडून कळल होत.." रडून रडून डोळे लाल झालेले.. कोणाला कळु नये म्हणुन बाथ घेतला.. आणि हसऱ्या चेहऱ्याने मी ...अजून वाचा

67

जुळले प्रेमाचे नाते - भाग-६६

कॉल वाजत होता... रिंग जात होती पण घेत मात्र कोणी नव्हतं.. "अरे यार डॅड आहे कुठे...?? कॉल का घेत आहे..?" राजने मोबाईलकडे बघितला आणि कंटाळुन तो बेडवर फेकून दिला. स्वतःच्या डोक्याला हात लावुन बसला होताच की त्याच्या रूमचा दरवाजावर कोणी तरी वाजवला. कंटाळवाणा चेहरा करतच तो नाखुषीने उठला आणि त्याने दरवाजा उघडला... समोर उभ्या असलेल्या व्यक्तीला बघून मात्र त्याचा चेहरा चांगलाच खुलला होता.. कारण समोर त्याचे डॅड उभे होते.."सरप्राईज माय बॉय...." त्यांनी आनंदाने राजला दरवाजातच मिठी मारली. "डॅड.....!!!" राजला समोर बाबांना बघून शब्दच सुचत नव्हते. त्याने ही जोरात मिठी मारली. असे हे बाप-लेक किती तरी वेळ मिठीत होते. नंतर दोघांनी स्वतःच्या भावनांना आवरत ...अजून वाचा

68

जुळले प्रेमाचे नाते - भाग-६७

"थँक्स गणु. कुठून तरी मार्ग निघाला." मी हात जोडून गणुचे आभार मानले. आणि सगळी बुक्स बाजुला ठेवून देऊन झोपण्याचा केला.पण न राहून मला सारखा एकच प्रश्न सतावत होता आणि तो म्हणजे ती व्यक्ती नक्की कोण असेल... अशी जिला माझ्या आवडीनिवडी महित आहेत. कोण असेल जो मला एवढा चांगलं ओळखत असेल, आणि काय हवं असेल त्याला. असे एकना अनेक प्रश्नांनी डोकं बधीर करत होते. मी एका कुशिवरून दुसऱ्या कुशीवर अलटून-पलटून झोपत होते. पण झोप काही केल्या येत नव्हती. शेवटी देवाचे स्मरण केले तेव्हा कुठे निद्रे देवीने ततास्तु म्हटलं. आणि मी झोपेच्या स्वाधीन झाले. कारण सकाळी कॉलेजनंतर राज च्या घरी जायचं ...अजून वाचा

69

जुळले प्रेमाचे नाते - भाग-६८

छान असा नॉनव्हेजचा बेत होता. जेवताना अचानक राजच्या डॅड ला ठसका लागला तस मी समोरच्या ग्लासमधील पाणी त्यांच्या समोर पण काही केला त्यांचा ठसका कमी होण्याचं नाव घेत नव्हता. शेवटी मी उठले आणि माझ्या डाव्या हाताने कसला ही विचार न करता त्यांच्या पाठीला चोळलं आणि त्यांना वर बघायला लावलं. तेव्हा कुठे त्यांचा ठसका कमी झाला. आणि त्यांना बर वाटल. "सॉरी हा काका मी काही न विचारता तुमच्या कोटला आणि पाठीला हात लावून चोळल." मी जरा घाबरतच त्यांची माफी मागितली. नाही म्हटलं तरी ते श्रीमंत आणि बाहेरच्या देशात रहाणारे. काय माहीत त्यांना हे आवडेल नाही आवडेल."अग बेटा त्यात सॉरी काय.. बरोबर ...अजून वाचा

70

जुळले प्रेमाचे नाते - भाग-६९

तेवढ्यात निशांत एकदम माझ्या जवळ आला.. "शांत हो.. तो मागेच उभा आहे. तो ब्लॅक टीशर्ट हेल्मेट घातलेला मुलगा राजच्या निघाल्यापासुन आपला पाठलाग करत आहे. मी लगेच मिस्टर गोखले यांना मॅसेज केला आहे. राज ने आपल्याला सर्वांचा एक ग्रुप केला आहे आणि मी त्या ग्रुपमध्ये मॅसेज टाकला आहे." निशांतने मला हे सांगताच मी फक्त खाली पडायचे बाकी होते. मी बघण्याचा विचार करत असताना त्याने मला तस करू नकोस अस डोळ्यांनीच बजावलं..."नको बघुस त्याच्याकडे. त्याला कळलं नाही पाहिजे की आपल्याला तो आपला पाठलाग करत आहे हे कळलंय." निशांतच्या बोलण्याने मी हातात असलेला गरम चहा ओठांना लावला. आणि नॉर्मल वागण्याचा प्रयत्न करू लागले. "तु राजच्या ...अजून वाचा

71

जुळले प्रेमाचे नाते - भाग-७०

"हॅलो...."हाय बेबी... आज तु चक्क मला कॉल केलास...?!वाह..!! म्हणजे तुला कळलं तर माझं प्रेम.." तिकडून ती व्यक्ती होती. "हा. मला कळलं तुझं माझ्यावर किती प्रेम आहे ते म्हणूच मला तुला भेटायचं आहे." मी घाबरत बोलले. हे बोलत असताना माझे हात थरथरत होते हे निशांतने पाहिलं आणि माझ्या हातांना त्याने आपल्या हातांची उब दिली. आणि का कोण जाणे मला असख्य हत्तीचं बळ आल आणि मी त्या व्यक्तीशी खुप काही बोलु लागले.."डार्लिंग तु बोलते आहेस. हा तुमचा काही प्लॅन नाही ना मला पकडायचा..?? काय आहे ना आज काल तु आणि तो तुझ्या मित्र निशांत सारखे त्या राजच्या घरी जात असतात ना ...अजून वाचा

72

जुळले प्रेमाचे नाते - भाग-७१

तिकडे माझे आई-बाबा ही होते. त्यांना बघून मी धावत जाऊन आई-बाबांना मिठी मारली. कदाचित त्यांना घडलेला प्रकार मिस्टर सांगितला असावा. आता वाट बघायची होती ते त्या व्यक्तीची. आणि तो क्षण आला.एका रूममधे आम्हाला नेण्यात आल. तिकडे एकाला खुर्चीला बांधल होत. तोंड काळ्या कपड्याने झाकेलेलं होत. मिस्टर गोखले आले आणि त्यांनी त्याच्या चेहऱ्यावरचा तो कपडा काढला. आणि ती अज्ञान व्यक्ती आज आमच्या समोर बसलेली होती.काळे लांब मानेपर्यंतचे केस.. कदाचित गोरा असावा कारण मार खाण्याने चांगलाच लाल झाला होता.. आणि ते डोळे... त्या डोळ्यांना आधी ही कुठे तरी पाहिल्याचं मला आठवत होत. पण कुठे ते आठवत नव्हतं. मिस्टर गोखले त्याच्या जवळ जाऊन त्यांनी ...अजून वाचा

73

जुळले प्रेमाचे नाते - भाग-७२

सफेद रंगाच्या त्या कुर्त्यामध्ये खुललेलं तीच सौंदर्य त्यात आताच आंघोळ करून आल्याने अजून ही ओले असलेले तिचे केस तिच्या चेहऱ्यावर येत होते. हलकं ऊन असल्याम त्या सोनेरी किरणांमध्ये तिचा तो चमकणारा चेहरा मला वेड लावणारा होता.. आता पर्यंत खूप मुलींना पाहिल पण ही वेगळी होती.. हृदयात घर करून गेली. मी मोबाईल सोडून फक्त तिलाच बघत होतो की एक मुलगा आला आणि तिला घरात घेऊन गेला.""त्या दिवसानंतर माझं आयुष्यच बदललं. मला तिला सारखं बघण्याची ओढ वाटु लागली होती. तिचा चेहऱ्या मला सगळीकडे दिसु लागला होता.. हवी हवीशी वाटावी अशीच होती ती..""एक दिवस हिम्मत करून मी तिच्या घरी गेलो... बेल वाजवली ...अजून वाचा

74

जुळले प्रेमाचे नाते - भाग-७३

"देव तुमचं बाथरूम खुप मोठं आणि आलिशान आहे...""म्हणजे काय. माझ्या वडिलांनी ते मोठया डिझाइनर कडुन करवून घेतले आहे. आवडलं तुला....""हो खरच खूप मस्त आहे.." "प्रांजल एक बोलु का...??" "हो बोल ना...""प्रांजल मला तू खुप आवडतेस. आणि मला तुझ्याशी लग्न करायचं आहे.." "देवांश तु वेडा आहेस का.. आपण अजून खुप लहान आहोत आणि लग्न वैगेरे तर खूप दूर आहे. मी तुला फक्त माझा मित्र मानते. तस काही ही माझ्या मनात नाही आहे.." "अग आता लग्न करायचं बोलत नाही आहे. नंतर करू पण तू मला होकार तर दे.. मला तू हवी आहेस.., माझं बनवायचं आहे मला तुला.""हे बघ देवांश मला वाटत आपण बाहेर जाऊया. मला ...अजून वाचा

75

जुळले प्रेमाचे नाते - भाग-७४

"अग मी का सोडून जाऊ तुला आणि रागवायचे कशाला. हा आता तू तुझ्यासोबत झालेला प्रसंग नाही सांगितलास म्हणजे अस नाही होत ना की मी हे नातं संपवाव. कदाचित ती योग्य वेळ आलीच नसावी की तू तुझ्यासोबत झालेला तो वाईट प्रसंग मला सांगावास. माहीत आहे वाईट प्रसंग सांगायला ही हिम्मत लागते. आणि आपलं नात एवढं ही ठिसूळ नाहीये की या छोट्या मोठ्या गोष्टींचा त्याच्यावर परिणाम हॊईल. मी तेव्हा ही तुझ्यासोबत होतो आता ही आहे आणि कायम राहील...""मी तेव्हा ही प्रेम करत होतो, आता ही करतो आणि यापुढे ही काहीही झालं. कितीही वाईट प्रसंग येउदे मी तुझ्यावर तेवढच प्रेम करेन. कारण ...अजून वाचा

76

जुळले प्रेमाचे नाते-भाग-७५।।

"काय बोलतेस...?? प्राजु एवढं काही झालं आणि तुला आम्हाला एका शब्दाने सांगावस ही नाही का ग वाटलं.." प्रिया आणि चांगल्याच भडकलेल्या माझ्यावर.. "अग काय आणि कोणत्या तोंडाने हे सांगायचं मी.. तो दिवस जरी आठवला तरी मला भीती वाटते. नको ग ते दिवस.. आणि त्या आठवणी..." मी डोळ्यातलं पाणी पुसण्याचा प्रयत्न करत बोलले.. जे अभिने पाहिलं आणि माझ्याजवळ येऊन तिने मला घट्ट मिठी मारली.. किती बर वाटतं नाही...!! जवळच्या व्यक्तींची ती मायेची ऊब... "गाईज आता तुम्ही तिला काहीच बोलु नका.. खरतर हे झालं तेव्हा तिने मला कॉल केला होता. मला ही अपेक्षा नव्हती की देवांश दादा एवढ्या खालच्या थराला जाईल. ...अजून वाचा

77

जुळले प्रेमाचे नाते-भाग-७६।।

माझे ओले केस मी टॉवेलने बांधले होते. एका हातात चहाचा कप घेऊन मी रूममधे आले. "अजून हा झोपला आहे..!! हा आळशीपणा...!! "खडूस उठ ना... आता काय रविवारचे बारा वाजवणार आहेस का..???" तरीही हा चादर डोक्यावर घेऊन घेऊन झोपत होता. मी चहाचा कप टेबलावर ठेवला आणि माझे ओले केस त्या टॉवेलमधून मोकळे केले... त्या पिक्चर च्या हिरोईन सारखं करत मी ही माझे केस झटकले.. त्या ओल्या केसांमधल पाणी जाऊन निशांतच्या चेहऱ्यावर एखाद्या कारंज्यासारख उडाल... "काय ग हनी-बी झोपू दे ना मला... रोज लवकर उठुन जातो ना ग ऑफिसला. आज रविवार आहे. आणि मी झोपणार आहे..." निशांत चादर घेऊन परत झोपला... ...अजून वाचा

78

जुळले प्रेमाचे नाते-भाग-७७।।

"ब्लॅक टीशर्ट मध्ये तर.. हाय मे मर जावा...!!" अस बोलून मी आरशातल्या निशांतची लांबुनच नजर काढली आणि स्वतःच काम बसले.. स्वतःच्या धुंदित मी स्वताच काम आवरलं आणि निघाले... बाहेर नाश्ता करायला बसले असता आईने विषय काढला... "अग एकटीच आलीस का..??? निशांत कुठे आहे..??" मी हातातला कांदेपोह्यांचा चमचा खाली ठेवत आईकडे पाहिलं.... "अशी प्रश्नार्थक चेहऱ्याने काय बघत आहेस प्राजु..! निशांत कधीपासून तुझ्या रूममधे आहे. तु बोलली नाहीस का त्याच्याशी..?? तु अंघोळीला गेलीस म्हणून बाहेर आलेला.. त्यानंतर तुझ्या चाहुलीने परत आता गेला होता. दिसला नाही का तुला..???!!" आई जे काही बोलत होती ते मला काहीच ऐकू जात नव्हतं. मी हातातले पोहे ...अजून वाचा

79

जुळले प्रेमाचे नाते-भाग-७८।।

सकाळी लवकरचं मला जाग आली. आणि का नाही येणार. जर तुम्हाला माहीत असेल की तुमचा आवडता व्यक्ती तुमच्यासोबत एकाच आहे. हा, आता जवळ नाही. पण एकाच छताखाली..... मग कसली झोप आणि कसलं काय..!! माझं ही अगदी तसचं झालं होतं. निशांत इकडे असल्याने मला आज लवकरच जाग आली. आणि ती देखील आईच्या हाकेशिवाय... असो. "होता है कभी कभी।।....." लवकर उठुन मस्त काही तर बनवेल अस ठरवुन बाहेर आले खरं... पण मी लेट होते किचनमध्ये पोहोचायला... कारण आई आज लवकरच उठली होती आणि तिने सगळा नाश्ता ही तय्यार केला होता. ते बघून माझा थोडा हिडमुस झालेला. मग आईनेच मला निशांतला उठवायला ...अजून वाचा

80

जुळले प्रेमाचे नाते-भाग-७९।।

आता बाबा मागे आईजवळ बसले होते आणि मी पूढे निशांतसोबत.. रेडिओवर मस्त रोमँटिक गाणी लागली होती.. मी लगेच काच खाली घेतली.. सूर्य ही परतीच्या प्रवासाला लागला होता.. चहुबाजूने पसरलेली त्याची गुलाबी, हलकी निळी, मधेच लाल-पिवळी किरणं पसरली होती.., तर मधेच कुठेतरी गोबरे गाल असलेले ढग मधे-मधे गुसु पाहत होते... मधेच एकत्र येत होते तर मधेच धावत होते जस काही त्या पसरलेल्या लाल-गुलाबी अग्नीमधुन स्वतःला वाचवत असावेत... आम्ही ही आता अलिबागच्या जवळ पोहोचत होतो.. जसजशी गाडी पुढे जात होती.. समुद्राच्या खाऱ्या वाऱ्याची हलकीशी हुळूक खिडकीतून अंगाला स्पर्शून जात होती.. तो खारटपणा उगाचच त्रास देत होता. पण थंड वारा काही खिडकी ...अजून वाचा

81

जुळले प्रेमाचे नाते-भाग-८०।।

आम्ही बोलत असताना आम्हाला राज चे खूप सारे फ्रेंड्स दिसले जे बाहेरून खास त्याच्या बर्थडेसाठी भारतात आले होते.. मोठया टेबलावर ते सगळे आणि राज बसला होता. अचानक तो उठुन आमच्याकडे आला आणि आम्हा दोघांना त्याने त्याच्या सोबत बसायला सांगितले.. हो, नाही करत आम्ही सोबत गेलो.. मग आम्ही कोण.., ते कोण असा छोटासा इन्ट्रो झाला. त्यात एक मुलगी होती.. कर्ली शॉर्टहेअर्स, डार्क ब्लॅक कलरचा शॉर्ट वन पीस घातलेली. बोलण्यात तरबेत होती.... ती "सोनिया" होती. राजची लहानपणीची अब्रॉडची फ़्रेंड. सर्वांच्या गप्पा चालु होत्या. पण तिची सारखी नजर मात्र निशांतवर येऊन थांबत होती.. हे मी मात्र चांगलंच हेरलं होत. गप्पा चालू असताना ...अजून वाचा

82

जुळले प्रेमाचे नाते-भाग-८१।।

चालत आम्ही तिथे पोहोचलो. आम्ही जाताच राजने माझा हात त्याच्या हातात घेतला आणि मला एका चेअरवर बसवलं. हे सर्व माझ्यासाठी नवीन होत. आणि खरतर मी खूपच अस्वस्थ होते. कारण राज हे सगळं का करत होता हे मला काही केल्या कळत नव्हतं. कारण हे आपण आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी करतो हे माहीत होतं. पण राज माझ्यासाठी का करतोय आणि कशासाठी हे मात्र कळत नव्हतं. त्यानंतर तो ही समोर बसला. आम्ही बसताच एका वेटर ने आमच्यासाठी खायला वाढलं. दोन ग्लासात ऑरेंज ज्यूस ओतला. "अरे राज माझं जेवण झालं आहे..." "हो, माहीत आहे. मी पाहिलं ना तू किती जेवलीस ते. निशांतच्या प्रकारामुळे तु ...अजून वाचा

83

जुळले प्रेमाचे नाते-भाग-८२।।

"कोण म्हणजे.. आहे एक मुलगी.!!" "अरे मुलगीच असणार ना...!! पण तिला काही नाव.., गाव असेल ना.??" "हा.. आहे ना. नंतर सांगेल. चल तिथे जाऊन बसु या का आपण.???" राजने हॉटेलच्या जवळ असलेल्या बाकांड्याकडे बोट दाखवत विचारलं तस मी मानेनेच होकार दिला. मग आम्ही चालत तिथे पोहोचलो आणि बसलो.. "राज... किती छान वाटतं नाही हा अथांग पसरलेला समुद्र... लाटांचा आवाज. म्हणजे बघ ना काय नात असेल ना त्या लाटांचं आणि किनाऱ्याच.. आणि त्यात हा मधे पसरलेला दूरवर नजर जाईल एवढा विशाल समुद्र.. पण तरीही त्यांच्या नात्याच्या मध्ये काही तो येऊ शकत नाही.. लाटांना भले दूर घेऊन जातो पण त्या लाटा ...अजून वाचा

84

जुळले प्रेमाचे नाते-भाग-८३।।

"ओह माय गॉड... आता या सोनियचीच कमी होती तुमच्या लाईफ मध्ये..." प्रिया ओरडतच बोलली. "हो ना यार. काय मंद ती.. पैशासाठी लोक काय काय करतात नाही..!!" वृदाने प्रियाला दुजोरा दिला. हे ऐकून मी फक्त हात वर केले.. आणि पुढे बोलू लागली.. आम्ही बीच वरून आलो.. मस्त रिफ्रेश वाटत होतं. बीचवरून येताच मी आणि निशांत फ्रेश होऊन राज ला भेटायला त्याच्या रूममध्ये गेलो. "हेय राज, येऊ का आत...??" माझ्या प्रश्नावर राजने हसतच आत यायला सांगितलं. "राज, आम्ही सगळे निघत आहोत. हेच सांगायला आलो होतो. मी आणि प्राजु..." "अरे यार.., निघालात तुम्ही...??? मला वाटलं अजून काही दिवस आपण इथे थांबु मस्त ...अजून वाचा

85

जुळले प्रेमाचे नाते-भाग-८४।।

जाग आली ती दरवाजा वाजवण्याची.. कोणी तरी ते वाजवत होत. मी कसे तरी डोळे उघडत बेडवरून उठले आणि दरवाजा तर समोर निशांत होता. हातात कॉफीचा मग घेऊन... "गुड मॉर्निंग मॅडम..., इन युअर सर्व्हिस मॅम. फॉर यु कप ऑफ कॉफी..." एवढ बोलून त्याने माझ्याकडे पाहिलं. "गुड मॉर्निंग.. क्या तुम इतना लेट कॉफी लाया। अभि साहेब को पता चला ना तो बोहोत दाटेंगे हा। बाद मे बोलने का नई बताया क्यु नही।।" "हो का मॅडम....!! अस बोलतच तो रूममध्ये घुसला. हातातला ट्रे बाजुच्या टेबलवर ठेवत त्याने माझ्या कमरेत हात घालत मला स्वतःच्या जवळ खेचलं... "अरे काय करतोस तू...?? सोड मला, वेडा ...अजून वाचा

86

जुळले प्रेमाचे नाते-भाग-८५।।

आईची सकाळपासुन लगबग चालु होती.. "अग प्राजु उठ ना...!!" अशी ओरडतच ती माझ्या रूममध्ये आली. पण येताच मला तय्यार खुश ही झाली.. "नशीब माझं तू तरी तय्यार बसली आहेस. तुझे बाबा कधी तय्यार होतील काय माहीत..." अस बोलतच ती माझ्या रूममधून आल्यापावली गेली देखील.. "काय ही आई..!!" तिची उगाचच धावपळ चालू होती. काय आहे ना आज तो दिवस होता.. म्हणजे "होळीचा". तशी "होळी" दर वर्षी येते.., पण यावर्षाची होळी स्पेशिअल होणार होती. कारण आज मी ती निशांत सोबत साजरी करणार होते. आज होळीला दहन आणि उद्या धुलीवंदन. बस आता धम्माल एवढंच बाकी होत.. मी, आई- बाबा.. आम्ही तय्यार होऊन ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय